तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसेच भारतात असताना हर्ब्ज म्हणायचे. पण अमेरिकेत अर्ब्झ म्हणतात हे माहित नव्हते.
herb हा फ्रेंच ओरिजिनचा शब्द असल्याने H सायलेंट असतो म्हणे.

पूर्वी कॅनडात असताना हर्ब म्हणायचो. अमेरिकेत गेल्यावर अर्ब म्हणू लागलो. परत कॅनडात आल्यावर खर्‍या कनेडिअन सारखं ५०% वेळा अर्ब आणि उरलेल्या वेळा हर्ब म्हणतो. Wink

ब्रिटिश इंग्रजी मध्ये एच सायलेंट नाही आणि मूळ शब्द फ्रेंच असल्याने त्यात (निम्मी अक्षरे उच्चारायची नाही नियमानुसार) सायलेंट आहे. अमेरिकेत अर्ब म्हणतात. कॅनडाचं अमेरिकेच्या विरुद्ध करायचं हे तर ठरलं पण आता ब्रिटिशांबरोबर जायचं का फ्रेंचांसारखं? तर बायलिंग्वलनेस आणि पोलाईटनेसचा कडेलोट करत ५०% असं ठरलं आहे. Wink

अमित Lol

ते ओव्हन, ओनियन चे अवन, अनियन कधी झाले? मला ते जाहिरातीत ऐकताना कल्चरल शॉक बसून आपले उच्चार अगदीच कंट्री आहेत असे वाटू लागले होते. अव्हन मधे तर अ जेमतेम उच्चारतात. अव्हन हा शब्द मूळ भारतीय हवन मधून आला आहे असे ठोकून द्यायला हरकत नाही. इंग्रजीत अपभ्रंश होताना महाप्राण मधल्या अक्षरावर गेला.

बाकी आण्ट्रे, जॉनरा, लाँजरे वगैरे तर सोडूनच द्या (तिसर्‍याच्या बाबतीत फक्त शब्द वापरणे सोडा).

परदेशात ते 'माय नेम इझ अमुकतमुक, बट यू कॅन कॉल मी जस्ट अमु' हे प्रकार फार पाहिले. मी माझं नाव आहे तेवढंच सांगायचो. माझं इतकं सोपं नाव असूनही एकाने मला हाक मारण्यासाठी कुठलं दुसरं सोपं नाव वापरतोस का म्हणून विचारलं होतं. म्हटलं हो, आहे ना, म्हण - 'वेणुगोपाल अय्यर, मुत्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर, चिन्नस्वामी मुत्थुस्वामी ....'

अव्हन हा शब्द मूळ भारतीय हवन मधून आला आहे असे ठोकून द्यायला हरकत नाही. >>> हाहाहा सहीच.

म्हटलं हो, आहे ना, म्हण - 'वेणुगोपाल अय्यर, मुत्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर, चिन्नस्वामी मुत्थुस्वामी ....'>>> भारीच, हाहाहा.

इंग्लडमध्ये लहानपणीचे सगळे रॉबर्ट मोठेपणी बॉब होतात.
"इमेल मध्ये याचे नाव रॉबर्ट, पण याला बोलताना बॉब का म्हणतात?" या माझ्या प्रश्नाचे तिथल्या भारतीयानेच हे उत्तर दिले होते.
नाही म्हटले तरी अगदी हलकासा (२० ते ३० वोल्टचा?) शॉक होता.

education एडुकेशन guardian गार्जिअन हे उच्चार मी भारतातच ऐकलेत. आणि अनेक व्यक्तींकडून.

“तिसर्‍याच्या बाबतीत फक्त शब्द वापरणे सोडा” Lol

“'वेणुगोपाल अय्यर, मुत्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर, चिन्नस्वामी मुत्थुस्वामी” - Lol

तिसर्‍याच्या बाबतीत फक्त शब्द वापरणे सोडा>> Lol
अवन आणि हवन हेही भारी आहे!

ह.पा., माझ्या नवऱ्याच्या एका सहकाऱ्याचं नाव मुथूबालन वरदराज पेरुमल होतं आणि ते त्याने असंच एका अमेरिकन माणसाला सांगितल्यावर तो अवाक होऊन याच्याकडे बघत बसला होता.

