भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावेची पोस्ट मला 'पेरूची' म्हणून आली होती. पार कल्पवृक्ष करून टाकतात, पण वाचणाऱ्याला काही किंमत नाही होS असा आव आणतात.

अमित+१,
मला तर दिवसेंदिवस मी पाषाणहृदयीच असले पाहिजे असं वाटायला लागलेयं. पाझर काही फुटत नाही, टवाळक्या मात्र भरपूर सुचतात. Lol

पार कल्पवृक्ष करून टाकतात, पण वाचणाऱ्याला काही किंमत नाही होS असा आव आणतात. >>> Lol यावर एक मीम काढली पाहिजे.

पेरू, पपई चे फायदे व त्यांचे कल्पवृक्ष केलेले पाहून:
नारळ: "म्हणजे आम्ही येडे"

“ नारळ: "म्हणजे आम्ही येडे" - Lol

माझ्या डोळ्यासमोर एकदम ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला‘ हे लताचं इमोशनल गाणं आणि त्याच्या बॅकग्राऊंडवर पपईची झाडं लावणारे मा. दीनानाथ असलं काहीतरी चित्र उभं राहिलं.

>> कृतज्ञतेचे हृदय अवर्णनीय आहे,
Lol Rofl हद्द! नक्कीच कुठल्यातरी अमराठी पपई व्यापाऱ्याने इंग्लिश मध्ये लिहून घेऊन गुगल भाषांतर करून पसरवले सगळीकडे. जाहिरात एजन्सीने सुद्धा पाटी टाकली. लेख तयार असतो. त्यात पेरू, पपई काहीही एकटा येते. हाय काय अन नाय काय! कृतज्ञतेचे ह्रदय Lol

>> पार कल्पवृक्ष करून टाकतात
पपई आहे म्हणून कल्पनावृक्ष म्हणूया Lol

*मूत्राशय गुदमरल्यास...* ________________

मूत्राशय भरले आहे आणि लघवी होत नाही किंवा लघवी करता येत नाही..
*मग काय करायचं...??*

हा अनुभव आहे एका प्रख्यात अॅलोपॅथी फिजिशियन 70 वर्षांच्या ईएनटी तज्ञाचा.
*चला ऐकूया अनोखा अनुभव..*

एके दिवशी सकाळी त्याला अचानक जाग आली. त्याला लघवी करणे आवश्यक होते, परंतु तो करू शकत नाही (काही लोकांना ही समस्या नंतरच्या वयात होते). त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले, पण सलग प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा त्याला समजले की एक समस्या निर्माण झाली आहे. डॉक्टर असल्यामुळे अशा शारीरिक समस्यांपासून ते अस्पर्शित नव्हते; त्याचे खालचे पोट जड झाले. बसणे किंवा उभे राहणे कठीण झाले, खालच्या ओटीपोटात दाब वाढू लागला.
शेवटी मोठ्या कष्टाने त्याने आपल्या मित्र-डॉक्टरला परिस्थिती सांगितली.

त्या मित्राने उत्तर दिले.... *अरे, तुझे मूत्राशय भरले आहे. आणि प्रयत्न करूनही तुला लघवी करता येत नाही...*
काळजी करू नकोस. मी सांगतो तसे कर. या त्रासातून सुटका मिळेल....

आणि त्याने सूचना दिली, *सरळ उभे राहा आणि जोमाने वारंवार उडी मारा. उडी मारताना, झाडावरून आंबा तोडल्यासारखे दोन्ही हात वर ठेवा. हे 10 ते 15 वेळा करा.*

जुन्या डॉक्टरांनी विचार केला...
*मी खरोखर या स्थितीत उडी मारू शकेन का...?*
उपचार थोडे संशयास्पद वाटले.
तरीही डॉक्टरांनी प्रयत्न केला...
*पण 3 ते 4 वेळा उडी मारल्यावरच त्याला लघवी करण्याची इच्छा जाणवली आणि त्याला आराम मिळाला.*

इतक्या सोप्या पद्धतीने समस्या सोडवल्याबद्दल त्याने आपल्या मित्र डॉक्टरचे आनंदाने आभार मानले.

अन्यथा, त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले असते, मूत्राशयाच्या चाचण्या, इंजेक्शन्स, अँटीबायोटिक्स इत्यादी तसेच कॅथेटर घालावे लागले असते. त्याच्यावर आणि त्याच्या जवळच्या लोकांसाठी मानसिक तणावाबरोबरच लाखोंचे बिलही आले असते.

