तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

त्या मुळे माध्यम मार्ग म्हणजे..
दारू कमी पिने ह्या बाबत जागृती आणि सरकारी यंत्रणा मार्फत त्याचे नियोजन.
आणि सामाजिक दबाव.
असे मार्ग निवडावे लागतात
>>>

हेमंत
+७८६
मी सुद्धा याच मताचा आहे.
माझ्यापरीने खारीचा वाटा ऊचलतो.
सरकारने येऊन जनजागृती करायची वाट न बघता मी माझ्या ओळखीच्यांना दारू वाईट आहे, ते एक व्यसनच आहे हे कायम लक्षात राहूद्या याची आठवण करत राहतो.

त्यापेक्षा असे सांगत जा कि दारू छान आहे पण अति दारू वाईट...
इतकी प्या कि थोडी सुरसुरी येईल.. इतकी नको कि बेहोष होऊन जाल...

पण अति दारू वाईट...<<< "अति" हा शब्द फार महत्वाचा
जिथे अति होते तेव्हा ते त्रासदायकच
अति खाणे
अति झोपणे
अति व्यायाम करणे
अति चौकस असणे
अति काळजी करणे
अति विचार करणे
....
....
...........................

अति धागे काढणे ??

"अति " हे टाईप करायला गेलो कfunction at() { [native code] }आसे उमटते

योग्य प्रमाणत दिलेले विष म्हणजेच औषध.

अशी पण एक व्याख्या मी वाचली आहे.
औषध पण मर्यादित प्रमाणात च फायदा करतात.
जास्त घेतली की जीवाला धोका.
अगदी पोष्टिक पदार्थ जास्त खाल्ले तर ते नुकसान च करणार.
"योग्य प्रमाणात " आणि "अती प्रमाणात
हे दोन शब्द खरेच खुप महत्वाचे आहेत

म्हणजे चरस गांजा सुद्धा प्रमाणात घ्यायला हरकत नाही. फक्त अति करू नये असे का?

जो पदार्थ मुळातच वाईट असतो त्याचे अतिप्रमाण आणि एखाद्या पौष्टीक पदार्थाचे अतिप्रमाण यात फरक असेल ना...

त्या अतिप्रमाणामुळे होणारे दुष्परीणाम यातही फरक असेल ना.

एकदा ते दुष्परीणाम लक्षात आल्यावर त्या पदार्थांचे सेवन करणे सोडणे सोपे की अवघड यातही फरक असेल ना..

पाणी हे जीवन असे म्हणतात.. पाणीही गळ्यापर्यंत प्याले की उलटी होते म्हणत आता आपण पाण्याला दारूच्या पंक्तीत बसवणार का?

फरक आहे ना .?
फरक करायचा झाला तर दारू च्या पंगती मध्ये रोजच्या अन्न मधील पण अनेक घटक बसतील.
तळले ले पदार्थ,अनेक प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ,कृत्रिम रंग,
कृत्रिम रीत्या बनवलेले रासायनिक अन्न पदार्थ.
उदा.
अजिनोमोटो ,व्हिनेगर ETC.

Soft drinks. खूप मोठी लिस्ट आहे ते दारू पेक्षा कमी हानिकारक नाहीत.
केसांचे रंग,विविध सौंदर्य प्रसाधन .
दारू पेक्षा कमी नाहीत.
फक्त दारू च बदनाम आहे

एकदा व्यक्ती रोज योग्य प्रमाणात दारू पित आहे,सिगारेट पण एकाधीच रोज पित आहे .
पण रोज व्यायाम करत आहे .
कमीत कमी प्रक्रिया केले ल पारंपरिक आहार घेत आहे.
हिरव्या भाज्या,फळं आहारात योग्य प्रमाणात घेत आहे .
आणि दुसरा .
दारू पीत नाही,सिगारेट पित नाही,व्यायाम करत नाही.
पिझ्झा,ब्रेड,बर्गर, शिवाय काही खात नाही.
सॉफ्ट ड्रिंक पितो.
तर अशा स्थिती मध्ये दारू पिणारा व्यक्ती च खूप तंदुरुस्त असेल .
आणि दुसरा दारू आणि सिगारेट दोन्ही न पिणारा अनेक रोगांनी ग्रस्त असेल.
ह्या वरून ठरवा दारू एकटीच खलनायक नाहीं

