तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

आता आयुर्वेदिक आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला. >> श्या ! बारकेसे गिल्टी प्लेझर्र सुद्धा सोडत नाहीत मंडळी .
बीअर आणि विंग्ज आवडते कॉम्बिनेशन आहे. फार जुळवाजुळव , तयारी काही लागत नाही.

ग्रॅड स्कूलमधे असताना carrefour मधे $२.५० ला एक डझन विंग्स आणि $१ ला ताजा बागेत मिळत असे. दोन (गरीब) ग्रॅड स्टूडंटचं पोटभर जेवण होत असे. त्यांच्या सारखे बफेलो विंग्ज इतर कुठे खाल्ले नाहीत.

आज च्या मानवाचे कर्तृत्व काय?.ह्याचे उत्तर एका वाक्यात देता येईल यांत्रिकी करण.
बाकी सर्व बाबतीत आज च माणूस पूर्वजांच्या पुण्याई वर च जगत आहे
१) भाषा निर्माण करने.
२) संवाद साठी ती वापरणे.
३) भाषा कशी लिहावी.
४) फळं,कड धान्य, कोणती माणसाने आहारात वापरावी
त्याची लागवड आणि उत्पादन कसे घ्यावे.
५) अन्न धान्य ची साठवणूक कशी करावी.
५) काय शिजवून खावे ,काय तळून खावे ,काय भाजून खावे.
६) ऊन, वारा,पावूस ह्या पासून रक्षण करण्या करता घर कसे बांधावे
७) कपडे,चप्पल कशी निर्माण करावी
८) योग्य आहार कोणता आणि अयोग्य कोणता.
९)
शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम काय करावं.
१०)कोणते प्राणी पाळावेत आणि त्याचा कसा वापर करावा
खूप मोठी लिस्ट आहे .ह्या मध्ये शिक्षण, कला,नीतिमत्ता,कुटुंब व्यवस्था,समाज व्यवस्था ,शासन व्यवस्था असे अनेक विषय नाहीत
वीज, चाक,हवेचा वापर,पाण्याचा वापर हे पण विषय नाहीत
हे सर्व पूर्वजांनी दिलेली फुकट ची गिफ्ट आहे...
पूर्वजांनी हे दिले नसते तर माणूस आज अस्तित्वात पण नसता.
त्या मुळे उथळ विचार करून कोणाचे पूर्वज काढू नका

“ पूर्वजांनी हे दिले नसते तर माणूस आज अस्तित्वात पण नसता.” पूर्वज नसते तर आजचा माणूस अस्तित्वात नसता हे बायोलॉजिकल सत्य म्हणून स्विकारायला हवं Happy

“ या सगळ्यात दारु कशी प्यावी हे पूर्वज सांगायचे विसरले” - ‘नीट‘ (नो पन इंटेंडेड) शोधलं तर मिळेल रे ह्यावरही काहीतरी Lol

पूर्वज (उत्साही) नसते तर आजचा माणूस अस्तित्वात नसता हे बायोलॉजिकल सत्य म्हणून स्विकारायला हवं Happy

‘नीट‘ (नो पन इंटेंडेड) शोधलं तर मिळेल रे>>>>

वैदिक काळापासूनचे आहेत दाखले

त्या आधीचा उत्साही अदिमानव काय पीत असावा यावर संशोधन होणे गरजेचे आहे

एकमेकांकडे जाताना गिफ्ट म्हणून काय नेत असावेत

.

पुर्वजांनी हे सांगितले आहे

------

कुरान विशेष रूप से ईमान वालों को नशीले पदार्थों के सेवन और जुआ में लिप्त होने से रोकता है। शराब को इसलिए मना किया गया है कि यह बुद्धि को भ्रष्ट कर देता है और सामाजिक व्यवहार पर नकारात्मक प्रभाव डालता है ।

नशीले पदार्थों, विशेष रूप से शराब को व्यापक रूप से अनेक सामाजिक बुराइयों का मूल कारण माना जाता है। शराब के नशे में गाड़ी चलाने से यातायात में दुर्घटनाएँ अधिक होती हैं।

गलियों के झगड़े और महिलाओं और बच्चों के विरुद्ध घरेलू हिंसा सामान्य रूप से शराब के नशे के प्रभाव में होती है, इसलिए कि शराब पीने वाले अपना सामाजिक आचरण और व्यवहार को खो देते हैं।

---------

सोबत पुर्वजांनी सांगितलेल्याची लिंक सुद्धा जोडत आहे.
चांगले विचार कुठल्याही भाषेत वा धर्मात असो. आचरणात आणायला हरकत नाही.

https://www.al-islah.in/2021/11/gambling-alcohol-banned-in-islam.html?m=...

