तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

ओह मी ते वरती वाचलेच नाही
मला वाटलं चेडर चीझ सारख काहीतरी असेल

टेंडर कोकोनट ज्यूस असा मिळतो?

मी हे वापरून बनवलं. पण काळं मिठ मस्ट. ते टाकलं की गोळा बनवणाऱयाच्या गाडीवर जे सरबत मिळतं तशी चव येते. वरून हवा तितका वोडका ओतायचा.
BBD21B80-B443-4BA3-A8E3-AA3431A88E62.jpegA10FAD30-FE5F-413B-8DBE-4E438348AD14.jpeg

ओह शाहळ्याचे पाणी होय
हा मग ते काय इथंच कोपऱ्यावर मिळतं

मँगो ज्यूस पण मिळेल, काळं मीठ पण आहे घरी
रुहअफजा च विनाकारण अक्खी बाटली घ्यावी लागेल
फार उग्र वाटतं मला तरी ते

काल हे कॉकटेल केलं

रेसिपी
एका जाड ग्लास मध्ये दोन चार लवंग हलकेच कुटली, त्यात अर्धा चमचा मध घातला, लिंबू पिळला एक अक्खा
सगळं मिश्रण नीट मिक्स केलं
मग 60ml सोडा आणि तेवढीच व्होडका मिक्स केली
भरपूर बर्फ घातला
आणि मग दालचिनीचा तुकडा गॅस वर पेटवला आणि लगेच ग्लासात सोडला
झकास स्मोकिंग फ्लेवर आला
आणि शेवटी टॉपअप अपी फिझ ने केलं

खल्लास प्रकार झालाय

IMG_20221128_231550.jpg

याला गर्निश करायला एक सफरचंदाची फोड कापून ग्लासवर खोचता येईल, मी ते करायचा कंटाळा केला

आशुचँप - बराच धाडसी प्रयोग केलायस. Happy जवळ जवळ काढ्यात कॉकटेल बनवलंस. Happy

आयडिया चांगली आहे.

मध्यंतरी अ‍ॅपल सायडर, जिंजर बीअर / जिंजरेल, दालचिनी वापरून मार्गारिटा बनवली होती, त्याची आठवण झाली.

मग दालचिनीचा तुकडा गॅस वर पेटवला आणि लगेच ग्लासात सोडला
झकास स्मोकिंग फ्लेवर आला>> वा, हे आवडलं मला .. तंदूरी कॅाकटेल

आणि शेवटी टॉपअप अपी फिझ ने केलं>> तिकडे फ्रेस्का मिळतं का? मला वोडका असलेल्या कॅाकटेल्समधे fresca टाकायला आवडतं

CAA62E18-C5D7-436A-8A5A-0B9C7646C7BC.jpeg

मला वाटले The Boys Series मध्ये Fresca असेच फेक प्रॉडक्ट वापरले आहे Happy

म्हाळसा, फ्रेस्कामध्ये जलजीरा घालून मस्त ड्रिंक तयार होतं. हवंच असेल तर त्यात थोडं जीन घालायचं. पण मला त्याशिवाय आवडतं.

मला Jagermeister ची एक बाटली गीफ्ट मीळाली आहे. ती कशी पीतात?

>>>> टकिला सारखेच shots मध्ये पितात बहुधा....

Jagermeister ही लिक्युअर आहे.

गोड लागेल. प्लस त्यात बरेच मसाले ही असतात.

जेवणानंतर प्यायची दारू. सगळ्यात शेवटची. माऊथ फ्रेशनर सारखी पितात. शॉट ग्लासमधे घेऊन सिप बाय सिप प्या. त्यात पाणी/कोल्ड्रिंक इ. काहीही मिक्स करायचं नाही. अल्कोहोल बरंच असतं हिच्यात (३५%, रम मधे असतं तितकं. ३० मिलि पेग बनवा).

आपल्याकडे चॉकोलेट किंवा कॉफी लिक्युअर कॉमनली मिळते. ही 'मास्टर हंटर' जर्मन्/युरोपियन लिक्युअर सहसा मिळत नाही.

यगरमिस्तर एकदम सुरेख प्रकार आहे

रेडबुल सोबत बेस्ट लागते ही

बाकी कोक किंवा कुठलाही सॉफ्ट ड्रिंक ऍड करू नका
त्याची हरबल टेस्ट मिळणार नाही

दोन तीन बर्फाच्या तुकड्या सोबत थोडं पाणी मिक्स करून घ्या
वेगवेगळ्या नोट्स जाणवतील त्याच्या

काहींना अजिबात आवडत नाही काढा आहे म्हणतात पण मला जाम आवडलेली
मी अगदी पुरवून पुरवून संपवली

जवळ जवळ काढ्यात कॉकटेल बनवलंस>>> हो सर्दी खोकल्यावर रामबाण आहे अशी जाहिरात करायला हरकत नाही

