तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज हे गाणं रिपिट मोडवर ऐकतेय
https://youtu.be/b4iOwqZCmv4

ह्या गाण्याशी वेगळंच कनेक्शन आहे .. कॅालेजच्या सेकंड यर ला ॲन्युअल फंक्शनला जेव्हा सगळे एकामागून एक “आशिक बनाया“ वर डान्स करत होते तेव्हा मी आणि माझ्या बेस्ट फ्रेंडने ह्या गाण्यावर डांस केलेला आणि आम्हाला फर्स्ट प्राईझ मिळालेलं.. ती मैत्रिण जाऊन आज ४ वर्षे झाली ..त्यामुळे आज तीच्या आठवणीत हेच गाणं रिपिट मोडवर वाजणार

लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स.......
https://www.youtube.com/watch?v=2kWLyInyjOE
दिवसातून चार वेळा आणि प्रत्येक वेळी चारदा...

ती मैत्रिण जाऊन आज ४ वर्षे झाली .. >> ओह Sad

आहा.. गाणेही पाहिले आता... खल्लास!! माझ्याही फारच गोड आठवणी आहेत या गाण्याच्या.. ईतके की मी यावर एक स्वतंत्र धागा काढून लेख लिहू शकतो. वालचंदला असताना माझ्यासाठी हे लव अँथम होते Happy

दिवसातून चार वेळा आणि प्रत्येक वेळी चारदा >> हे ३१ ला रिपिट मोडवर वाजवेन .. जाऊ दे, ३१ पर्यंत कोण वाट बघणार, आता मुली शाळेतून आल्या की वाजवेन

तो आमचा कार्टा मला ईंडिया आफ्रिका मॅच बघू देत नाहीये टीव्हीवर..
त्याचीच प्ले लिस्ट सध्या रिपीट मोडवर ऐकावी लागतेय
१. लुंगी डान्स
२. आता माझी सटकली
३. ढिंक चिका
४. गो गो गो गोविंदा

दिल मेरी ना सूने दिल की मै ना सूनू
दिल मेरी ना सुने दिल का मैं क्या करु

अल्बम वाहे बहूतेक.. सिंगर.. आतिफ असलम
https://youtu.be/YZLKoG_vhDY
खूप मस्त चाल..
15 दिवसापासून रिपीट mode वर ऐकतेय.!

तेरी झलक अर्शर्फी..श्रीवल्ली.... >> हे महान आहे. मी पण ऐकतेय. हिंदी पेक्षा तेलुगु जास्त छान आहे. सिद श्रीराम चा आवाज खूपच गोड आहे.

https://youtu.be/Iu5eKZHEtgM
सलग तासभर रिपीट मोडवर हे play होत रहातं, बरेच दिवसांनी पुन्हा या गाण्यावर माझी गाडी थांबलीय..

Everytime I see you
Decendants of the sun- K drama

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

सध्या रोज सकाळी रिपीट मोड वर ऐकतेय..
खूपच वेड लागलं ह्या गाण्याचं..
https://youtu.be/eaI8zvNSYas

म्हाळसा, कान्ट टेक माय आईज आवडलं असेल तर तुला -
https://www.youtube.com/watch?v=WF477pY2eFQ - जस्ट अनदर वुमन इन लव्ह
हेही आवडेल.
दोन्ही वेड्यासारखी रोमँटिक आहेत म्हणुन माझा तसा कयास.

सामो, तू सजेस्ट केलेलं गाणं मस्त आहे.
Can't Take My Eyes Off You गाणं मला ह्या सीनमुळे फार आवडायचं.. आज सकाळपासून ५ वेळा तरी ऐकून बघून झालं
https://youtu.be/SixsaGWC2Io

Pages