तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

चांगली माहिती
मला हे ब्रँड माहितीच नव्हते
जिम बीम एकच माहिती होता, तोच त्यातल्या त्यात बजेट मध्ये आणि भारतात मिळणारा

IF तुम्ही दारू कशी पिता?== मुलांसमोर THEN
Goto घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?
IF घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ? == चूक THEN
Goto तुम्ही दारू कशी पिता?
ENDIF
ENDIF

मी स्वतः मदिराप्राशन करत नाही पण इतरांनी पण करू नये असा आग्रह करण्याचा मूर्खपणा अजिबात करत नाही. इतरांमध्ये बायको (तिला वाईन आवडते) आणि मुले included. मी गाढव आहे म्हणून मला त्याची चव / मज्जा कळली नाही पण आजूबाजूचे गाढव नाहीत म्हणून त्यांनी खुशाल प्यावी असा माझा समज आहे. मी अंतरजालावर वाचून बायकोसाठी मागच्या परदेश वारीत हेनेसी कोनेक घेऊन आलो. ती कशी किती प्यावी ह्याबद्दल सध्या घरात तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन सुरू आहे. फार आहारी न जाता माफक प्रमाणात आयुष्याची मज्जा लूटण्यातच मज्जा आहे.
बॉण्ड चित्रपटात बॉण्डची बॉस M कोनेक पीत असते असे दृश्य बऱ्याच चित्रपटात आहे. एवढ्यातच स्वर्गवासी झालेल्या ब्रीटनच्या सम्राज्ञी पण रोज झोपताना थोडी कोनेक घ्यायच्या अशी आख्यायिका आहे. आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य लाभलेल्या ह्या ब्रीटीश महिलांच्या कणखरपणाचे रहस्य ह्या कोनेक मध्येच असेल बहुदा

Courvoisier-VSOP-Cognac-Enjoyed-by-Judi-Dench-as-M-in-Skyfall-2012-700x394.jpg

आशुचँप, काही नाही. एका वेळी हे दोन धागे वरती आलेले बघून काहीतरी संबंध जोडला. एकातून दुसऱ्यात आणि त्यातून परत ह्यात यायचा लूप काय होऊ शकेल तो लिहिला आहे. अल्पसमयव्यतीतकरणहेत्वर्थ (म्हणजे मराठीत टाईम पास).

आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य लाभलेल्या ह्या ब्रीटीश महिलांच्या कणखरपणाचे रहस्य ह्या कोनेक मध्येच असेल बहुदा >>. Happy

अल्पसमयव्यतीतकरणहेत्वर्थ (म्हणजे मराठीत टाईम पास)>>>
Happy

हायला, स्वतःच सरकार कसे निर्बंध घालते म्हणून दारू कशी वाईट हे पण म्हणता आणि एकाचवेळेत हे ज्ञान पण पाजता (pun intended) हि शुद्ध हिपोक्रसी नव्हे काय !
Submitted by कॉमी on 21 October, 2022 - 22:13
>>>>>

यात काहीही हिपोक्रसीपणा नाहीये.
सिंपल आहे बघा.
सरकारला महसूल मिळतो म्हणून ते दारू विकतात.
पण त्यांनाही माहीत आहे की दारू वाईट आहे म्हणून ते त्याच्या खरेदी विक्रीवर काही निर्बंध लावतात, जसे की वयाचे, स्थळ काळाचे वगैरे. तसेच त्याच्या जाहीरातींनाही मनाई करतात.
हे कळूनही अमान्य करण्यात काय अर्थ आहे.

तुमचा लाडका शरूख च करतो की दारूची जाहिरात
बघा त्यालाच Happy
Submitted by आशुचँप on 21 October, 2022 - 21:59
>>>>>

मी याबाबत शाहरूखचा निषेधच करतो. किंबहुना या निषेधाचा स्वतंत्र धागाही आहे.

दारूची प्रॉक्सि जाहिरात होतच असते, सोड्याच्या नावाखाली.
Submitted by कॉमी on 21 October, 2022 - 22:12
>>>>

असे सोड्याच्या नावाखाली का करतात बरे?
कारण दारूची जाहीरात अलाऊड नाही म्हणूनच ना..

खरे तर हा धागा - दारू कशी प्यावी, कुठली प्यावी याची चर्चा हे देखील दारूची एक प्रकारची जाहीरातच आहे. ही चर्चा पब्लिक फोरमवर करणे इल्लीगलच आहे Happy

मी स्वतः मदिराप्राशन करत नाही पण इतरांनी पण करू नये असा आग्रह करण्याचा मूर्खपणा अजिबात करत नाही.
>>>>>

याच धर्तीवर असे म्हणू शकता -
मी स्वतः दारूला विरोध करत नाही पण जे दारूला विरोध करतात त्यांना अडवायचा मुर्खपणा करत नाही Happy

पब्लिक फोरमवर करणे इल्लीगलच आहे>>> ¿
मनोरंजनासाठी डोंगर पेटवून पर्यावरणाचे नुकसान करून त्याची बढाई पब्लिक फोरम वर मारणे लीगल आहे Happy

डोंगर किती पेटवला, नेमके काय झाले होते, कसे झाले होते याचे डिटेल्स मी अजून कुठे लिहिले नाही.
डोंगर कसा पेटवावा याचे ज्ञान मी लोकांना वाटू लागलो आणि त्यांनाही डोंगर पेटवायला उद्युक्त करू लागलो तर ते नक्कीच ईल्लीगल होईल.
ईथे दारूबाबत नेमके हेच होतेय !
कायद्याने दारूच्या जाहीरातीला मनाई आहे. त्यामुळे ईथे अशी चर्चाही ईल्लीगलच झाली. मान्य करा किंवा नका करू.

