आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुपमाची कॉपी करायची तर कांचनला जास्त वेळ उभं राहायला लागेल आणि चालावं लागेल.
मी त्यांचा दिवाळीचा भाग पाहिला होता. ती तिथल्या आशुतोषला challenge करते की अरुंधतीशी लग्न कर.

उरलेल्या भागात. विशाखा केदार बाएर पडतात कधीच परत ये णार नाहीत. मग कट टु डाँबिवली. जिथे अरु फायनली मी भाड्याचे घर घेउ ण तिथे राहेन म्हणते. आई ओके करते. आईच्या डोसक्यात जुनाच बिल ऑफ मटेरिअल आहे त्यामुळॅ तुला कामाला जायचे असेल व्गैरे चालू करते. पण अरू तू न नेहमी सारखीच उठ म्हण ते. भाउ वगैरे गप्पा मारतात. अरू झोपताना रेकॉर्डिन्ग ची आठवण येते. गुनी गायेका असे मोहरीर म्हण तो ते आठवून डो ळे पुसते.

नेक्स्ट डे अप्पा पेपर वाचुन बसले आहेत आजी बोलायचा प्रयत्न करते पण ते रागातच आहेत. खोलीत झोपले पण नाहीत( हाय तौबा)
हे सर्व फ्रस्रेटेड आहेत. अवि सिंगल, अभी अनघा अजुन काय दिसत नाही. अन्या संजना हू नोज. आजी अप्पा आताइंटिमसी पण नाही.
यश काही करुण पण उपयोग नाही. इशाची माहितीनाही.

प्रोमो मध्ये संजना प्रॉपर्टीचा अर्धा भाग आशूला हवा असेल तर आपण घर वाचवले पाहिजे म्हणून सासुचे कान भरते. आशू व आरु सुट् टी साठी सेशेल्स ला जातात.

अनु पमा मधली संजना घर आपल्या नावावर करते सर्वांना हाकलते मग परत वनराज डिवोर्स घ्य्याचे म्हणतो तर घर परत करते.
काय ड्रामा.

अनु पमा व अनुज हे ट्विटर वर पण फार फेमस आहे. एक दिवस त्यांच्या प्रेमाचे काही घडले असावे तर अनुपमा ट्रेंडि ग होते. फॅन्स नी # एम ए एन ब नवला आहे. गुजराती फॅन्स असल्याने पार राधा क्रिश्नाचे फोटो डकवले होते. चलो भाई किसीको तो इशक हो रहा है. पण हे सर्व अगदी
आठवी नववीतल्या सारखेच वागतात.

"आजपासून माझी बायको तुमच्या (म्हणजेच तिच्या माहेरी) कधी पायसुद्धा ठेवणार नाही."

अरे तू कोण टिकोजीराव! तिचं ती बघेल ना!

अगदी. केदारनेही बायकोच्यावतीने परस्पर निर्णय घेतला. मग अनिरुद्धला बोलायचा याला काय अधिकार.

केदारनेही बायकोच्यावतीने परस्पर निर्णय घेतला. मग अनिरुद्धला बोलायचा याला काय अधिकार. >>>>>>> ++++++१११११११

आज अरुने ओरिजनल आवाजात ' सुखाचे चान्दणे' म्हटले.

अनु पमा व अनुज >>>>>>>> अनुपमा आणि अनुजचा रोमान्स बघणेबल तरी असतो. मराठी सिरियल्समध्ये रोमान्स कैच्याकै असतो. बाकी तिथेही नेहमीचा बोरिन्ग ड्रामा चालू आहे.

अनिरुद्धला बोलायचा याला काय अधिकार. >>> पण अनिरूद्ध आता जी त्याची बायको नाही तिच्याबद्दल तिने काय करायचे अन नाही करायचे हे ठरवायला बघतोय.

केदारनेही बायकोच्यावतीने परस्पर निर्णय घेतला. मग अनिरुद्धला बोलायचा याला काय अधिकार>> मला वाटत हे केदार मुद्दाम म्हटला असावा कारण लगेच अनिरुद्ध चवताळला की माझ्या बहिणीला अडवणारा तु कोण? त्याला अनिरुद्धला दाखवुन द्द्यायच होत की तु तुझ्या तेव्हा असलेल्या आणी आता नसलेल्या बायकोवर किती नको ते अधिकार गाजवलेस.
केदारची अ‍ॅक्टिन्ग आवडली, जनरलीच मला केदार-विशाखाची जोडी आवडते, सध्या ऑड मॅन आउट पात्र एकच आहे ते म्हणजे अविनाश, तो फ्रेम मधे असला नसला तरी नोटिस होत नाही.

