Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34
हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्यांसाठी आहे शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल
आपल्याला आवडणार्या, माहिती असणार्या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाजीत भाजी शेपूची भाजी... आणि
भाजीत भाजी शेपूची भाजी... आणि भाकरी. मी पण शेपू फॅन. शेपूचे सांबारही चांगले लागते.
भारताबाहेर शेपू सिझनिन्ग म्हणून वापरतात. काही मांसाहारी सूप्समध्येही चांगला लागतो.
मृ, वरच्या फोटोत खरंच भरपूर
मृ, वरच्या फोटोत खरंच भरपूर मुगडाळ आहे. साधारण एका जुडीला किती? अर्धी वाटी वगैरे?
आमच्याकडे बाबा आईला ऐकवतात की ह्यांच्याकडे,त्यांच्याकडे शेपूची भाजी करतात आणि आईने ते म्हणतात म्हणून केली तर हातच लावत नाहीत त्याला.
शेपू म्हणजे डिलच ना? मी एकदा
शेपू म्हणजे डिलच ना? मी एकदा एका मैत्रिणीने दालवड्यात बारीक चिरून टाकला होता तेव्हढाच खाल्लाय. बाकी शिजवताना त्याचा उग्र वास जातो का?
हुडाच्या सर्व पोस्ट्स ना
हुडाच्या सर्व पोस्ट्स ना जोरदार अनुमोदन..
अडम, सिंडीची प्रस्तावना
अडम, सिंडीची प्रस्तावना नजरेआड करु नकोस.
मागे स्वातीने सुरती उंधियोची रेसिपी दिली होती त्यात मुठीयात घातला होता शेपू. मला आवडला. अगदी उग्र वास वाटला नाही. मुळ्यापेक्षा नक्कीच सुसह्य.
अरेरे ! परमेश्वरा याना क्षमा
अरेरे ! परमेश्वरा याना क्षमा कर !! आपण शेपू खातोय हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे !! >>>>>>>>>>
आमच्या लक्षात न का येईना, पण आम्हाला ढेकरा आल्या की तुम्हाला आपोआपच लक्षात येईल....
लोखंडी तव्यावर शेपू परतून भाजी करणे... भाकरी (संख्या मोजू नये!) , कांदा आणि तेल...... जरा आणखी एखादी चव म्हणून शेंगदाणा-लसणाची जरा ओलसर चटणी..
ही घ्या एक वेगळी रेसिपी
ही घ्या एक वेगळी रेसिपी
http://www.maayboli.com/node/12391
शेपूची भाजी दही घालून नुसतीच
शेपूची भाजी दही घालून नुसतीच चाटून पुसून खाणे... अहाहाहा... तोंड को पाणी सुट्या...
कालच सा बा आणि मी शे भा बद्दल
कालच सा बा आणि मी शे भा बद्दल बोलत होतो की लोकांना शे भा कशी आवडत नाही वगैरे पण आज शे भा ने भरुन वाहणारे पान बघुन बरे वाटले! आम्हाला दोघींना शे भा खुपच आवडते. वरील प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारे केलेली. यापैइकी फक्त मोड आलेले मठ घालुन कधी खाल्ली नाही. आता एकदा तशी पण करुन बघते.
सा बा शे भा खा का व ?
सा बा शे भा खा का व ?
भाग्यश्री शेपु म्हणजे डीलच.
भाग्यश्री
शेपु म्हणजे डीलच.
सगळ्या रेसिप्या एकत्र करून
सगळ्या रेसिप्या एकत्र करून प्रिंटून घेणारे...
कोणीतरी शेंगदाण्याच्या मसाला वाली शेपू सांगितली... वाचूनच भूक लागली जबरदस्त...
सा बा शे भा खा का व ?>>> सा
सा बा शे भा खा का व ?>>>
सा बा - सासु बाई
शे भा - शेपुची भाजी
खा का व - ????
अरे, हे शेपूमंडळ कधी स्थापन
अरे, हे शेपूमंडळ कधी स्थापन झाले ? ...मी पण शेपूप्रेमी.
