Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यातल्या तिलक शब्दाचा अर्थ
यातल्या तिलक शब्दाचा अर्थ नेटवर 'रुप' असा दिलाय त्याला काही संदर्भ आहे का कसला? >> हे गाणं जरा वादग्रस्त आहे. तुम्ही कुठल्या बाजूचे आहात ह्यावर अर्थ बदलतो. इतकेच सांगतो. इथे फार अवांतर चर्चा नको सुरू व्हायला.
कोक स्टुडिओ - राहत फतेह अली
कोक स्टुडिओ - राहत फतेह अली खान आणि आबेदा परवीन!
तिलक...शब्दाचा अर्थ 'रुप' कसा काय असेल?
हर्पा, मग वेगळा धागा काढून
हर्पा, मग वेगळा धागा काढून तिथे सांगा पण सांगा.
तिलक...शब्दाचा अर्थ 'रुप' कसा काय असेल? >>> हो मला पण हाच प्रश्न पडला होता. पण तिलक या शब्दाच्या नेहमीचा अर्थाही गाण्यात नीट बसत नाही. खुस्रोच्या मोजक्याच हिंदी रचनांपैकी ही एक आहे. छाप = नाव आणि तिलक = रुप (?) . 'त्या' ला भेटले आणि माझ्या नाव-रुपाचा (माझ्या individual identity चा) मला विसर पडला. 'चाचारती चाचरती बाहेरी निघाले, ठकची मी ठेले' असा काहीसा अर्थ!
ये मोह मोहके धागे, तेरे
ये मोह मोहके धागे, तेरे उंगलीयोसे जा उलझे.
ऐ, हैरते आशिक़ी जगा मत
ऐ, हैरते आशिक़ी जगा मत
पैरों से ज़मीं, ज़मीं लगा मत --- Film Guru, Singers -Hariharan and Alka Yagnik
वाह बेकरार करके हमे .... मस्त
वाह बेकरार करके हमे .... मस्त आहे!!
ये मोह मोहके धागे, तेरे उंगलीयोसे जा उलझे. ...... एकदम छान. खरच कधीतरी रीपीटवर लावावे असे.
ऐ, हैरते आशिक़ी जगा मत ....... सुपर्ब!!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=YjllO7-K9k4
https://www.youtube.com/watch?v=NueNRRmZRuw
https://www.youtube.com/watch?v=0YZRQIoaUqk
नमो नमो जी शंकराhttps://www
नमो नमो जी शंकरा
https://www.youtube.com/watch?v=dx4Teh-nv3A
३९३ मिलिअन पैकी ३९३ हजार व्यू आमचेच असतील
ह्यातलेच माझ्या आवडीचे
ह्यातलेच माझ्या आवडीचे काफिराना
https://youtu.be/ZmcBC9-wAXM
ओ माझ्याही आवडीचे आहे ते
ओ माझ्याही आवडीचे आहे ते काफिराना.. मी मागेही टाकले होते हे ईथेच कुठेतरी..
दोन्ही गाणी वेगळ्या मूडची आहेत. त्या त्या मूडनुसार रीपीट मोडवर ऐकतो.
दोन्ही बघायलाही फार सुंदर वाटतात..
३९३ मिलिअन पैकी ३९३ हजार व्यू
३९३ मिलिअन पैकी ३९३ हजार व्यू आमचेच असतील >>>
हे गाणे ३२८ सेकंदाचे आहे. ३९३००० वेळा म्हणजे ३२८X ३९३०००= १२८९०४०० सेकंद= २१४८४०० मिनिटं =३५८०७ तास = १४९१ दिवस = ४ वर्षे.
चित्रपट प्रदर्शित होऊन बरोबर ४ वर्षे झालीत.. म्हणजे तिन्ही त्रिकाळ २४ तास सलग चारही वर्षं ऐकले असेल तर तुम्ही खरंच खूप मोठे फॅन आहात या गाण्याचे..
