Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निलाक्षी, ओके.
निलाक्षी, ओके.
बरेच आहे की! लहान होतो तेव्हा
बरेच आहे की! लहान होतो तेव्हा अनवाणीच लहान चेंडूने किंवा खोबरेल तेलाच्या बाटलीने वगैरे फुटबॉल खेळताना पायाच्या अंगठ्याला झालेल्या जखमा अजून आठवतात. Actual football घेता आला नसता असे नाही, पण कोण मागत बसणार बाबांकडे.. आहे त्याने खेळता येतंय तर झालं! तेव्हा एखादा चप्पल जरी घालून आला तरी त्याला काढायला लावायचो, बाकीच्यांना त्या लागतील म्हणून.. आता घ्यावासा वाटतो फुटबॉल पण खेळायला वेळ आणि मित्र नाहीत. (शेवटचे दवणीय वाक्य माझ्याकडुन आल्याने मलाच क शॉ बसला आहे)
धन्यातून कोथींबीर ऊगवते हा
धन्यातून कोथींबीर ऊगवते हा माझ्या २५ वर्षीय मैत्रीणीला बसलेला शाॅक होता.
यावरून आठवलं. (धणे किंवा
यावरून आठवलं. (धणे किंवा कोथिंबिरीशी काही संबंध नाही, पण एखादी बेसिक गोष्ट मोठं होईपर्यंत माहिती नसणे यावरून आठवलं )
माझी एक रूममेट होती. एकदा कशावरून तरी तिच्याशी गप्पा मारत असताना २९ फेब्रुवारीला वाढदिवस असणाऱ्यांना दरवर्षी वाढदिवस साजरा करता येत नाही वगैरे विषय निघाला. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तिला खरोखरच असं वाटत होतं की ज्यांचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला असतो, त्यांचं वय दर चार वर्षांनीच वाढतं. अर्थात तिला लगेचच स्वतःचा बावळटपणा लक्षात आला आणि मीही मग फार ताणलं नाही. पण मला खूप गंमत वाटली होती तेव्हा.
वावे
वावे
कडधान्याला घरी मोड आणता येतात
कडधान्याला घरी मोड आणता येतात हे ऐकून माझ्या तिशीतल्या एका सहकारणीला शॉक बसला होता. तो पर्यंत ती उस्सळ ही फक्त बाहेरून आणण्याची गोष्ट आहे असंच समजत होती.
वावे
वावे
“ कडधान्याला घरी मोड आणता येतात हे ऐकून माझ्या तिशीतल्या एका सहकारणीला शॉक बसला होता. तो पर्यंत ती उस्सळ ही फक्त बाहेरून आणण्याची गोष्ट आहे असंच समजत होती.” - ह्यावरून ‘कापूस हा गादीतच जन्माला येतो आणि वाढत वाढत एक दिवस गादी फाडून बाहेर येतो‘ हे आठवलं.
(No subject)
(No subject)
धन्यातून कोथींबीर ऊगवते >>>>
धन्यातून कोथींबीर ऊगवते >>>> आईग्ग.. खरेच की काय. हे मलाही नव्हते माहीत आजवर.
‘कापूस हा गादीतच जन्माला येतो
‘कापूस हा गादीतच जन्माला येतो आणि वाढत वाढत एक दिवस गादी फाडून बाहेर येतो
आता यावरून मला एक 'चिंटू' आठवला. चिंटू त्याच्या पप्पांच्या मित्राकडे एका खेडेगावात सुट्टीला गेलेला असतो. तिथे तो गाईचं दूध काढताना बघतो आणि म्हणतो, 'मग हे दूध प्लॅस्टिकच्या पिशवीत कोण भरतं?' यावर त्याचा तिथला मित्र म्हणतो, 'हे दूध प्लॅस्टिकच्या पिशवीत भरतात?'
माझ्या भाचीने फक्त एकच मूल
माझ्या भाचीने फक्त एकच मूल असलेली घर पाहिली होती (ती लहान असताना एक मूल असण्याचा ट्रेण्ड होता).
तर लहान असताना एकदा ती पळत पळत घरी आली आणि बहिणीला सांगत होती, " अग आई, तिथं बागेत दोन मुलं आहेत आणि दोघांचीही आइ एकच आहे..."
दोन मुलांना एकच आ ई असू शकते हा तिच्या करता मोठाच शोक होता!
आणखीन एका मुलाची मजा, तो एका
आणखीन एका मुलाची मजा, तो एका मामाच्या साखरपुड्याला गेला, खूप मजा आली त्याला.
मग काही महिन्यांनी लग्न होत.
आल्यावर घरच्यांना सांगत होता, सेम च मुलगी होती आज पण... : D
वावे आणि नानबा > .. दोन
वावे आणि नानबा >
.. दोन मुलं हा लहान मुलाचा कशॉ फारच सही आहे 
all
all

