आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभ प्रभातः आज शनिवार गेम चा इवेंट रात्रीतुन खेळत बसले मग अर्धव ट झोप झाली. इथे थंडी पन अर्ध वट आहे. पण कुत्रे अजून ब्लँकेटात झोपले आहे. तर भाग ५९५ मध्ये संजना व अनघा कलगी तुर्‍याने सुरु होतो. इथे एकदम आल्हाद दायक शीतल हवा आहे पण तिथे मात्र वातावरण तापले आहे.

अनघा पुढे येते नाट्यमय पद्धतीने व मी अरुची रिप्लेसमेंट नाही तसे समजू नका असा दम भरते. संजना ह्या काय म्हणूण तूच तर किचन ची जबाबदारी घेतली आहेस ना असे खोचक पणे विचारते. ह्या शॉट मध्ये तिचा चेहरा बघा इतका मेक अप करून गोरा गुलाबी केला आहे की हे ठेवलेले लाडाचे पात्र आहे हे लगेच कळते.

अनघा: गोड बोलुन ताईला अडकवलेत तसे मला अडकवू नका. ते तुम्हास जमणार नाही.

संजना लगेच नेलपॉलिश लावलेले हाताने रंगवलेले केस मागे सारते व नजर चुकवते.

अनघा: मा झे काम सोडून मी तुमच्या साठी स्वयंपाक घरात स्वतः ला अड कवोन घेइन असे होणार नाही. त्म्ही पन करा तुमच्या साठी तुम्हीच करा. मी आई अप्पांची काळजी घेइन कारण ताईने सा गितले आहे. तुमी व बाबा जे वागलात त्याउन मी आता तुमच्याशी काही करणार् नाही.
तुम्ही खूपच सेल्फिश आहात.

अभी : बाबांशी असे काय बोलतेस
अनघा: त्यांनी जे वागले आहे त्याला डोमेस्टिक वायलन्स म्हणतात मी गप्प बसणार् नाही तू आवाज खाली कर आधी का नाही बोललास जेव्हा तु झे वडील आईवर घाणेरेडा संशय घेत होते.

अभी : कारण मला दुसृयांच्या भां डणात पडायचे नव्हते. काय पेद्रु आहे. आईच्या अप् मानाने पण खव ळत नाही.

अनघा: अश्या लोकांमुळेच डोमे स्ती क अब्युज मुलींची छेड ह्याला खत पाणी मिळते. मी गप्प बसणार् नाही व मला घरात भांडणे चर्चा चा लणा र नाही म्हणून तडक वर निघून जाते. केस मोकळे पंजाबी ड्रेस व हे वक्तव्य अशी देशमुखांची सुनांची तिसरी पिढी आहे. एकदम रण रागि णीच.

अभी चा चेहरा ज्युरासिक पार्क मध्ये एक बारकादिनासोअर असतो व तो अचानक माने भोवतीची झालर पसरवुन काळे वीष समोरच्या शिकारीच्या डोळ्यात फेकून त्याला मारतो त्या दिनासोर ला बघितल्या वाणी झाला आहे. तो वडिलांना सामो पचाराने घ्या अनघा चे बिनसले आहे.

अन्या ठीक आहे अरुंधतीच्या उद्धट पणा चा परीणाम आहे. आता आपण भोगावे लागणार. एकदम गॅसलाइटिन्ग बिहेविअर. संजना माझा वेळ गेला ज्युस करायचा राहिला म्हणून किचन मध्ये जाते. आता बूड हाल्वावे लागेल ह्या ज ज्युनिएअर व सिनीअर लाडा व लेल्या बायकांना.
स्वतः करून घ्यायचे

काय कदृ लोक आहेत थोडे पैसे घालुन एक स्वयंपाकीण व आजी आजोबांना बघायला हेल्पर ठेवायचा ना.