मधुराज रेसिपी मध्ये तिने एक tortilla wrap दाखवला आहे त्यात अख्खा वेळ tortilla ला टॉर्टीला म्हणते. त्यावेळी ती अमेरिकेत होती. >>> खरा उच्चार काय आहे? मी भारतातच रहाते आणि अमेरिकेत कधी गेले नाहिये Wink

तिसर्‍याच्या बाबतीत फक्त शब्द वापरणे सोडा >>> Rofl Rofl

विनय आपटे एपिक आहेत त्या सीन मध्ये.आम्ही परत परत पाहतो.तो आणि विजयराज चा लाल बटन वाला सीन. >>> सेम Proud

रॉबर्ट ह्या माणसाचे निकनेम बॉबी असते हे मला बरेच दिवस माहित नव्हत.
युक्रेन टिमा बरोबरोबर ७ वर्ष काम केल्यावर त्यांच्यात आणि आपल्यात काही बाबतीत खुप मजेशीर साम्य आहे. उदा. अँड्री हे नाव खुप कॉमन आहे.
आपल्याकडे राजा, राजकुमार,शक्ती असते तसे. (अ‍ॅड्री- पुरुष योद्धा)
तसेच बरीच आडनाव शिंपी, धनगर अशी असतात. जस Stadnik - धनगर , Kravchenko - शिंपी किंवा शिंप्याचे पोर.
आपल्याकडे गजानन वगैरे तस त्यांच्याकडे नतालिया खुप कॉमन . म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी जन्मलेली.

अर्धी तर तेंव्हाची श्रीलेंकेची क्रिकेट टीम आहे. आट्टापट्टू कलुवितारांना जयसूर्या

विनय आपटे यांनी ते पाठ कसे केले असेल याचे राहून राहून आश्चर्य वाटते!!!! >> मी अगदी हाच विचार करत होतो !!

पाठ केले असूही शकेल.अभिनेते/अभिनेत्री मेहनत घेतात रोल्स साठी.
अर्थात काही जण म्हणतात समोर गाडीच्या काचेवर लिहिलेले वाचून बोलत असावे.
विनय आपटे, दिलीप प्रभावळकर, विजय पटवर्धन(लाल बटन सीन मध्ये विजय राज च्यामागे)असे नाट्य कलाकार हिंदीत पाहून मस्त वाटतं कधीकधी. आणि अर्थातच अशोक सराफ, लक्ष्या, प्रिया अरुण यांना पाहून पण.

तीन तीन तासांची नाटकं, त्यातल्या लांबलचक पल्लेदार वाक्यांसकट, आख्खी पाठ करण्याची सवय असलेली जुनी नट मंडळी आहेत ही. ह्यांना समोर बघून वाचण्याची गरज पडली नसावी.

नाट्य कलाकार हिंदीत पाहून मस्त वाटतं कधीकधी >> +1

मराठी कलाकार भरपूर आहेत हिंदीत आणि ते उत्तम काम देखील करतात पण सुपरस्टार म्हणावा असा एकही नाही.
माधुरी होती बराच काळ, त्यानंतर नाही.

अव्हन हा शब्द मूळ भारतीय हवन मधून आला आहे
>>

हा हा अर्थपुर्ण आहे Happy
योगायोगाने मी सुद्धा ओव्हनवर काही गरम करायचे असेल तर ओव्हन करेंगे ओव्हन करेंगे गाणे गातो Happy

धमाल ॲक्चुअली धमाल पिक्चर आहे. दोन्ही सीन आयकॉनिक आहेत. कित्येक मीम्समध्ये वापरले गेले आहेत.
लाल बटणवाला सीन क्रिकेटमध्ये बराच दिसतो.
सामने धोनी दिख रहा है.
हां, आऊट कर दिया.
नही करना था Happy

मराठी कलाकार भरपूर आहेत हिंदीत आणि ते उत्तम काम देखील करतात पण सुपरस्टार म्हणावा असा एकही नाही.
माधुरी होती बराच काळ, त्यानंतर नाही.
नवीन Submitted by फलक से जुदा on 7 June, 2022 - 16:20
>>
त्यांचा जन्म मराठी घरातला असेल. पण त्या मराठी कलाकार नाहीत.

Pages