डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
असे पण सर्व कॉल , msgs record
असे पण सर्व कॉल , msgs record संबंधित कंपन्या पहिल्या पासून करत असणार .
अशी मला पक्की शंका आहे.
गूगल उघड उघड.
तुमचे स्थान,तुम्ही कोणत्या स्थानी किती वेळ होता.
ते हॉटेल होते की बार होता बार असेल तर तुम्ही दारू पिता .
असे नको ते उद्योग उघड करत असते.
मग privecy नावाचा प्रकार अस्तित्वात तरी आहे का?
सरकार लं हवी तेव्हा ही माहिती मिळू शकते ते कशाला स्वतःची यंत्रणा निर्माण करून कर्मचारी वाढवतील
फेरफटका... येस्स... हाच तो
फेरफटका... येस्स... हाच तो मेसेज
रेकॉर्डेड, व्हॉटसफ, पोटसफ.. :हहपुवा:
इथले मेसेज वाचून भलतीच करमणूक होतेय.
कशाला स्वतःची यंत्रणा निर्माण
कशाला स्वतःची यंत्रणा निर्माण करून कर्मचारी वाढवतील
<<<
ते असली कामं "आउटसोर्स" करतात आजकाल.
रेकॉर्डेड वरुन.... हल्ली मला
रेकॉर्डेड वरुन.... हल्ली मला माहित नसलेल्या नंबरवरुन फोन आला की हॅलो ही म्हणावं का नाही असं वाटतं. माझं व्हॉईस प्रिंट माझ्या बँकेत किंवा अनेक ठिकाणी माझी सिग्नेचर म्हणून अस्तित्त्वात आहे. ते अगदी पहिल्या फळीत ओळख पटवायला आज वापरलं जातं. अर्थात दुसरी आणि तिसरी फळी अस्तित्त्वात असली तरी रेझिंग द बार मधला एक बार रीच झाला तर ती नक्कीच धोकादायक असेल.
अनोळखी व्यक्तीशी बोलल्याने त्या व्यक्तीला माझ्या आवाजाचे गुणधर्म साठवून ते पुनरुत्पादित करुन माझ्या अपरोक्ष त्याचा पुर्नवापर करणे शक्य होईल. ही मला हल्ली भिती वाटते. सध्यातरी नुसतीच मनाचे खेळवाली भिती आहे. असं कितपत सहज होऊ शकतं, त्याला किती सँपल साईझ लागते इ. बद्द्ल माहित नाही. माझा आवाज ओबामा इतका फेमस नाही, पण फोन करुन कोणे बोललंच नाही आणि मी हॅलो आणि नंतरची फुकट बडबड केली की हा विचार दरवेळी मनात येतो इतकंच.
अशाच एका स्कॅम नंबर ला सहज
अशाच एका स्कॅम नंबर ला सहज फोन केला तर भारतीय मुलगी होती व आय अॅम ज्युलिया रॉबर्ट वर्किंग फॉर अॅमॅझोन वगैरे... हाऊ आर यू झाल्यावर मी हाऊ वॉज युवर करवा चौथ असे विचारले ..
*मी डॉ. दिपाली,*
*मी डॉ. दिपाली,*
* *माझे म्हणणे आहे की या कडाक्याच्या थंडीत ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी रात्री १० वाजता झोपल्यानंतर जेव्हाही तुम्ही अंथरुणावरून उठता तेव्हा लगेच उठू नये. कारण थंडीमुळे शरीरातील रक्त घट्ट होते, नंतर हळूहळू काम केल्यामुळे ते हृदयापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकत नाही आणि शरीर निघून जाते. या कारणास्तव, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हृदयविकारामुळे होणारे अपघात हिवाळ्याच्या महिन्यांत खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे, म्हणून आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मी पण तीच सूचना देतो.*
*साडेतीन मिनिटे: माझा सल्ला!*
विजयसिंह राजपूत डॉ
सामान्य चिकित्सक
*ज्यांना सकाळी किंवा रात्री झोपताना लघवीला जावे लागते त्यांच्यासाठी खास माहिती!!*
या साडेतीन मिनिटांत प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी.
