खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

Submitted by कुमार१ on 13 February, 2022 - 01:39

शब्दखेळ हे विरंगुळा विभागाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहूच.

पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :

प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.

१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.

२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.

३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.

४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.

५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आणि एकाच शब्दात उत्तर असलेला नसावा.
नमुना म्हणून मी एक सुरुवात करतो.

खेळ क्रमांक १
तुम्हाला एका दोन खोल्यांच्या घरात नेले आहे. दोन्ही खोल्यांमध्ये भिंत आहे. एका खोलीत असताना दुसऱ्या खोलीतील काहीही दिसणार नाही हे लक्षात घ्यावे.
पहिल्या खोलीत एका भिंतीवर ओळीने तीन इलेक्ट्रिक स्विचेस आहेत. मात्र इथे एकही दिवा बसवलेला नाही. यातीन स्विचेसनी नियंत्रित केलेले तीन वेगवेगळे दिवे दुसऱ्या खोलीत आहेत. प्रत्येक दिव्याचा स्विच स्वतंत्र आहे. पहिल्या खोलीत फक्त एक खुर्ची ठेवली आहे. त्या खोलीत असताना तुम्ही 3 स्विचेसची उघडझाप कितीही वेळा करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार ते स्विचेस चालू /बंद स्थितीत ठेवू शकता.

असे करून झाले की तुम्ही पहिली खोली सोडणार आहात व दुसऱ्या खोलीत प्रवेश कराल. एकदा का तुम्ही इकडे आलात की तुम्हाला पहिल्या खोलीत पुन्हा जायला बंदी आहे.

आता दुसऱ्या खोलीतील दृश्य पाहू. इथे घरात असते तसे सर्व फर्निचर आहे. इथल्या तीन भिंतींवर प्रत्येकी एक याप्रमाणे बल्ब बसवलेला आहे. तुम्ही पहिल्या खोलीत स्विचेसची जी अवस्था ठेवली असेल, त्यानुसार तुम्हाला आता हे बल्ब चालू किंवा बंद अवस्थेत दिसतील. आता याच खोलीत थांबून तुम्हाला सांगायचे आहे की -

पहिल्या खोलीतील कुठला स्वीच( क्रमांक 1, 2 व 3 सर्व) इथल्या कुठल्या बल्बला नियंत्रित करतो ?

चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर !
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेळ क्रमांक ५

एक श्रीमंत माणूस म्हातारा होतो. त्याला दोन मुले असतात आणि ती मत्सरी असतात. म्हातारा आता त्याच्या संपत्तीचे इच्छापत्र करायचे ठरवतो. त्यासाठी तो मुलांपुढे एक प्रस्ताव ठेवतो.

त्या दोघांनी आपापल्या मालकीच्या घोड्यावर स्वार होऊन लांब पल्याची शर्यत लावायची. त्यामध्ये जो घोडा शर्यतीत हरेल त्याच्या मालकाला म्हाताऱ्याची सर्व संपत्ती मिळेल !

दोन्ही मुले तो प्रस्ताव ऐकून शर्यतीस तयार होतात. दोघे घोड्यावर बसतात आणि वेळकाढूपणा करीत हळू हळू पुढे जात राहतात. असे बराच काळ झाल्यावर ते वैतागतात. वाटेत त्यांना एक शहाणा माणूस भेटतो. आता दोघे घोड्यावरून उतरतात आणि त्याला या विचित्र शर्यतीबद्दल सांगून त्याचा सल्ला मागतात.

तो विचार करून त्यांना काहीतरी सांगतो. ते ऐकल्यानंतर दोघेही ताडकन घोड्यांवर स्वार होतात आणि आता घोडे जीव खाऊन जोराने पळवू लागतात.

प्रश्न : त्या माणसाने मुलांना काय सांगितले असावे?

छान
अन्य कोणी उत्तर नाही दिले तर तुम्ही द्यालच !

पण मूळ उत्तर न फोडता मी वेगळे उत्तर देतो -

तो सांगतो की म्हाताऱ्याला सोडा. गोव्यात सेंट सबास्तीअन उद्यानात एका मोठ्या डब्ल्यूच्या खाली अमाप संपत्ती पुरून ठेवली आहे, ती आधी शोधा. Wink
#धमाल

त्या दोघांनी आपापल्या मालकीच्या घोड्यावर स्वार होऊन लांब पल्याची शर्यत लावायची.

यातील ठळक केलेली अट पाळूनच केले पाहिजे का?

