Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लहान मुलांचे सगळे किस्से भारी
लहान मुलांचे सगळे किस्से भारी आहेत!
घरचे आणि शेजारचे सगळेच माझ्या
घरचे आणि शेजारचे सगळेच माझ्या बाबांना “भाऊ“ बोलवायचे त्यात घरचे तर अरे तूरे करायचे.. मग माझा भाऊ आणि त्याच्यानंतर मीही कायम बाबाला “अरे भाऊ” म्हणतंच हाक मारलेली आठवतंय
>>>>>
पुर्ण ईंच का पिंच
मी सुद्धा माझ्या वडिलांना अरे भाऊ
आणि आता माझी पोरेही आजोबांना अरे भाऊ
कोथिंबीरचा किस्सा वाचून आठवलं
कोथिंबीरचा किस्सा वाचून आठवलं,,, माझी मैत्रीण एकदा म्हणाली होती की, "मी अजून कुरमुऱ्याचं झाड पाहिलं नाही."
ते ऐकून मला आणि नंतर कुरमुरे झाडाला येत नाही हे कळल्यावर तिला शॉक बसला होता.
कांदे झाडाला येत नाहीत,
कांदे झाडाला येत नाहीत, जमिनीतून खणून काढावे लागतात हे बऱ्याच मोठेपणी कळल्यावर मला सांस्कृतिक धक्का बसला होता.भाजीवाल्या कडे कांद्यावर भुईमूग शेंगा किंवा बटाट्यासारखी माती नसते.त्यामुळे ते मातीतून आले आहेत असं वाटायचं नाही.
वडिलांना भाऊ, दादा, नाना
वडिलांना भाऊ, दादा, नाना आप्पा वैगरे हाक मारतात हे पाहिले होते परंतू माझा नवरा व त्याची तिन्ही भावंडे स्वतःच्या वडिलांना मामा हाक मारतात हे पाहून मला कशॉ बसला होता.
फेफ - कापूस
फेफ - कापूस
वावे - मग तिला "दोन चंद्र" लेख वाचायला देऊ नका. नाहीतर तिला खरोखरच दोन चंद्र आहेत असे वाटेल. नशीब Women are from Venus and not Mars
वरचे सगळेच प्रतिसाद LOL
वरचे सगळेच प्रतिसाद LOL
साबुदाण्याची प्रोसेस यूटुब वर बघुन आश्चर्य वाटलेले. त्या आधी त्याचे दाणे असावेत असा अंदाज होता..
सोनू निगम ने एका मुलाखतीत
सोनू निगम ने एका मुलाखतीत सांगितले आहे. त्याने लहानपणी वडिलांना तक्रार केली होती की असे कसे नाव ठेवले आहे तुम्ही. मोठा झाल्यावर हसतील मला लोक. तेंव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, तू ती चिंता करू नकोस. कारण तू जेंव्हा मोठा होशील तेंव्हा आताचे सगळे सोनू, मोनू, बबलू मोठे झाले असतील.
आणि खरंच तसं झालं. माझ्याच माहितीतल्या पिंक्या, गुड्डी चाळीशीला आल्या. बाळ आता साठ वर्षाचा आहे
आपण वापरलेल्या विजेचे वीजबिल
आपण वापरलेल्या विजेचे वीजबिल येते हे मला खूप उशिरा कळले, तो माझ्यासाठी खरच एक क. शॉक होता
नवर्याच्या ऑफिसमधे एक
नवर्याच्या ऑफिसमधे एक मद्रासी माणूस जॉइन झाला होता, नवीनच होता अमेरिकेत. त्याने ऑफिसमधे जॉइन झाल्यावर सांगितले की त्याला दोन बेडरूम चे अपार्ट्मेंट हवे, कारण बायकोच्या चार दिवसांमधे ते एका खोलीमधे राहणे त्यांच्याकडे चालत नसे. त्याचे फार मोठे धार्मिक घराणे होते म्हणे. त्यांच्याकडे कुणी गेले तर ते स्वतः घरच्या डिशेस वगैरे खायला घ्यायचे, आणि लोकांना डिस्पोझेबल. कारण असे की ते श्रेष्ठ असल्यामुळे बाकी लोकांनी वापरलेली भांडी घासू शकत नाहीत. नॉनव्हेज, कांदा लसूण अशा गोष्टींमुळे कधीही बाहेर जेवायला जायचे नाही.
एकदा मी त्याच्या बायकोला भेटायला गेली तेव्हा ती समोरच्या खोलीमधे एकटी बसली होती. मी पाणी मागितले, तेव्हा तिने मला घ्यायला सांगितले. त्या दिवसामधे ती किचनमधे जाऊ शकत नाही म्हणून. आणि ऑफिसम्धे जायच्या आधी नवरा दिवसभराचे खाणे बाहेर काढून ठेवायचा.
