तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी धागा आहे हा! सगळे किस्से मजेशीर आहेत!
मी बालवाडीत असताना माझ्या वर्गात दोन जुळ्या बहिणी होत्या - दोन्ही भावंडं एकाच वर्गात आणि दोघींची आई एकच ह्या दोन्ही गोष्टींनी मला धक्का बसला होता!
माझी अजून एक अशी कल्पना होती की पहिलीच्या बाईंचं शिक्षण हे पहिलीपर्यंतच झालेलं असतं. म्हणून त्या पहिलीला शिकवतात. नंतर जेव्हा पहिलीच्या बाई चौथीच्या वर्गात शिकवायला आल्या तेव्हा त्यांना आता कसं शिकवता येईल असा मला प्रश्न पडला होता!

मी बालवाडीत असताना माझ्या वर्गात दोन जुळ्या बहिणी होत्या - दोन्ही भावंडं एकाच वर्गात आणि दोघींची आई एकच ह्या दोन्ही गोष्टींनी मला धक्का बसला होता! >>>> Lol
माझ्या पंजाबी मैत्रिणीच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा किस्सा.. महाराष्ट्रात रहात असल्याने मुलगी बरेच मराठी शब्द बोलायची. पंजाबी- हिंदी- मराठी असे धेडगुजरी बोलायची. तिच्या मामीला जुळे होणार होते. गोदभराई चे फोटो पाहून या छोट्या बाईसाहेब अचानक चिडल्यात. "सब लोग मेरेसे झूठ बोल रहे. मेरेको बताया की एकसाथ दो दो बेबीज आने वाले है.. फोटो मे तो नही दिख रहे. मामी के टमी मे एक ही बेबी दिखं रहा हैं.. दो बेबी होते तो टमी ढुंगी जैसी दिखती ना!.. घरचे बिचारे ढुंगी म्हणजे काय या अर्थाच्या शोधात Lol

पहिलीच्या बाई चौथीच्या वर्गात शिकवायला आल्या तेव्हा त्यांना आता कसं शिकवता येईल असा मला प्रश्न पडला होता! >> Lol

मनिम्याऊ Rofl

सूर्य चंद्र गोष्टीवरून मला माझा बावळटपणा आठवला
एका कामानिमित्त चेन्नईला गेलो होतो, पहिल्यांदाच
इव्हेंट समुद्र किनारीच होता, म्हणलं कार्यक्रम संपला की मस्त सूर्यास्ताचे फोटो काढू
आणि कार्यक्रम सुरू असतानाच सूर्य मावळताना दिसू लागला तो जमिनीच्या दिशेने
माझ्यासाठी तो धक्काच होता कारण समुद्र इकडे असताना सूर्य अजून तिकडे कसा हा विचार करताना एकदम लक्षात आलं आपण त्या किनाऱ्याला आहोत

नशीब मी हे कोणाला सांगितले नाही आणि कार्यक्रमाचे फोटो काढायला कॅमेरा आणलाय असे भासवले Happy

वरची चर्चा वाचून माझा लहाणपणीचा किस्सा आठवला. मी दुसरीत असताना आईने कोथिंबिर आणायला पाठवले. भाजीवालीने १ रूपयाला एक पेंडी असे सांगताच मला घासाघीस करायची असते ते पाहिलेले आठवले व म्हटले आठाण्याला द्या की. ती बाई म्हणाली, आठाण्याचे धणे घेऊन जा किराणा दुकानातून. मला कळेना, मला कोथिंबिर पाहिजे ही धण्याचं का सांगतेय. घरी आल्यावर आईने सांगितले, तिच्या उपहासात्मक बोलण्याचा अर्थ असा की आठाण्याचे धणे नेऊन पेर आणि आलेली कोथिंबिर वापर..

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हा अनेकांना कल्चरल शाॅक असतो. हिंदीभाषीक लोक गुगल करून मान्य पण जागेवरच करतात पण मराठी माणसाला हे आजीबात स्विकारलं जात नाही.

हो, पण मला एक कळाले नाही Hindi is official language of Union म्हणजे काय नक्की ? >>>>
अश्या २२ अधिकृत भाषा आहेत भारतात. हिंदीही त्यातीलच एक.

>> पहिलीच्या बाई चौथीच्या वर्गात शिकवायला आल्या तेव्हा त्यांना आता कसं शिकवता येईल असा मला प्रश्न पडला होता!

