युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

घरी चुकुन खुप सारी ताजी बेसिल पाने आणली गेली आहेत.
ती कशी संपवु ? काय बनवु ? आयडीया द्या प्लीज...
पेस्तो सॉस करायचा नाहिये...

१५ adults आणि सहा kids.
घरी brunch ला येणार आहेत
मिसळ करण्याचे योजिले आहे
कुणी प्रमाण सांगेल काय?
मटकी किती?
पाव किती?
योकू ह्यांची पाकृ follow करते मी नेहमी त्यानुसार सांगा
किंवा कसंही

खुप बेझीलची पाने ट्रे मध्ये ऑलिव्ह ऑइल घालून त्यात फ्रीझ केली की बर्‍याच वेळा पास्ता सॉस वगैरे गोष्टींकरता वापरता येता.

मिसळ तिखट पणावर पाव किती खातील ते अवलंबून असेल. पण पर अ‍ॅडल्ट २ पाव तरी लागतील. घरी असताना बर्‍याचदा एखादा जास्ती खाल्ला जातो. तिखट असेल तर मग आर्धा अजून जास्तीच. मोड न आलेली तीन वाट्या मटकी लागेल.

आमच्या इकडे माणशी 4 पाव धरले जातात... काही लोक 3 च खातात काही 4... उरलेले चालून जातात दुसऱ्या दिवशी ऑम्लेट पाव वगैरे होऊ शकतो पण कमी पडून चालत नाही आयत्या वेळेस..
माझं प्रमाण नॉर्मली असं असतं...
एक लादी मध्ये 6 पाव येतात तर तुला माझ्या अंदाजाने 9 लादी लागतील ( सेफ साईड साठी 10 तुम्ही दोघे नवरा बायको धरून )
मटकी अर्धा किलो पेक्षा थोडी शी कमी....आणि पाव किलो पेक्षा थोडी जास्त....

माझ्याकडे असलेल्या चांदीच्या समईला जिथे तेल असते त्या खोलगट भागात काळे डाग पडले आहेत... म्हणजे तेलाचे किंवा चांदीची वस्तू ठेवून ठेवून काळी पडते तसे नव्हेत. शाईचा डाग पडतो तसे आहेत. ही समई आणि इतर दोन पितळी समया मागील दोन वर्षात सतत आलटून पालटून वापरल्या आहेत. पण ही चांदीची समई जास्त प्रमाणात वापरली गेली आहे. WFH असल्याने सतत समई लावलेली असते. पण यावेळी चांदीची समई स्वच्छ करायला घेतली तेव्हा हे डाग दिसले. त्यामुळे मन पण जरा खट्टू झाले आहे.
हे डाग कशामुळे पडले असतील? कसे काढावेत?
धन्यवाद!

वॉशिंग सोडा आणि अल्युमिनियम फॉइल चा तुकडा पाण्यात घालून उकळा.समई नंतर साबणाने घासून काढा.
यू ट्यूब वर पाहून यशस्वी झालेले उद्योग.

कोलगेट, पिताबरीने सद्धा चान्दीची भान्डी निघतात व्यवस्थित.
दमट हवामानाने काळी पडतात भान्डी.

मखान्यांचे काय करता येईल. बरेच उरले आहेत.

>>>>

१..खीर . मायबोलीवरच रेसिपी आहे .
२. थोडे तिखट , कळमिरी पावडर टाकून , एक दोन थेंब तूपावरून परतून घेऊन स्नॅक्स टाईप चखणा
३. भाजलेले मखाने + दाणे+ कांदा+टोमॅटो + शेव +लिंबू मिसळून भेळ

मखाणे: थोडे भाजून सरळ पीठ करून पोळी भाकरी थालिपीठात वापरता येतील
1 मोठा चमचा तूप गरम करून त्यात मीठ घालून त्यावर मखाणे चांगले परतून गार झाल्यावर डब्यात भरून ठेवता येतील.
चहात टाकून चमच्याने काढून खाता येतील शंकरपाळे असल्यासारखे
रामबंधु चिवडा किंवा भडंग मसाला, तेल, कढीपत्ता, सुकं खोबरं,दाणे असं करून चिवडा करून ठेवता येईल.
दही कॉर्नफ्लेक्स असतात तसे ओव्हरनाईट दह्यात मखाणे भिजवून वर चिरलेली केळी बेदाणे बदाम काप टाकून कॉर्नफ्लेक्स सारखा नाश्ता

मखाण्याचाच विषय सुरू आहे तर माझीही शंका विचारून घेते.
मखाणे तुपावरून परततांना वरून मीठ घालून हलवलेकी सगळे मीठ खाली जाऊन बसते आणि मग खातांना मीठ कमी वाटते.
तर काय उपाय करावा?