म्हणजे चरस गांजा सुद्धा प्रमाणात घ्यायला हरकत नाही.>>> होय
आपण पाण्याला दारूच्या पंक्तीत बसवणार का?>>> होय

ह्या वरून ठरवा दारू एकटीच खलनायक नाहीं>> क्या बात है
या बद्दल मी मागेही लिहिलं होतं
कोणी आपल्या लहान मुलांना कौतुकाने दारू देत नाही पण आवडीने आणि कौतुकाने हानिकारक पदार्थ खाऊ घालणाऱ्या कित्येक आया पहिल्या आहेत
ओबेसिटी हा हानीकारक आहे, लहान मुलांमध्ये मधुमेहाच्या वाढत्या केसेस फार काळजीचे कारण आहे हे काय कमी तज्ज्ञानी सांगितले का पण त्याकडे साफ दुर्लक्ष करून सर एकच मुद्दा धरून बसतात

आमच्या बाबू लं पिझ्झा खूप आवडतो.
सॉफ्ट ड्रिंक तर त्याला हवच.

असे कौतुकाने सांगणाऱ्या आया कमी नाहीत.

आणि दुसरा .
दारू पीत नाही,सिगारेट पित नाही,व्यायाम करत नाही.
पिझ्झा,ब्रेड,बर्गर, शिवाय काही खात नाही.
सॉफ्ट ड्रिंक पितो.
>>>>>>>

दारूच्या टक्करला यायला दुसर्‍यामध्ये फारच वाईट सवयी दाखवाव्या लागल्या Happy

आणि दारू पिणार्‍यांना या ईतर वाईट सवयी नसतातच हे ईथे गृहीत धरले आहे जे चुकीचे आहे Happy

या बद्दल मी मागेही लिहिलं होतं
कोणी आपल्या लहान मुलांना कौतुकाने दारू देत नाही पण आवडीने आणि कौतुकाने हानिकारक पदार्थ खाऊ घालणाऱ्या कित्येक आया पहिल्या आहेत
>>>>>

एक्झॅक्टली

का देत नाही? हा विचार कधी केला आहे.
बड्डे पार्टीला लहान मुलांना फ्रूटी ऐवजी एकेक बीअरचा कॅन द्यायला काय हरकत आहे जर दारूत काही वाईट नाहीये तर Happy

Soft drinks. खूप मोठी लिस्ट आहे ते दारू पेक्षा कमी हानिकारक नाहीत.
>>>>

छे हो, सॉफ्ट ड्रिंक दारूपेक्षा कमी हानीकारकच आहे.

आणि तुम्हाला ती देखील ईतकी हानीकारक वाटत असेल तर त्याबद्दलही सावध करा याच धाग्यावर लोकांना

कारण दारू पिणारेही त्यात ती मिसळतातच की.. आधीच्या पोस्ट वाचा.. कित्येक पोस्टमध्ये कुठल्या दारूत कुठली सॉफ्ट ड्रिंक मिसळावी हे देखील आलेय. म्हणजे हे डबल पॉईझन तयार होत आहे..

मला वाटत नवीन धागा काढावा
पण सर तिथेही माती कालवायला येणारच
कुठेही जावा यांच्या अटेन्शनची भूक संपतच नाही
याना इग्नोर करा म्हणणारे कुठं आहेत ते भजनी मंडळ वाले

दारूच्या टक्करला यायला दुसर्‍यामध्ये फारच वाईट सवयी दाखवाव्या लागल्या

मतितार्थ हा आहे .
दारू मुळे कमी नुकसान होते योग्य प्रमाणात घेत असाल तर ,पण नुकसान हे होतेच.

पण
बर्गर,पिझ्झा अनेक वेळा प्रक्रिया केलेले अन्न ,,सॉफ्ट ड्रिंक
. व्यायामाचा अभाव , ह्या सवयी दारू पेक्षा जास्त नुकसान करतात.