Lol
याच्या बरोबर उलट किस्सा. मी पहिलीत कि दुसरीत असताना वाचायला पूर्णपणे शिकल्यावर मौज वाटू लागली. अर्थातच कोणतेही पुस्तक वाचता येऊ लागले. एकदा मी चौथीच्या मुलाचे पुस्तक घेऊन वाचायला लागलो. तेंव्हा आजूबाजूच्या मुलांना फार आश्चर्य वाटले होते "अतुल दुसरीत असून चौथीचे पुस्तक वाचू शकतो" सगळ्या शाळेभर सांगितले. चौथीतल्या दादा लोकांसमोर सुध्दा वाचून कवतिक झाले. मला मात्र कळेना कि ह्यात विशेष ते काय, मी तर तेंव्हा चौथीचेच काय डिग्रीचे सुद्धा मराठी पुस्तक वाचू शकलो असतो की Lol
इतक्या वर्षांनीही काही प्रसंग स्पष्ट आठवणीत राहतात.

काही वर्षांपूर्वी बंगलोरला राहत असताना मी कन्नड अक्षरे लिहायला वाचायला शिकलो. ती भाषा अजून पुरती अवगत नव्हती झालेली. तेव्हा मी अनेकांना सांगायचो की मला कन्नडा लिहा-वाचायला येते, पण मला त्याचा अर्थच कळत नाही, तर ते ऐकून अनेकांना शॉक बसायचा. भाषा ही आधी बोलायला यावी आणि मग वाचायला लिहायला हा क्रम आपल्या डोक्यात फिट्ट असतो. लिपी आणि भाषा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे अनेकांना कळत नाही. मी कन्नड लिपीत मराठी शब्द लिहितो, असं कसं करता येईल हे ही अनेकांना झेपत नाही. आपल्या कल्चरमध्येच ते नसल्यामुळे लोकांना अशा वेळी कल्चरल शॉक बसतो.

(मागे अतुल ह्यांनी सुचवल्याप्रमाणे ह्या पोष्टित काहीतरी करून कल्चर आणले आहे)

मित्राला आम्ही दोघं पृथ्वीचा नकाशा बघत असताना मी गंमत म्हणून म्हणलं की नकाशा हा नेहमी असाच का असतो. (अमेरिका पश्चिमेला, जपान पूर्वेला इ.) तो म्हणाला पलिकडच्या बाजूला फक्त समुद्र आहे. जमीन फक्त या बाजूला आहे म्हणून.

जमीन फक्त या बाजूला आहे Lol

पुण्यात गणेश विसर्जनाच्या वेळी मोठ्या मोठ्या मूर्ती (मानाचे गणपती आणि दगडूशेठ हलवाई वगैरे सगळ्याच मोठ्या मूर्ती) प्रत्यक्ष विसर्जित करत नाहीत, त्या परत नेतात हे मला नवऱ्याने सांगितलं होतं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं. मी लहानपणापासून समुद्रात मूर्ती विसर्जित केलेल्या बघितल्या होत्या. त्यात मोठ्या मूर्तीही असायच्या. पण पुण्यात नदी असल्याने तेवढं पाणीच नसतं म्हणून विसर्जन करण्यासाठी दुसऱ्या लहान मूर्ती नेतात.

पुण्यात गणेश विसर्जनाच्या वेळी मोठ्या मोठ्या मूर्ती (मानाचे गणपती आणि दगडूशेठ हलवाई वगैरे सगळ्याच मोठ्या मूर्ती) प्रत्यक्ष विसर्जित करत नाहीत, त्या परत नेतात हे मला नवऱ्याने सांगितलं होतं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं.>>>
मलाही एकदा पुण्यात गेल्यावर पुण्यातल्या काकांनी हे सांगितल्यावर खूप आश्चर्य वाटले होते, तसेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उघडे मंडप पाहून खूप आश्चर्य वाटले होते.