*ते इतके महत्त्वाचे का आहे?*
या साडेतीन मिनिटांनी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.यांत सर्वात महत्वाचे म्हणजे *(वयस्कर मंडळीनी शक्यतो बेडवरच झोपावे जमिनीवरअंथरून टाकून झोपू नये)*
जेव्हा-जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा रात्रीच सुदृढ व्यक्तीही मृतावस्थेत आढळते.
अशा लोकांबद्दल आम्ही म्हणतो की, आम्ही त्यांच्याशी कालच बोललो. अचानक काय झालं? तो कसा मेला?
याचे मुख्य कारण असे आहे की जेव्हा आपण रात्री लघवी विसर्जनासाठी जातो तेव्हा अचानक किंवा अचानक आपल्याला जाग येते, परिणामी मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही.
ही साडेतीन मिनिटे खूप महत्त्वाची आहेत.
जेव्हा आपण मध्यरात्री लघवी करण्यासाठी उठतो तेव्हा आपला ईसीजी पॅटर्न बदलू शकतो. याचे कारण असे की, जेव्हा आपण अचानक उभे होतो तेव्हा मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही आणि आपले हृदय काम करणे थांबवते.
साडेतीन मिनिटांचा प्रयत्न हा एक उत्तम उपाय आहे.
1. झोपेतून उठताना अर्धा मिनिट गादीवर झोपावे.
2. *पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा.*
3. *पुढील अडीच मिनिटे गादीखाली पाय डोलत राहू द्या.*
साडेतीन मिनिटांनी तुमचा मेंदू रक्ताशिवाय राहणार नाही आणि हृदय काम करणे थांबवणार नाही! यामुळे आकस्मिक मृत्यूही कमी होतील.
तुमच्या प्रियजनांना फायदा झाला आहे, त्यामुळे त्यांना जाणीव करून देण्यासाठी नक्कीच प्रसारित करा.
*धन्यवाद!!*
45+ साठी खूप महत्वाचे
विनंत्या आणि विनंत्या
तुम्हाला हा मेसेज तुमच्यापैकी फक्त 10 लोकांना फॉरवर्ड करावा लागेल आणि त्या 10 लोकांनी हा मेसेज इतर 10 लोकांना फॉरवर्ड करावा.
तुम्हाला फक्त एक लिंक जोडायची आहे आणि लवकरच संपूर्ण देश फक्त आठ पायऱ्यांमध्ये जोडला जाईल. ,
आवडल्यास सर्व मित्रांसोबत शेअर करा- संग्रहित : - श्री जनार्दन म्हात्रे,
तुम्हाला फक्त एक लिंक जोडायची आहे आणि लवकरच संपूर्ण देश फक्त आठ पायऱ्यांमध्ये जोडला जाईल. ,>>>>>>>>>>>>> हे काय आहे> कसल्या पायर्या
आयला जाऊ कि नको?
आयला जाऊ कि नको?
जा जा!
जा जा!
आमचे आजोबा म्हणायचे... जाऊ का नको? जा. खाऊ का नको? नको.
तर... रक्ताचा भाग चक्रमपणा असला तरी, वय वाढलं की झोपेतून धाडकन उठून चालू लागू नये, कारण तोल (बॅलन्स) तिरपागडा होऊन तोल जातो आणि सभोवतालचं भान नसल्याने डोक्यावर पडून जोरदार मार बसू शकतो/ मेंदू कवटीत कंप पाऊन रक्तस्त्राव होऊ शकतो इ. इ. त्यामुळे काळजी घ्यावी.
आयला जाऊ कि नको?>>>>
आयला जाऊ कि नको?>>>>
सारांश : जटा समझाओ ईसे , ऐसे फॉरवर्ड बाजार में बहोत आते है. ये साडेतीन मिनट जो डोलता नहीं है ना, वो उठता नहीं उठ जाता है!!
संदर्भ # सन्नी भाऊ देवळे
https://youtu.be/GpizwisxHfk
अमित आमचेही आजोबा हेच
अमित
आमचेही आजोबा हेच म्हणायचे!
जेव्हा आपण अचानक उभे होतो
जेव्हा आपण अचानक उभे होतो तेव्हा मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही आणि आपले हृदय काम करणे थांबवते.>> हे फार च विनोदी आहे अशास्त्रिय.
अचानक झोपेतून उठणे.
अचानक झोपेतून उठणे.
ही शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया असते .
