शेपू फॅन क्लब

Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34

हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्‍यांसाठी आहे Happy शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्‍यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल Proud

आपल्याला आवडणार्‍या, माहिती असणार्‍या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजीत भाजी शेपूची भाजी... आणि भाकरी. मी पण शेपू फॅन. शेपूचे सांबारही चांगले लागते.
भारताबाहेर शेपू सिझनिन्ग म्हणून वापरतात. काही मांसाहारी सूप्समध्येही चांगला लागतो.

मृ, वरच्या फोटोत खरंच भरपूर मुगडाळ आहे. साधारण एका जुडीला किती? अर्धी वाटी वगैरे?
आमच्याकडे बाबा आईला ऐकवतात की ह्यांच्याकडे,त्यांच्याकडे शेपूची भाजी करतात आणि आईने ते म्हणतात म्हणून केली तर हातच लावत नाहीत त्याला. Proud

शेपू म्हणजे डिलच ना? मी एकदा एका मैत्रिणीने दालवड्यात बारीक चिरून टाकला होता तेव्हढाच खाल्लाय. बाकी शिजवताना त्याचा उग्र वास जातो का?

अडम, सिंडीची प्रस्तावना नजरेआड करु नकोस. Wink
मागे स्वातीने सुरती उंधियोची रेसिपी दिली होती त्यात मुठीयात घातला होता शेपू. मला आवडला. अगदी उग्र वास वाटला नाही. मुळ्यापेक्षा नक्कीच सुसह्य.

अरेरे ! परमेश्वरा याना क्षमा कर !! आपण शेपू खातोय हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे !! >>>>>>>>>>

आमच्या लक्षात न का येईना, पण आम्हाला ढेकरा आल्या की तुम्हाला आपोआपच लक्षात येईल.... Proud

लोखंडी तव्यावर शेपू परतून भाजी करणे... भाकरी (संख्या मोजू नये!) , कांदा आणि तेल...... जरा आणखी एखादी चव म्हणून शेंगदाणा-लसणाची जरा ओलसर चटणी..

कालच सा बा आणि मी शे भा बद्दल बोलत होतो की लोकांना शे भा कशी आवडत नाही वगैरे पण आज शे भा ने भरुन वाहणारे पान बघुन बरे वाटले! आम्हाला दोघींना शे भा खुपच आवडते. वरील प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारे केलेली. यापैइकी फक्त मोड आलेले मठ घालुन कधी खाल्ली नाही. आता एकदा तशी पण करुन बघते.

सगळ्या रेसिप्या एकत्र करून प्रिंटून घेणारे...
कोणीतरी शेंगदाण्याच्या मसाला वाली शेपू सांगितली... वाचूनच भूक लागली जबरदस्त... Happy

अरे, हे शेपूमंडळ कधी स्थापन झाले ? ...मी पण शेपूप्रेमी.
आमच्याकडे पण मूगाची डाळ घालूनच करतात ही भाजी. एका कुकरमध्ये राहील अशा भांड्यात तळाला थोडी पिवळी मूगडाळ घेऊन त्यात थोडे पाणी घालायचे ( डाळ घट्ट शिजण्याइतपत ) आणि त्याच भांड्यात वर चिरलेला शेपू दाबून बसवायचा. शेपू जास्त, डाळ कमी. मग कुकरला व्यवस्थित शिट्ट्या काढून शिजवायची. एकीकडे मिरची चिरुन, भरपूर लसूण ठेचून घ्यायचा. शेपू उकडल्यावर चांगला घोटून ( जरा चरचरीत असते म्हणून ) त्यात आवडीप्रमाणे डाळीचे पीठ घालून नीट ढवळून घ्यायचे. फार घट्ट वाटले तर थोडे पाणी घालू शकता. पातळ वाटले तर पीठ जास्त लावायचे. मग दुसर्‍या पातेल्यात तेल तापवून मोहरी,हिंग,जिरं, हळद अशी फोडणी करुन लसूण सोनेरी परतायचा. मिरच्या घालून परतून शेपू घालायचा ( डाळ आणि बेसन असलेला ) मीठ आणि दाण्याचे कूट घालायचे. ही भाजी कोरडी पण नाही, सरसरीत पण नाही. घट्टसर पिठल्यासारखी होते. डाळीचे वरण शिजल्यामुळे आणि डाळीच्या पीठामुळे छान मिळून येते. दाण्याच्या कुटाची एक वेगळीच खमंग चव येते. या पद्धतीने पालक, मेथी, करडई पण करता येतात.
थोडासाच शेपू बारीक चिरुन घातलेले मेयॉनीज घालून केलेले डिल चिकन सॅल़ड अप्रतिम लागते Happy

माझी अतीषय आवडीची भाजी आहे ही Happy शेपु फॅन्स बघुन बर वाटलं. मी देखील मुगडाळ लसुण हिरवी मिर्ची घालुन करते भाजी फक्त त्यात अजुन कांदा पण घालते (भाजी वाढवायला Wink ) नी वरुन पुन्हा लसणीची फोडणी (म्हणजे गरम तेलात लसुण तळुन ती तेलासकट) भाजीत घालते. टेस्टी लागते. गेल्या आठवड्यात सकाळची हिच राहीलेली (नवरोबा खावीच लागली तरच खातो) म्हणुन उरलेली भाज मुगडाळ्+तांदुळ खिचडीत घातली त्याने पण आवडीने खाल्ली खिचडी

मी पण शेपू पंखी Happy
आठवड्यातून एकदा शेपूची भरपूर लसूण घातलेली भाजी आणि तांदळाची भाकरी हा बेत असतोच माझा.