बादवे कालच्या भागात मी तो बाहेरच्या बाजूने वर जाणारा जिना बघितला. माझा सल्ला वाचूनच बांधलेला असावा. तिथे कोणी स्वयंपाकी फॅमिली भाडेकरु ठेवता आली असती. लेखिकेला बंगले वाले लोक्स कसे राहतात हे खरे तर माहीत नाही किंवा कोणी रिसर्च करत नसावेत.

कट टो आरु हाउसः

यश तर्फे सर्वांना हकीकत कळते. ते लगेच अरु ला शोधायला निघतात पण सुलेखा थांबा तिला एकां त हवा आहे म्हणून तिला एकटे सोडा
म्हणते. यश जास्तच अपसेट आहे. त्याला आशू दोन घास खाउन घे अश्या टोन मधे म्हणतो ज्या टोन मध्ये आदमी एक ही बार बोलता है.
घास घालताना यश ला परत आईचे प्रेमाचे भरते येते व फुटेज दाखवले आहे. बासरीवर आई कुठे काय करते चालू आहे.

आई उपाशी असेल वण वण फिरत असेल( लोकल मध्ये गात असेल?! भीक मागत असेल? मंदिरासमोर बसली असेल?! गायीला चारा म्हणत असेल ?!! कुछ भी किती ती सहानु भूती त्या बाईला)

आता इशा रडत आहे व अनघा जेवण घेउन येते. हम आपके है कौन लेव्हल मोमेंट. इशा नखरे इन फुल स्विन्ग अनघा खोटे गोड बोलणे फुल स्विन्ग. हा प्राणी कधी पण नखे काढू शकतो. इशाची रडा रड अनेक वेळा बघितलेली आहे तीच आहे. इशा : बाबा असे नव्हते वाइट नव्हते.
अनघा स्पश्टिकरण मोड. बाबा काला नुसर बदलले नाहीत. अनघाच्या ड्रेस च्या ओढणी वर जी पॅच वर्क ची बॉर्डर आहे ती फार छान आहे.
अनघा एकदम आईची बाजू मांडत आई ने का बरे एकटे जगायचे कसे जगायचे. तिला जोडिदार नको का?! ब्ला ब्ला
आता इशा व आई फुटेज. आ ठवणींचे सागर व डोल्यातुन पाणी. अनघा तिला थोपट त शांत करत आहे.

कट टु नित्या आशू: ते दोघे राग व्यक्त करत आहेत. हे माझ्या मुळेच झाले असे आशू म्हणतो. नित्या पण मी येतो म्हणतो.

आता कट टु अरु जी पार्कात बसून रडत आहे. व अपमानाच्या आठवणी काढत आहे. एक बाई येउन सेल्फी काढते. व्हिडीओ सोशल मिडीया वर व्हायरल केला आहे संजना ने. ती बाई व्हिडीओ दाखवते. ती पण गात असे पन संसारा मुळे गाणे मागे पडले. रोज अर्धा तास काढा रियाज करा कलेला वय नाही आपण आपल्याला सबबी देणे बंद करणॅ. अचान क एक मॅन आला व मला गा म्हटला. स्व प्ने बघायला वय नसते.
आत आई कुठे काय काय कोरस चालू आहे.

अरू स्वतः लाच पुढे चल नवे आकाश शोधायचे फुल ऑन थांबायचे नाही function at() { [native code] }आ थांबायचे नाही मोड मध्ये आहे.

गुड चेंज. पण ते अन्याला थोबडवायचे राहिले.

प्रोमो मध्ये ती आई कडे आहे व एकदम आश्वासक छान मोड मध्ये आहे. काम करायला उत्सुक आहे ते बघून आशू एकदम उभा राहतो.
झिं दाबाद
जय हिंद जय महाराश्ट्र.

काय पेद्रु आहे. आईच्या अप् मानाने पण खव ळत नाही.>>+१ तो अनिरूद्धच्याच वळणावर गेलाय.
कोणी स्वयंपाकी फॅमिली भाडेकरु ठेवता आली असती. लेखिकेला बंगले वाले…>>> आधी एकदा अन्याशी भांडताना अरू बोलते कि मी घरात आले आणि तुमच्या आईने घरातल्या कामवाल्या बाई काढून टाकल्या. मग मी होतेच राबायला.