आमच्याकडे पण मूगाची डाळ घालूनच करतात ही भाजी. एका कुकरमध्ये राहील अशा भांड्यात तळाला थोडी पिवळी मूगडाळ घेऊन त्यात थोडे पाणी घालायचे ( डाळ घट्ट शिजण्याइतपत ) आणि त्याच भांड्यात वर चिरलेला शेपू दाबून बसवायचा. शेपू जास्त, डाळ कमी. मग कुकरला व्यवस्थित शिट्ट्या काढून शिजवायची. एकीकडे मिरची चिरुन, भरपूर लसूण ठेचून घ्यायचा. शेपू उकडल्यावर चांगला घोटून ( जरा चरचरीत असते म्हणून ) त्यात आवडीप्रमाणे डाळीचे पीठ घालून नीट ढवळून घ्यायचे. फार घट्ट वाटले तर थोडे पाणी घालू शकता. पातळ वाटले तर पीठ जास्त लावायचे. मग दुसर्या पातेल्यात तेल तापवून मोहरी,हिंग,जिरं, हळद अशी फोडणी करुन लसूण सोनेरी परतायचा. मिरच्या घालून परतून शेपू घालायचा ( डाळ आणि बेसन असलेला ) मीठ आणि दाण्याचे कूट घालायचे. ही भाजी कोरडी पण नाही, सरसरीत पण नाही. घट्टसर पिठल्यासारखी होते. डाळीचे वरण शिजल्यामुळे आणि डाळीच्या पीठामुळे छान मिळून येते. दाण्याच्या कुटाची एक वेगळीच खमंग चव येते. या पद्धतीने पालक, मेथी, करडई पण करता येतात.
थोडासाच शेपू बारीक चिरुन घातलेले मेयॉनीज घालून केलेले डिल चिकन सॅल़ड अप्रतिम लागते
माझी अतीषय आवडीची भाजी आहे ही
माझी अतीषय आवडीची भाजी आहे ही
शेपु फॅन्स बघुन बर वाटलं. मी देखील मुगडाळ लसुण हिरवी मिर्ची घालुन करते भाजी फक्त त्यात अजुन कांदा पण घालते (भाजी वाढवायला
) नी वरुन पुन्हा लसणीची फोडणी (म्हणजे गरम तेलात लसुण तळुन ती तेलासकट) भाजीत घालते. टेस्टी लागते. गेल्या आठवड्यात सकाळची हिच राहीलेली (नवरोबा खावीच लागली तरच खातो) म्हणुन उरलेली भाज मुगडाळ्+तांदुळ खिचडीत घातली त्याने पण आवडीने खाल्ली खिचडी
मी पण शेपू पंखी आठवड्यातून
मी पण शेपू पंखी
आठवड्यातून एकदा शेपूची भरपूर लसूण घातलेली भाजी आणि तांदळाची भाकरी हा बेत असतोच माझा.
काय धावतोय हा बीबी!! आज
काय धावतोय हा बीबी!! आज बाजारात शेपू मिळतो का बघायला हवा.
मी पण शेफॅक्लमध्ये! पण
मी पण शेफॅक्लमध्ये!
पण आजपर्यंत घरी कधी आणून भाजी केली नाही. आता एकेक करुन बघायला हव्यात. एक हूड आणि अॅडम सोडले तर इतर सगळ्यांनाच आवडते असं दिसतंय शेपू. 
रॉबिन हूडाला बाणानं/भाल्यानं
रॉबिन हूडाला बाणानं/भाल्यानं मारलेली हरणं प्रिय आणि अॅडमला सफरचंद प्रिय...
.. त्यांचा कशाला विचार करायचा?
नमस्कार, मी ८-९ वर्षाची होते
नमस्कार,
मी ८-९ वर्षाची होते तेव्हा आईने शेपूची भाजी केली होती. एका घासाच्या वर मी खाऊ शकले नाही. आमच्या यजमानांचा अनुभवही काही वेगळा नाही. पण हा बीबी पाहून शेपू आणून ट्राय करावा असा विचार मनात आलाय.