*कृपया ज्येष्ठ नागरिकांसोबत शेअर करा. हा असह्य अनुभव असलेल्या प्रत्येकासाठी हा एक सोपा उपाय आहे.*

कर्करोगाचा पराभव झाला

अननस गरम पाणी
कृपया ही माहिती सर्व ग्रुप मधे पसरवा !!
ICBS जनरल हॉस्पिटलचे प्रोफेसर डॉ. गिल्बर्ट ए. क्वोक यांनी आग्रह धरला की ज्यांना हे बुलेटिन मिळाले त्या प्रत्येकाने दहा प्रती इतरांना दिल्यास किमान एक जीव वाचू शकेल.
मी माझ्याकडून काही केले आहे, आशा आहे की तुम्ही देखील करू शकता..
धन्यवाद!
अननसाचे गरम पाणी तुमचे प्राण वाचवेल
गरम अननस कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात.
एका कपमध्ये अननसाचे 2 ते 3 तुकडे बारीक करा आणि त्यात गरम पाणी टाका, ते "क्षारयुक्त पाणी" होईल, जर तुम्ही ते रोज प्यायले तर ते सर्वांसाठी चांगले आहे.
गरम अननस कर्करोगविरोधी पदार्थ सोडते, प्रभावी कर्करोग उपचारांसाठी औषधातील नवीनतम प्रगती.
अननसाच्या कोमट फळामध्ये सिस्ट्स आणि ट्यूमर मारण्याचा प्रभाव असतो. हे सर्व प्रकारचे कर्करोग बरे करते हे सिद्ध झाले आहे.
अननसाचे गरम पाणी ऍलर्जी/अ‍ॅलर्जीमुळे शरीरातील सर्व जंतू आणि विषारी पदार्थ काढून टाकते.
अननसाच्या रसापासून मिळणारे औषध केवळ *हिंसक पेशी* नष्ट करते आणि निरोगी पेशींवर परिणाम करत नाही.
तसेच, अननसाच्या रसातील अमीनो ऍसिड आणि अननस पॉलिफेनॉल उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतात, अंतर्गत रक्तवाहिन्यांमधील अडथळा टाळतात, रक्त परिसंचरण सुधारतात आणि रक्त गोठणे कमी करतात.
वाचल्यानंतर इतरांना, कुटुंबाला, मित्रांना सांगा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

*हा मेसेज किमान पाच ग्रुपवर पाठवा*
*काही पाठवणार नाहीत*
*पण मला आशा आहे की तुम्ही ते नक्की पाठवाल*

<<जर तुम्ही ते रोज प्यायले तर ते सर्वांसाठी चांगले आहे>>.
ते पिताहेत ना. मग तेच आपल्यासाठीही चांगले. आपल्याला प्यायची गरज नाही.

सर्व आधुनिक वैद्यक संशोधन थांबवून फक्त हळद-लिंबू- जिरे-मिरे-फळे वगैरे वर संशोधन करावे (किंबहुना ते झालेच आहे) कँसरच काय ग्लोम्यूरल नेफ्रायटीस सुद्धा हात टेकेल या औषधांपुढे Happy

डॉ. गिल्बर्ट ए. क्वोक यांनी आग्रह धरला म्हणे, डॉ क्वोक हे सोळा सोमवारचे व्रत करतात जणू, उतू नका मातू नका घेतले फॉरवर्ड टाकू नका, पुढे वाटा. तरच ह्या व्रताचे फळ म्हणजे अननस तुम्हाला मिळेल. पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल केले आहे 'मला आशा आहे की तुम्ही पाठवणार' .! हे माझ्या वडिलांनी पाठवले आहे, हे स्वतः सर्दीवर सुद्धा आयुर्वेदिक औषधे घेत नाहीत, आम्हाला मात्र बोअर करतात. आता त्यांना मी भोंदू फॉरवर्ड्सची ही लिंक पाठवेन. Proud

माहिती चेक करावी म्हणून गुगल केल्यावर अनेक ठिकाणी अननसात कॅन्सरविरोधी तत्त्व आहेत असे आढळले.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6338369/
मेडीकल जर्नल्स पाहिलेले नाहीत. पण वैद्यकीय क्षेत्रातले जाणकारच सांगू शकतील.
तूर्तास हा एक रिसर्च पेपर मिळाला. वर वर चाळला आहे.
https://www.researchgate.net/profile/Daryoush-Shahbazi-Gahrouei/publicat...

Pages