भाग ५९७:

अरु जास्त वेळ झोपायचा प्लान करत आहे पन यश उठवतो. त्याने भाजी - रताळी आणली आहेत. हे चहा घेइप रेन्त म्हातारी पोह्याच्या तयारीस लागली आहे. तर के दार विशाखा येतात. परत उज ळणी. ते तिला घरी घेउन जायला आले आहेत. गळ्यातच पडत आहेत. पण अरु एकटी राहायचा प्लान बोलुन दाखि वते. स्वतंट्र राहायचे आहे. यश पन म्हणतो इतके सोपे नाही ते . केदार पर त ते तुला जमणार नाही टेप लावतो.

विशाखाला पण तिला व्हिजिट करून रियाज ऐकायचा आहे भाड्याच्या घरी. विशाखा पोहे करायला उठते. अरु पण पोहे करायला घेते.

इकडे अप्पा चहा करुन घेत आहेत. आईशी बोलत नाहीत. म्हातारी आपल्या वागण्याचे एक्स्पलनेशन करत आहे. हे अरुचेच कारस्थान आहे.
तिला आशु आरु वागणे पटत नाही. तो आल्या पासुन ती बदलली.

संजना एकदम येते सेकंड इ अर ला असल्या सारखे स्कर्ट ब्लाउज प्लास्टिकचे कानातले हेअर एक्स्टेंशन करुन आली आहे. तिला सासुशी बोलायचे आहे. आई ने डब्यात आह्सू नित्या साठी अळू वड्या दिल्या आहेत. यश आईला एकटी सोडतच नाही. मी सोडायला येइल मी घर
शोधायला येइन.
अरु लगेच आईला नमस्कार करते संधी सोडत नाही सुसंस्कार दाखवायची.

इकडे संजना फुल ऑन आय मेक अप विचित्र लिप्स्टिक व ने ल पॉलिश आई च्या डोक्यात भरवते की घर धोक्यात आहे आशु आरु घर घशात घालू शकतात.

मग एक लोकलचा शॉट आहे की अरु अऑफिसात.

तिला कार आशूने अ‍ॅलोट केली आहे. पण ती ट्रेनच बरी म्हणते. मग घराचा वि शय निघतो. आशू लगेच गेस्ट हाउस ऑफर करतओ. पण हिला लहान जागा एकटे राहायचे आहे. आशू तेवढ्यात आई पण बरोबर राहणार् का हा डिपोझिटर टाइप प्रश्न विचारुन घेतो. हो क्लिअर असलेले बरे.

आरु त्याला डब्यात अळू वड्या देते. लगेच कौतूक. परत नित्या संजना आत येतात व संजन काही खोचक बोलते जे पुढील भागातही चालू आहे.

पण अनिरूद्ध आता जी त्याची बायको नाही तिच्याबद्दल तिने काय करायचे अन नाही करायचे हे ठरवायला बघतोय. >>> अगदी अगदी.

अंकिताने ज्याला फसवून लग्न करायला भाग पाडलं तो अभिषेक म्हणतोय - आईचा कोणी गैरफायदा घेऊ शकेल.
त्याच्याबाबत अनेकदा Look who is talking असं म्हणावंसं वाटतं. पण ही पात्रंच तशी लिहिली आहेत.

.. who is talking असं म्हणावंसं वाटतं>>> अगदीच. त्याला एकदा खूप चोपला पाहिजे.

Look who is talking असं म्हणावंसं वाटतं.>>> असं बर्याच पात्रांबद्दल बोलावसं वाटतं यात. आरसा बघत नसावेत हे लोक. नाहीतर दुसर्यावर फेकतोय तो चिखल आपण आपल्याच थोबाडाला कितीवेळा फासून घेतलाय हे दिसलं असतं त्यांना. अरू जशी अन्याला सडेतोड उत्तर देते तशी अभिला का देत नाही? एकदा त्याला आरसा दाखवा म्हणावं. अन्या vampire झालाय. आरशात दिसायचा नाही.

अंकिताने ज्याला फसवून लग्न करायला भाग पाडलं तो अभिषेक म्हणतोय - आईचा कोणी गैरफायदा घेऊ शकेल. > हो ना. काही म्हणून निर्णय्क्षमता नाही स्वतः मध्ये तर निदान बाजू तरि घेइइल खर्याची. हा एकतर डॉक्टर वाटत नाही आणि वडिलांच्या वर बेजबाबदार आणि कोत्या मनाचा आहे. अनघा ने हे ध्यान का म्हणून गळ्यात घेत्ले देव जाणे.