प्रत्यक्ष विसर्जित करत नाहीत, त्या परत नेतात >>>>
मला बरोबर उलट धक्का बसलेला
मला मुर्त्या परत आणतात हेच माहिती होतं, आमचं जे छोटं मंडळ होतं त्याचीही पूजेची आणि मुख्य मूर्ती वेगळी असे. मुंबईच्या मिरवणूका कधी प्रत्यक्ष पहिल्या नाहीत पण नंतर मग चॅनेल्स वर दाखवायला सुरू झाल्यावर मी विचारलं होतं वर्षभर या एवढल्या मुर्त्या ठेवतात कुठे?
जेव्हा मला कळलं की दरवर्षी या विसर्जित करून पुन्हा नव्याने बनवतात तेव्हा धक्का बसलेला

पुणे मुंबई गणपती देखावे, मिरवणूकी आणि विसर्जनपद्धतीत टोकाचे फरक आहे. धक्के बसणे कॉमन आहे. पुण्याच्या गणपतींचे कौतुक ऐकून बघायला गेलेलो साधारण अकरावी बारावीत असताना. पण काही विशेष वाटले नव्हते. आपल्या मुंबईच्या गणपतीची मजा सोडून ईथे उगाच आलो असे तेव्हा झाले होते. पुणेकरांना कदाचित उलटे होत असावे. आपले बालपण ज्या वातावरणात गेले असते त्यानुसार आपल्या आवडी आणि त्यांचे बेंचमार्क तयार झाले असतात. तो पुण्याचा मित्र विसर्जन मिरवणूक बघ म्हणून आग्रह करत होता. ते पुढच्यावेळी म्हटले पण कधी योग आला नाही. पण एकदा अनुभवायचे आहे ते.. एकदा ट्राय करायचे आहे धाग्यात टाकायला हवे.

मुंबई मधले काही जुने जख्खड सॉलिसिटर लोक्स सोने gms किंवा गिनी किंवा मोहर अशात बिले रेज करतात त्यांचा काहीतरी 16/ 17 रुपयाचा कन्व्हर्जन रेट आहे. 15 एक वर्षांपूर्वी असे बिल जेंव्हा मी पहिल्यांदा फर्म मध्ये पाहिलं तेंव्हा एकदम धक्काच बसला होता. Proud एकंदरीतच सॉलिसिटर जमातीने मला फार धक्के दिलेत. माझी बॉस सॉलिसिटर होती आणि तिला जर केस लॉ रिसर्च आवडला नाही किंवा एखादा चपखल / टू द पॉईंट केस लॉ दिला नाही तर ती सरळ प्रिंट केलेला रिसर्च अंगावर (माझ्या) भिरकावून द्यायची. पहिल्यांदा असे केले तेंव्हा फारच धक्का बसला होता. Proud

मला त्या सॉलिटिसर शब्दाने कल्चरल शॉक बसला होता इथे अमेरिकेत आल्यावर. भारतात असताना सॉलिसिटर हा एक भलताच जड शब्द चित्रपट्/मालिकांमधून मोठे उद्योजक वगैरे वापरत. इथे आल्यावर बहुतेक ऑफिसेस, दुकाने यांच्या दारावर "No Soliciting", "No Solicitors" वगैरे लिहीलेले पाहिले आणि हा काय प्रकार आहे ते कळायला वेळ लागला Happy इथे सेल्समन लोकांकरता ती नोटिस असते.

आकाशात बघंणयासारखे काय असते हा तिला प्रश्न पडला. ‘मै तो सिर्फ करवा चौथको उपर देखती हु‘ म्हणाली >>> Lol
ती म्हणे, "हां, तो? चांद पश्चिम में तो उगता है, और पूरब में डूबता है... सूरज उल्टा आता है!" >>> Lol

तसेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उघडे मंडप पाहून खूप आश्चर्य वाटले होते. >> म्हणजे काय? इतरत्र पडदे बंद करून ठराविक वेळांत उघडतात का?

पुण्यातील लायटिंगचे गणपती हा प्रकार इतरत्र पूर्वी फारसा नव्हता असे ऐकले.

इतरत्र पडदे बंद करून ठराविक वेळांत उघडतात का?
>>>
लांबून दर्शन होत नाही बाप्पांचे. मंडपाला एंट्री एक्झिट असते. आत जाऊन दर्शन घ्या. देखावा वगैरे बनवला असतो. डेकोरेशनवर खर्च केलेला असतो. तो असा रस्त्याने येणाजाणाऱ्याला दाखवत नाहीत.
पुर्वी चलचित्रांचे देखावे फार चालायचे. आमच्याईथे तर नवरात्रीला देवी बसायच्या त्यातही असायचे. पाच दहा मिनिटांचे शो असायचे. त्यात जे देखावे केले असायचे त्यांची रेकॉर्ड लाऊन माहिती द्यायचे. मशीन वापरून ते देखावे हलायचे वगैरे. सहसा सामाजिक प्रश्न असायचे. वृत्तपत्रे त्यांना बक्षीसे वगैरे द्यायचे. मंडपांच्या बाहेर त्या मंडळाने आधीच्या वर्षांमध्ये जिंकलेल्या ट्रॉफी ठेवल्या असायच्या. आता हसायला येते की ते बघायलाही लोकं तास तासभर लाईन लावायचे प्रत्येक ठिकाणी. पण तेव्हा ते आवडायचेही.