अरू घर सोडताना संजनाला बेस्ट लक म्हणते. पण त्या मायलेकासाठी संजनाच योग्य आहे. ती त्यांची फालतूगीरी सहन करत नाही.

अप्पांचा आउटबर्स्ट छान दाखवला. पण त्यांच्याही तोंडी बायकोला उद्देशून "तुला घराबाहेर काढेन" हे वाक्य होतं.
शेवटी घर पुरुषाचं आणि बाईला तो कधीही घराबाहेर काढू शकतो, असाच मेसेज जातो.
अनघाचा स्टँड आवडला. पण आजेसासू आणि नवर्‍याचं करेलच ती.
इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी गौरी गायब.
आणि अरुंधती गौरीच्या घरी राहत असते तर तिचे कपडेलत्तेही तिथेच असायला हवेत.
की थोडे समृद्धीत , थोडे गौरीकडे आणि थोडे आईकडे असं आहे?

कालच्या भागात क्लायमॅक्सला तबल्याचे बोल तोंडाने वाजवले. आचरट.

{अप्पांचा आउटबर्स्ट छान दाखवला. पण त्यांच्याही तोंडी बायकोला उद्देशून "तुला घराबाहेर काढेन" हे वाक्य होतं.}

हम्म, बरोबर निरीक्षण आहे. लक्षात आलंच नव्हतं हे !

बरोबर आहे, पण ते बोलले कोणाला ते तर बघा, ती बाई त्याच लायकीची आहे, आणि कोणत्या वेळी बोलले तेही महत्त्वाचं आहे, अप्पा बायकोचा उठसूठ अपमान करणारे वाटत नाही. कोणत्यातरी एका क्षणी प्रत्येकाचा असा आउटबर्स्ट होतोच, त्यात बोलले जाते काहीपण. हेमावैम.
काही म्हणा, कांचन निलाजरी आहेच.

शेवटचा सीन छान झाला.

केस मोकळे पंजाबी ड्रेस व हे वक्तव्य >>>>>> आता कान्चन अनघाला ही उद्यापासून ड्रेस नको साडीच नेस ऑर्डर सोडेल असे वाटतेय. अनघाने मुळीच ऐकू नये तिच. मला कान्चने हिला ड्रेस घालायची परवानगी कशी काय दिली ह्याचच आश्चर्य वाटत.

भाग्यश्री>>+१ तसेही पुरूष कितीही वेळा घराबाहेर जा म्हणाला तरी या बायका घाबरत नाहीत. कांचन तर जाणारच नाही. अरूंधतीला सुद्धा इतक्यावेळा बोलल्यावर आता तिची इच्छा राहीली नाही म्हणून ती घर सोडते आहे.
त्या मायलेकासाठी संजना आणि अभिषेकसाठी अंकिताच योग्य आहे.

मी मुद्दाम काही सीन्स बघितले, अरुने आणि आप्पांनी जबरदस्त केलंय. अरुने सरळ पोलीस कंप्लेंट करायला हवी होती महामाया एक्स सासु, गॉन केस एक्स नवरा यांच्याविरोधात.

हा नालायक अनि त्याला काय अधिकार आहे, संजना पण अरुला बोलण्यात पुढे, वाह. स्वतः तर नवरा मुलगा आणि लग्न शाबुत असताना लफडं करत होती, ती आणि अनि ह्यांना बोलायचा अधिकार आहे का.

अनघासाठी पुढचा शॉट बघायला हवा.

त्या मायलेकासाठी संजना आणि अभिषेकसाठी अंकिताच योग्य आहे. >>> तर काय. पण अंकिता समोर बुळ्या बनत होता आणि sympathy घेत होता.

