Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह येस! २४ मुलींत म्हणायला
ओह येस! २४ मुलींत म्हणायला पाहिजे होतं.
टिळक पंचांग >>
"रिजनल फूड हॅबिट्स" आणि
"रिजनल फूड हॅबिट्स" आणि "विविध भाषांमधले उच्चार" हे कल्चरल शॉक मधे येतात हा मला एक मोठा कल्चरल शॉक आहे

आणि हजार प्रतिसाद झाले तरी
आणि हजार प्रतिसाद झाले तरी जंता मुद्द्यावर बोलत असेल हा आत्मविश्वास हाच मोठा शॉक आहे.
(No subject)
जंता जनार्दन प्रतिसाद दणादण
परीवर्तन संसार का नियम है,
धागा भरकटत नाही, तर केवळ विषय परीवर्तन होते.
ग्यान बटना लेकिन कम नही होता
कोल्हापूर साईड ला वडापाव
कोल्हापूर साईड ला वडापाव म्हटल्यावर मोठा टगा वडा आणि स्लाइस ब्रेड आला ते बघून धक्का बसला होता(आता हा आधी लिहिला असेल तर पानं पुढे गेली म्हणून परत वाचा.) शिवाय 'वडे आणू का' विचारल्यावर वडा पाव न आणता खरोखर लोकं नुसते वडेच आणायचे हे बघून धक्का बसला.वडा पाव आणि तोही लादी पाव हवाच.
>> मोठा टगा वडा आणि स्लाइस
>> मोठा टगा वडा आणि स्लाइस ब्रेड आला
येस्स्स्सस... तोंपासू
प्रत्येक शहरातली वडा-पाव पद्धती वेगळी आहे. वडा-पाव धाग्यावर यावर बरीच चर्चा झाली आहे
वडे आणू का' विचारल्यावर वडा
वडे आणू का' विचारल्यावर वडा पाव न आणता खरोखर लोकं नुसते वडेच आणायचे
>>> बरोबर आहे कि...
कोल्हापूरहून मुंबईला येईल
कोल्हापूरहून मुंबईला येईल तसेतसे वड्याचा आकार ग्र्याज्यूअली कमी कमी होत जातो. कोल्हापूरचा अगदी मोठा वडा मुंबईला छोटुसा होऊन जातो.

त्यामुळे सातारचा वडापाव प्रमाणभूत मानायला हरकत नाही
वडे आणू का' विचारल्यावर वडा
वडे आणू का' विचारल्यावर वडा पाव न आणता खरोखर लोकं नुसते वडेच आणायचे
>>> बरोबर आहे कि...
>>>>
हो ॲक्चुअली बरोबर आहे.
पण काहींना नुसते वडे खायला आवडतच नाही. त्यांच्यासाठी वडापाव हाच पदार्थ असतो. नुसता वडा म्हणजे मिसळपाव ऐवजी नुसती मिसळ दिली आणि खा म्हटले असे वाटते.
मी सुद्धा लहानपणी पहिल्यांदा दादरच्या श्रीकृष्णचा वडा खाल्लेला तेव्हा असाच चकीत झालेलो. हे काय च्यायला नुसता वडा खायचा? पाव कसे विकत नाही हे लोकं? असा प्रश्न पडलेला.
हेच मला बटाटावडा सांबारबाबतही पहिल्यांदा झाले होते. वडा सांबर ऑर्डर केल्यावर मेदूवड्याजागी बटाटावडा आलेला बघून डोक्याला शॉट लागलेला. बहुधा गावाला कोकणात झालेले असे..
कोल्हापूरचा अगदी मोठा वडा
कोल्हापूरचा अगदी मोठा वडा मुंबईला छोटुसा होऊन जातो.>>> पण मुबैला तर जम्बो वडा वैगरे अॅड पाहिल्यात आहेत मग त्याची काय साइझ असते जम्बो छोटुसा असेल तर कोल्हापुरला काय डोनट साइझ वडा देतात की काय?वडा,मिसळ बरोबर स्लाइस ब्रेड अगदी बीग नो नो!! कॉम्बीनेशनच वियर्ड आहे.
नाशिकला वडारस्सा म्हणुन प्रकार देतात त्यात बटाटेवडा-त्यावर झणझणीत तर्रिदार रस्सा (साबार नाही रस्स्साच) आणी बरोबर पावच
येस अनु..अगदी परवाच खाल्ला हा
येस अनु..अगदी परवाच खाल्ला हा वडा आणि स्लाइस ब्रेड!.
