Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अॅडमिन, म्हाळसावर अॅक्शन घ्या
अॅडमिन, म्हाळसावर अॅक्शन घ्या. दिवसेंदिवस वाढतच चाल्लंय तिचं.
म्हाळसाबाई, तुम्ही दिवे घ्या.
बाबो काय पदार्थ काय पदार्थ! _
बाबो काय पदार्थ काय पदार्थ! _/\_ सगळ्यांना हातचं जोडले.
चोको लाव्हा आप्पे खतरनाक
चोको लाव्हा आप्पे खतरनाक दिसतायत ,रेसिपि प्लिज!
आबा, ते ताट इकडे पाठवून द्या
आबा, ते ताट इकडे पाठवून द्या
या सगळ्या मासे-मटण ताटांचे फोटू टाकणार्या लोकांचे पत्ते घेतले पाहिजेत. पुढच्या भारतवारीत एकेकाकडे जेवायला जाईन म्हणते
rmd नक्की या
rmd नक्की या
आप्पे आणि रगडा पॅटीस : तोंपासू :
अॅडमिन, म्हाळसावर अॅक्शन घ्या
अॅडमिन, म्हाळसावर अॅक्शन घ्या. दिवसेंदिवस वाढतच चाल्लंय तिचं. >>> मुलीची शाळा सुरू झाली .. आता रोज झेला
रेसिपि प्लिज! >>>
https://youtu.be/e3RDzBSrQms
आबा ताट तोंपासू. rmd जरूर या!
आबा ताट तोंपासू.
rmd जरूर या!
चोको लाव्हा आप्पे, प्लिज
चोको लाव्हा आप्पे, प्लिज रेसिपी द्या.
जबरी झालेत choko आप्पे...
जबरी झालेत choko आप्पे....link save केली...अस्मिता चा रगडा पण कातिल दिसतोय...yummy..कुठून आणता एवढा उत्साह आणि उरक तुम्ही लोकं _/\_
आपल्यात तर चोको लाव्हा
आपल्यात तर चोको लाव्हा आप्प्याची पाकृ विचारण्याचे डेअरिंग सुद्धा नाही. हौसे खातर कशी बशी पवर्ती चढून त्यात धन्यता वाटणाऱ्याने कळसूबाईचा रस्ता विचारण्या सारखे होईल ते.
SNiper कसा अचूक नेम धरून काम
SNiper कसा अचूक नेम धरून काम तमाम करतो,
म्हाळसादेवीच्या चॉकोलाव्हा आप्पे फोटोनी तेच काम केलंय.
खल्लास एकदम.
गोडाला बॅलन्स करायला रगडा आलाच पाठोपाठ.
एकदम जलेपे नमक.
म्हाळसा देवींचे आप्पे इतके
म्हाळसा देवींचे आप्पे इतके छान दिसत आहे त ! माझ्या कडे आप्पे पात्र नाही, आसपास मिळण्याची शक्यता ही कमी आहे, तरीही हेब्बार ची रेसिपी बघितली, खूपच छान
म्हाळसा व अस्मिता यांचे पदार्थांचे फोटो जबरदस्त प्रभाव पाडतात. सुरेख!
मानव
मानव
थँक्यू आबा आणि आशू२९
थँक्यू आबा आणि आशू२९
आशू कडे मात्र ट्रिपच काढावी लागणार 
आबा पुण्यात असतात बहुधा त्यामुळे जेवायला जाणं जरा जास्त सोपं आहे
काढाच ट्रीप एखादी खांदेशी
काढाच ट्रीप एखादी
खांदेशी भरीत अन ठेचा होऊन जाऊ देऊ!
आबा पुण्यात असतात बहुधा
आबा पुण्यात असतात बहुधा त्यामुळे जेवायला जाणं जरा जास्त सोपं आहे
>>> हो हो, पुण्यातच (पिंची) असतो. या केव्हाही
(No subject)
आई ग्ग! तुकड्या...लाळ गळू
आई ग्ग! तुकड्या...लाळ गळू बाहुली.
आईशप्पत! भारी फोटू.
आईशप्पत! भारी फोटू.
Naividya :
Naividya :

वाह.. काय झकास ताट दिसतेय
वाह.. काय झकास ताट दिसतेय
इकडं सारख्या भाकरी बघून मी एक
इकडं सारख्या भाकरी बघून मी एक किलो ज्वारी घेऊन आले..आधी कशी दळून मिळेल ते पाहते मग मला ती करायला जमेल कि नाही ते पाहते..

# रवागुळनारळ लाडू
दुधीचे थेपले, दुधी हलवा
दुधीचे थेपले, दुधी हलवा

पालक पुरी आणि शिरा

बीट पराठा आणि गाजर हलवा

कोथिंबीर थेपला आणि दही

हे फोटो टिफिनबॉक्सच्या
हे फोटो टिफिनबॉक्सच्या जाहीरातीत वापरता येतील..
ते खाणे तर नशीबात नाही.. पण बघून बघून मला ते डब्बे विकत घ्यावेसे वाटू लागलेत
यम्मी फोटो!!
यम्मी फोटो!!
अरे वा ! माझाही डब्ब्यांचा
अरे वा ! माझाही डब्ब्यांचा झब्बू . आम्हाला २ डबे द्यावे लागतात . स्नॅक आणि लंच . मी मेन पदार्थ बदलते , साईड्स तेच राहतात.




वाह ट्युलिप . तुमचेही पोरांचे
वाह ट्युलिप . तुमचेही पोरांचे डब्बे भारी आहेत !
स्टील चे डब्बे कुठे मिळतील?
सगळेच डब्बे फोटो मस्त
स्टील चे डब्बे कुठे मिळतील?
काय भारी डबे आहेत ( आतल्या
काय भारी डबे आहेत ( आतल्या ऐवजासहित बोलतोय )


असेच अमुचे डबे असते तर बालपण अजून सुंदर झाले असते.
लहानपणी स्टीलचा घट्ट झाकणाचा डबा.
नखे कापल्याच्या दुसऱ्या दिवशी उघडताना कसरत नुसती.
लाडू पाठवा इकडे, ज्वारी भाकरी पाठवतो तिकडे
म्हाळसा, डब्बे एकदम मस्त. डबा
म्हाळसा, डब्बे एकदम मस्त. डबा रेसिपीज् धागा वेळ काढून मनावर घ्यावा बरें.
ट्युलिप मिनी इडल्या आहेत का त्या? छान दिसतायत.
हा ब्रोकोली प्रकार कच्चा खातात की उकडून?
Pages