गोदावरी चित्रपटातील "कोजागिरी
गोदावरी चित्रपटातील "कोजागिरी" गाणे
https://youtu.be/V0XWtmmWXtg
ओंकारा मधील ओ साथी रे काल
ओंकारा मधील ओ साथी रे काल ऐकलं....निव्वळ सुंदर गाणं.... श्रेया घोषाल बेस्ट....कालपासून १० १२ वेळा तरी ऐकल असेल..
ओंकारा मधील ओ साथी रे काल
ओंकारा मधील ओ साथी रे काल ऐकलं....निव्वळ सुंदर गाणं.... श्रेया घोषाल बेस्ट....कालपासून १० १२ वेळा तरी ऐकल असेल..
>>> It grows on you….
ओंकारा मधील ओ साथी रे काल
ओंकारा मधील ओ साथी रे काल ऐकलं....निव्वळ सुंदर गाणं.... श्रेया घोषाल बेस्ट....कालपासून १० १२ वेळा तरी ऐकल असेल..
>>> It grows on you….
ओ साथी रे...ओंकारा. खूप
ओ साथी रे...ओंकारा. खूप आधिपासून च ऐकत आलेय.
गारूड आहे गारूड.
नैना ठग लेंगे पण सेम..जादूई!
सलिल कुलकर्णीच्या 'क्षण
सलिल कुलकर्णीच्या 'क्षण अम्रुताचे' अल्बम मधल 'सन्धिप्रकशात' हे गाण रिपीट मोडवर ऐकतेय सध्या.
दिदी नेहमीप्रमाणे अप्रतीम.
मराठी गाण्यांमध्ये 'एकाच या
मराठी गाण्यांमध्ये 'एकाच या जन्मी जणू ' हे आशा भोसले यांचं गाणं मी कितीही वेळा नॉनस्टॉप ऐकू शकते.. ऑल नाईट फेवरेट गाणं...
ऑल टाइम फेवरेट... चुकुन नाइट
ऑल टाइम फेवरेट... चुकुन नाइट टाईप झालं.
हम हैं राही प्यार के, हमसे
हम हैं राही प्यार के, हमसे कुछ न बोलिये
जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिये
बांधले मी बांधले,
बांधले मी बांधले,
इंद्राचे तोरण बांधले,
शिंपण घातले, शिंपण घातले,
चाफ्याचे शिंपण घातले.
माझं अतिशय आवडतं गाणं, सर्वसाक्षी चित्रपटातले.
'एकाच या जन्मी जणू ' >>> हे ही खूप आवडतं.
मला "एकाच या" आवडत नाही.
मला "एकाच या" आवडत नाही. चित्रपटात या गाण्यानंतरच ती सून आत्महत्या करते ना? गाणं ऐकलं की तेच आठवतं.
मानसी मागीकर होत्या का त्या भूमिकेत?
आज माझ्या डोक्यात हे गाणं वाजतंय. इतक्यात ऐकलेलं नाही.
मन्ना डे - ओ रंगरजवा रंग दे ऐसी चुनरिया के रंग ना फीका पडे - नॉन फिल्मी
कुन फ़या कुन चालू आहे डोक्यात.
कुन फ़या कुन चालू आहे डोक्यात. आणि खालील कडवं ऐकताना .... -
जब कहीं पे कुछ नहीं भी, नहीं था
वही था, वही था, वही था, वही था
... उगाचच नासदीय सूक्त आठवत आहे. ज्यांनी भारत एक खोज सिरियल बघितली असेल त्यांना आठवेल -
"नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परोयत्।"
(सृष्टी से पहले सत नहिं था, असत भी नहिं, अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था ... इत्यादी. सेमच अर्थ वाटला मला - 'जब कहीं पे कुछ नहीं भी, नहीं था' ऐकताना. कुन फय कुन चा अर्थ माहीत नाही.)
मानसी मागीकर होत्या का त्या
मानसी मागीकर होत्या का त्या भूमिकेत? >>> हो.
आजचे गाणं ममता मधले, रहते थे कभी जिनके दिलमे, जान से भी प्यारो की तरह .
