तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

त्याला ट्विटर आणि सोशल मीडियावर लिही ना नाव घेऊन की एक चाहता म्हणून आम्हाला हे आवडत नाही आणि त्याचा स्क्रीनशॉट टाक इथं
>>>>
मी तिथे ट्विटर वा तत्सम सोशलसाईटवर जात नाही. तिथे त्याचे कौतुकही करत नाही. माझ्या अकाऊंटला तिथे कोणी फॉलोही करत नाही.
मी मायबोलीवरच त्याचे कौतुक करतो तर निषेधही ईथेच करणार ना.

आणि हो, मायबोली काही खाजगी जागा नाही. पब्लिक फोरमच आहे. त्यामुळे बाथरूममध्ये कडी लाऊन निषेध हे उदाहरण मायबोलीबाबत साफ चुकले आहे.

उपयोग काय तुझ्या वांझोट्या निषेधाचा???

ज्याचा निषेध करायचा त्याला कळलं तर पाहिजे
मराठी पेपर मध्ये पूर्वी संपादक हिटलर ला दम देत आपल्या अग्रलेखातून
तसल्या लेव्हल चा तुझा हा निषेध
इथं काही शेकडो असतील वाचक आणि डझन लेखक या धाग्यावर
पण तुझा सो कॉल्ड सुपरस्टार हजारो तरुणांना, लहान मुलांना आयुष्य लार्ज बनवायला दारू प्यायचा सल्ला देतो, त्यांना प्रवृत्त करतो त्याबद्दल बोलताना तुझी जीभ लुळी पडते
इतकीच कळकळ आहे ना दारुबद्दल मग जिथे जास्त अवश्यक आहे तिथं दाखव ना
पण नाही तिकडे अगदी डोळ्यातून बदाम वगैरे छपरीपणा करणार
खरोखर फरक पडेल असलं काही तू करणार नाही कारण तुला कळकळ कमी आणि स्वतःला अटेन्शन कसे मिळेल याची चिंता जास्त आहे, दारू केवळ निमित्तमात्र.
त्यात तुझं भजनी मंडळ आहेच हाजी हाजी करायला

मध्ये मी अजून एक बियर व्होडका प्रयोग करून बघितला होता तो सांगितला होता का इथे? बराच जुगाड होता पण धमाल जमले होते. थांबा शोधून टाकते रेसिपी.

चैला.

इतके सगळे नवे प्रतिसाद पाहून, नव्या इंटरेस्टिंग दारू किश्श्यांसाठी धागा उघडला तर हे रुन्मेश नामक प्राणी काहीतरी असंबद्ध बडबड इथे करीत आहेत.

आपले सगळे कसे बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी मंदभक्त जे काय चाळे करतात तसे या व्यक्तिचे प्रतिसाद वाचून वाटते.

प्रतिवाद काय तर मुलांसमोर दारू प्याल का?

उत्तर : हो. खरं तर प्यायला हवी.

जर तुमच्यात सोशल ड्रिंकिंग करण्याइतपत सेल्फ कंट्रोल असेल तर नक्कीच. अन मुलांना व मुलींनाही योग्य वयात आल्यानंतर (दारू पिण्याचे लायसन आपल्याकडे २१ वर्षी मिळते बहुतेक.) दारू कशी व किती प्यावी. कुणाच्या कंपनीत पिणे सेफ असते, हे शिकवणे गरजेचे आहे.

एक शंका : दारूड्या पालकांची मुले त्यांचे दारूचाळे पाहून हमखास दारूद्वेषी होतात असाही अनुभव आहे. तसे तर काही इथे नाहिये ना? कारण फारच दारूद्वेष दिसतोय इथे

एक सूचना : आजकाल नुसत्या मेट्रोज मधे नव्हे, जिथे जिथे होस्टेल्स अन कॉलेजेस झाली आहेत अश्या टियर २ सिटीज मधे देखिल दारू पेक्शा वीड जास्त बोकाळत आहे. त्यापासून मुलांना सावध करणे गरजेचे आहे. त्याबद्दल जनजागृती मोहिम या रुन्मेश यान्नी हाती घ्यावी. म्हणजे नको तिथे येउ न फाल्तू बडबड करणार नाहीत.