प्रतिशिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदू ची आज्ञा न घेता चेता तंतू,चेता रज्जु,आणि स्नायू ह्यांनी परस्पर घेतलेला निर्णय.
तेव्हा मानसिक दबाव येतो .
Heart attack येवू शकतो
पण अशी क्रिया घडणे तुमच्या हातात नसते त्या मध्ये मेंदू चा सहभाग च नसतो त्या मुळे तुमच्या इच्छे ला काही किंमत नसते.
अचानक धोका जाणवला की पण शरीर अशी
प्रतीशिप्त reaction देते
दीक्षितांनी सर्व आकडेवारी
दीक्षितांनी सर्व आकडेवारी न्यायालयापुढं ठेवली. एका सुदृढ गायीचे वजन तीनसाडेतीन क्विंटल असते. पण, ती कापल्यावर केवळ ७० किलोच मांस मिळते. एक किलो गोमांस जेव्हा निर्यात होते, तेव्हा ५० डालर मिळतात म्हणजे रु. ३,५००. रक्त २५ लीटर, त्याचे १,५०० ते २,००० आणि हाडांचे १,००० ते १,२०० रुपये मिळतात. म्हणजे गाय मारून तिचे मांस, रक्त आणि हाडे विकून ❤️ हत्या करणाऱ्या कसायाला अधिकतम केवळ ७,००० रुपयेच मिळतील. (आणि हे आकडे सुदृढ गायींच्या संबंधातले आहेत. म्हाताऱ्या गायींपासून इतकं उत्पन्न मिळत नाही.) पण, तिला जिवंत ठेवलं तर किती रुपये मिळतील? आता त्याची आकडेवारी पाहा….
एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. न्यायाधीशांना आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?”त्यावर दीक्षित म्हणाले, “आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं.
ते न्यायाधीशांना म्हणाले, “आता आय.आर.सी. च्या संशोधकांना पाचारण करून शेणाचं परीक्षण करून घ्या.”
जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी अछि सांगितले, “ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micro nutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे. न्यायालयाने ते मान्य केले.
दीक्षित म्हणाले, “माझे वडील आणि दोघे भाऊ शेतकरी आहेत. १५ वर्षांपासून आम्ही गायीच्या शेणापासून खत करून शेती करतो. १ किलो शेणापासून ३३ किलो खत बनते. रोजच्या १० किलो शेणापासून ३३० किलो. (म्हणजे महिन्याचे १ टन) आणि ६ रुपये किलोप्रमाणे १८०० ते १९०० रुपयांचे खत प्रतिदिन मिळेल. म्हणजे वर्षाचे रु. ७०,०००च्या वर झाले.
गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.”
सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे.
आधुनिक शिक्षण घेतलेल्या मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गायीच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण भारताचे पोट त्यातून भरते.
आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते.
एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव मिळतो.
अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते.
अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंटे आहेत.
अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा दर लीटरला डॉ. १२००, ते १३०० आहे. याचा अर्थ एका गायीपासून प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. म्हणजे २० वर्षांच्या आयुष्यात २,२०,००,००० (दोन कोटी वीस लक्ष रुपये) झाले.
पुन्हा गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते.
न्यायाधीशांचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दीक्षित म्हणाले, “आपल्या गाडीला आम्ही शेणापासून बनवलेल्या मिथेनचा सिलिंडर बसवून देतो. आपण गाडी चालवूनच पाहा ना.” त्यांनी मान्यता दिली. आणि तीन महिने गाडी चालवली. आणि म्हणाले, "एक्सलंट!!"
कारण, त्यांना प्रतिकिलोमीटर केवळ ५० ते ६० पैसे इतकाच खर्च पडला. आणि डिझेलला प्रति किलोमीटर ४ रुपये खर्च (म्हणजे सातपट) येतो.
आणखी, मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. ह्या सगळ्याच बाबी न्यायाधीशमहाराजांच्या लक्षात आल्या. मग दीक्षित म्हणाले, “प्रतिदिन १० किलो शेणापासून २० वर्षांत किती गॅस मिळेल?”
भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १ लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वाढेल.
ही सगळी आकडेवारी जेव्हा दीक्षितांनी न्यायाधीशांसमोर मांडली, तेव्हा, गायीची हत्या करण्यापेक्षा तिला वाचवण्याने देशाचा आर्थिक लाभ अधिक आहे, हे त्यांनी मान्य केले.