मराठी आरू हिंदी अन्नू च्याच मार्गावर चालली आहे। यात फरक एवढाच आहे कि अभिषेक हा समृद्धी बंगल्यातच राहतोय व तिकडे असे कथानक चालू असतानाही तोषू हा आपल्या सासूच्या घरी राहत असतो आणि त्याची बायडी किंजल अनुच्या सासरी। जो तमाशा अन्या ने घातलाय तिकडे अन्नू च्या सासूने आणि वि ने चांगलाच राडा घातला होता। सेम चाललंय सगळे फरक येव्हडाच कि आकुकाक खूपच मागे पडलीय

मराठी आरू हिंदी अन्नू च्याच मार्गावर चालली आहे। यात फरक एवढाच आहे कि अभिषेक हा समृद्धी बंगल्यातच राहतोय व तिकडे असे कथानक चालू असतानाही तोषू हा आपल्या सासूच्या घरी राहत असतो आणि त्याची बायडी किंजल अनुच्या सासरी। जो तमाशा अन्या ने घातलाय तिकडे अन्नू च्या सासूने आणि वि ने चांगलाच राडा घातला होता। सेम चाललंय सगळे फरक येव्हडाच कि आकुकाक खूपच मागे पडलीय

संजनाचा कपडेपट बघून अमांची पोस्ट आठवली. चपखल वर्णन केलं आहे.

उद्या अनघाचा अभिषेकला फटका- तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चात होईल असं वागू नकोस.
अभिषेक - गप्प बस असं ओरडतो

अनघा ने हे ध्यान का म्हणून गळ्यात घेत्ले देव जाणे.>>> अरूंधतीमुळे >>>>>>>>> अगदी अगदी. अनघा सुद्दा डेस्परेट झाली होती ह्याच्याशी लग्न करायला.

अरु जास्त वेळ झोपायचा प्लान करत आहे पन यश उठवतो. >>>>>>>> हो ना. इथे सुद्दा आईला त्रास देतो. वर रताळयाची भाजी तिलाच करायला सान्गतो.

संजना एकदम येते सेकंड इ अर ला असल्या सारखे स्कर्ट ब्लाउज प्लास्टिकचे कानातले हेअर एक्स्टेंशन करुन आली आहे >>>>>>>> ती तर एकदम ईशासारख उडया मारतच येते किचनमध्ये. मला वाटल आता ही अप्पान्ना धडकते की काय.

आणि त्याची बायडी किंजल अनुच्या सासरी। >>>>>>>>> तिच अफेयर चालू असत अस कुठेतरी वाचल होत.

भाग ५९९: शुभ प्रभात

अरु ऑफिसात बसली आहे. संजनाला आत बोलवतात ती लगेच डाँबिवलीहून आलीस त्रास झाला असेल. असे होपफुली विचारते पण अरु तिला
गप्प करते. मग तिला हाकलू न देतात व अरु च्या रेंटेड फ्लॅट ची बोलणी करतात. व ब्रोकर बरोबर फ्लॅट पाहायला जायचे ठरते.

आशू तिला एक फाइल देतो त्यात कॉकरोच असते त्याला घाबरून तो अबोध बाळ तिच्या पदरामागे लपतो. ह्या प्रसंगात तिला अनि रुद्धची याद येते पण तिला झुरळा पणे झटकून ती पदर का धरिला कान्हा ला बघुन आ स्चर्य व्यक्त करते. ( एकांतात वेग्ळा वागतो हा बाप्या)

संजनाला परत बोलवतात व प्रेस कॉन्फरन्सचे बोलणे चालू असते. अरु हसून फाइल परत करते. बाकी नंतर

सध्या जे चाललंय त्यात अनिरुद्ध सोडला तर बाकी सगळ्यांच्या रिअ‍ॅक्शन्स साहजिक होत्या आणि अभिनय त्याला साजेसा. केदार अरुंधतीशी खरंच बहिणीप्रमाणे वागतो, फक्त बोलायला नाही. पण अनिरुद्धच्या रिअ‍ॅक्शन्स पटणार्‍या नाहीत आणि मिलिंद गवळीचा अभिनयही विचित्र.