अरुने सरळ पोलीस कंप्लेंट करायला हवी होती महामाया एक्स सासु, गॉन केस एक्स नवरा यांच्याविरोधात >>> एकदाही साधा उल्लेख तर नाहीच केला, काय डोंबल complaint करणार ती.

अंकिता >>>>>>>> अंकिता झालेल्या हिरविणीला ' सुन्दरा मनामध्ये भरली' मध्ये बघितल. तिथेही व्हिलनच झाली आहे. सणकी बॉस झाली आहे. एटिटयूड अन्कितासारखाच आहे.

भाग ५९६:

शुभ संध्याकाळ . सकाळी घरचे नेट डाउण होते. व नौ ला ऑफिस गाठले. आत्ता आल्यावर बघते आहे.

भाग ओपन्स विथ अरु चक्क माहेरी आली आहे. आई व भाउ तिच्या वागण्याचे समर्थन करत आहेत व अन्या ला शिव्या देत आहेत. तरी ही बाई एक माणूस वाइट म्हणून सर्व घर वाइट का वगैरे सुविचारु बोलत आहे.

आईला पण बळ आले आहे ती अरुला रोज पूर्ण दिवसाचा डबा बनवून देणार आहे. लेकीला बोलल्याचे तिला दु:ख झाले आहे कशी ही कोत्या मनाची माणसे इत्यादि पदर डोळ्याला चालू आहे. आई लगेच तिला आराम कर रियाज कर म्हणते. अरु उसासत खालच्या पट्टीत आईला तुझा माझ्यावर विश्वास आहे ना विचारते. आई लगेच माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी वेगळी आई आहे मीपण बदल्णर आहे वगिअरे म्हणते.

इकडे अनघा किचन मधून हात पुसत येते. व अप्पा डोक्यला हात लावुन बसले आहेत मेंदू शोधत असतील बहुतेक. अनघा ल गेच दोन घास खाउन घ्या मोड!!! घावणे उपमा ..

अन्या येतो व अप्पाला समजावतो. व अनघाला तिला किचन मध्ये पाठिवतो. अन्या म्हण्तो बरे झाले आता शांतपणे राहु. आपले लाइफ आहे तसेच छान शांत चालू राहील अरु गेली ते बरेअ. तुम्हाला काही त्रास होणार नाही.

अप्पा लगेच तू मला त्रास जन्मभराचा दिला आहेस.
अन्या हे मी एकट्याने दिलेले नाही. अप्पा रिफ्लेक्षन मोड मध्ये आहे. आपन आता अनोळखी झालो तू किती नीच हलक ट आहेस ते समजले.
आता मला तुझी घ्रू णा वाटते एवढी गलिच्छ भाशा विचित्र विचार कसे काय तुझ्या डोक्यात आले मी एक बाप म्हणून अपयशी ठरलो असे म्हणू न ते खूप रडतात. अवी शांत करतो.

अन्याच्या व्हरबल अब्युज ला अप्पा गुन्हा म्हणतात. खोलीत जाणार नाही म्हण तो कांचन चं तों ड पण बघायचे नाही आहे त्यांना. मग शेवटई आले घातलेला चहा. ट्रीट म्हणून साखर पण असे ठरते. अवी व अप्पा गच्चीवर बसुन शांत होत आहेत.

संजना खोलीत बसुन अन्याचे कान भरत आहे. अन्या वैतागला आहे मी काय चुकीचे बोललो. संजना म्हणते हा आशुतोशचा अरु चा प्लान आहे. काल त्यांनी ठरवले असेल एकत्र राहायचे. अन्या लगेच तू जॉब सोड व घरावर राज्य कर म्हणतो. पण संजनाला मोलकरीण बनायचे नाही. नोकरी सोडायची नाही. मात्र आता मला ह्या घरात मोकळे पणी वावर्ता येइल. म्हणा ते दे आर हॅपी.

