तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डबा स्कुटी वर नीट बसत नाही
त्यापेक्षा पाच किलो गहू आणि 3 किलो ज्वारी दोन वेगळ्या पिशव्यातून टाकणे आणि आणणे सोयीचे जाते
आल्यावर ती पिशवी डब्यात ठेवायची, म्हणजे डबा पीठाने माखत नाही

ओके, आमच्याकडे चक्कीवाल्याचा पोरगा दारात यायचा. डबा घेऊन जायचा. डबा परत आणायचा.
आता मला वाटते घरचे रेडीमेड पीठच विकत घेत असावेत. एका तपापेक्षा जास्त कालावधी लोटला, तो डबा पाहिला नाही. आता विषय निघाला म्हणून आठवले.

रेडिमेड पीठ महाग पडते
त्यापेक्षा दळण परवडते
जाऊन टाकून आणायचा व्याप होतो तो सोडलं तर बाकी काही त्रास नाही
आणि रेडिमेड च्या चपात्या नीट होत नाहीत हा अनुभव

हो ते तर आहेच. जेवढे घरगुती तेवढे स्वस्त आणि मस्त. तरी स्विगीवरून रेडी जेवण ऑर्डर करण्यापेक्षा रेडी पिठाचे घरगुती जेवण परवडले Happy

आमच्या चाळीत एका बाईने घरातच मशीन बसवलेले आणि व्यवसाय सुरू केलेला. तिच्याकडूनही मग दळून घ्यायचो.

मग त्या बाईंचा पोरगा दारात येऊन डबा घेऊन जायचा आणि परत आणायचा का? का तुम्हाला पायीपायी जायला लागायचे?

मग त्या बाईंचा पोरगा दारात येऊन डबा घेऊन जायचा आणि परत आणायचा का? >> डब्यात पीठ घेऊन परत आणायचा का हे राहिले रे बाबा Wink

अशा वातावरणात वाढलेला माझा तो भाऊ जेव्हा विलासपूरला गेला तेव्हा त्याने पाहिले की तिथे लोक गणपती भाजी घेऊन यावी तसा पिशवीत घाऊन आणतात. हे बघून त्याला एव्हढा धक्का बसला की तो तिथे रस्त्यात बसून रडू लागला << हा खरच कल्चरल शॉक, बाकी अनुभव गंमत वाटली, आश्चर्य वाटलं , कल्चरल डीफरेन्सेस वै. मधे येतात ...

मग त्या बाईंचा पोरगा दारात येऊन डबा घेऊन जायचा आणि परत आणायचा का?
>>>
चाळीतच होती. आमच्या खाली. एक माळा ऊतरावा लागायचा.
पण कुठल्या तरी धान्याचे पीठ जाड की बारीक मनासारखे येत नाही म्हणून चक्कीवाल्या पोराचाही धंदा चालू होता.
खालची बाई गरीब होती. नवरा नाही. पोरगा पस्तिशीचा पण व्यसनी. त्यालाही स्वत:च कमावून पोसायचे. त्यामुळे शक्य तितके तिच्याकडे दळण दिले जायचे.
आमच्या चाळीत आर्थिक विषमता बरेपैकी होती. तरीही लोकं मिळून मिसळून राहायची. त्यामुळे चाळीचे एक वेगळेच कल्चर होते. कधीतरी यावर एक लिहायला हवे.. नोट करून ठेवतो.

आपल्याकडे बरेच वेळा ९ ही वेळ काम सुरु करण्यासाठी दिसते अजुनही. इथे बहुंताश लोक ८ ला हजर असतात. काही लोक ६ लाच काम सुरु करतात>>>>

सकाळी उठतात किती वाजता? आणि स्वतःचे, मुलांचे डब्बे, शाळेत सोडणे वगैरे आवरुन बाहेर पडतात कधी? रात्र मोठी असते तेव्हा काय करतात? सहा वाजता कामावर हजर होणे फक्त शिफ्ट वालेच इथे करतात. ओफिसात काम करणा-यांचा बहुतांशी ९ हाच रिपोर्टींग टाईम असतो.