तो त्याच्या आणि संजनाच्या अफेअरबद्दल स्पष्टिकरण देतो की त्या दोघांनी लग्न केलंय. त्याला रोज हे सुनवायची गरज आहे की तो लग्नाच्या वेळी पळून गेला होता (दोनदा?) . अरुंधतीशी संसार आणि संजनासोबत मज्जा अशीच अ‍ॅरेंजमेंट त्याला हवी होती. त्याने अगदी या शब्दांतच हे सांगितलं आहे.

आता अरुंधती वेगळं घर घेऊन "एकटी" राहणार हे म्हटल्यावर अनिरुद्धच्या कल्पनाशक्तीचे वारू अंतराळा पलीकडे चौखूर उधळतील आणि त्याच्या नाकातोंडाकानातून आणखी कुठून कुठून धूर येईल. तो स्वतःच संजनाच्या घरी जाऊन राहिला होता.

अरुंधतीच्या आईच्या घराचा सेट बदललाय असं वाटतं. दरवाजाची दिशा , ओट्याची जागा वेगळी वाटतेय आणि या घरात दोन बेड आहेत.
बेडसारखी मोठी खरेदी या लोकांनी गपचूप कशी केली?

अरुंधतीच्या आईच्या घराचा सेट बदललाय असं वाटतं. दरवाजाची दिशा , ओट्याची जागा वेगळी वाटतेय आणि या घरात दोन बेड आहेत.>> अहो भावुजी तिने नोक्री गाणे करून पैशे कमविले नव्हे त्यातले दिले असतील माहेरी. म्हातारीस बेड घ्यायला. हो घर बदलले आहे. अन्या म्हणजे मी च कायम बरोबर असा एं टायटल्ड राजाबेटा फर्स्ट बॉर्न सन आहे. जबाबदारी काही च घ्यायाची नाही पण मला पाहा फुले वाहा.

तर पुढे.

आता संजना स इतका पण अनुभव का नाही जर अनेक दशके नोकरी केली आहे?! की कोणाच्याच वैयक्तिक सिचुएशन बद्दल क कामाच्या ठिकाणी बोलायचे नसते. एस्प आपल्या वरील मोठ्या बॉस व पार्टनर त्याचा को पार्टनर ह्यांच्या समोर तर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देउन कटायचे असते.

तर ही कुचकट प्रश्न विचारत असते. जॉब म्हणजे कश् ट अस्तात घरी आरामात झोपायचे नसते. आता तुला रोज करायला लागेल. अरु तिला कामाचे बोल फक्त असे समजावते. नित्या लगेच नो नीड ती कंपनीच्या लॅव्हिश फ्लॅट मध्ये राहणार आहे म्हणुन तिला जळवतो. ल गेच संजना
म्हणून घरातुन निघालीस का असा खोचक प्रश्न करते. खाजवुन खरुज काढायचे संजय राउत स्किल तिला एकदम जमले आहे. अरु तिला गप्प बसव्ते व आशू पण तुम्ही कामाचे च बोला व कटा म्हण ते. तो सेकंड इ अर कॉले ज गेटप तिला अगदीच शोभत नाही. ओठा जवळचा व्रण
फाउंडेशन खाली पण लपत नाही.

अरु घर पाहायला एकटीच जाणार आहे. हालाकि प्रेम ळ व्हर्जिनल बॉयफ्रेंड तिला पार सेशेल्स न्याय्ल पण उत्सुक आहे, काय हा करंटे पणा!!
आपली चलती आहे हे ही तिला कळत नाही आहे. सो इनोसंट ती हसु कम उसासा उसाहसु करत थेंक्यु म्ह णते ते नक्की बघा. हे मेजर स्किल आहे.

इकडे गौरी परत आली व मला आईला भेटायचे आहे ब्ला ब्ला र डणे चालू आहे. त्यात ती यशला तु मे ल शॉविनिस्ट पिग नाहीस असे खोटेच व्हॅलिडेशन देते. त्याचे पुर्वीचे वागणे विसर्ली वाट्ते. हा इंग्रजी शब्द लेखिकेला कुठे सापडला असावा बरे( आळुच्या वडीच्या नारळाच्या रसातल्या भाजीच्या भांड्याच्या तळाशी असावे हे एम सी पी. )

रेंट ची जागा बघायला आरू जाते.

इकडे अभी ने गोव्याची तिकिटे बुक केले आहेत. पण अनघा कायकी भडकली आहे. हिचा प्रॉब्लेम काय आहे. गोव्याला जाउन यावेना!!! म्हातारीला उकड करुन घालण्यात काय रिलीज मिळतो हिला?! मेजर भां डण नव्या नवर्‍याला एकद्म कमी लेखणे दाखवणॅ ते ही यश समोर.
ये शादी ज्यादा दिन नही टिकेगा दिकता है.

