तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सारा अली खानचा विषय निघाल्याने पुन्हा ही दोन गाणी आलटून पालटून चार चार वेळा ऐकणे सुरू झाले.

https://www.youtube.com/watch?v=ZmcBC9-wAXM

https://www.youtube.com/watch?v=dx4Teh-nv3A

Can't Take My Eyes Off You गाणं मला ह्या सीनमुळे फार आवडायचं.. आज सकाळपासून ५ वेळा तरी ऐकून बघून झालं
https://youtu.be/SixsaGWC2Io >>>>

या सीन मुळेच हे गाणे कळले होते मला Happy

Nothing gonna change my love for you.. by George Benson..
रिपीट.. आणि रिपीट... आणि रिपीट..

Nothing gonna change..... +११११
एकच नंबर गाणे आहे ते. विशेष करून "Hold me now, Touch me now" हे खूप सहीSSS गायलंय.
वाह! All time favourite.

मला का माहीत नाही, पण हे गाणं ऐकताना ९०ज मधलं एक हिंदी अल्बम गाणं दिवाना तेरा... हे हमखास आठवतं. काहीतरी साधर्म्य आहे दोन्हीत असं वाटतं.

कभी ऐ हकीकत ए मुंतजर नजर आ लिबास ए हयात में

वेगवेगळ्या कलाकारांनी गायलेलं ( वेगवेगळ्या संगीतरचना)
राहतचं सगळ्यांत अधिक भिडतं
https://youtu.be/VXA1OdWvo50

'मौसम प्यार का'
https://youtu.be/qJq684EnbMQ

आर. डी. बर्मन यांचे संगीत, विशेषतः गिटार पीसेस, आशा भोसले आणि किशोरदा हे एवरग्रीन कॉंबिनेशन, ऋषी कपूर आणि पूनम धिल्लों ही नेत्रसुखद जोडी, ऋषी कपूर यांचा सहज अभिनय, लोणावळ्याचा निसर्ग - सगळ्या गोष्टी अतिशय फ्रेश गाणे बनवतात.

आशा भोसले खुल्या आवाजात गाणे स्टार्ट करतात. आणि किशोरदा मखमली आवाजात. गाण्याच्या शेवटी किशोरदा सप्तक चेंज करतात. मस्त इफेक्ट आहे.

“पोन्नी नदी” हे रेहमान चं नवीन तामिळ गाणं. हिंदीत “कावेरी से मिलने“ म्हणून आहे. पण हिंदी पेक्षा तमिळ चांगलं वाटतंय.

https://youtu.be/Vb4qfhRaBTs
"नऊवारी"
मला रॅप पहा प्रकार कधी आवडला नव्हता. कारण समजायचंच नाही गाणं, त्यातले शब्द. पण हे ऐकायला आणि बघायला खूप छान वाटलं. २-३ वेळा ऐकून होतंय दिवसातून. मुख्य म्हणजे माझी लेक पण ठेका धरून डुलते या गाण्यावर.

मि नेहमी गाणे लावून अभ्यास केलेला आहे किंवा कामे करतो, अनेक गाणे मि रिपीट ऐकतो पण एक गाणे गेली काही वर्ष रिपीट मोड वर ऐकतो ते आहे.
मुक्कदर का सिकंदर मधील
" दिल तो है दिल दिल का ऐतबर क्या चीज है "
माझे फेव्हरेट आहे

दिल तो है दिल दिल का ऐतबार क्या कीजे आहे ते ,,,, तुमचं वालं चुकीची ऐकू आलेली मधे टाका Wink

रोज शाम आती थी

https://www.youtube.com/watch?v=-rhPlLYCcg8

हे गाणे, याचे शब्द, यात असलेली वाद्य, music arrangement, यातले सुरवातीचे आणि मधले पक्षांचे आवाज आणि लाटांचा आवाज.

मला अजिबात गाण्यातले फारसे कळत नाही पण एवढे नक्कीच कळते की हे वेगळेच गाणे आहे. सध्या रिपीट मोडवर आहे

'मौसम प्यार का'
https://youtu.be/qJq684EnbMQ

आर. डी. बर्मन यांचे संगीत, विशेषतः गिटार पीसेस, आशा भोसले आणि किशोरदा हे एवरग्रीन कॉंबिनेशन, ऋषी कपूर आणि पूनम धिल्लों ही नेत्रसुखद जोडी, ऋषी कपूर यांचा सहज अभिनय, लोणावळ्याचा निसर्ग - सगळ्या गोष्टी अतिशय फ्रेश गाणे बनवतात.>>>>> अगदी अगदी परफेक्ट..

आज सकाळपासून पाच सहा वेळा बघून झालं
https://youtu.be/0IdqwA2GXgY
डान्स , म्युझिक दोन्ही मस्त.. हे गाणं बघून ला ला लॅन्डच्या गाण्याची आठवण झाली https://youtu.be/_8w9rOpV3gc

शंकराभरणमचे दोरकुना इटुवंटी सेवा आवडले असेल तर हे इन्स्ट्रुमेंटल अपील होउ शकते.
मूळ गाण्यातील शब्दस्वर, आलाप जवळपास तंतोतंत आले आहेत. आज हे मूळ गाणे शोधताना सापडले, आता तिसऱ्यांदा ऐकतो आहे.

ए खुदा मुझको बता.. तू रेहता कहाँ क्या तेरा पता..
हम तो यहाँपे मुसाफिर है... ढुंढे अपनी मंजिल का पता..

आता च्या १५ वर्षातील एक पण गाणे उत्तम दर्जाचे नाही.
ना उत्तम गायक,ना उत्तम संगीतकार,ना उत्तम गीतकार .
सर्व लो दर्जा ची गाणी आहेत.
पण १९८० च्या अगोदर च सर्व गाणी किती ही वेळा ऐकली तरी समाधान मिळत नाही ती गाणी परत परत ऐकविशी वाटत असतात

छाप तिलक सब छिनी रे >>> कुणाचं ऐकलं?

यातल्या तिलक शब्दाचा अर्थ नेटवर 'रुप' असा दिलाय त्याला काही संदर्भ आहे का कसला?

Pages