काही नाही
तूप चांगलं सणसणीत तापून मीठ त्यात थोडं पसरतं. मग लगेच मखाणे टॉप डाऊन हलवून ते सगळीकडे जाईल असं बघायचं.गरज लागल्यास आणि मन खात नसल्यास वरून अजून 1 चमचा तूप घालून हलवायचं.

हे डाग कशामुळे पडले असतील? कसे काढावेत?>>
वत्सला, वाती जळल्याचे डाग आहेत का ? ते असतील तर सॉफ्ट ब्रशने घासावे लागेल. जर चांदिला काळपटपणा आला असेल तर अ‍ॅमेझॉनवर चांदी स्वच्छ करण्याचे क्रीम मिळते ते चांगले वर्क होते.

नाही नाही, ती समई वारंवार स्वच्छ केल्यामुळे ते तेलाचे, काळवंडलयाचे असे डाग नाहीत. वात जळते त्या ठिकाणी जे काळे डाग पडतात ते निघतात. हे वेगळेच आहेत. कापडावर काळ्या शाईचा डाग दिसतो तसे दिसतात.

स्टील कट ओट्स आणले आणि ओवरनाइट ओट्स रेसिपी असतात त्यानुसार रात्रभर दुधात भिजवून ठेवले पण सकाळी मऊ वगैरे काही झाले नाहीत. आता ते संपवायचे कसे प्रश्न पडला आहे. रात्रभर भिजवून मग सकाळी दुधात शिजवावेत का?

पाखरं अलरेडी मेली असतील तर डायरेक्ट, मेली नसतील तर गाळून दिव्याला वापरता येईल.
मला लामण दिव्यात वात ओवून लावायला त्रास होतो.फार कसरत लागते.शिवाय ती जळून सारखी आत जाते आणि दिवा चालू असताना बाहेर ओढली आयब्रो चिमट्याने तर दिवा शांत होतो.लामण दिवा यु आय चांगला असला तरी अत्यंत बोअर आणि कटकटीचा प्रकार आहे.काही चांगले उपाय आहेत का यावर?

तिळाचे तेल नाहीये अनु तीळ आहेत वर जाऊन वाचून आले परत. पाखरं काढून स्वच्छ धुवून, वाळवून , खाऊन पहा. चांगले असती तर भाजून, थंड करून फ्रीजमध्ये ठेव. सध्या कडकडीत ऊन नाहीये. .. दाणे, तीळ भाजून तसेच ठेवले तर काही दिवसांनी वास ( नाक फारच संवेदनशील आहे) येतो.वर्हाडात तीळाच्या, कुरडया करतात न तळता तश्याच खातात. कुरडयात खपले असते. उन्हाळ्यात दुपारचं टाईमपास खाणं असायचं तीळ खसखशीच्या कुरडया, बाजरीच्या खारोड्या दाणे, कच्च तेल कांदा घालून.

अय्यो
मी किती डंब आहे(स्वगत)
(स्वगत एंड) : कंपोस्ट मध्येच टाका

आता ते संपवायचे कसे प्रश्न पडला आहे. रात्रभर भिजवून मग सकाळी दुधात शिजवावेत का?>> हो. दुधात किंवा पाण्यात शिजवता येतील.
स्टीलकट ओट्स शिजवूनच खावे लागतात. ओव्हरनाईट ओट्स कराण्यासाठी फक्त ओल्ड फॅशन रोल्ड ओट्स ( क्विक ओट्स नाही) वापरावे लागतात.

घरात आपण किती काळजी घेऊन काय काय करतो. बाहेर कसं करत असतील?

इथून पुढे तिळाचे लाडू किंवा वड्या विकत न आणायचं ठरवलंय Happy

थँक्स सोनाली. ऑनलाईन रेसिपीजमध्ये काहीजणांनी स्टील कट ओट्सपण ओवर्नाईट प्रकारात वापरले होते. कदाचित ब्रँडवर अवलंबून असेल. आता शिजवूनच बघेन.

Pages