आता रें त साठी पेपर घ्यायला अरु ला घरी जावे लागेल म्हण णे यश ला सांगितले तर तो हातात आणुन देइल ना खेचर पण नाही.
जाणार् ती व प्रोमो मध्ये गौरी शी बोलत असताना संजना व आई पेपर घेउन येतात व बहुतेक घर अर्धा भाग साइन करुन घेतात...
हा भाग अनुपमात फारच नाटकीय होता. त्यामानाने इतर चाळ करी हाड्रामा बघायला नाहीत इथे.

कंपनी फ्लॅत मध्ये फुकट राहणे ग्रेट झाले असते. चार पैसे वाचले असते पण भिकेचे डोहाळॅ कौन क्या कर सकता

इन अदर न्युजः नवाब मलिकांना अटक. ञ युक्रेन मध्ये युध्ह परिस्थिती, युपीत मतदान.

साधे गाण्याचे क्लास व नोकरी करून अरु विमलचा पगार, आईला पैसे, अप्पाना पैसे, गौरीला पैसे ईतके करत होती. आता तर लाखात कमावते. गाण्याचे क्लास, शाळेतली नोकरी, आश्रमातली नोकरी हे सगळे कधीच मागे पडले. आता संगीत शाळा आहे तोंडी लावायला. दिमतीला मोठा फ्लॅट व गाडी मिळू शकते हवी तेव्हा. एवढा करिअर ग्राफ पटापट कोणाचा वर जातो. साबा साबू यांचे सगळे करून, अन्याला व त्याच्या पात्राला तोडीस तोड उत्तर देण्यात वेळ घालवूनही यशस्वी होते ती आई Wink

अहो भावुजी तिने नोक्री गाणे करून पैशे कमविले नव्हे त्यातले दिले असतील माहेरी. म्हातारीस बेड घ्यायला. >>>>>>>>>>> तिला गुडघेदुखीचा त्रास आहे म्हणून घेतला असेल. सॉरी अमा पण अरुच्या आईला म्हातारी म्हणून हिणवणे पटले नाही. कान्चनला म्हातारी म्हटले ते ठीक आहे. कारण ती वागतेच तशी.

यशला तु मे ल शॉविनिस्ट पिग नाहीस असे खोटेच व्हॅलिडेशन देते. >>>>>>> अगदी अगदी. तु इनसिक्युअर नाही म्हणे. दुसर्या डिझायनरबरोबर तु पळून तर जाणार नाहीस ना असा हाच शहाणा तिला बोलत होता.

मेजर भां डण नव्या नवर्‍याला एकद्म कमी लेखणे दाखवणॅ ते ही यश समोर. >>>>>>> अगदी बरोब्बर केल अनघाने. अभिची तीच लायकी आहे.

जॉब म्हणजे कश् ट अस्तात घरी आरामात झोपायचे नसते. >>>>>>>> इतके दिवस अरु गृहिणी होती म्हणजे ती काय घरी आराम करत होती का? जस जॉब करण कष्टाच असत तस घरकामही वेळखाऊच असत.

एवढा करिअर ग्राफ पटापट कोणाचा वर जातो. साबा साबू यांचे सगळे करून, अन्याला व त्याच्या पात्राला तोडीस तोड उत्तर देण्यात वेळ घालवूनही यशस्वी होते ती आई >>>>>>>>> राधिका पार्ट २.० आहे ती.

म्हातारी म्हणून हिणवणे पटले नाही. कान्चनला म्हातारी म्हटले ते ठीक आहे.>>> म्हातारी काही हिणवण्यासारखा शब्द नाही वाटत. गावाकडे वयस्कर पालकांना सहज म्हातारा/री म्हटलेले पाहिले आहे.

राधिका पार्ट २.० आहे ती.>>> +१ ती मसाले विकून ३००-४०० कोटीची कंपनी घेते, ही गायनशाळा चालवून करोडपती होईल.

कंपनी फ्लॅत मध्ये फुकट राहणे ग्रेट झाले असते. चार पैसे वाचले असते पण भिकेचे डोहाळॅ कौन क्या कर सकता>>> अगदी अगदि !

भारी लिहिलंय अमा Lol
तुम्ही चालू घडामोडींचे संदर्भ आणताय त्यामुळे जास्त मजा येतेय!

Pages