परंतू माझा नवरा व त्याची
परंतू माझा नवरा व त्याची तिन्ही भावंडे स्वतःच्या वडिलांना मामा हाक मारतात हे पाहून मला कशॉ बसला होता.
>>>>
हे मामा प्रकरण मलाही फार जवळचे आहे. कारण मला लहानपणापासून म्हणजे अगदी दुसरी तिसरीत असल्यापासून चाळीतले सारे आबालवृद्ध मामा हाक मारायचे. मला आवडणारी मुलगी देखील मामाच हाक मारायची. ती मला दादा नाही म्हणत यातच काय ते मी समाधान मानायचो. कॉलेज संपून जॉबला लागेपर्यंत हे असेच होते. नंतरच्या पिढीतले मुले मात्र नावाने हाक मारू लागली. किंवा नावापुढे दादा जोडू लागले.
आणि लोकांना डिस्पोझेबल. कारण
आणि लोकांना डिस्पोझेबल. कारण असे की ते श्रेष्ठ असल्यामुळे बाकी लोकांनी वापरलेली भांडी घासू शकत नाहीत
>>>>>
हे भारी आहे. म्हणजे ऊच्च शिक्षणाने वा अमेरीकेत जॉब करताना जग बघितल्यानंतरही विचार बदलतातच असे नाही. किंबहुना ही श्रेष्ठत्वाची भावना वाढतही असेल..
आणि लोकांना डिस्पोझेबल. कारण
आणि लोकांना डिस्पोझेबल. कारण असे की ते श्रेष्ठ असल्यामुळे बाकी लोकांनी वापरलेली भांडी घासू शकत नाहीत >> खरच भारी आहे. ह्यांच्या कडे एकदा गेले की मला नाही वाटत परत कोणी जात असेल..
नाहीच गेलो
नाहीच गेलो
माझ्या लहानपणी, गहु तांदुळ
माझ्या लहानपणी, गहु तांदुळ वगैरे धान्य कायम रेशन दुकानातुन येत असे. ते दुकानात कधी येताहेत याच्या बातम्या मिळवत राहणे, आल्यावर लांब रान्गेत उभे राहुन, आपला नंबर येईल तेव्हा जरा बरे गहु तांदुळ असलेले पोते उघडलेले असु दे ही प्रार्थना करत राहणे, पिशव्या भरुन रेशन आणणे आणि मान मोडेतो ते साफ करणे हे महिन्यातुन दोनदा करायचे त्रासदायक काम असे.
इतर दुकानात रांगेत उभे न राहता चांगले गहु तांदुळ मिळतात हे मला पहिल्यांदा कळले तेव्हा खरेच धक्का बसला होता..
आणि सध्या रेशनवर चांगल्या प्रतीचे रेशन मिळते हे बघुन सुद्धा धक्काच बसलेला.
कुरमुऱ्यांचं झाड
कुरमुऱ्यांचं झाड
मी प्रोजेक्ट स्टुडंट म्हणून जीएमआरटीमधे असतानाचा एक प्रसंग आठवला. तिथे जेव्हा शास्त्रज्ञ यायचे तेव्हा ते, शिवाय पीएचडी स्टुडंट वगैरे कुणी असतील तर एकत्र वेगळ्या टेबलावर जेवायला, नाश्त्याला वगैरे बसायचे. यात काही उच्च-नीच वगैरे भाव नसायचे, तर एकत्र काम करत असल्यामुळे ते एकत्रच येऊन कँटीनमध्ये बसायचे. तेव्हा त्यांच्या गप्पा लांबून बघताना माझ्यासारख्या नवख्या इंजि. विद्यार्थ्यांना वाटायचं की ते काही तरी खगोलशास्त्रातल्या गहन गोष्टींवर चर्चा करत असणार. एकदा माझं काही काम त्यांच्याबरोबर सुरू होतं. तेव्हा नाश्त्याची वेळ झाल्यावर मीही त्यांच्याबरोबर कँटीनमध्ये येऊन बसले. नाश्त्याला पोहे होते. त्यांचा विषय सुरू झाला की पोहे (कच्चे, पांढरे पोहे) कसे तयार करत असतील? आश्चर्य म्हणजे हे त्यांच्यापैकी कुणालाही माहिती नव्हतं. म्हणजे नेमकी पद्धत माहिती नसेल हे ठीक आहे, पण कशापासून बनवतात हेही माहिती नव्हतं. एक पीएचडी स्टुडंट म्हणाला, भेळेचे कुरमुरे असतात ना, ते दाबून पोहे तयार करत असतील. हे ऐकून मी म्हटलं की कुरमुऱ्यांचं पीठ नाही का होणार दाबल्यावर? गावाला आमच्याकडे घरच्या भाताचे (इथे भात म्हणजे सालासकट तांदूळ) पोहे बनवून घेतात त्यामुळे मला ती प्रक्रिया माहिती होती ती मी सांगितली. पण एकीकडे मला मनात हसायला येत होतं की लांबून आपल्याला वाटायचं की हे काही तरी भारीपैकी गोष्टींची चर्चा करतात
