डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
एवढा मोठा फॉर्वर्ड वाचायच्या
एवढा मोठा फॉर्वर्ड वाचायच्या नादात "भारतीय बिर्याणी सम्पविणे" असं वाचलं गेलं >>>
बाकी ते सुप्रिमकोर्टकेसलॉ.कॉम
बाकी ते सुप्रिमकोर्टकेसलॉ.कॉम डोमेन एक्सपायर झालंय. कुणाला हवं असेल तर घेऊन टाका चटकन.
मी कालच ते बघणार होतो. तेथे
अतिशय गंभीर चिंतनीय पोस्ट!
गल्ली चुकली.
हे भोंदू पेक्षा दवणीय म्हणता
हे भोंदू पेक्षा दवणीय म्हणता येईल.
सहमत
सहमत
रवी शास्त्र वगैरे न मानणारी
रवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी पी सी वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच कारण ती तांत्रिक गरज आहे.
मी थोडा असा विचार केला...
मग मानवी मेंदू तर त्यातुलनेत प्रचंड मोठा आहे. तो ही अनेक ठिकाणी कनेक्ट होतो हार्मफुल साईट्स अर्थात जागा जसे की स्मशान, काही दुषीत जागा, बाधीक व्यक्ती, नकारात्मक व्यक्ती वगैरे च्या संपर्कात आपण जातो.
आपल्यामध्ये व्हायरस येऊ नये (दोष येऊ नये आपले तेजोवलय दुषीत होऊ नये) म्हणून आपण कोणता अँटीव्हायरस टाकतो?
उत्तर समोरच होते...
आपण म्हणणारे स्तोत्र मंत्रजप हे आपले अँटीव्हायरस... मंत्रांचा अर्थ समजला काय व न समजला काय... कॉम्प्युटरचे अँटी व्हायरस प्रोग्रामिंग तरी कुठे समजते आपल्याला?
पण ज्याला समजते त्याने सांगितले की आपण मुकाट ऐकतो व चालवतो... समजो अथवा न समजो ते काम तर व्यवस्थित होते.
मंत्र स्तोत्रांचे वेगळे काय आहे? सकाळ संध्याकाळ आपले आवर्तन स्कॅन करत राहायचे... व्हायरस आपोआप जातात...
जसे सतत ऑनलाईन राहून काम करणारे जे पी सी असतात त्यांना स्ट्राँग अँटी व्हायरस लागतो... तसेच विशेष साधना करणार्या साधकांना विशेष न्यासोक्त कवच असावच लागतं.
एव्हाना पी सी व मानवी शरीर आणि अँटीव्हायरस व स्तोत्र मंत्र यातील साम्य आपण जाणलेच असेल...
त्या क्षेत्रातील तज्ञांचं ऐकावं व तो प्रोग्राम रन करावा एवढंच आपण करत रहावं मग चिंता नाही.
आणि दुर्लक्ष करत गेलो तर एकवेळ अशी येते की फॉर्मेट करावं लागतं पण शरीराला, मनाला फॉर्मेट कसं करणार? मग उद्भवतात समस्या, आजार, अडचणी....
शेवटी काय?...
रोजचं स्कॅनिंग अर्थात नित्यपाठ आणि आपल्या सद्गुरु ने दिलेले नामस्मरण, नित्यसेवा केली तर हार्मफुल साईट्सला भेट देताना आपलं संरक्षण, शुचिर्भूतता सांभाळली की आपलं शरीर, मन नक्कीच छान सुरक्षित राहील.
जय श्रीराम ।
जय सद्गुरू ।
( याचे लेखक कुणी शंकर पवार आहेत असे समजले. मूळ लेखक आहेत कि ढकलपात्र याची कल्पना नाही).
(No subject)
(No subject)
ह्या फॉरवर्ड ची जो चेष्टा
ह्या फॉरवर्ड ची जो चेष्टा करेन त्याची हार्ड डिस्क क्रॅश होईल. त्याचा सेशन टाईम आउट होईल. पेमेंट करताना एक सेकंड नेट जाईन आणि ऑटो रिफ्रेश होऊन दोनदा पैसे जातील. वाईट लोक आहेत हे हसणारे. डेव्हिल चे एजंट. खरं तर सेक्रेटली हे पण हेच करतात पण त्याचा फायदा बाकीच्यांना होऊ नये म्हणून ते जाणूनबुजून (शब्दार्थ टीम जाणून बुजायचं कसे?) चेष्टा करून तुम्हाला ह्या आतल्या गोष्टी ट्राय करू देत नाही. डोळे उघडा जागे व्हा आणि टाका अँटी वायरस तगडा.