तुम्ही लिहिलेय तसे ६ वाजता जेवणे व ८ पर्यन्त निजानीज जेव्हा कोणाच्याच घरात लाईट्नव्हते त्या काळात होत असे, मी अनुभवलेले आहे. मला आताही करायला आवडेल पण आता भारतात इथे गावातही उशिरा झोपणे सगळीकडे कॉमन आहे. मोबाइल व टिविचा एकत्रित दुष्परिणाम. तरी लोक सकाळी लौकर उठतात. झोपेचे तास कमी झालेले आहेत. भविष्यातील अनारोग्याची नांदी.

इंग्लंडात असताना एकदा सकाळी जाग आली. पाहतो तर बाहेर लख्ख उजेड होता. गोल्डर्स ग्रीनला नवीन घरी जाणार होतो त्या घरमालकिणीने सकाळी लवकर फोन करायला सांगितले होते. मला वाटलं उशीर झाला कि काय म्हणून थेट फोन उचलला आणि नंबर डायल केला. नाव सांगितल्यावर पलीकडून त्रासिक आवाजात उत्तर आले,
"ही फोन करायची वेळ आहे का?"
"अहो पण तुम्हीच सांगितले होते सकाळी लवकर फोन कर म्हणून"
"पण म्हणून काय सकाळी साडेपाच वाजता फोन करतात का?"
बघितले तर खरंच साडेपाच वाजले होते. पण बाहेर मात्र आपल्याकडच्या साडेसात सारखा लख्ख उजेड होता. आता यांच्या देशात एवढया भल्या पहाटे सूर्य उगवतो ह्यात माझी काय चूक? Lol थंडीत मात्र संध्याकाळी साडेचारलाच अंधार पडायला सुरुवात. ऑफीसमधून निघेपर्यंत घनदाट रात्र. असे वाटायचे रोज ओव्हरटाईम करून घरी जातोय. Lol

ऋनमेष
हा व्यक्ती नक्की कसा असेल उस्तुत्कता आहे.
चाळी पासून मोठ्या हौसिंग सोसायटी चा विषय काढा.
तो तिथे राहिलेला असतो.
G

अशी कोणती गोष्ट जगात नाही त्याचा अनुभव त्याने घेतला नसेल.
उद्या कोणी वाघाची शिकार कशी केली असा अनुभव सांगितला तर ऋनमेष पण त्याच्या वाघाच्या शिकारीचा अनुभव सांगेल.
उद्या कोणी बोलले मी अमिताभ बरोबर ब्रेक फास्ट घेतला आहे तर हा पण शाहरुख बरोबर जेवण केल्याचा अनुभव कथन करेल.

"कहा से आते है ऐसे लोग"

ऋनमेष
हा व्यक्ती नक्की कसा असेल उस्तुत्कता आहे.....
Submitted by Hemant 33 on 16 June, 2022 - 08:58>>>>

तुम्ही जेमतेम २ वर्षांपूर्वी मायबोलीवर आलात ना? म्हणूनच!!!

आणि ते ऋनमेष नाही, ऋन्मेऽऽष असे आहे!!! (कृपया त्याचे नाव चुकीचे लिहू नका, 'नाहीतर लोक एखाद्याचे नाव चुकीचे का लिहितात? / व्यक्तीच्या नावाला दुसऱ्याच्या लेखी असलेले महत्व / नावात खरेच काही नसते का?' वगैरे वगैरे अशा विषयावर धागा येईल!!!)

निल्सन यांनी सांगितलेल्या किश्श्यावरून आठवलं. मी इंदूरला एका घरी गणपतीला काकडीचे काप नैवेद्य म्हणून दाखवलेले पाहिले. तसंच खाली बसून आरती.

