खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त.
पण चिकन सिझलर मध्ये फ्रेंच फ्राइज?

फ्रेंच फ्राईज परवडतात, पण माझ्या तो कोबी डोक्यात जातो. म्हणून मी कुठेही हे सिझलर्स प्रकरण मागवायला जरा घाबरतोच.. आणि वेज सिझलर्स तर बिलकुल बिलकुल मागवत नाही.

चिटि सिझलर्स भारी दिसतेय. ईथले कधी ट्राय केले नाही. कसे होते?>> चिकन सिझलर्स यम्मी होते.. मी पूर्वी पासून इथे आले की हे सिझलर्स खातेच.. पण सिझलर्स व्यतिरिक्त लखनवी मटन सीख कबाब्ज मागवलेले, तेही चांगले होते.. आज तुझ्या घराजवळच्या व्हिक्टोरियामधे गेलेले.. तिथलं ड्रॅगन फायर चिकन आणि हॅाट पॅाट राईस

F16AF450-1B45-4AF0-8F3B-6A21C489C297.jpeg

हॅाट पॅाट राईस - हेही पूर्वीपासून आवडीचे.. ह्यात वर ग्रेव्ही आणि खालू राईस येतो
B5522EB6-6E6B-44CE-B5D4-341983D8A8C6.jpeg

चिकन सिझलर मध्ये फ्रेंच फ्राइज? >> मी जितक्या ठिकाणी सिझलर खाल्लेत त्यात नेहमीच फ्रेंच फ्राइज होतेच

कोबी ऐवजी लेटस घालायला सांगायचे ऑर्डर करताना / योकोज चे सिझलर्स खा त्यात ते कोबी पान नसतं.
>>>
अच्छा, बघायला हवे. आमच्याईथे जिथे जिथे खातो तिथे नसते असली काही भानगड त्यामुळे प्रश्न पडला नव्हता.

आज तुझ्या घराजवळच्या व्हिक्टोरियामधे गेलेले.. तिथलं ड्रॅगन फायर चिकन आणि हॅाट पॅाट राईस >>> मीच ईथे आल्यापासून कधी तिथे गेलो नाही. कदाचित ते आपल्याच नाक्यावरच्या हॉटेलमध्ये डिनरला काय जा असे होत असावे. पण जायला हवे. ड्रॅगन फायर चिकन यम्मी दिसतेय Happy

चिकन टिक्का सिझलर सिझल होताना दिसत नाहीये Proud आणि तळात फॉईल का घातली आहे? मग त्या ग्रेव्हीचा धूर कसा होणार?

वरचे ड्रॅगन फायर चिकन आणि हॅाट पॅाट राईस मात्र भारी दिसतायत.

आणि तळात फॉईल का घातली आहे? >> हो ना हे मलाही खटकलं.. पूर्वी फॅाईल नव्हते देत पण आजकाल देतात .. बहुतेक मेंटेनन्स कमी करायच्या नादात
असो, आज आमच्या डोंबिवलीतली सुप्रसिद्ध मुनमूनची मिसळ खाल्ली
4993B535-1799-4969-A167-BC63098E99CA.jpeg

अरे तो कोबी फक्त इन्सुलेशनसाठी असतो ना?
फॉइल मध्ये सिझलर देणारे उद्या वर्तमानपत्रावर थाली देतील Sad

अगं नाही, सबजाच होता. आम्हाला पण आधी चिया सीड्स असतील असंच वाटलं होतं Happy
पेस्ट्री बाकी मस्त होती. रोझ फ्लेवर overpowering नव्हता अजिबात. अगदी परफेक्ट म्हणतात तसा होता. पुढच्या वेळी कधी केक करून घ्यायचा असेल तर याच फ्लेवरचा करून घ्यावा असा मनसुबा आहे Proud

ओ होका, मुलगा मी केलेल्या साखि ला गरिबांचे कॅव्हिआर म्हणाला अशातच Proud
प्लेटला सेम पिंच. फुटताफुटना गेल्या व मिनिमलिझमने डिप्रेशन यायला लागले म्हणून मी नवीन आणल्या एकदाच्या Lol

गरिबांचे कॅव्हिआर >>> Rofl हे भारीये!
अरे खरंच की! अपने प्लेट्स तो सेमीच हय Proud खरंतर हा माझा बर्‍यापैकी आधी आणलेला सेट आहे. पण अजून चांगला राहिलाय (कमालै! Wink ) त्यामुळे चालू आहे.
मिनिमलिझमने डिप्रेशन यायला लागले >>> लोल! मिनिमलिझमने छान वाटायला हवं, डिप्रेसिंग नाही. डिप्रेशन यायला लागलं की स्वतःचे लाड करायला लागायचं लग्गेच Wink

मला वाटतं , वरच्या फोटोत आहेत त्यांना पुडाच्या वड्या म्हणतात. बेसनाच्या पारीत कोथिंबिरीचे सारण भरून तळतात. पाटवड्या बेसन शिजवून थापून त्याच्या वड्या पाडतात.

Pages