आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समृद्धी बंगल्यात नवा दिवस उजाडला आणि अरुंधतीच्या घरी कालचाच दिवस चालू आहे का? की हे लोक घरी परत गेलेच नाहीत? की सकाळीच
पुन्हा तिच्या घरी गेले?

कालचाच दिवस चालू आहे का? >> असंच दिसत आहे. किंवा ते नाक भर घर लावायला पूर्ण रात्र गेली असेल. मग सगळे तिथेच गाद्या टाकून किंवा ममव पद्धतीने सतरंजीवर झोपले असतील गप्पा करत. मग सका ळी उठून बसले असतील. चहा शिरा वाट बघत. मेजर कंटिनु टी लॅप्स.

ते पापु खात असतात तेव्हा ती म्हणते उद्या अप्पाचा वाढदिवस. संजना म्हणाते तिने आजचाच दिवस निवडला मुद्दामुन शिफ्टिन्गला. परत भाउ आला आहे म्हणजे आधी त्यांचे बोलणे झाले होते मी वीकां ताला येइन आपण छोटी पुजा करू ते आता रद्द झाले आहे बहुतेक. भाउ आला आहे म्हणजे शनिवार आहे का? अनघा रात्र भर बाहेर? ! अभी चिडलेला दिसतो आहे. नक्की दिवस कोणता आहे ह्या बद्दल सॉलिड गोंधळ झाला आहे. अरु ची प्रग ती दाखवायचा कोण तो आग्रह.

काल डिनर मध्ये मी अनुपमा पाहिले तिथे तिचा ४५ वा वाढदिवस. सून गर्भारशी अहे. सासू टोमणे मारत आहे आता आजी झालीस तर लफडी कमी कर ह्याव अन त्याव. घरच्यांनी ४५ पदार्थांची मोठी थाळी समोर ठेवली आहे. हे सर्व लोक स्टेडिअम मध्ये पर्फॉरम करत अस्ल्या सारखे कायम कोंडाळे करून संवाद बोलत असतात.

अन्जु ताइ नाहि दिसल्या खुप दिवसात? त्या बघतात हि आणी बहुधा अनुपमा सुद्धा नियमित. >>> मी का, मी नाही हो बघत दोन्ही. युट्युबवर दोन दोन मिनिटांचे शॉटस बघते आणि इथे वाचते. मी सध्या एक स्वाभिमान बघतेय नियमित, गुम है धावडवत, बडे अच्छे उडत. अंतरा मल्हारची आणि प्रार्थना श्रेयसची आठवड्यातून दोन दिवस.

मुलगी, आई, बरसात सर्व युट्युबवर काही मिनिटांचे सीन्स. तेवढं पुरतं, समजते स्टोरी. आता रात्रभर साईटसवर बागडणे आणि युट्युबवर हे सर्व बघणं सुरु असतं.

संजना वेळे त ब्रेकफास्ट मिळाला नाही तर डोके दुखते तिचे. >>>>>>> हिला स्वतः च्या हाताने ब्रेकफास्ट करता येत नाही का? दूध+ कॉर्नफ्लेक्स करायला हिला कितीसा वेळ लागतो. ते नाहीतर ब्रेड-बटर आहे की सोबतीला. अरुसारख कान्दे- पोहे तिला थोडीच करायच आहे?

संजना अभीच्या मनात पण शंका पेरत आहे. >>>>>>> तुझी बायको तुझ्या ताब्यात नाही म्हणते. लुक, व्हु हिज टॉकिन्ग?

अनुपमा पाहिले तिथे तिचा ४५ वा वाढदिवस. घरच्यांनी ४५ पदार्थांची मोठी थाळी समोर ठेवली आहे. >>>>>>> मराठीत हे ऑलरेडी दाखवून झालय अरुचा चाळीसावा वाढदिवस दाखवून.