सोबत कसलीशी पांढरी चटणीही होती .मी खाल्ली नाही.
पण वडापाव येईल या आशेवर होतो..तो अगदीच अपेक्षाभंग झाला.....
अति लहानपणी फक्त वडेच माहिती
अति लहानपणी फक्त वडेच माहिती होते, डोंबिवलीत रामनगर मध्ये आधी आणि नंतर पाटकर शाळेजवळ एक बाई फक्त बटाटावडे आणि साबूदाणे वडे विकायच्या, खूप मोठे आणि चविष्ट वडे असायचे. नंतर वडापाव ट्रेंड चालू झाल्यावरही त्यांनी फक्त वडेच विकले (इथे पाव मिळणार नाही अशी पाटी लावली त्यांनी नंतर) खूप गर्दी असायची, ती चव अजूनही तोंडावर आहे.
वडापाव तसा उशिरा खायला सुरुवात केली.
खाद्यपदार्थ जिथल्या तिथल्या
खाद्यपदार्थ जिथल्या तिथल्या सवयींनुसार लोकप्रिय झालेले असतात. बाहेरून येणाऱ्या लोकांना त्या सवयी जुळतीलच असे नाही, म्हणून कल्चरल शॉक.
बाली-इंडोनेशिया मध्ये स्थानिक "अत्यन्त रुचकर व लोकप्रिय भाजी आहे तुम्ही टेस्ट करून पहाच" म्हणून आम्हाला प्रेमाने वाढली गेली. पहिल्या घासातच झटका बसला. तिला निलगिरीसम* उग्र वास येत होता. आपल्याकडे तशाच वासाची वनस्पती लहानपणी अनेकदा बघितली होती. पण कधी खावे लागेल वाटले नव्हते. कशी खात असतील वगैरे विचार मनात आले. पण तेवड्यात आपली "शेपू" आठवली. ज्यांनी कधीच खाल्ली नाही त्यांना ती उग्रच वाटणार. असा विचार करून इंडोनेशियन चवदार निलगिरीच्या* भाजीचे घास गट्टम केले
(*अगदी निलगिरी नव्हे. जवळपास. पण तशाच वासाची वनस्पती आहे आपल्याकडे. पण आता नाव नाही आठवत)
पण मुबैला तर जम्बो वडा वैगरे
पण मुबैला तर जम्बो वडा वैगरे अॅड पाहिल्यात
>>>
तो जंबोकिंग म्हणून एक बंडल वडापाव असतो. त्याची गणती वडापावमध्ये बिलकुल करू नये. बर्गर गटात मोडतो तो..
बाकी काही लोकल वडापाववाले मोठा वडा मोठ्या साईजच्या पावामध्ये देतात आणि त्याला जंबोवडापाव म्हणतात.
हल्ली ते बिकानेरछाप दुकानांमुळे मुंबई नवीमुंबईत बरेच ठिकाणी गोड चिंचेच्या चटणीसोबत वडापाव मिळतात ते ही वीट आणतात..त्यापेक्षा समोसापाव परवडतो.
टगा वडा >> ही उपाधी जाम आवडली
टगा वडा >> ही उपाधी जाम आवडली आहे अनु.
हहपुवा
अतुल तुम्हाला घुई म्हणायचे
अतुल तुम्हाला घुई म्हणायचे आहे का. लॅव्हेंडर त्याला निळी / जांभळी फुलं येतात.
नाही. ९० च्या आसपास सामाजिक
नाही. ९० च्या आसपास सामाजिक वनीकरण तर्फे शाळेत बरीच रोपे आणली होती. सुबाभूळ, रेन ट्री (Monkey pod tree) सोबत हि रोपे सुद्धा आणली होती शाळेत. पण नावच आठवत नाही.
एका सोसायटीत मुले पार्कींग
एका सोसायटीत मुले पार्कींग मध्ये स्पोर्टस शूज घालून खेळताना पाहून असाच शॉक बसलेला! माझी आपली कल्पना की स्पोर्ट्स शूज हे फक्त मैदानावर खेळताना किंवा विशेष खेळाचे ट्रेनिंग असेल तर घालायचे.. घराच्या अंगणात अनवाणी खेळायचो त्याची आठवण झाली एकदम!
९० च्या आसपास सामाजिक वनीकरण
९० च्या आसपास सामाजिक वनीकरण तर्फे शाळेत बरीच रोपे आणली होती.