>> इतरत्र पडदे बंद करून ठराविक वेळांत उघडतात का? >>पडदे लावून एका बाजुने रांगेनं ('रांगेचा फायदा सर्वांना' हे बेस्ट वर वाचूवाचू सगळीकडे रांगा लावायची हौस) पडड्याच्या पलिकडे आत जायचे, दर्शन घ्यायचे आणि दुसर्‍या बाजुने बाहेर पडायचे असं मुंबईत असतं (पूर्वी तरी असायचं). कोंडाळं करुन ही जत्रा लागल्यासारखं चौकभर सैरावैरा जन्ता पळत्येय असं चित्र पूर्वी तरी मुंबईत नसायचं. रांगा लावुन पब्लिक यडचाप सारखं तासंतास उभं रहायचं ते राहूद्या! Proud
आणखी एक म्हणजे दीड दिवसाच्या गणपतीचं घरातलं विसर्जन झालं की मुंबईत सार्वजनिक गणपतींना जाण्याची पद्धत होती. आणि जे काय हलते डुलते भव्य का कायसे देखावे असतील ते पहिल्या दिवसापासून तयार असत. पुण्यात आल्यावर समजलं की देखावे बघायला जायचं तर शेवटच्या तीन चार दिवसात. सुरुवातीला गेलं तर कार्यकर्ते ... नाही स्वयंसेवक म्हणतात त्यांना पुण्यात... समजुन देखावे उभे करायच्या कामाला लावायचे. कारण गणपती आला (तो ही आदल्या दिवशी वगैरे आणत नाहीतच... यथावकाश सगळं!) की मग सावकाश काय ते देखावे हळूहळू आकार घेतात.

हो ते मध्यंतरी पुण्यात काही ठिकाणी बघितले होते. रांगा लावून आत सोडणे वगैरे. एरव्ही सरळ समोरून बघायचे असा प्रकार Happy

पुण्यात पूर्वी देखावे, लायटिंग वगैरे साधारण पहिल्या २-३ दिवसांत तयार होत असावे. आम्ही अगदी पहिल्या दुसर्‍या दिवशी कधी गेलो नाही त्यामुळे तेव्हा तयार असत की नाही माहीत नाही. गणपती बघायला म्हणून बाहेर पडणारे लोक सहसा पाचव्या/सहाव्या दिवसापासून बाहेर पडत. गौरी-गणपती विसर्जन झाले की गावात तुडुंब गर्दी होत असे. रात्री १-२ वाजता सुद्धा शहराचा मध्यवर्ती भाग गजबजलेला असे.

मुंबईत लालबागला रात्री ते पहाटे कधीही जा. रात्रीचे आठनऊ वाजता जसा माहौल असतो तसाच पुर्ण रात्र असतो. लोकं रात्री जेवून घराबाहेर पडतात ते पहाटे घरी परतायच्या हिशोबाने.. जत्राही रात्रभर चालू असतात. आम्ही (डिप्लोमा फ्रेंडस) तिथले जत्रेतले जुगार खेळतही रात्रभर पडीक असायचो.

दिड दिवसाचे घरचे गणपती मुंबईत क्वचित असतात. गौरी विसर्जनवाले पाच सहा दिवसांचेच जास्त असायचे. घरात कोणाचा मृत्यु झाला असेल त्या वर्षी दिड दिवसाचा. आमच्या बिल्डींगमध्येच एकेकाळी पंधरा वीस घरात गणपती यायचा आणि विसर्जनाला एकत्र भाऊच्या धक्यावर जायचे. पुण्यातले गणपती बुडवत नाहीत आणि तीच मुर्ती पुन्हा वापरतात हे पहिल्यांदा समजले तेव्हा तो माझ्यासाठीही कल्चरल शॉकच होता. किती हे पुणेकर कंजूस असे तेव्हा वाटायचे Happy

Pages