“ एकमेकांकडे जाताना गिफ्ट म्हणून काय नेत असावेत” - हायला! ह्यावर कधी विचार नव्हता केला Happy ह्यात एका धाग्याचं पोटेन्शियल आहे का? Wink

म्हणजे सगळे पूर्वज यूपीमधून आले का काय Happy
तिरुचरापल्ली मधले पूर्वज हिंदीतून कशाला काही सांगतील
आणि सांगितलं तर कोणाला कळणार Happy

ह्यात एका धाग्याचं पोटेन्शियल आहे का? >>>>
आदिमानवांनी गुहेत लहान मुलांच्या समोर असे वागणे
बरोबर की चूक
असा धागा काढा, धो धो चालेल
Happy

Gift ह्याचा खरा अर्थ काय आहे?
ज्याला गिफ्ट देणार म्हणजे भेट वस्तू देणार त्याची किंमत ज्या व्यक्ती la भेट वस्तू देणार त्या व्यक्ती कडून माझा काय फायदा होईल ह्या वर अवलंबून असते.
गिफ्ट ही एक प्रकारची लाच च असते.
किंवा गरज भागवण्या चे साधन असते.
पूर्वज ..
ज्याच्या कडे कोंबडी आहे पण लाकड नाहीत फ्राय करण्यासाठी
तेव्हा ज्याच्या कडे कोंबडी आहे पण लाकूड नाही ते लाकूड गिफ्ट करत असतील

हा एकाकडे मोहाची फुले असतील
दुसऱ्याकडे वरवंटा
मग दोघे मिळून रस काढून अर्धा अर्धा घेत असतील

सोबत बफेलो तंगडी फ्राय

सगळ्यात दारु कशी प्यावी हे पूर्वज सांगायचे विसरले, त्यामुळेच कटप्पांनी हा धागा काढलाय >> Lol
थोडक्यात डीयुआय आणि डोमेस्टिक व्हायलन्स होणार नाही, गटरात लोळायची वेळ येणार नाही ते बघा आणि घ्या. त्यात काहीच दुमत नाही. Lol दिवसरात्र दारुबंदीची नशा जास्त घातक आहे. इथे ताळतंत्र सोडून कोण वागतंय याचा पोल घ्या बरं!

पण सर पूर्वजांनी दारू प्या असं पण सांगितलंय.
Timothy 5:23 -
Drink no longer water, but use a little wine for thy stomach's sake and thine often infirmities.
येशू ख्रिस्ताने पाण्याची वाइन बनवलेली.
आता तुम्हीच मार्गदर्शन करा - येशू बरोबर की पैगंबर.

दारू आता ची .
आणि दारू सारखे पेय आदरणीय पूर्वज लोकांचे फरक आहे.
1) आता ची दारू kinvan प्रक्रिया - उर्ध्व पतन ,आणि नंतर रंग येण्यासाठी कृत्रिम रंग .चव थोडी बदलावी म्हणून कृत्रिम चव निर्माण करणारी रसायने अशी बनते
पूर्वज ज्याला दारू म्हणायचे ते पेय.
ताडी, माडी किंवा आता आपल्याला माहीत नसलेली नैसर्गिक रीत्या तयार होणाऱ्या फळांचे रस .
फरक आहे ना.
ताडी मध्ये अल्कोहोल नैसर्गिक असते ५% सर्वोच्च असतेच
पण ते नैसर्गिक..
आणि तेच प्रमाण योग्य आहे.
बिअर कृत्रिम ..
दोन्ही नशा निर्माण करत असल्या तरी शरीरावर विपरीत परिणाम करण्याची दोन्ही पेयांची क्षमता वेगळी आहे
पूर्वज हुशार की आपण हुशार.

ताडी मध्ये अल्कोहोल नैसर्गिक असते ५% सर्वोच्च असतेच
पण ते नैसर्गिक..
आणि तेच प्रमाण योग्य आहे.
>>>>>>

ताडी आणि नीरामध्ये काय फरक आहे?

मी लहानपणी नीरा खूप आवडीने प्यायचो. सीजन आला की ऑलमोस्ट रोजच. कारण तेव्हा भायखळा स्टेशनला आतमध्ये नीराचा स्टॉल होता. आणि तो रोजचा शाळा-कॉलेजला जायचा रस्ता होता. ट्रेन सोडायचो, पण नीरा नाही चुकवायचो. माझे काही मित्र तेव्हा मला नेहमी चिडवायचे की हा दारूचाच एक प्रकार आहे. संध्याकाळी हे आंबते आणि त्याची ताडी-माडीसारखी दारू बनते.