Ashu sir- (fukaat salla) ignore kara zala.... an-ullekhaane marlet tar baray,

मला वाटतंय की यातल्या कॉकटेल रेसिपी शोधून त्याचा वेगळा धागा करावा
प्रिय अडमीन, यात माझ्या आणि रन्मेष च्या ज्या अवांतर पोस्ट पडल्या आहेत त्या उडवता येतील का
उगाच रसभंग होतोय

ओ आशु भाऊ तुम्ही फार जीवाला लाऊन घेता. रुंमेशचे comments आले की घरच्या एखादा पेग भरलेल्या गलासाचा फोटोबिटो टाका राव. जमलं तर कुठल्यातरी खतरनाक कॉकटेल ची रेसिपी लिहा. वर लिहीली तसे. तुम्ही फोटो टाकले तर आपण पण टाकू की Happy Happy

Ok.
नाव कधी ऐकले नव्हते.
जग प्रसिद्ध jhony Walker हा समज

मध्ये मी अजून एक बियर व्होडका प्रयोग करून बघितला होता तो सांगितला होता का इथे? बराच जुगाड होता पण धमाल जमले होते. थांबा शोधून टाकते रेसिपी.

Submitted by नीधप on 23 October, 2022 - 01:15

नीधप रेसि पी?

मला आठवतोय, बियर मध्ये ऑरेंज ज्यूस असं काहीतरी होतं बहुदा
मी त्यावेळी म्हणलेलं पण की नक्की चांगलं लागेल ना

पण तुझा सो कॉल्ड सुपरस्टार हजारो तरुणांना, लहान मुलांना आयुष्य लार्ज बनवायला दारू प्यायचा सल्ला देतो, त्यांना प्रवृत्त करतो त्याबद्दल बोलताना तुझी जीभ लुळी पडते
>>>>

अहो केलाय की शाहरूखचा निषेध मायबोलीवरच. त्याचे कौतुकही ईथेच करतो तर निषेधही ईथेच करणार ना.

मग आता शाहरूखच्या दारासमोर मोर्चा घेऊन जावे अशी अपेक्षा कश्याला? आणि मग तसे करायचेच झाल्यास एकट्या शाहरूखबाबतच का? असे करणाऱ्या प्रत्येकाचा निषेध त्याच प्रकारे करावे लागेल ना..

पण या सगळ्यात एक कळतेय का,
हे निषेधार्ह कृत्य आहे हे तुम्ही मान्य करत आहात. हा माझ्यासाठी एक छोटासा विजयच आहे. तोंडाने कबूल करा किंवा करू नका, पण दारू वाईट असते ही जाणीव असायलाच हवी प्रत्येकाला.

दारू पिणे एक व्यसन आहे त्या मुळे दारू वाईट आहेच.
दारू ची सवय लागते आणि ती सवय सोडणे कठीण जाते.
लिमिट मध्ये पिली तर काही होत नाही असे एक दारू पिणाऱ्या लोकांचे बोध वाक्य लोकांसाठी असते.
पण हे लिमिट म्हणजे किती?
ह्या विषयी प्रत्येकाचा आकडा वेगळा असतो.
दुसरे पैसे बरबाद होतात.खूप जास्त पैसे दारू वर खर्च होतात.
त्या मुळे दारू वाईट च आहे.पैसे नसतील तर व्यसनी माणूस चोरी पासून काही ही करू शकतो.
म्हणून दारू वाईट च.
दारू पिल्यानंतर मेंदू चे कंट्रोल सुटते.
भावना तीव्र होतात.
राग प्रचंड येणे आणि तर रागाच्या भरा मध्ये जीवित हानी त्या व्यक्ती कडून होते.
म्हणून दारू वाईट च.
पोस्ट martam करणारे कर्मचारी,कचरा उचलणारे कर्मचारी,अतिशय विपरीत स्थिती मध्ये काम करणारे.
सैनिक फॅमिली पासून लांब राहतात.
अशा काही क्षेत्रात काम करणारे दारू पितात.त्यांना तशी सुविधा पण दिली जाते.
कारण मानसिक स्थिती ठीक राहावी काही वेळ तरी सर्व त्रास,दुःख विसरून जवित.
दारू मुळे शरीराचे अतोनात नुकसान होते .
ह्या विषयी दुमत कोणाचेच नाही.
मृत्यू जरी काही लोकांना आला नाही तरी शरीरातील अनेक अवयव कमजोर होतात...
मग तरी लोक दारू का पित असतील?
दारू पिण्याच्या विविध सोयी सुविधा जगभर का आहेत.
दारू ल अगदी कॉर्पोरेट वागणूक का दिली जाते.
बुध्दीमान,धनवान, प्रतिष्ठित,कीर्ती वान लोक पण दारू पितात ह्याची कारणे काय असावीत.