न्यायालयाचे हे मत जेव्हा कसायांना समजले, तेव्हा ते संतापले. आपला पराभव त्यांना डोळ्यांसमोर दिसू लागला.
गोहत्येपासून ७० सहस्र रुपयांचा लाभ होतो, असे ते म्हणाले होते. पण तिची हत्या केली नाही, तर तिच्यापासून कोट्यवधी रुपयांचा लाभ होतो. आणि आजवर हे कुणी सांगितलंसुद्धा नव्हतं. तर पटवून सिद्ध करण्याची गोष्टच उद्भवली नाही.
(आणि गायींची पैदास वाढवली तर आपण गॅस निर्यातही करू शकू. इंधनाची समस्या उरणारच नाही. वर आपल्या बाळांना अधिकाधिक दूध देऊ शकू.)
मग कसायांनी आपला हुकमाचा एक्का बाहेर काढला. ते म्हणाले, गोहत्या करणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे.
त्यावर दीक्षित म्हणाले, “त्याकरता कुराण, शरियत, हदीस हे सगळे ग्रंथ आम्ही न्यायालयासमोर आणतो. गाईची कत्तल करा असे त्यात कोठे लिहिले आहे, ते आम्हालाही जाणून घ्यायाचे आहेच. गायींची हत्या करा, असे त्यात कुठेही लिहिलेले नाही, असे आपल्या लक्षात येईल.
उलट, 'गायीचे रक्षण करा!' असेच हदीसमध्ये म्हटले आहे, कारण तीही तुमचे रक्षण करते. गाय मुका प्राणी आहे, म्हणून तिच्यावर दया करा, असेच महमद पैगंबर ह्यांचे विधान आहे.
गायीची हत्या कराल तर दोझकमध्येसुद्धा जागा मिळणार नाही, जहान्नमध्येही जागा मिळणार नाही, असेही आणखी एके ठिकाणी म्हटले आहे.
तर मग गायीची हत्या करण्याचा अधिकार त्यांना केव्हापासून मिळाला? विचारा ह्या कसायांना.”
तेव्हा कसाई निरुत्तर झाले.
दीक्षित पुढे म्हणाले, “मक्का, मदीनामध्ये काही ग्रंथ असतील तर तेही घेऊन या.”
मग न्यायालयाने एक महिन्याची मुदत दिली. आणि गायीची हत्या करणे हा इस्लामचा मूलभूत अधिकार आहे, असा आदेश असलेले असे काही दस्तऐवज असतील तर घेऊन येण्याचा आदेश दिला.
एक महिन्यात काहीही पुरावा मिळाला नाही. आता आणखी वेळ देता येत नाही, असे म्हणून न्यायालयाने २६ ऑक्टोबर २००५ ला (बरोबर 15 वर्षांपूर्वी) आपला निर्णय दिला.
ह्या निर्णयाची प्रत आपल्याला www.supremecourtcaselaw.com ह्या दुव्यावर जाऊन पाहता येईल.
हे निकालपत्र ६६ पानी आहे. तो निर्णय देऊन न्यायालयाने इतिहास घडवला आहे.
निर्णयात न्यायालय म्हणते, गायीची हत्या हा संवैधानिक अपराध आहे, धार्मिक पाप आहे. गोरक्षण, गोसंवर्धन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. सरकारचे आहेच. पण नागरिकांचेही आहे.
आजपर्यंत जी संवैधानिक कर्तव्ये होती (उदा. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, क्रांतिकारकांचा आदर करणे, देशाची अखंडता व एकता अबाधित ठेवणे), आता गायीचे रक्षण ह्याचीसुद्धा संवैधानिक कर्तव्यांमध्ये भर घातली गेली आहे.
1998 च्या भारतच्या अणुस्फोटानंतर जगाने भारतावर आर्थिक बंदी लादली. पण भारतावर त्याचा फारसा दुष्परिणाम झाला नाही. अमेरिकेने याचा विशेष अभ्यास केला व भारताची बलस्थाने हेरली व ती नष्ट करण्याचा विशेष कार्यक्रम मोठया बजेटसह आखला.