कर्नाटकात काही जणांकडेतर त्याच दिवशी संध्याकाळी विसर्जित करतात, नालासोपारा इथे रहात असताना एक कुलकर्णी आडनावाचे पण कर्नाटकातले, त्यांच्याकडे ही पद्धत होती.

>>>>आमच्या इथे पण कर्नाटक येथील कुलकर्णी आहेत ते त्याच दिवशी विसर्जन करतात.

मी इंदूरला एका घरी गणपतीला काकडीचे काप नैवेद्य म्हणून दाखवलेले पाहिले. तसंच खाली बसून आरती.
>>>>
आमच्याकडे/आपल्याकडे दहीहंडीला काकडीचा प्रसाद असतो.
खाली बसून आरती हे भजन स्टाईल झाले. दोघांत तसा फार फरक नाही म्हणा. देवाचीच आराधना करायचे प्रकार झाले.

व्यक्ती हा शब्द स्त्रिलिंगी आहे हो. स्त्री पुरुष कुणालाही उद्देशुन असले तरी ‘ही व्यक्ती‘ असेच आहे. ‘ ऋ ही व्यक्ती…’ असे हवे.

आमच्याकडे लहानपणी नागपंचमीला नाग आणायचे. बहुधा पिशवीतूनच आणायचे आणि पिशवीतूनच सोडायचे. >> ऑ Uhoh

आमच्याकडे भाजी पण पिशवीतून आणतात
दळणाला पण पिशवी असते >> Proud

Cultural शॉक वैगरे काही नसते आपण त्या गोष्टी प्रथम बघतो.. जगात माणूस प्राणी उदंड आहेत.प्रत्येकाची रीत वेगळी प्रतेकच्या दृष्टी ने ते जे करतात ते योग्य असते .
आपण उगाच आपल्याला पटत नाही म्हणून शॉक होतो

गणपती आणि नॉनवेज वरून एक किस्सा आठवला,

म्हणजे मी तसा थिअरीटकली वर्षाचे ३६५ दिवस मांसाहार करतो वा करू शकतो.
पण प्रत्यक्षात सणांच्या दिवशी जर घरीच नॉनवेज जेवण केले नसेल तर मग मी सुद्धा मुद्दाम स्विगीवरून नॉनवेज ऑर्डर करत नाही. आहे तेच शाकाहार खातो. यामुळे गणपतीत गौरीविसर्जनाचे गणपती जाईपर्यंतच्या संध्याकाळपर्यंत घरी नॉनवेज बनले वा आणले जात नाही. आणि आपसूक माझा गणपती पाळला जातो.

पण एके वर्षी एक गंमत झाली. तेव्हा मुंबईला राहत होतो. आमच्या समोरच्यांच्या घरात गणपती यायचा. त्यांना ऐन गणपतीच्या दोनेक दिवस आधी कोणाकडून तरी फुकटात पण फार उत्तम असे मासे मिळाले. ते सुद्धा आठ दहा दिवस अख्या कुटुंबाला पुरतील ईतके. आता त्यांच्या घरात गणपती. मासे फ्रिजरमध्ये टाकायचे तर ते ही त्यांना पटत नव्हते. मग ते आमच्या घरी आले. तुमच्याकडे ठेवाल का म्हणून विचारायला. मी म्हटले, हो बिनधास्त. मी तर खाऊही शकतो. तसे लगेच ते म्हणाले की ठिक आहे, मग खा हवे तितके. तसेही आम्हाला कुठे पैसे पडलेत. उगाच आठवड्याभराने ते खराब होण्यापेक्षा तेवढेच पोटाला लागतील.

मग काय, सलग पाच सहा दिवस मी मासे खात होतो. हलवा पापलेट सुरमई असे दोन तीन मासे आणि कोलंबी वगैरे होते. आई बनवून देत होती आणि मी खात होतो. गणपतीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जास्तीत जास्त माश्यांचा फडशा पाडला.