अंतरा मल्हारची >>>>>> ह्या सिरियलचे सीन्स अधून मधून बघते. हि सिरियल 'आई कुठे' / मानबाच्या वळणावर जाणार आहे असे वाटते. अन्तराच मल्हारवर एकतर्फी प्रेम असत. शेवटी ती मल्हारच्या हरवलेल्या भावाशी लग्न करेल अस वाटतय. मल्हारला उपरती होईल, पण तोपर्यन्त वेळ निघून गेलेली असेल. मल्हार रुक्ष दाखवलाय. सासू मात्र छान वागते तिच्याशी.

शेवटी ती मल्हारच्या हरवलेल्या भावाशी लग्न करेल अस वाटतय. >>> श्वेता करेल बहुतेक त्याच्याशी लग्न, त्या घरची सून व्हायला. लवस्टोरी अंतरा मल्हारचीच असेल असं वाटतंय.

सासू मात्र छान वागते तिच्याशी. >>> हो आजेसासुपण, दोघी छान आहेत.

सिरीयल स्लो आहे, ड्रग्ज प्रकरण मुळ कोणाचं हे शोधता आलं नाही अजून मल्हारला. स्लो असल्याने आठवड्यातून दोनदा बघणं खूप झालं.

आई मधे संजनासमोर काही चालत नाहीका सासुचं.

आई मधे संजनासमोर काही चालत नाहीका सासुचं.>>> अरू घर सोडून गेल्यापासून त्या एका गटात आल्यात. संजना आधीपासूनच स्वयंपाकघरापासून लांब आहे आणि केलं तर असे काही करते कि सा-सा ते खात नाहीत. त्यामुळे हे कर ते कर असे तिला सांगता येत नाही. तसेच संजना काही चालू देत नाही.

आजचा भाग फारच तुकडे करून जोडलेत असा वाटला.
इकडे अरू कधी अभिच्या थोबाडीत मारणार याची वाट बघताना मधेच बाकिचे लोक येऊन बडबड करत आहेत असे वाटले. अभि सेम अन्यासारखा आहे. त्याचे असे गूण लग्नाआधी दिसत होते तरीही अनघा लग्नाला तयार झाली आणि आता रोजची रडारड!

अरुचं घर आधी संजनाचं होतं. फर्निचर सकट फ्लॅट मिळाला का. अप्पाना ओवाळायला ताम्हणही होतं अरुकडे. अभि कधीच आनंदी नसतो.

अभिला सोईस्कर रित्या बापासारखा केलाय. डायरेक्ट कॅरॅक्टर चेंज. आधी वेगळा होता तो. भाग वाढवायलाच म्हणा, अजून काय. एक मुलगा आईसारखा दुसरा बापासारखा.

त्याचे असे गूण लग्नाआधी दिसत होते तरीही अनघा लग्नाला तयार झाली आणि आता रोजची रडारड! >>>> याला कुठे ना कुठे अरू कारणीभूत आहेच. नाहीतर अनघाने याला दुसरा चान्स दिलाच नसता. तरी हे तरी बरं, की तिची दुसरी अरू होताना दाखवत नाहीयेत. अभिला त्याची जागा दाखवून द्यायला तीच आहे आता.

कायच्या काय टोकाचं बोलत होता तो. उगाचच तमाशा करताहेत.
ज्याच्या बापाने या वयात दुसरं लग्न केलं त्याला असले प्रश्न पडायचं अजिबात कारण नाही. बापाने केलेलं चालतं, आईने नाही, हे पण कायच्याकाय.
त्या डॉक्टरीण बाईंनी याला कामावरून कमी करावं आणि अनघाने उपाशी ठेवावं.
बापलेकाला बसूदे बोंबलत.

आशुतोष म्हणाला मला राग आला तर ....माझ्यासारखा वाईट कोणी नाही (असं काहीतरी)

मागे संजनाचा राग आला तेव्हा अर्धे शब्द गिळत होता ते आठवलं.

त्या आशुतोष ला अजिबात ग्रेस नाही.. आवाज दमदार नाही, रागावण्याचा अभिनय जमत नाही, कणखर वाटत नाही, ग्रेट बिझिनेस मन वाटत नाही, आंघोळ करून आलाय असे सुद्धा वाटत नाही......!!!