भारताची 1. पारम्पारिक शेती, 2 . कुटुंब व्यवस्था 3. भारतीय नीतिमूल्ये या तीन गोष्टी नष्ट केल्याशिवाय भारत कधीच पुरता सम्पणार नाही. गोधन सम्पवणे, भारतीय बियाणी सम्पविणे, तथाकथित विचारवंत, मीडिया मार्फत कुटुंब व्यवस्था नितिमूल्ये सम्पविणे हा योजनापूर्वक कार्यक्रम सुरु आहे. गाईंची कत्तल हां त्यातला एक भाग.
हे फार मोठे षड्यंत्र आहे.
सर्वानी समजून घेतले तरच निभाव लागेल.
जास्तीजास्त लोकांपर्यत पोहचवा.
खुपच महत्त्वाचा मेसेज आहे, सर्वानी वाचा प्रेरणादायी आहे
हायब्रिड बैलगाडीचे पेटंट
शब्दश; Bulls*** hybrid
धम्माल!
धम्माल!
जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी अछि सांगितले, “ह्यात .... >> संशोधकांना शेणाच्या वासाने शिंक आली बहुतेक.
“आम्हाला वेळ द्या आणि जागा
“आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं. >>>
न्यायाधीश, दोन्ही बाजूचे वकील व कोर्टात उपस्थित लोक, तसेच रस्त्यावरचे बघे - हे सगळे गाईला चारा घालून घालून शेण मिळवण्याच्या क्रियेची पूर्तता होण्याची वाट पाहात आहेत असे इमॅजिन केले.
सुरुवात डॉलर मध्ये करत अलगद
सुरुवात डॉलर मध्ये करत अलगद गाड़ी त्याच आकड्याला रूपये भासवत भला मोठ्ठा फरक दर्शवत तुलना करण्याचे सामर्थ्य वादातीत असते अश्या (न)आशयघन फॉरवर्ड मजकुराचे
शेवटला परिच्छेद आधीच तयार
शेवटला परिच्छेद आधीच तयार होता/असतो. वरचा मसाला वेगवेगळा भरून फॉरवर्ड तयार होते (फॉरवर्ड या शब्दाची व्याख्याच लोकांनी शेअर करून व्हायरल करण्यास केलेले लिखाण असल्याने, लेख ऐवजी फॉरवर्ड शब्द वापरला आहे.)
https://blogs
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/uadharan-arth/cow-slaughte...
1) गाय उपयुक्त पशू आहे का ?
1) गाय उपयुक्त पशू आहे का ?
तर आहे.
२) गायी चे दूध पोषक तत्व नी माझी युक्त आहे का?
तर आहे.
३) शेणखत हे शेती साठी उपयुक्त. आहे का?.
गायी चे मूत्र शेती साठी योग्य आहे का?
तर आहे.
जमिनीचा पोत शेणखत नी सुधारतो.अनेक पोषक तत्व, अनेक उपयुक्त जिवाणू शेणखत मध्ये असतात
आणि ते शेती साठी अती उत्तम च आहे.
वरील सर्व फायदे गायी पासून मिळतात
त्या वर आक्षेप मला नाही वाटत कोणाचा असेल.
काहीच अगदी पन्नास वर्ष पूर्वी गाय ही विकली जायची नाही नको असेल तर फुकट कोणाला तरी दिली जायची
शेती खूप आणि गायी चे खाद्य भरपूर शेतात च होत असे .
त्या मुळे खर्च असा नाही
गाय हा उपयुक्त पशू आहे हे तेव्हा लोकांना पटत होते तेव्हा ते गाय विकायचे नाहीत.
आता लोक बिघडली आहेत ते दूध देणे बंद झाले की गाय विकतात.
त्याला खरे कारण आहे शेती मध्ये मनुष्य बळ आता नाही.
लोक शहरात विस्थापित झाली
एक दोन म्हातारी माणसं च शेती करतात.
रासायनिक खत आज ,आता तरी उत्पादन वाढ करतात पुढील पन्नास किंवा १०० वर्षात जमीन नापीक होणार असते.
पण त्याला वेळ आहे.
कोर्टात गाय उपयुक्त आहे सिद्ध कारणे ह्याचा अर्थ कायद्याने गाय उपयुक्त आहे आणि ती विकू नका तो गुन्हा आहे .