सेम च मुलगी होती आज पण...
सेम च मुलगी होती आज पण...
दोन मुलांना एकच आई असू शकते
दोन मुलांना एकच आई असू शकते
सही एकेक, हाहाहा.
सही एकेक, हाहाहा.
कडधान्य, कापूस आणि चिंटू
कडधान्य, कापूस, चिंटू, सेमच मुलगी

असम्बद्ध प्रतिसाद -
असम्बद्ध प्रतिसाद -
वरचे वाचुन एक खुप जुनी आठवण वर आली.
माझ्या एका मैत्रिणीच्या भावाने त्याच्या मामीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती नऊ महिन्यांची गरोदर होती. भाऊ खुपच लहान होता, गरोदर वगैरे त्याला कळत नव्ह्ते.
तो घरी परत गेल्यावर त्याला त्याच्या आईने विचारले, काय रे, नवी मामी कशी आहे?
तो म्हणाला, बाकी छान आहे पण तिचे पोट खुपच मोठे आहे.
लहान मुलांच्या किंवा आपल्या
लहान मुलांच्या किंवा आपल्या लहानपणीच्या समजुती यावर खरंच एक वेगळा धागा काढा धमाल येईल.
चिंटू, सेमच मुलगी, एकच आई
चिंटू, सेमच मुलगी, एकच आई
म्हणाला, बाकी छान आहे पण तिचे
म्हणाला, बाकी छान आहे पण तिचे पोट खुपच मोठे आहे.>>>
माझी भाची तिच्या गरोदर मावशीला ‘जा ना शी करून ये’ म्हणाली होती.
(No subject)
(No subject)
दोन मुलांना एकच आ ई असू शकते
दोन मुलांना एकच आ ई असू शकते हा तिच्या करता मोठाच शोक होता! > सेम किस्सा बहिणीच्या घरी पण झालेला आहे! मग त्याला त्याच्या आई वडिलांची उदाहरणे देऊन पटवल की अस खर होते

हा धागा एकदम मस्त वहातो:, मजा येतेय वाचायला एकेक किस्से कम शॉक्स
कडधान्य, कापूस, चिंटू, सेमच
कडधान्य, कापूस, चिंटू, सेमच मुलगी >>>>>
मुलगी १.५-२ वर्षांची असताना
मुलगी १.५-२ वर्षांची असताना आम्हाला नावाने हाक मारायची. याचा लोकांना शॉक बसायचा. एका देसी डॉक्टर आजीबाईंनी तर आम्हाला चक्क रागावलं होतं की असं कसं तुम्ही हे चालवून घेता. तिला मम्मी-डॅडी म्हणायची सवय लावा, असं आम्हाला म्हटलं. पण घरात आम्ही इन मीन तीन लोकं. आणि असले की आजी-आजोबा. तेव्हा ती रेगुलर डे केयरला नाही जायची. नवरा आणि मी एकमेकांना नावाने हाक मारायचो. मग ती आमचीच नक्कल करायची. आम्ही पण त्याला फारसं मनावर नाही घेतलं. थोडी मोठी झाली की कळेलच तिला, असा आमचा विचार होता. पण बाहेर गेल्यावर ती आम्हाला नावाने बोलवायला लागली की लोकांच्या भुवया उंचवायच्या. मला अजूनही तिने मला नावाने हाक मारली तर काही फरक नाही पडणार. पण लोकांना इतका शॉक बसतो, याचंच मला आश्चर्य वाटतं.
माझ्या आईला मी अक्का म्हणायचे
माझ्या आईला मी अक्का म्हणायचे कारण तिला सगळे जण अक्का म्हणायचे, आई म्हणणारे कोणीही नव्हते. आम्ही वेगळे राहायला लागल्यावर अक्का म्हटल्यावर शेजारी हसायला लागले म्हणुन आई म्हणायची सवय लावुन घेतली.
माझ्यासोबत आई म्हणणारे अजुन पब्लिक आले नन्तर जन्माला हळुहळू.
साधना, हे रिलेट करू शकते..
साधना, हे रिलेट करू शकते.. जॅाइन फॅमिलीत हे फार कॅामन असावं .. घरचे आणि शेजारचे सगळेच माझ्या बाबांना “भाऊ“ बोलवायचे त्यात घरचे तर अरे तूरे करायचे.. मग माझा भाऊ आणि त्याच्यानंतर मीही कायम बाबाला “अरे भाऊ” म्हणतंच हाक मारलेली आठवतंय.. इतरांना कल्चरल शॅाक बसत असावा पण लहान वयात ते आम्हाला कळतही नसायचं
Pages