याला Skin-to-skin care किंवा
याला Skin-to-skin care किंवा kangaroo therapy सुद्धा म्हणतात. यामध्ये बाळ pre-mature असल्याने वडील किंवा आईच्या शरीराशी चिकटून राहणे महत्वाचे असते. फुप्फुसाशी या बाळाची श्वसन नलिका जोडली वगैरे जात नाही. पण हा चुकीचा मेसेज व्हायरल झाला आहे. बापाच्या फुफ्फुसातून थेट नळी जोडली म्हणे
रवी शास्त्र वगैरे न मानणारी
रवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी >> रवी शास्त्री वाचलं मी चुकून.
हपा मी पण.
हपा मी पण.
एरवी शास्त्र ... असे असावे ते बहुधा
अरे हां!
अरे हां!
(No subject)
हे धक्कादायक आहे. एक केस ऐकली
हे धक्कादायक आहे. एक केस ऐकली होती. पण असा मेसेज फिरत आहे हे माहित नव्हते म्हणून धक्कादायक. बाकी नो कॉमेंट्स (फॉर ए रिजन). फक्त प्रतिक्रिया वाचत राहीन.
मगाशी इमेज नीट साईझ मध्ये
मगाशी इमेज नीट साईझ मध्ये बसवता येत नव्हती, बर्याच वेळा एडिट केली पोस्ट, म्हणुन डिलिट केली.
आता पण येत नाहीये, पण असो.
योगायोगाने कालच रेडीओ वर
योगायोगाने कालच रेडीओ वर 'ऑस्कर द कॅट' बातमी रिटेलिकास्ट होत होती. जुनीच बातमी आहे.
ऑस्कर काही तासांत मृत्यू होणार्या रुग्णाच्या बाजुला जाऊन बसते. तिने १०० मृत्यू असे प्रेडिक्ट केले आहेत. प्रोव्हिडन्स, र्होड आयलंड मधील घटना आहे.
https://www.cbc.ca/listen/live-radio/1-2-as-it-happens?cmp=DM_SEM_Listen... इथे ३ जानेवारीचा एपिसोड ५०:४५ पासून ऐकू शकता.
वरचं अतीरंजितच आहे. पण हे आठवलं म्हणून लिहिलं.
मायबोलीवर आहेत animal
मायबोलीवर आहेत animal communicator
एका व्हॉट्सऍपग्रुप एका
एका व्हॉट्सऍपग्रुप एका व्यक्तीने मी वर पोस्ट केलेली लिंक शेअर करून "हे खरे असेल का?" असे विचारले होते.
तेव्हा ते फेसबुक पेज वाचून त्यातला शेवटला परिच्छेद कोट करून म्हटलं "हे त्यात लिहिलंय, अजुनही शंका आहे?"
त्यावर आता त्या व्यक्तीचा प्रतिसाद आला की "हे फेसबुक पेज वाचल्यावर गुगल वर शोधले तर बरेच व्हिडिओ सापडले असे सांगणारे म्हणुन विचारले."
त्यातील एक हा.
सोमी आणि आंतरजालामुळे वर्तमान, माहिती सोबतच कन्फर्मेशन बायस वाढण्यासही चांगलीच मदत होते.
ऑस्कर काही तासांत मृत्यू
ऑस्कर काही तासांत मृत्यू होणार्या रुग्णाच्या बाजुला जाऊन बसते. तिने १०० मृत्यू असे प्रेडिक्ट केले आहेत. >> ह्या वर आधारित जी ए कुलकर्णी ह्यांची एक फार सुरेख पण निराशाजनक कथा आहे.
कुत्रे शेण माती दगड खाणार नाही अगदीच अब्युजिव परिस्थिती शिवाय. असे केल्यास तडक व्हेट गाठा. ऑपरेशन करावे लाग ते दगड काढायला.
Durga 2 म्हणजे डायरेक्शनली अन
Durga 2 म्हणजे डायरेक्शनली अन रिस्ट्रिक्टेड रेगन अरे.