नित्या आशू यश आले आहेत डोंबिवलीस. आईशी बोलत आहे. आशू नित्या आईला नमस्कार करतात व आई चहा करायचे बघते पण आशू दोन मिनिटे बोलुन मी निघतो. म्हटला. आरु म्हणते मी ओके आहे. अरु म्हणते उगीच त्रास नको म्हणून मी राग आला तरी गप्प बसत असे. घरातली शांतता भं ग व्हायला नको.
पण आता गप्प बसून चालणा र नाही. म्हणून अरु आपला स्टँड क्लीअर करते सर्वांना. घरचे आई वभाउ आशूचे आभार मानतात.

प्रोमो मध्ये ती बहिण व केदार आईशी भांडून आता मी कधीच इथे येणार नाही परत म्हणते.

अरु आई व भावाला आता मला पुढचा मार्ग एकटीनेच क्रम ण केला पाहिजे म्ह णते. " आपल्या उज्वल भविश्यासाठी मुंबई मेट्रो. पुने ठा णे कासरा वडवली" आता ही गाडी मार्गाला लागली म्हणायची.

मीपण बदल्णर आहे वगिअरे म्हणते. >>>>>>>> म्हणजे हि पण आता ड्रेस घालणार की काय?

मात्र आता मला ह्या घरात मोकळे पणी वावर्ता येइल. >>>>>>>> कान्चन आणि अन्या मोकळेपणाने वावरु देतील का तिला?

कान्चन आणि अन्या मोकळेपणाने वावरु देतील का तिला?>>> तिला त्यांचा काही त्रास नाही. सासूला किचन संभाळणारी कोणी हवी आहे ते ती करत नाही आणि अन्या जे काही बोलतो त्याचे ती ऐकत नाही.
येता जाता अरूचे कौतुक आणि तिचा घरातला वावर तिला नको होता. ते मिळाले.

अरुंधतीची आई बदलणार म्हणाली ते समाज प्रबोधनासाठी होतं. कोणा मुलीची छेड काढली किंवा आणखी काही झालं की व्हिक्टिम ब्लेमिंग सुरू होतं. तू त्या वेळी तिथे गेलीसच कशाला टाइप्स.
तसंच सासरी छळ होत असेल तर मुलीलाच सहन कर, नवर्‍यासमोर- सासूसमोर पडतं घे असं सांगतात.
मी तसं काहीही करणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तुझ्या पाठी खंबीरपणे उभी राहणार. - इति अरुमाता.

एका प्रोमोत संजना आणि कांचन अरुंधतीला घराचा हिस्सा त्यांच्या नावावर करून द्यायच्या कागदावर सह्या करायला सांगतात आणि ती करते. माझ्या माणसांवरचा हक्क इ. दवणीय- वपु टाइप्स वाक्य फेकते.

बिग बॉसच्या घरातून काँटेस्टंट बाहेर पडताना त्याची एव्ही दाखवतात, तसं अरुंधती बाहेर पडताना तिच्या प्रत्येकासोबतच्या क्षणांच्या वेगवेगळ्या एव्ही दाखवल्या. अपोझिशनशी - अनिरुद्ध, कांचन , संजना, अभिषेक - ती किती चांगली वागली याची क्षणचित्रं होती. हे तिला आठवलं.

तिच्या पार्टीच्या - यश, ईशा- लोकांना नंतर तिच्यासोबतचे क्षण आठवले.
--------
अमा, MTNL Net का? काल संध्याकाळपासून माझ्याकडेही बंद आहे.

करायला सांगतात आणि ती करते. >>>> म्हणजे आप्पांच्या इच्छेला काही अर्थ नाही.
अभिषेकचा त्याच्या बापासारखा स्वभाव बघता तो यशबरोबर एका घरात आनंदाने राहू शकणार नाही. अन्या-संजना अविनाशला त्या घरात टिकू देणार नाही. हा विचार करून तरी अरूंधतीने संपूर्ण घर अन्या आणि सासूच्या नावे करायला नको होते.