पहाते एकदा बनवून आणि सांगते तुम्हाला.
कित्ती पंखे सापड्ले शेपुचे..
कित्ती पंखे सापड्ले शेपुचे.. मल इतके दिवस उग्गीच एकटं वाटत होतं .. मला खुssssssssssप आवडते ही भाजी.. कशीही केली तरी..
मी कधीतरी आवडती भाजी शेपु सांगितल्यावर "काहीही काय " अशा अर्थाचे looks मिळाले होते..
वडे ट्राय करणार अता!
ह्या बीबी ला शेपू व्यापारी
ह्या बीबी ला शेपू व्यापारी संघटनेचा छुपा फायनान्स आहे असा मी आरोप करतो
अरे देवा का ही शिक्षा? इतक्या
अरे देवा का ही शिक्षा? इतक्या रेसिप्या देऊन तोंडाला पाणि सोडवलं लोकांनी....
आता पटदिशी कोणितरी शेपूची भाजी करून मला खायला बोलवा बघू...
आज सकाळि बाजारात गेले तर
आज सकाळि बाजारात गेले तर शेपुच्या भाजीचे भाव गगनाला भिडलेत, भाजीवाला म्हणतो कसा मायबोलीवर शेपु महोत्सव चालु आहे का? त्याला सांगितल हो हो सिंडिने सगळ्यांना कामाला लाऊन दिलय. हा घे तिची इमेल आय डि आणि आभार मान पाहु तिचे.
हा धागा सुरू केल्याबद्दल
हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद..
मी शेपु हेटर आहे, पण उगाच शिव्या देऊ नका. माझी लेक शेपु फॅन आहे आणि ती मला नेहमी 'तुला माझ्या शाळेत बनवतात तशी शेपुची भाजी अजिबात येत नाही' म्हणुन खंतावत असते. अर्थात मी हेटर असल्याने मला ती बनवता येत नाही.
आता वरच्या रेसिपीज ट्राय करेन. तीला आवडतील बहुतेक. खास पुणे परिसरातील लोक अजुन काही वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर तेही सांगा.
मुगडाळ, लसुन घालुन केलेली
मुगडाळ, लसुन घालुन केलेली भाजी कोणाला आवडत नसेल तर त्यावर साजुक तुपाचा गोळा ( हो पातळ तुप नाही गोळा) टाकायचा, लै भारी लागते. हुडा बघतोयस ना? ट्राय मारुन बघ, शेपु हेल मधुन निघुन शेपु हेवन मध्ये पोचशील. (एकेरी उल्लेख कॉमिक इफेक्ट करता आहे हां)
बाकी रटाळ चवीच्या, वासाच्या कित्येक (रंगित) गोष्टी तुमच्या खास आवडीतल्या आहेत ते विसरुन उगाच काय शेपुचं घोडं मरताय?
शेपू फॅन क्लब?? अर्रर्र. इतकी
शेपू फॅन क्लब?? अर्रर्र. इतकी वाईट अवस्था आली?

देवा यांना अज्जिब्बात माफ करू नको. कारण ते काय करताहेत, त्यांना चांगलं माहितीये. (तरी करताहेत).
खास पुणे परिसरातील लोक अजुन
खास पुणे परिसरातील लोक अजुन काही वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर तेही सांगा.<<<
माझी रेसिपी वाच. एकदम सदाशिव पेठी रेसिपी...
हुडाचा एवढा वेळ अनुल्लेख केला आता अपमान करायला हवा नाही का गं सिंडे?
दक्षे बाजारात जाऊन शेपू घे आणि करून खा.
किंवा मुंबईत ये. मी घालते शेपू खायला.
नीदी, तुझी रेसिपी वाचून
नीदी, तुझी रेसिपी वाचून वाटलंच होतं तुला गळ घालावी शेपूच्या भाजीची म्हणून..
आता काय आयतंच आमंत्रण आहे...
येतेस का?
येतेस का?
Pages