हे एक ड्यू (DEW) म्हणजेच डायरेक्टर एनर्जी वेपन आहे. सामान्य भाषेत समजून सांगायचं म्हटले तर ही एक शंभर किलो एवढ्या हलक्या हलकी वजनाची लेजर गन आहे, जी कोणत्याही लष्करी ट्रकच्या वर बसविली जाऊ शकते. आणि एकदा की शत्रूवर गोळीबार केली की त्यांना पळून जाणे अशक्य आहे. कारण तिचा वेग 300000 किलोमीटर प्रति सेकंद आहे. हे जरी गुप्त शस्त्र असले आणि भारत सरकारने याबाबत अधिक माहिती प्रसारमाध्यमांना देण्याचे टाळले असले तरी, आता समोर येत असलेल्या बातम्यांनुसार हे शस्त्र पूर्णपणे तयार करण्यात आले आहे, व आतापर्यंतचे हे भारताचे सर्वात जास्त गुप्त शस्त्र म्हणून ओळखले जात आहे.
याच्या मारक क्षमतेचा अंदाज तुम्ही यावरून घेऊ शकता की, पृथ्वीच्या 8 प्रदक्षिणांएवढे अंतर ते एका सेकंदात पार करू शकते, शत्रूकडे निशाणा साधा, बटण दाबा आणि त्या नंतर समोरील शत्रू पूर्णपणे नेस्तनाबूत. यावरून तुम्हाला त्याच्या अग्निशक्तीची कल्पना येऊ शकते.
भविष्यात जगातील कोणताही देश भारताविरुद्ध लढण्याचे धाडस दाखवू शकेल अस वाटत नाही..!!!
जय हिंद!
डायरेक्शनली अन रिस्ट्रिक्टेड
डायरेक्शनली अन रिस्ट्रिक्टेड रेगन अरे. >>> असा "अरे" की ज्याला कोणी "कारे" करू धजणार नाही
(No subject)
>> पृथ्वीच्या 8
>> पृथ्वीच्या 8 प्रदक्षिणांएवढे अंतर ते एका सेकंदात पार करू शकते
पृथ्वीची एक प्रदक्षिणा म्हणजे ४० हजार किलोमीटर. अशा ८ प्रदक्षिणा म्हणजे तीन लक्ष हून अधिक किलोमीटर. आणि त्या एका सेकंदात! म्हणजे प्रकाशाच्या गतीहून अधिक वेगाने?
Nooo! Physics won't allow your weapon.
>> डायरेक्शनली अन रिस्ट्रिक्टेड
मधला अन इंग्लिश की मराठी
८ सेकंद त्यांनी पूर्णांकात
८ सेकंद त्यांनी पूर्णांकात लिहिले असेल. लेजरचा वेग म्हणजे प्रकाशाचा वेग. त्याला यांनी गोळीबाराचा वेग म्हटले आहे.
मारा करणाऱ्या लेजर गनची अमेरिकेने चाचणी केली असे काही वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते.
अरे ला कारे, मराठी अन >> धमाल
अरे ला कारे, मराठी अन >> धमाल प्रतिक्रिया.
या पेक्षा दहापट वेगाच्या लेजर
या पेक्षा दहापट वेगाच्या लेजर गन बनवून त्या रे वर बसून ते भूतकाळात जाणार आणि मग इतिहास बदलून येणार. त्यामुळे इतिहासाची क्रमिक पुस्तके बदलावी लागतील. भारताने इसवी सन पूर्व १२०० वर्षांपूर्वी युरोपावर आपले साम्राज्य प्रस्थापित केले ते अद्याप चालू असून अनेक गोरे लोक हल्ली भारतात शिकायला येतात. पहिल्या शतकात मोदीजींनी मक्केत राममंदीर उभारले. सहाव्या शतकात मोदीजींनी व्हॅटकिन सिटी येथे मंदीर उभारून तिथे मोहनलाल या नंबीयार ब्राह्मण पुजार्याची नेमणूक केली. या विरोधात इटलीतले एक असहकारी नेते महॉन गंधाय यांनी दिवसभर पास्ता खाण्याचे व्रत जाहीर केले होते.
त्यामुळे मोदीजींनी मग त्या मंदीरात पोपची नेमणूक केली.
>> लेजरचा वेग म्हणजे
>> लेजरचा वेग म्हणजे प्रकाशाचा वेग
ओह पृथ्वीला प्रदक्षिणा फक्त वेगाच्या संदर्भात आहे. प्रत्यक्ष लाईट तशी प्रदक्षिणा घालू शकत नाही आणि जे प्रदक्षिणा घालू शकते ते त्या वेगाने जाऊ शकत नाही
(No subject)
Pages