मानव
तिथेच तर गंमत आहे.
तुम्ही उत्तर ओळखलेले दिसते

खेळ क्रमांक ६

दुर्गम भागातील एक मजूर लांबवरच्या बाजारात जाऊन प्रत्येकी एक बकरी, लांडगा आणि भाजीची करंडी खरेदी करतो. आता गावी परतत असताना त्याला नदी पार करायची आहे. ती पार करण्यासाठी एक अरुंद मचवा ठेवलेला आहे. मचव्यातून जाताना त्याला वरीलपैकी एकच वस्तू एकावेळी न्यायची परवानगी आहे.

त्याच्या अनुपस्थितीत जर उरलेल्या दोन वस्तू एकत्र राहिल्या, तर त्यात धोका असा आहे :
लांडगा बकरीला खाऊन टाकेल किंवा बकरी सर्व भाजी खाऊन टाकेल.
पण या मजूराला तीनही वस्तू नदीपार सुरक्षित न्यायच्या आहेत. तर तो हा उद्योग कसा यशस्वी करेल ?
…...

टीप : दिलेल्या माहितीच्या आधारेच उत्तर द्यावे. न दिलेल्या काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. गरज वाटल्यास उत्तरांच्या एकाहून अधिक शक्यताही लिहायला हरकत नाही.

पहिल्या फेरीत बकरी पलीकडे नेईल. लांडगा आणि गवत इकडे असतील.
दुसर्‍या फेरीत गवत नेऊन बकरी परत आणेल.
तिसर्‍या फेरीत लांडग्याला घेऊन जाईल.
चौथ्या फेरीत बकरीला घेऊन जाईल.

दुसरं उत्तर:

१. बकरील झाडाला बांधलं. भाजीची करंडी तिच्या पासून लांब ठेवली. लांडग्याला पैलतीरी घेऊन गेला. तिथे त्याला झाडाला बांधुन ठेवलं. (पळून जाऊ नये म्हणुन)
परत आला.

२.भाजीची करंडी घेऊन गेला, पैलतीरी ठेवले, परत आला.

३. बकरीला घेऊन गेला.

भरत व मानव
दोन्ही पर्याय बरोबर.
पहिल्या प्रकारात एकेरी दिशेने फेरी मोजायची असल्यास एकूण सात फेऱ्या होतात.

दोर्‍या असतील तर कोणत्या क्रमाने नेले याने काहीच फरक पडत नाही.
लांडगा आणि बकरी यांना एका किनार्‍यावर एकमेकांपासून लांब लांब बांधले की झाले.

उद्या तुम्ही देताय का ?
सोयीची वेळ निवडा.
शक्यतो २४ तासांमध्ये एक ठेवावे असे मला वाटते.

तुमचा मुद्दा लक्षात घेऊनच खेळ क्रमांक 4 मी भारतातल्या भल्या पहाटे दिला होता:
16 February, 2022 - 04:17
आणि त्याचे उत्तर अवघ्या 19 मिनिटात आले होते Happy

छान
असे जर इच्छुकाने आधी एक दिवस सांगून ठेवले तर नियोजन करणे खूप सोयीचे होईल आणि सर्वांना संधी मिळेल.
शुभेच्छा

वत्सला,
या, स्वागत आहे !
लागा तयारीला Happy

छान. नियोजन असे करूया
19 फेब्रुवारी : ना बु

20 फेब्रुवारी: मामी
संबंधित दिनांकाला भाप्र वेळ 00.01 वाजल्यापासून तुम्ही कधीही देऊ शकता.
स्वागत !

खाली दिलेला शब्दांच्या सिक्वेंस मधे गाळलेले शब्द ओळखा आणि लॉजिक सुध्दा सांगा.

MARIJUANA, KNOT, FOLK, ???, HYMN, LEOPARD, ???

(प्रश्नचिन्हांची संख्या आणि शब्दातले लेटर्सची संख्या यांचा काहीही संबंध नाही)

मला आढळलेल्या लॉजिक प्रमाणे उत्तर अनेक असू शकतात.
मी खाली दोन शब्द देत आहे.
चौथा शब्द : Mnemonic
सातवा शब्द: Psychology

लॉजिक: उच्चारांमध्ये पहिल्या शब्दात j, दुसऱ्यात k, तिसऱ्यात l silent. पुढील शब्दात अल्फाबेटिकली पुढले अक्षर silent हवे, जे पाचव्या आणि सहाव्यात आहे.
तेव्हा चौथ्या आणि सातव्या शब्दात अनुक्रमे m आणि p silent असलेले कुठलेही शब्द चालतील.

गुड वन मानव!! बरोबर आहे.
त्या लॉजिकला फिट होतील असे कुठलेही दोन शब्द चालतील.

Pages