असा सरकारी निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणे.
.लोकांचा ह्याला आक्षेप असावा .
आणि तो योग्य आहे
पण गाय उपयुक्त प्राणी आहे असे कोण बोलले की त्याची टर उठवणे ही विकृती आहे
विकृत भावना त्या मागे असते
याच लिंकच्या खालीच राजीव
याच लिंकच्या खालीच राजीव दीक्षितांच्या वेगवेगळ्या दाव्यांची अक्षरशः चिरफाड करणाराही एक लेख दिला आहे तोही धमाल आहे
दीक्षित हे पूना ओक स्कुल चे विद्यार्थी होते असं दिसतंय
प्रिन्सिपल
प्रिन्सिपल
1) गाय उपयुक्त पशू आहे का ?तर
1) गाढव उपयुक्त पशू आहे का ?
तर आहे
२) गाढवीचे दूध पोषक तत्व नी
माझी?युक्त आहे का?तर आहे
(आईच्या दुधानंतर सर्वात चांगले दूध गाढवीचे दूध पूर्वी पासून मानले जाते, आता त्याहून चांगलेही मानतात)
३) गाढवलीद खत हे शेती साठी उपयुक्त. आहे का?.
गाढवा चे मूत्र शेती साठी योग्य आहे का?
तर आहे
४) लोक गाढवाचे मांस खातात हे खरं आहे का आणि ते ऊपयुक्त आहे का?
तर आहे
(No subject)
(No subject)
माणूस मांस भक्षण करतो.
माणूस मांस भक्षण करतो.
कोणताच प्राणी मारून खाणे कोणत्याच मांसाहारी माणसाला वर्ज्य नव्हता.
काही शे किंवा हजार वर्षा पूर्वी.
मुस्लिम पण डुक्कर खात होते आणि हिंदू पण गाय चे मांस खाते होते..जयवंत पवार किंवा कोणी त्या प्रकारचे लेखक जे सांगत आहेत ते काही नवीन नाही
किंवा बुध्दीमान माणसाला च हे माहीत आहे असे पण नाही.
तरी जगभरात अनेक देशात अनेक प्राण्यांचे मांस खाण्यास:विक्रीस बंदी आहे .मुस्लिम देशात (काही) डुकराचे मांस लं बंदी आहे
काही देशात घोड्याच्या मांस ल बंदी..कुत्रा,गाढव असे अनेक प्राण्यांच्या मांस ल बंदी आहे
गायी चे मांस वर बंदी आणावी ही मागणी भारतात होत असेल तर काही जगा वेगळे घडतं आहे असे काही नाही
गायीच्या मांस लं बंदी ही धार्मिक मागणी असेल तर त्याला विरोध करणाऱ्या लोकांचा विरोध पण धार्मिक च आहे.
दीक्षित ,आणि जयवंत पवार दोघे त्याच्या धार्मिक कल्पने नुसार किंवा राजकीय फायदा तोटा ह्याचा विचार करून योग्य च भूमिका घेत आहेत.
धार्मिक आणि राजकीय ह्या पलीकडे ह्या वादाला काही अर्थ नाही
विरुद्ध मतांचे पण त्याच भूमिकेत असतात.
<दीक्षित ,आणि जयवंत पवार दोघे
<दीक्षित ,
आणि जयवंत पवार दोघेत्याच्या धार्मिक कल्पने नुसार किंवा राजकीय फायदा तोटा ह्याचा विचार करूनयोग्यच भूमिका घेत आहेत.>
एवढं कळलं तरी पुरेसे आहे.
ते नाही का काही प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घालत, मग आम्ही का नाही असे आधीच म्हटले असते तर या धाग्यावर ती पोस्ट आली नसती, ना जयंत पवारांना ते लिहावे लागले असते.
अरे धम्माल धागा आहे हा
अरे धम्माल धागा आहे हा
एवढा मोठा फॉर्वर्ड वाचायच्या नादात "भारतीय बिर्याणी सम्पविणे" असं वाचलं गेलं
"भारतीय बिर्याणी सम्पविणे"
"भारतीय बिर्याणी सम्पविणे" असं वाचलं गेलं
"भारतीय बिर्याणी सम्पविणे"
"भारतीय बिर्याणी सम्पविणे" असं वाचलं गेलं
Pages