मग ते अडमीन ना सांगा
त्यांना इलीगल वाटलं तर बंद करतील हा धागा
इथं रडून काय उपयोग आहे
तुमची पिरपीर वाचून आणखी प्यायची इच्छा होते

आणि तुमच्या माहितीसाठी, युट्युबवर दारू कशी प्यावी, काय मिल्स करावं, कोकटेल्स कशी बनवावी, निरनिराळ्या दरवांचे रिव्ह्यू सगळं काही आहे
तिथं जाऊन तुमची पिरपीर का करत नाही
तिथं फाट्यावर मारतील म्हणून सगळी इथंच का?

शरूख चा निषेध पण इथंच मायबोलीवर
जसं काही तो येणारे इथं वाचायला आणि उपरती होऊन बंद करणारे जाहिराती करणे

बाकी काय नाहीय तुम्हाला अटेन्शन हवंय, आणि हे एक निमित्त मिळालंय छळायला

असो तुमच्यामुळे धागा वरती राहतोय,लोकांना माहिती मिळतेय त्यामुळे चालू द्या Happy

इथं रडून काय उपयोग आहे
तुमची पिरपीर वाचून आणखी प्यायची इच्छा होते
>>>>>

स्वतःच्याही नकळत दारू हे वाईट पेय आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद

चला रात्री भेटूया, शुभ दिपावली !

लहानपणी डोक्यावर पडला आहात काय??
नक्की कुठल्या वाक्यात मी दारू वाईट आहे हे मान्य केलंय

मी सांगू का तुम्हाला तुम्ही जरा तब्येतीची काळजी घेत चला, या वयात असे भ्रम होणं चांगलं नाही

आणि ते शरूखच निषेध करायचे मनावर घ्या

सरकारला महसूल मिळतो म्हणून ते दारू विकतात.
पण त्यांनाही माहीत आहे की दारू वाईट आहे म्हणून ते त्याच्या खरेदी विक्रीवर काही निर्बंध लावतात, जसे की वयाचे, स्थळ काळाचे वगैरे. तसेच त्याच्या जाहीरातींनाही मनाई करतात.
हे कळूनही अमान्य करण्यात काय अर्थ आहे.

>>>मुळात मला दारूच्या जाहिरातींवर निर्बंध चूक वाटतात. सरकारी नियम आहे म्हणून सोड्याच्या नावाने करावी लागते. त्यामुळे उगाच सरकार अमुक्तमूक करते हे सांगून काय उपयोग ? मला सरकारच्या सुद्धा दारूविषयक काही पॉलिसी पटत नाहीत. तुमचीच अपेक्षा आहे की सरकारने निर्बंध घातले म्हणून दारू वाईट आहे हे मी मान्य करावे. आणि तुम्हीच उलटे म्हणता "लीगल आहे म्हणजे चांगले होत नाही." हि हिपोकरसीच आहे.

बाकी, दारू कशी प्यावी हा धागा तुम्ही सणासुदीच्या काळात उघडला कशाला, जर सणासुदीला लोक दारू पितात ह्याचा तुम्हाला त्रास होतो ? नवीन प्रतिसाद आलेत हे बघायचे आणि इग्नोर करायचे. इथे येऊन इतर लोकांना गिल्ट ट्रिप करणे निचपणाचे आहे.

बर्बन चे आणखी काही ब्रॅंड
वुडफर्ड रीझर्व, बुलेट, ब्लॅक पावडर, न्यू रिफ, एलायजा क्रेग - हे बर्‍यापैकी अफोर्डेबल. कॉकटेलमधे वापरायला दु:ख होत नाही
ब्लँटन महाग आणि मिळायला कठीण. पण बर्बन आवडली तर एकदम वर्थ ! ही मात्र एक स्फेरिकल आइस बरोबर. बर्फ आवडत नसेल तर एखादा चमचा डिस्टिल वॉटर बरोबर - याच्या बरोबर मसालेदार चखणा वगैरे वर्ज्य …

लहान bottle असतात. आणि अगदी काही थेंब च क्वार्टर चे काम करतात.
त्या दारू ल काय म्हणतात.
मी बघितली आहे
पण नक्की तिच्या विषयी माहीत नाही.
झटका मारणे हा काही तरी प्रकार असतो ना

Bulleit Rye एकदा ट्राय करून बघा. 95% राय mash आहे. नीट घेतली तर राय च्या फेमस स्पायसी फ्लेवरचा झटका लगेच येतो. Especially, जर आपल्याला रूटीन mash bill bourbon ची सवय असेल तर लगेच फरक जाणवतो.