हेमंत ते पालथा घडा क्लब चे आजीवन सदस्य आहेत
तुम्ही कितीही सांगा ते त्यांना हव्या त्याच विषयावर चर्चा नेणार
त्यामुळे आता सर जितके प्रतिसाद देतील तितक्या नव्या कॉकटेल आणि दारूच्या पोस्ट टाकाव्या
त्यांना हेच उत्तर आता

मला वाटते ह्या असह्य डोकेदुखीमुळे अनेकांची आय रिअली नीड अ ड्रिंक अशी परिस्थिती झाली आहे. व्याख्या विख्ह्ही वुख्हु. मला एक ब्लडी मेरी द्या कोणीतरी.

बर्गर,पिझ्झा अनेक वेळा प्रक्रिया केलेले अन्न ,,सॉफ्ट ड्रिंक
. व्यायामाचा अभाव , ह्या सवयी दारू पेक्षा जास्त नुकसान करतात.
>>>>

अहो, पण मुळात या सवयीचे समर्थन कोणी केले आहे.
मुद्दा लक्षात घ्या, हे बाकीचे सर्व कॉन्स्टंट ठेवा.
१) एका व्यक्तीला या सर्व वाईट सवयी आहेत पण ती दारू पित नाही.
२) दुसर्‍या व्यक्तीला या सर्व वाईट सवयी आहेत, त्यावर ती दारूही पिते.
कोणाच्या आरोग्याची तुम्हाला जास्त काळजी वाटेल?

तुम्ही टॅक्सीत बसला आहात,
१) ड्रायवर कोल्ड्रींक प्यालेला आहे
२) ड्रायव्हर दारू प्यायला आहे
कुठल्या टॅक्सीत बसल्यावर तुम्हाला जास्त टेंशन येईल?

असह्य डोकेदुखीमुळे अनेकांची आय रिअली नीड अ ड्रिंक अशी परिस्थिती झाली आहे.
>>>>>

माझ्या माहितीप्रमाणे दारूने डोकेदुखी कमी होत नाही तर उलट दुसर्‍या दिवशी जड झालेले डोके उतरवायला लोकं लिंबू सरबत, कोरी चहा वगैरे घेतात. तरी जाणकारांनी फोकस मारा

त्यामुळे आता सर जितके प्रतिसाद देतील तितक्या नव्या कॉकटेल आणि दारूच्या पोस्ट टाकाव्या
त्यांना हेच उत्तर आता
>>>>

कोणाला दारूचा प्रचार करायचा असेल खुशाल करावा
मी दारूचा विरोध करणे सोडणार नाही
दोघे प्रामाणिकपणे आपापले कार्य करत राहू !

क्लोज्ड ग्रूप . क्लोज्ड ग्रूप.

बरी करमणूक आहे. ते हेओवा विटनेस वाले कसे तुझा उध्दार करुनच सोडतो म्हणून बायबल डोक्यात मारतात तसे वाटत आहे.
फॉर द रेकॉर्ड मी आत्तच फक्त लेमन टी घेतला आहे.

हेमंत मस्त पोस्ट +111
का देत नाही? हा विचार कधी केला आहे.
बड्डे पार्टीला लहान मुलांना फ्रूटी ऐवजी एकेक बीअरचा कॅन द्यायला काय हरकत आहे >>अरे सांगितलं न त्यांनी दारू सिर्फ नाम से बदनाम है
हेच कारण आहे

नाही तर उलट दुसर्‍या दिवशी जड झालेले डोके उतरवायला लोकं लिंबू सरबत, कोरी चहा वगैरे घेतात. >>>ईईई काहीही,सगळेच जण अगदी तररररर होईस्तोवर पितात असं वाटतं का तुला?

सगळेच जण अगदी तररररर होईस्तोवर पितात असं वाटतं का तुला?
>>>>>>

छे असे कुठे म्हटले मी..
दारूच्या अति सेवनाने तर्रर्रर झाल्यावर डोके चढते तर ती डोकेदुखीवर उपाय कसा ईतकाच मुद्दा होता.

बड्डे पार्टीला लहान मुलांना फ्रूटी ऐवजी एकेक बीअरचा कॅन द्यायला काय हरकत आहे >>अरे सांगितलं न त्यांनी दारू सिर्फ नाम से बदनाम है

>>>

हे उपरोधाने म्हटलेय की सिरीअसली?
म्हणजे दारू नाहक बदनाम आहे अन्यथा लहान मुलांना बीअरवाटप करण्यास काहीही हरकत नाही असे खरेच म्हणायचे आहे का?

Pages