तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतमाला की छाँव में मध्ये हे गाणं ऐकलं.
फिर आने लगा याद वही प्यार का आलम
गाणं आधी ऐकलं होतंच. संगीतकार इक्बाल कुरेशी हे नावही माहीत होतं. पण या गाण्यातली गंमत आताच कळली. इंटरल्युड म्युझिक ऊर्जने भारलेलं आहे आणि जिथे शब्द आहेत तिथे नशेत बुडत तरंगत आहे. पडद्यावर शशी कपूर असल्याने आणखीनच गोड झालंय.

लोकहो, ट्विटरवर हिंदी गाण्यांची स्पर्धा (?) चालली आहे. #2000sbollywoodbracket बघा. आपापल्या आवडत्या गाण्यांना मत द्या.

भरत : आत्ताच ऐकलं. छान आहे.. पण, मुझे तुम नजर से जास्त आवडलं. रेखाची त्या काळातली खरी अवस्था तिचं दुःख तिच्या आवाजातून ओळखू येत त्यात...

पूर्वी या धाग्यावर लोक शास्त्रीय गाणी ऐकत असायचे. त्यामुळे धाडसच व्हायचं नाही.
आज मिस्टर रेखाचा वाढदिवस. दिवसभर बिग बी ची गाणी ऐकली गाडीत. काल झूठीची ऐकली.
झूठा जनमदिन.

हे सुरांनो चंद्र व्हा,
एकदा ऐकून कधीच कान आणि मन भरत नाही कायम रिपीट वर ऐकते

>>>>>>>>>कुसुंबी सावळे निळे, उदे अनंत सावळे
मेघ मेघ, सुर्य सुर्य मावळे.

वाह!! हे गाणे माहीत नव्हते.

En esta noche la vida es completa
En este segundo la vida es muy rica

ग्रेस + श्रीधर फडके + सुरेश वाडकर या त्रयीचे हे अप्रतिम गीत मनावर गारुड करते. >>> हे श्रीधर फडकेंच्या आवाजातलं ऐकायला जास्त आवडतं

तसंच 'सूर येती, विरुन जाती' च्या बाबतीत!! पं. सत्यशील देशपांडे आणि लताबाई ह्यांच्या पेक्षा लताबाई आणि पं. हृदयनाथ ह्यांचं गाणं जास्त आवडलं

गुलाबी शरारा! उत्तराखंड गृपचं त्यांच्या भाषेतलं गाणं सध्या Insta आणि YouTube वर trending आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचं रील बघितलं या गाण्यावरचं आणि ती ट्यून,रिदम जो काही डोक्यात बसला, की मूळ गाणं शोधून काढायची इच्छा झाली. ते शोधतांना अजून भरपूर रिल्स सापडले, त्यामुळे हे गाणं trending असल्याचं समजलं. मग अर्थ असलेला व्हिडिओ ही सापडला.

आज पाऊण तास रिपीट मोडवर ऐकत होते. आणि आता बघते तर इकडे हा धागा! म्हणून लिहिल्या वाचून रहावलं नाही.

हम कठपुतलें काठ के
हमें तू नाच नचाये
ऊँचे आसन बैठ के
अपना दिल बहलाए

हम तो है खेल खिलोने
खेलो जी भर के राम
दुःख या सुख जो भी चाहो
लेलो जी भर के राम
खेलो जी भर के राम

हर पल चंचल मन नाचे
हर पल आशा दीवानी
हर पल चंचल मन नाचे
हर पल आशा दीवानी
लेकिन हर सपना टूटे
रह जाये दर्द निशानी
लेकिन हर सपना टूटे
रह जाये दर्द निशानी
लुक छुप करनी करते हो
दिल में घर कर के राम

दुःख या सुख जो भी चाहो
लेलो जी भर के राम
खेलो जी भर के राम

https://youtu.be/w5AigOYSaLs?si=AiGcCV5S-5c6q_7y

Pages