मी पण शेफॅक्लमध्ये! Proud पण आजपर्यंत घरी कधी आणून भाजी केली नाही. आता एकेक करुन बघायला हव्यात. एक हूड आणि अ‍ॅडम सोडले तर इतर सगळ्यांनाच आवडते असं दिसतंय शेपू. Wink

रॉबिन हूडाला बाणानं/भाल्यानं मारलेली हरणं प्रिय आणि अ‍ॅडमला सफरचंद प्रिय... Proud .. त्यांचा कशाला विचार करायचा?

नमस्कार,
मी ८-९ वर्षाची होते तेव्हा आईने शेपूची भाजी केली होती. एका घासाच्या वर मी खाऊ शकले नाही. आमच्या यजमानांचा अनुभवही काही वेगळा नाही. पण हा बीबी पाहून शेपू आणून ट्राय करावा असा विचार मनात आलाय. Happy

पहाते एकदा बनवून आणि सांगते तुम्हाला.

कित्ती पंखे सापड्ले शेपुचे.. मल इतके दिवस उग्गीच एकटं वाटत होतं .. मला खुssssssssssप आवडते ही भाजी.. कशीही केली तरी..

मी कधीतरी आवडती भाजी शेपु सांगितल्यावर "काहीही काय " अशा अर्थाचे looks मिळाले होते.. Sad

वडे ट्राय करणार अता! Happy

अरे देवा का ही शिक्षा? इतक्या रेसिप्या देऊन तोंडाला पाणि सोडवलं लोकांनी....
आता पटदिशी कोणितरी शेपूची भाजी करून मला खायला बोलवा बघू... Proud

आज सकाळि बाजारात गेले तर शेपुच्या भाजीचे भाव गगनाला भिडलेत, भाजीवाला म्हणतो कसा मायबोलीवर शेपु महोत्सव चालु आहे का? त्याला सांगितल हो हो सिंडिने सगळ्यांना कामाला लाऊन दिलय. हा घे तिची इमेल आय डि आणि आभार मान पाहु तिचे. Proud

हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद..

मी शेपु हेटर आहे, पण उगाच शिव्या देऊ नका. माझी लेक शेपु फॅन आहे आणि ती मला नेहमी 'तुला माझ्या शाळेत बनवतात तशी शेपुची भाजी अजिबात येत नाही' म्हणुन खंतावत असते. अर्थात मी हेटर असल्याने मला ती बनवता येत नाही. Sad

आता वरच्या रेसिपीज ट्राय करेन. तीला आवडतील बहुतेक. खास पुणे परिसरातील लोक अजुन काही वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर तेही सांगा.

मुगडाळ, लसुन घालुन केलेली भाजी कोणाला आवडत नसेल तर त्यावर साजुक तुपाचा गोळा ( हो पातळ तुप नाही गोळा) टाकायचा, लै भारी लागते. हुडा बघतोयस ना? ट्राय मारुन बघ, शेपु हेल मधुन निघुन शेपु हेवन मध्ये पोचशील. (एकेरी उल्लेख कॉमिक इफेक्ट करता आहे हां)
बाकी रटाळ चवीच्या, वासाच्या कित्येक (रंगित) गोष्टी तुमच्या खास आवडीतल्या आहेत ते विसरुन उगाच काय शेपुचं घोडं मरताय?

शेपू फॅन क्लब?? अर्रर्र. इतकी वाईट अवस्था आली? Sad Uhoh

देवा यांना अज्जिब्बात माफ करू नको. कारण ते काय करताहेत, त्यांना चांगलं माहितीये. (तरी करताहेत). Proud

खास पुणे परिसरातील लोक अजुन काही वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर तेही सांगा.<<<
माझी रेसिपी वाच. एकदम सदाशिव पेठी रेसिपी... Wink

हुडाचा एवढा वेळ अनुल्लेख केला आता अपमान करायला हवा नाही का गं सिंडे?

दक्षे बाजारात जाऊन शेपू घे आणि करून खा.
किंवा मुंबईत ये. मी घालते शेपू खायला.

नीदी, तुझी रेसिपी वाचून वाटलंच होतं तुला गळ घालावी शेपूच्या भाजीची म्हणून..
आता काय आयतंच आमंत्रण आहे... Wink

Pages