हे मी माझ्या ऑर्कुटवरच्या मित्रांना सहज सांगितले तेव्हा त्यांना कल्चरल शॉक बसला. कोणाचा विश्वासच बसायला तयार नव्हता की मी गणपतीत रोज मासे खाल्ले. मग मी त्यांना चॅलेंज दिले की चला तर मग पुढच्या गणपतीला तुमच्या पैश्यातून मला रोज नॉनवेज पार्टी द्या. मी रोज खाऊन दाखवतो. पण ते चॅलेंज घ्यायलाही कोणी तयार नाही. किंबहुना दर गणपतीला मी त्यांना याची आठवण करून हेच चॅलेंज देतो. पण आजवर ना त्यांनी विश्वास ठेवला, ना मला गणपतीत नॉनवेज पार्टी द्यायची हिंमत दाखवली Happy

निलाक्षी, नाग म्हणजे नागाची मुर्ती Happy
निलाक्षी, नाग म्हणजे नागाची मुर्ती Happy, नागाची मुर्ती म्हणजे नागाच्या मुर्तीचा फोटो :)) नागाच्या मुर्तीचा फोटो म्हणजे नागाच्या मुर्तीच्या फोटोची फोटो कॉपी :)) नागाच्या मुर्तीच्या फोटोची फोटो कॉपीच्या हस्तप्रति::))

तुमच्याकडे फ्रीज नसावा, डीप फ्रीजर असावा. आणी शेजार्‍यांनी कदाचीत >२०-२५ किलो मासे ठेवायला दिले असतील हा माझ्झ्या कोत्या मनाचा अंदाज. तुम्ही उगा कमी पणा घेवुन त्याला फ्रीज वगैरे म्हणुन आपला मोठेपणा लपवताय.

निलाक्षी, नाग म्हणजे नागाची मुर्ती Happy, नागाची मुर्ती म्हणजे नागाच्या मुर्तीचा फोटो :)) नागाच्या मुर्तीचा फोटो म्हणजे नागाच्या मुर्तीच्या फोटोची फोटो कॉपी :)) नागाच्या मुर्तीच्या फोटोची फोटो कॉपीच्या हस्तप्रति::))>>>>

पहिल्या पोस्ट मध्ये सरांनी पिशवीतून नाग आणायचे आणि सोडायचे असं लिहिलं आहे
आता मूर्ती सोडायचे म्हणजे काय करायचं हे ते लवकरच विचार करून सांगतील

ह्यांचे प्रतिसाद गाळून वाचायची सोय आहे का?>>>>

मुंबईत प्रवास करतांना रस्त्यावरचे खड्डे टाळून जाता येते का???

मुंबईत प्रवास करतांना रस्त्यावरचे खड्डे टाळून जाता येते का??? >>>>>> प्रतिसाद ऑफ द डे. Lol

आम्हीसुद्धा मातीचा नाग पिशवीतून आणतो. पूजा झाल्यावर नेताना मात्र थोडी अडचण होते. त्याचे विसर्जन वाहत्या पाण्यात किंवा अळवाच्या बनात करायचे असते. मुंबईत हे दोन्ही पर्याय उपलब्ध नसतात. मग पूजेचे निर्माल्य काढून बाजूला ठेवून ती मूर्ती प्लास्टिकच्या एखाद्या टबात किंवा धातूच्या भांड्यात ठेवून त्यावर मंत्राक्षता आणि थोडे पाणी श्रद्धापूर्वक शिंपडतो. मग ती मूर्ती बाहेर काढून व्यवस्थित गुंडाळून ऋषि पंचमीपर्यंत तशीच ठेवतो आणि गणपतीच्या मूर्तीसोबत विसर्जन करतो. तेव्हा नेताना ते एका छोट्या ताम्हनात ठेवून ते ताम्हण काळजीपूर्वक पिशवीत ठेवून नेतो.

Pages