फारएण्ड, दोन चंद्र
एकदा चंद्राच्या जवळ शुक्र होता, तेव्हा मी गच्चीवरून फोटो काढून परत येत असताना शेजारीण भेटली. ही चांगली शिकलेली, नोकरी करणारी. तिने विचारलं, कसला फोटो काढलास? मी फोटो दाखवला आणि म्हटलं, चंद्र आणि बाजूला हा व्हीनस आहे. तर म्हणाली, व्हीनस तो प्लॅनेट है ना? वो चाँद के बाजू में कैसे हो सकता है? चाँद के बाजू में तो पोलस्टार होता है! मी म्हटलं पोलस्टार तो नॉर्थ में होता है, वो चाँद के बाजू में कैसे होगा? तर म्हणाली बचपन से बुक्स में यही पढा है हमने.. म्हटलं कौनसे बुक में? तर म्हणाली काफी सारे बुक्स में ऐसे ही पढा है! मी म्हटलं की असं नसतं. पोलस्टार उत्तर दिशेला असतो. पण ती दुर्लक्ष करून निघून गेली.
माझ्या ऑफिसातल्या कलिगला ‘
माझ्या ऑफिसातल्या कलिगला ‘ रात्री आम्ही आकाशदर्शन कार्यक्रमाला गेलो होतो’ हे सानंगितल्यावर धक्का बसला होता. आकाशात बघंणयासारखे काय असते हा तिला प्रश्न पडला. ‘मै तो सिर्फ करवा चौथको उपर देखती हु‘ म्हणाली. मी म्हटले आता रोज बघत जा.
माझा चुलतभाऊ, वडलांना बाबा
माझा चुलतभाऊ, वडलांना बाबा आणि माझ्या वडिलांना पपा म्हणत असे.माझ्या आईला काकी म्हणत असे.तो लहान असताना त्याला गावी नेताना बसमध्ये त्याच्या तोंडून पपा, काकी असं ऐकल्यावर इतरांना जबरा क.शॉ बसलेला.
संयुक्त कुटुंबात आईवडिलांना
संयुक्त कुटुंबात आईवडिलांना जी नावं असतात , तीच नावं मुलंही वापरतात.
माझ्या मावशीचे मिस्टर त्यांच्या मुलांसाठीही भाऊ होते.
आईकडे थोरल्या भावंडांसाठी वेगळी नावे होती. ताई, बाई, बाबा (कारण वडील दादा असावेत), भाऊ, बेबी ही माझ्या मावश्या आणि मामांची संबोधने. पण धाकट्या भावंडाचं नाव घेतलेलं चाले. त्यामुळे मोठ्या मामांच्या मुलांची लिलूआत्या माझी बेबीमावशी.
चंद्र,तारे,ग्रह,कांदा,
चंद्र,तारे,ग्रह,कांदा, कोथांबिर. ह्या विषयी माहीत नाही .अशा ह्या शिकलेल्या साऱ्याजणी .
खरेच शिकल्या आहेत की कॉप्या करून आणि पाट्या टाकून डिग्री घेतलेल्या आहेत.
अंगठा छाप लोक पण ह्यांच्या पेक्षा हुशार असतात.
ह्यांना अडाणी शिक्षित असेच म्हणतो मी.
ग्रह,तारे, universes हे शाळेत शिकवतात त्याचीच परीक्षा देवून दहावी होते.
वनस्पती,त्यांची शास्त्रीय नाव,त्यांची माहिती,त्यांची ओळख सार सर्व शाळेत शिकवले जाते...ह्या कशा दहावी बारावी पास झाल्या असतील.
सगळ्या नव्या पोस्टी धमाल आहेत
सगळ्या नव्या पोस्टी धमाल आहेत... एकच आई, पुन्हा सेम मुलगी, कुरमुरे
वावे, जीएमआरटी किस्सा भारी!
चंद्रावरून एक किस्सा आठवला.... पूर्वी आमच्या शेजारी एक मुस्लिम कुटुंब रहायचं. शेजारी म्हणून आमचे चांगले संबंध होते. बर्याचदा ईदची चंद्रकोर आमच्या टेरेसवरून संध्याकाळी मावळतीला आली की दिसायची. त्यांनी सांगून ठेवलं होतं, की चंद्रकोर दिसली तर लगेच हाक मारा. काही वर्षं हे अगदी रूटिन होतं.