>>> जळणाला लाकुड , गुरांना चारा
तसा काही प्रचार नव्हता. झाडं
घराच्या अंगणात अनवाणी खेळायचो
घराच्या अंगणात अनवाणी खेळायचो त्याची आठवण झाली एकदम!
नवीन Submitted by निलाक्षी on 10 June, 2022 - 16:45
>>>>
हो, काळ बदललाय आता.
आमच्याकडे पोरगी अनवाणी खेळायला पळते आणि तिची आई शूज घाल, शूज घाल म्हणून तिच्या मागे लागते. लहानपणी चाळीच्या मैदानात ऊप्स गल्लीत आम्हीही अनवाणीच क्रिकेट खेळायचो. त्यामुळे मी जास्त लोड घेत नाही. बाकी हल्ली स्टेटस म्हणूनही एक प्रकार आला आहेच. सगळ्यांची पोरं शूज घालून खेळत असतील तर आपले कसे अनवाणी पाठवायचे. हे स्टेटस मेंटेलिटीला झेपत नाही.
कोल्हापूर साईड ला वडापाव
कोल्हापूर साईड ला वडापाव म्हटल्यावर मोठा टगा वडा आणि स्लाइस ब्रेड आला >> त्याला कोल्हापुरात पेटी पाव म्हणतात .. स्लाइस ब्रेड पेक्षा थोडा वेगळा असतो..
वडा सांबर ऑर्डर केल्यावर
वडा सांबर ऑर्डर केल्यावर मेदूवड्याजागी बटाटावडा आलेला बघून डोक्याला शॉट लागलेला. बहुधा गावाला कोकणात झालेले असे..>>
एकदा ट्रेकवरून परत आल्यावर , माझ्याच गावात स्टेन्ड समोरच्या हॉटेलात वडा ऑर्डर केला..
कढी मध्ये बुडवलेल्ला बटाटेवडा बघून बसलेला मानसिक धक्का कसा विसरणार!!!
>>>>>>>>बघून बसलेला मानसिक
>>>>>>>>बघून बसलेला मानसिक धक्का कसा विसरणार!!!

एकदा एका स्टॉलवाल्याने भजी
एकदा एका स्टॉलवाल्याने भजी स्टीलच्या प्लेट सहित मायक्रोवेव्ह मध्ये ठेवली होती, आणि नन्तर त्या स्टील भोवती होणाऱ्या फर्रफर्र टर्रटर्र विजेच्या स्पार्क कडे साफ दुर्लक्ष करून एक मिनिटाने बाहेर काढली. तेंव्हा त्या प्लेटला इलेक्ट्रिक आणि मला रिव्हर्स कल्चरल शॉक बसला होता.
आमच्याकडे पोरगी अनवाणी
आमच्याकडे पोरगी अनवाणी खेळायला पळते आणि तिची आई शूज घाल, शूज घाल म्हणून तिच्या मागे लागते.》》
नाशिकला तशीच कढीभेळ मिळते ट्राय करायचे अजून धाडस झाले नाहीये
हे ही ठिक आहे, मुलांना काही लागू नये म्हणून काळजी.. पण डायरेक्ट स्पोर्ट शूज.. त्यामुळे जास्त धक्का बसला कालाय तस्मे नम: ..!
कढित बुडवलेला वडा
मला हे स्पोर्ट्स शूज प्रकरण
मला हे स्पोर्ट्स शूज प्रकरण नीट समजलं नाहीये. खेळताना स्पोर्ट्स शूज च घालणार, ड्रेस शूज नाही. मी काहीतरी मिस करतोय का?
भजी स्टीलच्या प्लेट सहित
भजी स्टीलच्या प्लेट सहित मायक्रोवेव्ह मध्ये
>> बाबौ
भजी स्टीलच्या प्लेट सहित
भजी स्टीलच्या प्लेट सहित मायक्रोवेव्ह मध्ये....बापरे!
तसं नाही फेरफटका.. शूज
तसं नाही फेरफटका.. शूज वापरण्याबद्दल माझा आक्षेपही नाही.. फक्त आम्ही अनवाणी खेळत असू नेहमी.. अगदी मैत्रिणीच्या सोसायटीतही खाली अनवाणीच. त्यामुळे मला वाटते की घराखाली खेळताना फारफारतर् चप्पल असेल..म्हणून बसलेला धक्का आहे.
Pages