आज जाने कि जिद्द ना करो -
आज जाने कि जिद्द ना करो - coke स्टुडिओ - फरीदा खानुम
आवडतं कडवा :
हाय, मर जायेंगे
हम तो लुट जायेंगे
ऐसी बातें किया न करो
आज जाने, की ज़िद्द न करो
आज जाने, की ज़िद्द न करो
तुम ही सोचो ज़रा, क्यूँ न रोकें तुम्हें?
तुम ही सोचो ज़रा, क्यूँ न रोकें तुम्हें?
जान जाती है जब उठ के जाते हो तुम
जान जाती है जब उठ के जाते हो तुम
तुमको अपनी क़सम जान-ए-जाँ
बात इतनी मेरी मान लो
ही दोन्ही आवडतात.
ही दोन्ही आवडतात.
जब हम न होंगे जब हमारी खाक पे तुम रुकोगे चलते चलते
या ओळी ऐकताना प्रत्येक वेळी शिरशिरी येते.
फरीदा खानची एक कॅसेट होती माझ्याकडे सगळीच गाणी मस्त.
संध्याकाळी जरा बाहेर गेलेले
संध्याकाळी जरा बाहेर गेलेले तेव्हा डोक्यात एकदम, 'त्याची धुन झंकारली रोमारोमात' हे आलं आणि नंतर तेच ऐकू येतंय.
खरंतर हे गाणं मला माहितीच नव्हतं, ह्या सुरेल गाण्याची ओळख मला मायबोलीकर मुग्धटलीने करून दिली. अनेक वर्षांपूर्वी ती घरी आलेली, तिने गायलं होतं (म्हणजे तिचा आवाज छान आहे मला माहिती होतं म्हणून मी सांगितलं तिला गाणं म्हणायला) .
फरिदा खान यांची गाणी आवडतात.
फरिदा खान यांची गाणी आवडतात.
कोक स्टुडिओची गाणी छान असतात.
कोक स्टुडिओची गाणी छान असतात.
कुन फ़या कुन चालू आहे डोक्यात.
कुन फ़या कुन चालू आहे डोक्यात. आणि खालील कडवं ऐकताना .... -
जब कहीं पे कुछ नहीं भी, नहीं था
वही था, वही था, वही था, वही था
आणि
कुन फाया कुन चा अर्थ माहीत नाही.
>>>>>> ख्रिस्ती धर्मात लोगोस् म्हणून एक संकल्पना आहे. जी मला आपल्या नामाच्या जवळ जाणारी वाटते. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्म मूर्तिपूजक नसल्याने ते काही मूलतत्वांबाबत अधिक सारखे आहेत. त्याहीपेक्षा खोल गेलं तर सगळ एकचं होतं.
In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God.
हा शब्द नादब्रह्म आहे. लोगोस् म्हणजे नादब्रह्म , पण तो म्हणून दाखवता येत नाही म्हणून शब्द म्हटलंय.
कुन फाया कुन म्हणजे why not be the word itself , because it is our true self. There is nothing else , never was, never will be . So why not 'Just be' ! तत्वमसि (?) साठी जे ' नेति नेति' लागते त्याच्या पायऱ्या, किंवा process of elimination. एकेक काढून टाकत गेल्यावर जेव्हा काहीच उरत नाही, ते हे कुन किंवा लोगोस् किंवा निरंजन किंवा नादब्रह्म किंवा शिवतत्त्वं !
याच्या/ नासदीय सुक्तातल्या सिद्धांताच्या आसपास जाणारी , कमी गूढ किंवा याची पुष्टी करणारी म्हणजे राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे ( संदर्भ: अब मुझको भी हो दीदार मेरा, करदे मुझे मुझसे ही रिहा ) आणि आदि शंकराचार्य यांचे निर्वाण षटकम्
मनोबुद्धयहंकारचित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे
न च व्योम भूमिर्न तेजॊ न वायु: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवोऽहम् ॥1॥
न च प्राण संज्ञो न वै पञ्चवायु: न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश:
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायू चिदानन्द रूप:शिवोऽहम् शिवोऽहम् ॥2॥
Pages