मी हे सगळे प्रयोग बायकोला पहिले टेस्ट करायला देतो
ती बऱ्यापैकी चोखंदळ आहे, तिने मस्त आहे असा अभिप्राय दिला की लगेच इथे टाकतो Happy

ही रेसिपी पण कॉकटेल इंडिया च्या चॅनेल वर मिळाली
त्यात थोडे मोडीफिकेशन केलं

अप्पी फिझ नसेल तर साधा सोडा ही चांगला लागतो
पण बाकी थाम्बसाप कोक ड्यु वगैरे नको

आणि व्होडका ऐवजी व्हिस्की पण मस्त लागते
तोही एक पेग बनवून पहिला

“टकिला सारखेच shots मध्ये पितात बहुधा” - टकिला चे शॉट्स घेण्यापेक्षा, ती फ्रीझरमधे ठेवुन गार करावी (गोठत नाही) आणि नुसती सिप करावी.

ख्रिसमस स्पेशल कॉकटेल
लवंग आणि मिरची ग्लासात टाकली, वर लिंबाचा रस चमचाभर
थोडं कुटून घेतलं मग बर्फ घातला
रियल मिक्स फ्रुट ज्यूस घातला 30ml आणि व्हिस्की 60ml
अप्पी फिझ ने टॉप अप केलं

WhatsApp Image 2022-12-25 at 10.41.36 PM.jpeg

पाणीपुरीचं पाणी पण चांगलं लागेल का त्यात?>>
हो एकदम मस्त लागतं
वरती टाकलीय बघा त्याचीही रेसिपी

31st ला कॉलेज मित्र जमलो तेंव्हा एका मैत्रिणीने बनवलेले ड्रिंक-
व्हाईट वाईन + वोडका + टकीला + सफरचंदाचे पनीर शेप सारखे तुकडे

नमस्कार सगळ्यांना तशी मी बरीच जुनी मेंबर आहे आहे पण फक्त वाचन पुरताच ठेवला होता आधी असायचे active.. असो मझपण आवडता विषय आहे हा. हापिसात आज शुक्रवार असल्याने चर्चेतही आहेच त्यामुळं सगळं धागा पहिल्यापासून वाचून काढला भारी वाटलं...मीपण घेते नवऱ्याबरबर हापूसच्या फ्रेंड्स बरोबर...पण खर सांगू का मला नेहमीच डावलले गेल्यासारखं वाटत ह्याबतीत म्हंजे मला बंधन वैगेरे नाहीत पण jents भलेही कितीही लेडीज बरोबर पियदेत त्यांना jents barobar comfertable wata, प्रत्येक वेळी ते मला विचारतीलच असे नाही जसे boys la विचारतात....आणि एकटी प्यावं अस मला पण वाटतं नाही

प्रत्येक वेळी ते मला विचारतीलच असे नाही जसे boys la विचारतात....आणि एकटी प्यावं अस मला पण वाटतं नाही
<<
नवर्‍याला दम देउन ठेवा, प्रत्येक वेळी विचारलंच पाहिजे असं. Wink

एकटी प्यावी असं वाटत नाही, हे फारच उत्तम लक्षण आहे. याचा अर्थ तुम्हाला अ‍ॅडिक्शन नाही. दारुड्याचे पहिले लक्षण म्हणजे एकट्याने दारू पिणे.

(अर्थात सगळ्या दारूड्यांना हे माहिती असते मग सेल्फ डिनायल मधे जाऊन कुणालातरी सोबत घेऊन त्याला पाजण्यात जास्त खर्च करत गाळात जायला लागतात.)

जाता जाता एक जोक :

डॉक्टर : दारू पिता का?
पेशंट : कुणी अग्दी फारच आग्रह केला तर घेतो २-३ पेग.
डॉक्टर : असा आग्रह महिन्यातून किती वेळा होतो साधारणतः?
पेशंट : रोज..
डॉक्टर : रोज? :ऑ:
पेशंट : हो. आग्रह करायला एक माणूस ठेवला आहे नोकरीवर..

दारुड्याचे पहिले लक्षण म्हणजे एकट्याने दारू पिणे.
>>>>

हे उत्तम निरीक्षण आहे
याची नोंद करतो.
मलाही ऑफिसमधून घरी येताना एखाद्या बार शेजारून जाताना कोणी असे एकटेच दारू पित बसलेले दिसले की फार वाईट वाटते त्या व्यक्तीबद्दल.

जाताना कोणी असे एकटेच दारू पित बसलेले दिसले की फार वाईट वाटते त्या व्यक्तीबद्दल.>>>>
जाऊन मग कँपनी द्यायची, त्यात काय इतकं
असेही तुम्हाला फालतू वेळ बराच असतो, तेवढाच सत्कारणी लागेल

Pages