Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
आजचे उद्या टाकायचे का?
आजचे उद्या टाकायचे का?
(No subject)
आज माझा डायरेक्ट मटका बसलाय.
आज माझा डायरेक्ट मटका बसलाय.
फर्स्ट अटेंप्ट.
आयला, होल इन वन
कालचं टाकलंय अड्ड्यावर.
तुमची अड्ड्यावरची रांगोळी बघूनच मला धागा काढायला सुचलं आरारा.
सरांचे भारंभार धागे आवडीने वाचतो पण स्वतः धागा काढायला मात्र सुचत नाही.
आजचे उद्या टाकायचे का?
आजचे उद्या टाकायचे का?
आजचे आजच टाका, मात्र शब्द उघड करू नका
ह्याच्या सारखाच हँगमॅन म्हणून
ह्याच्या सारखाच हँगमॅन म्हणून पोरांबरोबर खेळतो. पण त्यात सोडवणार्याने एक अक्षर सांगून मनात शब्द धरलेल्या व्यक्तीने ते कुठे आहे ते सांगायचे असते.
यात दरवेळी संपूर्ण शब्द आणि तो ही शब्दकोशातील हवा या अटीमुळे आणखी मजा येते आहे. सुरुवात केली तेव्हा सहा ट्राईज मध्ये येईल का वाटत होतं. पण जसेजसे शब्द मिळत जातात तसे पुढच्या ट्रायला काय शब्द द्यावा ह्याचा सबसेट (माझ्या मेंदुत मुद्दलातच कमी असल्याने असेल कदाचित) आक्रसत जातो.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
दुसऱ्या डिवाईसवरून पहिल्या
दुसऱ्या डिवाईसवरून पहिल्या फटक्यात लॉटरी लागली
हे अनलिमिटेड अहे >> https:/
हे अनलिमिटेड अहे >> https://www.wordleunlimited.com
(No subject)
(No subject)
पहिला प्रयत्न.
(No subject)
अरे वा श्रद्धा, मस्तच!
अरे वा श्रद्धा आणि ऋष्या, मस्तच!
आज सकाळपासून खूप बिझी होतो. नंतर जेवताना खेळलो पण नीट लक्ष देऊन नाही. आजचा शब्द लवकर ओळखता यायला हवा होता.
मस्त आहे हा गेम. मी आणि लेक
मस्त आहे हा गेम. मी आणि लेक दोघीही खेळतोय.
अरे मस्त आहे हा गेम!
अरे मस्त आहे हा गेम!
Admin ला कोपरापासून नमस्कार!
Admin ला कोपरापासून नमस्कार!
मला आला. तिस-या प्रयत्नात.
मला आला. तिस-या प्रयत्नात.
मस्तच खेळ , खेळतेय पण स्कोअर
मस्तच खेळ , खेळतेय पण स्कोअर लाजीरवाणा आहे म्हणून देत नाहीये.
मी न लाजता देतोय. दे तू पण!
मी न लाजता देतोय. दे तू पण!
(No subject)
पहिला प्रयत्न. मस्त आहे हे, व्यसन लागू शकतं!
घ्या
घ्या
माझी कॉमेंट का काढून टाकली?
माझी कॉमेंट का काढून टाकली?
(No subject)
(No subject)
आज दुसर्याच फटक्यात जमल.
आज दुसर्याच फटक्यात जमल.
पण लक चा खेळ आहे
मटका!
मटका!
(No subject)
प्लीज शब्द नका लिहू. हे चित्र
प्लीज शब्द नका लिहू. हे चित्र काढून टाका आणि कॉपी लिंक मध्ये रंगीत चौकोन येतात ते डकवा इथे.
Pages