अभि म्हणतो मला मधे पडायला आवडत नाही, बापाने केल तर हे सगल इतक लॉजिकल नसत वैगरे भावनाहि असतात म्हणे, आइचा मित्र कशाला हवा वैगरे बापाचि मैत्रीण प्रेयसी चालते, त्यावर प्रश्न विचारले की नुसता थयथयाट , सगळ कॉन्ट्रॅडिक्ट करणार.

आशुतोषने अरुंधतीवरचं प्रेम व्यक्त करावं म्हणून अभिषेक आणि अनिरुद्धचा तमाशा रचला.
आता यश आईला प्रेमाच्या दरीत ढकलायला पाहतोय.

अरे काय सारखं त्या अरूला विचारतात नुसती मैत्रीच आहे ना की प्रेम?
एवढी वयस्कर, मॅच्युअर बाई, २६ वर्ष संसार करून खरंतर संसारात बुडुन आता डिवोर्स झालाय, ती लगेच प्रेमात पडेल? तिला आशु आवडायला, प्रेम व्हायला, त्याच्याबद्दल काही वाटायला वेळ लागणार की नाही.
अरूंधती आहे की स्टुडन्ट आफ दि ईयरची आलिया भट!

काल संजनाने अनिरुद्धला गाफील ठेवून कागदांवर सही करून घेतलीय. कांचनची सगी घेतली का ते कळलं नाही. घर स्वतःच्या नावावर केलं असेल. कथानक भरभर पुढे सरकतंय. पण आता ही टिपिकल मालिकावाली कथा झाली.

हे शाम टु शाम अनुपमाची कॉपी आहे पण तिथले डायनामिक्स वेगळे आहे. इथे अरु मराठी स्त्री असल्याने ती उंबर्ठा ट्रॅ क ने जायचा निदान प्रयत्न तरी करील. पुढे जाउन प्रेमात पडेल. इन्हे तो गलेइच पड गया मामला आहे हा.

आजच्या भागाचा कचरा केलाय आशुने. अरे आहे ना प्रेम गेले २६ वर्षे, मग जरा राग, जिद्द दिसूदेत की चेहर्यावर आणि आवाजात. एवढ्या मेंगळटपणे का सांगतोय? एकटा अन्या च as usual तडतडतोय आणि अरु पण मख्ख चेहरा नेहमी सारखा. जाऊदेत, उतारा म्हणून अनुजचा असा भाग असेल तो बघून घेते Wink .

त्या आशुतोष ला अजिबात ग्रेस नाही.. आवाज दमदार नाही, रागावण्याचा अभिनय जमत नाही, कणखर वाटत नाही, ग्रेट बिझिनेस मन वाटत नाही, आंघोळ करून आलाय असे सुद्धा वाटत नाही......!!! >>>> +१११

आता यश आईला प्रेमाच्या दरीत ढकलायला पाहतोय.>>> काय गरज आहे याला, ती तिचं बघून घेईल ना. उगाच एखाद्याच्या मनात बळंच असे विचार ढकलणारी माणसं मला अजिबात आवडत नाही.

हे लोक आळीपाळीन हे काम करतात. - विशाखा, अविनाश आता यश. गौरीपण सांगेल किंवा सांगितलं असेल.
एकटी राहणारी बाई मालिकांना झेपत नाही.

प्रेमाची दरी Lol

इतकीही वाईट नसते ही दरी...पडून पहा एकदा....!!!