एकदा असंच त्यांच्या घरातली माझ्या वयाची बाई आली, चंद्रकोरीकडे बघून डोळे मिटून तिने मनोभावे तिची जी काही प्रार्थना, दुवा होती ती केली.
मी म्हटलं, "योगायोगाने लक्ष गेलं नाहीतर थोड्या वेळात चंद्र मावळलाच असता."
ती म्हणाली, "मावळेल कसा, क्षितिजावरच दिसतोय, आत्ता तर उगवलाय."
मला वाटलं तिचा पूर्व-पश्चिम गोंधळ होत असेल. म्हणून मी म्हटलं, "नाही, ही पश्चिम आहे."
ती म्हणे, "हां, तो? चांद पश्चिम में तो उगता है, और पूरब में डूबता है... सूरज उल्टा आता है!"
माझी क.शॉ.मुळे बोलतीच बंद झाली.
त्यांच्या घरातले सगळे उच्चशिक्षित होते, ती स्वतःही. डबल ग्रॅज्युएट, पीएच्डी, याखाली बात नव्हती. त्यामुळे मला आणखी शॉक होता.
ती म्हणाली, लहानपणापासून आम्हाला घरी असंच सांगितलंय!
मग मी तिचा भूगोलाचा तास घेतला. काही उपयोग झाला का माहिती नाही.
‘मै तो सिर्फ करवा चौथको उपर
‘मै तो सिर्फ करवा चौथको उपर देखती हु‘ >>> करवा चौथ चतुर्थीला असतो पौर्णिमेला नाही हे बऱ्याच उशीरा लक्षात आलं होतं माझ्या

अमावस्येच्या दिवशी चन्द्र
अमावस्येच्या दिवशी चन्द्र सुर्याबरोबरच उगवतो व मावळतो. त्या दिवशी त्याने त्याचा प्रकाशमान मुखडा पुर्णपणे विरुद्ध दिशेला फिरवलेला असतो. या दोन कारणांमुळे तो पृथ्वीवासियाना दिसत नाही हे मला भयंकर उशीरा कळाले. मुलगी म्हणाली शाळेत झोपायला जायचीस का? पण खुप ताण देउनही मला हे शिकवलेले आठवत नाही, बहुतेक तेव्हा कळलेच नसावे.
मी नताशा, तो हिन्दी
मी नताशा, तो हिन्दी चित्रपटांचा परिणाम. तिकडे चौथ नेहमी वाटोळ्या चन्द्राला बघुन साजरी होते.
साधना +१
साधना +१
लप्रि.. मलाही त्या बाईसारखेच वाटत होते आत्ता आत्तापर्यंत. चंद्र संध्याकाळीच कसा मावळेल?
चांद पश्चिम में तो उगता है,
चांद पश्चिम में तो उगता है, और पूरब में डूबता है... सूरज उल्टा आता है!"
एकदा आमच्या सोसायटीतला एक मराठी माणूस मी संध्याकाळी गच्चीवर गेले असताना भेटला. तेव्हा काही तरी फॉरवर्ड फिरत होतं की अमुक तारखेला चंद्रकोर, गुरू आणि शुक्र मिळून आकाशात स्माईली दिसणार आहे वगैरे. तर त्याने मला विचारलं की हे खरं आहे का? म्हटलं नाही, गुरू आणि शुक्र जवळजवळ दिसत नाहीत सध्या. सध्या शुक्र संध्याकाळी पश्चिमेला दिसतोय, तो आता थोड्या वेळाने मावळेल आणि गुरू रात्री उशिराने इकडून उगवेल.. असं म्हणताना मी पूर्वेकडे हात केला. तर म्हणाला, अच्छा इकडून उगवतो का गुरू? म्हटलं ही पूर्व आहे ना. तर म्हणाला गुरूपण पूर्वेला उगवतो का?
मी काय म्हणणार? हो म्हटलं!
अमावस्येच्या दुसर्या दिवशी
अमावस्येच्या दुसर्या दिवशी चन्द्र बिचारा सुर्यानन्तर तासाभराने उगवतो, दिवसभर ड्युटी करतो आणि सांजेला सुर्य झोपल्यावर तासाभराने मावळतो.
सूर्य मावळला की चंद्र उगवतो.
सूर्य मावळला की चंद्र उगवतो. सूर्य उगवायच्या वेळी मावळतो. असा साधा सोपा नियम लक्षात ठेवला असेल लोकांनी.
गुरूपण पूर्वेला उगवतो का? >>>
गुरूपण पूर्वेला उगवतो का? >>>
वावे जीएमआरटी किस्सा मस्तच
वावे जीएमआरटी किस्सा मस्तच

>>भेळेचे कुरमुरे असतात ना, ते दाबून पोहे तयार करत असतील
Pages