प्रिय अडमीन, यात माझ्या आणि रन्मेष च्या ज्या अवांतर पोस्ट पडल्या आहेत >> मी चुकून "यात प्रिय अडमीन, माझ्या आणि रन्मेष च्या ज्या अवांतर पोस्ट पडल्या आहेत" असं वाचलं. म्हटलं अडमीन पण अवांतर लिहू लागले की काय! (सॉरी अडमीन)

माझ्यासाठी एक छोटासा विजयच आहे>>
सगळा आटापिटा याचसाठीच चाललाय तुझा
जोड्याने हाणा पण पाटील म्हणा असला तुझा बाणा
त्यामुळे तुला दारूचा प्रॉब्लेम नाहीये तर फक्त अटेंशन हवंय हे माझं मत बरोबर असल्याचे सिद्ध झालं आहे
हे तू तोंडाने मान्य कर अथवा नको पण तुला फक्त मायबोलीवर या निमिताने त्रास द्यायचा आहे हे तू आता कबूल केलं आहेस. तुझ्या भजनी मंडळालाही याची जाणीव असायला हवी
हाही एक माझ्यासाठी विजयच आहे

हाही एक माझ्यासाठी विजयच आहे
>>>>

माझा शत्रू दारू आहे
तुमचा शत्रू ऋन्मेष आहे
दोघांच्या लढाईत फरक आहे
असो, दोघांना आपापल्या लढाईसाठी शुभेच्छा Happy

काहीतरी फालतू बोलू नको
माझा शत्रू असण्याइतक तुला महत्व नाहीये
तू जागोजागी येऊन पिरपीर करतो म्हणून मी तिथं बोलतो
तू बाकी कुठंही जाऊन तडफड मला घंटा फरक पडत नाही

चिलट माहितीये का तुला? ते कसं स्वस्थ बसूही देत नाही आणि हाकलले तरी जातही नाही आणि त्यामुळे कोणी वैतागला तर तो चिलटाचा विजय नसतो

असो, फार अवांतर झालं आता इथं जरा विषयावर बोलू

नवीन कुठली ऑर्डर केलीस का व्हिस्की? ऑफर्स असतील तर घे माझ्यासाठी पण एक

माझा शत्रू असण्याइतक तुला महत्व नाहीये
>

.

बर्रं Happy

विषयावर बोलूया

काल कित्येक वर्षांनी (जवळपास सहा सात वर्षांनी) ड्रिंक घेतले. चुकून घेतले लक्षात आले नाही. पहिला घोट घेताच कळले पण मोह आवरला नाही. छोटीशीच बाटली होती. पण पुर्ण संपवली. एकदा तोंडाला चटक लागली की थांबणे अवघड असते. आता मात्र पुन्हा कधी ही चूक होऊ देणार नाही असे स्वत:ला बजावले.

सावध रहा लोक्स हे क्लिकबेट आहे
पूर्ण दुर्लक्ष करा

हे सगळ्यात आधी तुम्हीच मनावर घ्या. तुम्हीच जाताय रिंगणाबाहेर कुस्ती खेळायला.

रुन्मेष plz इथे बस कर आता प्रतिसाद आणि प्रतिवाद
मला इथले प्रतिसाद वाचायला खूप आवडतात,लोकं भारी भारी काय काय try करतात मस्त वाटतं वाचायला
मी अजूनतरी कधी दारू प्यायली नाही पण कधी इच्चा झाली तर असू द्यावा म्हणून हा धागा राखीव आहे Rofl

Pages