शुभ प्रभात

आधीचे एक दोन भाग अभीला आईने थोबाडित देणे व तेच तेच डायलॉग ह्यत गेले. आता कळकटाने आपले प्रेम जगजाहीर केले आहे. व कालचा एपिसोड तेच चर्वित चर्वण घरी झाले. त्याच्या. आज तेच पुढे. तो पूर्ण बड बड करत माझे प्रेम आहे आहे.करत आहे. पण त्या त अरुंधती आता बदललेली नाही. आधीचीच अजूनही आहे. " आजु बाजुचे वातावरण शुद्ध्ह करणारा तुझा ऑरा अजूनही तसाच आहे. " हे ऐकूनच फुटले. हे प्रेम नाही ही भक्ती झाली ना. आता ह्या संवादाशेव टी ही त्याला पोटाशी घेउन केस पुसते काय पदराने? साडीस तेल लागेल. ह्याचा पण मेक ओव्हर गरजेचा आहे. पहिले साबणाने तोतो मग पावडर तिटी

त्याने पूर्ण परिस्थिती अ‍ॅज ऑन डेट अपडेट दिल्यावर अरु चा मोठा समजुत दार संवाद चालू आहे. ही अजूनही अनिरुद्ध साठीच दिवा धरुन आहे.
शी हॅज इफेक्टिव्हली फ्रेंड झोन ड हिम. काय कावेबाज गोड स्त्री आहे.

आता आशू चे टेन्शा न उतरले आहे. व ती त्याला दादा गिरी करत आहे. मैत्रीचा प्रवा स सुरू झाला आहे. मग कार मधून ऑफिसला कशी गेली.
मी अश्या स्वार्थी मैत्रीणी फार जवळून बघितल्या आहेत.

अप्पा पण सगळे ऐकतात अप डेट घेतात व बायकोला फैलावर घेतात. मग मी असतो तर अरुला त्याच्याशी लग्न कर असेच सुचवले असते असे म्हणतात. गायच ती दावणीला बांधलेलीच बरी.

प्रोमो मध्ये नित्या अरु आशू यश हसत जेवत आहेत. संजना बघते व इशा बरोबर काड्या करू बघत आहे. तिचा ड्रेस लै भारी आहे एकदम गावठी चिकणी. अरू ला आता सर्व व्यवस्थित बोलण्यामुळे छान वाट्टॅ आहे कारण आधी तिला यश ने बोलुन समजावले होते. ( स्वतः काही विचार करु शकतो वगिअरे नाहीच.. )

कालच्या भागात अनघाला घरीच थांब असा हुकूम सुटला. अनिरुद्ध दिल्लीला गेला. संजनाला ऑफिस आहे. अभिषेकला हॉस्पिटल. म्हणून अनघा घरी हवी. यश , ईशा असतात. गौरी शेजारीच असते. आईअप्पांचे हातपाय अजून चांगले हलतात. तरी त्यांना बघायला ही घरी हवी.
त्या आशुतोष बाळ्याला अभिषेकबद्दल बोलायला घरी जायचे कारणच नव्हते. ज्या कारणासाठी गेला ते फुकट गेलेच. वर प्रेमाची कबुली देऊन आला. मग दूध उतू गेलं म्हणून कण्हत बसला.

मालिकेच्या संवाद लेखिका ट्रोलिंगमुळे भडकल्यात . एका मालिकेच्या एका एपिसोडचे संवाद लिहायला आम्हांला इतके तास लागतात. मग तीन तीन मालिकांचे लिहायला किती तास लागतील? त्यात कलाकारांच्या अडचणी असतात. मग तो गायब झाला तर सगळं सांभाळून घ्यायला लागतं (म्हणजे निहारला दारातून हाका मारायच्या . कांचनला सकाळीच देवळात आणि मग डायरेक्ट विशाखाकडे पाठवायचं .)
प्रेक्षकांना तंगड्या पसरून बघत कमेंट करायला जातं.

हे लोक्स क्रियापदाच्या शेवटी स आणि त लावत नाहीत. नवीन मराठी आहे का ही. या आधीही कोणीतरी लिहिलं आहे यावर. बिचाऱ्या लेखिकेच्या डोक्याला आधीच ईतके व्याप आहेत, ती तरी कुठे कुठे लक्ष ठेवेल. कलाकार स्वतः असेच बोलतात का वैयक्तिक आयुष्यात की रट्टा मारतात डोकं न वापरता.

Pages