अनिरूद्ध, अरूंधती, अनघा, अंकिता ठिके पण अविनाश, अभिषेक, अशुतोष यांच्या नावात फार गोंधळ होतो माझा.

अविनाश, अभिषेक, अशुतोष यांच्या नावात फार गोंधळ होतो माझा. > माझा पण . अणि केदार आणि शेखार मध्ये पण Proud

अ ची बाराखडी आहे सगळी. अशीच लहानपणी घरकुल सिरीयल लागायची, त्यात पण अ ची बाराखडी होती.

अभिषेकचा त्याच्या बापासारखा स्वभाव बघता तो यशबरोबर एका घरात आनंदाने राहू शकणार नाही. अन्या-संजना अविनाशला त्या घरात टिकू देणार नाही. हा विचार करून तरी अरूंधतीने संपूर्ण घर अन्या आणि सासूच्या नावे करायला नको होते.>>> अविनाश आणि यशनेही निघावे तिथून, दोघं सिंगल आहेत, कमवते आहेत, आणि gents आहेत, कुठेही राहतील आरामात. शिवाय आशुचा पाठिंबा आहेच. अडकले ते फक्त अनघा आणि अप्पा. त्यांनी खमके बनून कान बंद करून आहे तिथे राहतील.

करायला सांगतात आणि ती करते. >>>> म्हणजे आप्पांच्या इच्छेला काही अर्थ नाही. >> कदाचित ते स्वप्न आहे असे दाखवतील आणि मग अरु अप्पाना , आशुतोष ला सांगेन .. दोघेही तिला असे काही करू नकोस वैगेरे समाजवतील ... कारण कांचन जशी बोलताना दाखवली आहे ..त्यावरून असेच वाटते

स्टार प्रवाह फेसबुक पेजवर प्रेक्षक म्हणताहेत, हे अनुपमा सारखंच ( बिनडोक) चाललंय. भर रस्त्यात पकडून सह्या घेतल्या. त्यासाठी कांचन ने आपलं बुड हलवलं

खरच...अनुपमा मधे अगदी बिन्डोक पणा दाखवितात ए
आणि ती अनुपमा इतकी बेकार नाचते.....जेव्हाकी तिची डांस अ‍ॅकेडेमी असते....!
त्या सुंदर अनुज ची मला तर कीव यायला लागली आहे आता...बिचार्‍याला त्या गावंढळ अनुपमा बरोबर रहावं लागतय.... आणि अगदी प्रेम करावं लागतंय बळंच...!! दिग्दर्शकाच्या मर्जी नुसार!

आज पण सकाळी घरी नेट गंडलेलं नौ वाजता आले तेव्हा मी तयार होता होता दहा मिनिटॅ बघितले. त्यात अर्धा वेळ जोगळेकर फॅमिली केळकरांचे आभार मानत होती. मग पार्सलं निघाली आता अल्बम झाला की जेवायलाच येणार आहेत. आळूचे फतफते. आरु चे फत फते.

उरलेल्या वेळात केदार विशाखा आई शी भांडत होते. व अभी ने त्याची बोटचेपी बाजू मांडली. अनघा ठोकणा रे त्याला. बाकी भाग रात्रीस बघेन

अमा Lol तुमचे नॅरेशन वाचून फुटतेच दरवेळी.

खरच...अनुपमा मधे अगदी बिन्डोक पणा दाखवितात ए
आणि ती अनुपमा इतकी बेकार नाचते.....जेव्हाकी तिची डांस अ‍ॅकेडेमी असते....!
त्या सुंदर अनुज ची मला तर कीव यायला लागली आहे आता...बिचार्‍याला त्या गावंढळ अनुपमा बरोबर रहावं लागतय.... आणि अगदी प्रेम करावं लागतंय बळंच...!! दिग्दर्शकाच्या मर्जी नुसार!>>>> +१११११
अनुपमाची कॉपी नको करायला जशीच्या तशी,, बोर करता ते फार.

Pages