तेव्हा गूगल नसल्याने अश्या प्रश्नांची उत्तरे सहज शोधता यायची नाहीत.

लाजाळू चे झाड,तंबाखू, गांजा ( अफू,) ताडी, माडी ,मोहाचे झाड अशा किती तरी वनस्पती आहेत त्याचे सेवन केले की नशा येते

पण माणूस सोडून कोणता प्राणी त्याचा वापर करत नसेल .
ह्या सर्व वनस्पती निसर्गाने फक्त माणसं साठी च पृथ्वी वर निर्माण केल्या आहेत.
प्रचंड क्षमता असणाऱ्या मानवी मेंदू साठी त्याची गरज असावी.
( उगाचच संबंध जोडून आपले मोठे पण सिध्द केले आहे असे कोणी म्हणू नका)

पण माणूस सोडून कोणता प्राणी त्याचा वापर करत नसेल>

हे माझे वाक्य च प्रश्र्नर्थी आहे फक्त प्रश्न चिन्ह दिले नाही .
त्या मुळे सिध्द न करता फक्त माहिती ध्या

ईशान्य भारतातील आसाम, अपॉंग नावाच्या तांदळाच्या बियरसाठी ओळखले जाते जे शतकानुशतके तेथे बनवले जाते. मिझिंग आणि आदि जमाती विवाह आणि सणांसारख्या आनंदी प्रसंगांसाठी त्याचे तुकडे करतात.

30 वेगवेगळ्या प्रकारची झाडांची पाने, गवत आणि रांगांचा वापर आपोंग बनवण्यासाठी केला जातो. तांदळाबरोबरच बांबू आणि केळीची पाने देखील जोडली जातात.

हँडिया
हंडिया हे ओरिसा, झारखंड आणि बिहार तसेच बंगालच्या काही भागांमध्ये एक लोकप्रिय पेय आहे. हे प्राचीन काळापासून संस्कृतीचा भाग आहे आणि अतिशय शुभ मानले जाते.

सहसा उत्सवाच्या वेळी मद्यपान केले जाते, ते स्थानिक देवतांना देखील दिले जाते उत्सव. किण्वित हर्बल गोळ्या आणि तांदूळ दारू बनवण्यासाठी वापरतात

हत्ती, माकडे, डुक्कर, हरणे हे सगळे प्राणी मादक फळे आणि फुले खाऊन झिंगतात
आणि हे अनवधानाने नाही तर कुठल्या हंगामात कुठं कुठली फळे मिळतात याचे ज्ञान त्यांना असते
याचे डिस्कव्हरी, अनिमल प्लॅनेट ला भरपूर व्हिडीओ आहेत

आधीच मर्कट, त्यात मद्य प्यालेले. अशी म्हण आहे
त्यामुळे जनावरे मद्यपान करतात यात तथ्य असावे.

आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला।
झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला।
झाली तयास तदनंतर भूतबाधा।
चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा।

अशी ती ओरिजनल म्हण आहे

'दुसर्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही' अशीहे म्हण आहे म्हणजे कुसळ आणि मुसळ ह्या गोष्टीसुद्धा डोळ्यात जातच असतील. 'असतील शिते तर जमतील भुते' अशीही म्हण आहे. त्यामुळे भात शिजवला कि भुतं जमत असातील. Light 1 Happy

वा शालजोडीतून.

बीअर बरोबर खारवलेले परफेक्ट भाजलेले काजू पन बेस्ट. आयटीसीचे मस्त मिळतात काजू.

फेरफटका हा हा.. गूड वन!
थोडक्यात नरो वा कुंजरो वा.. टू बी और नॉट टू बी.. मर्कट मद्य पिणारेही असू शकते किंवा मर्कट मद्य न पिणारेही असू शकते.. म्हणींचा शब्दश: अर्थ न घेता मॉरल बघावे. मद्य पिल्याने आपल्यातील मर्कटपणा वाढतो किंवा उसळून बाहेर येतो. म्हणून मर्कट पित असेलच असे नाही.

ऋनमेष.
दारू ही वाईट च आहे ह्या वर दुमत असण्याचे काहीच कारण नाही.
तुझ्या मता शी सहमत आहे.

पण तरी दारू चे व्यसन असणारी करोडो लोक जगात आहेत हे सत्य पण नाकारता येत नाही.
त्यांना पूर्ण बहिष्कृत करने पण शक्य नाही.
त्या मुळे माध्यम मार्ग म्हणजे..
दारू कमी पिने ह्या बाबत जागृती आणि सरकारी यंत्रणा मार्फत त्याचे नियोजन.
आणि सामाजिक दबाव.
असे मार्ग निवडावे लागतात.

Pages