वाईल्ड टर्की वाल्यांनी Matthew McConaughey ला क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून घेतले आणि त्याच्याबरोबर नवीन बर्बन केली आहे - Wild Turkey Longbranch. बाटलीवर त्याची सही सुध्दा आहे. नीट सिप करायला मस्त.

एक माणूस भलतंच चिडलंय वाटतं.
Submitted by भरत. on 22 October, 2022 - 16:58
>>>

कोणी मद्यपान केल्याने मला वैयक्तिकरीत्या काही त्रास नाही. तर मी का चिडू?
मला कुठे दारूचे उदात्तीकरण होतेय असे दिसले तर नाही राहावत हा माझा प्रॉब्लेम असेल. हे मात्र मान्य आहे.

मुळात मला दारूच्या जाहिरातींवर निर्बंध चूक वाटतात.
>>>
ओके.
पण ते आहेत हे फॅक्ट आहे. कारण सरकारच्या मते दारू हे अपेयपान आहे. त्याची जाहीरात होऊ नये असे त्यांना वाटते. म्हणजे ज्याला प्यायची त्याने प्या. पण लोकांन उद्युक्त करू नका असा सरकारचा स्टॅंड असतो. ईथेही मी वर धाग्याच्या हेतूबाबत तोच आक्षेप नोंदवला आहे. आपली आपण प्या. लोकांना उद्युक्त करू नका.
किंबहुना लहान मुलांसमोर घरी दारू पिऊ नये असे मी म्हणतो यामागे देखील हाच विचार आहे.
त्यामुळे याबाबतीत माझे आणि सरकारचे विचार जुळतात म्हणू शकतो.

...

बाकी, दारू कशी प्यावी हा धागा तुम्ही सणासुदीच्या काळात उघडला कशाला, जर सणासुदीला लोक दारू पितात ह्याचा तुम्हाला त्रास होतो ?
>>>>>>
लोकं सणासुदीला दारू पितात याचा मला वैयक्तिक काही त्रास होत नाही.
पण जिथे दारूचे उदात्तीकरण होत असते तिथे जाऊन दारूबाबत लोकांना सावध केल्याशिवाय मला राहावत नाही.
हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि तो मला मान्य आहे.

मोठी माणसे ईथे सणासुदीचे चार दिवस या अल्कोहोलच्या दारूपासून दूर राहायला तयार नाहीत.
पण त्या फटाक्याच्या धाग्यावर लहान मुलांनी या दिवाळीत फटाक्यांच्या दारूपासून दूर राहावे या अपेक्षा. >> बरोबर.

त्यामुळे याबाबतीत माझे आणि सरकारचे विचार जुळतात म्हणू शकतो. >> चूक.

ईथे तो निषेध नोंदवला आहे>>>
अरे बेंबट्या,
वाचणारे का तुझा हा वांझोटा निषेध तो इथं येऊन?
हे म्हणजे बाथरूमची कडी लावून हळू आवाजात इंग्रज सरकार मुर्दाबाद म्हणायचं आणि वर देशप्रेमी असल्याचा दिंडोरा पिटायचा तसं झालं हे
इथं जितका कांगावा आणि खोटी कळकळ दाखवतोय त्याच्या शतांशाने जरी खरी असेल तर त्याला ट्विटर आणि सोशल मीडियावर लिही ना नाव घेऊन की एक चाहता म्हणून आम्हाला हे आवडत नाही आणि त्याचा स्क्रीनशॉट टाक इथं
च्यायला तो तिकडं हजारो लोकांना मेक इट लार्ज म्हणत दारू प्यायला प्रवृत्त करतोय आणि तू लाल करतोस त्याची

आता नेहमीप्रमाणे यातले एखादे जे सोयीस्कर वाटेल तितकेच वाक्य घेऊन त्याचा प्रतिसाद दे कारण तुझ्या फुल्यात तितकाच दम Happy
त्यापेक्षा तू जास्त काही करूच शकत नाहीस

सरकारशी मी असहमत आहे असे स्पष्ट असताना सारखे सरकार कशाला पुढे करताय ? कितीतरी वेस्टर्न सरकारांमध्ये दारूची जाहिरात चालते. उलट आपण मायनोरीटी असणार आहे .

बाकी दारूच्या प्रॉक्सि जाहिराती होतात आणि सरकार त्या चालवून घेते आणि एकन एक व्यक्तीला सोडा म्हणजे दारूची जाहिरात आहे माहित असते ह्यावरून काय असेल ते समजून घ्या

ह्यावरून काय असेल ते समजून घ्या
>>>>
ह्यावरून हेच समजतेय की सरकार मध्यममार्ग निवडतेय.
दारू वाईट आहे म्हणून निर्बंधही आहेत.
पण त्यावर सरसकट बंदी आणली तर जनक्षोभ उसळेल, महसूल बुडेल तो वेगळाच, म्हणून त्या निर्बंंधांनी मद्यप्रेमींचे फारसे अडणार नाही असेही बघितलेय.

Pages