Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वात महत्वाचे मी जेव्हां
सर्वात महत्वाचे मी जेव्हां प्रतिसाद द्यायला सुरूवात केली तोपर्यंत कुबेरांची बाजू चुकीची आहे हे कुणाच्याही गावी नव्हते.
इथेही आणि तिथेही. तिथले तर अजून धुसफुसत आहेत. धुसफूस उत्तर देता येत नसले की होते. नाईलाज आहे.
मी कुबेरांचा वादग्रस्त भाग वाचला आहे. त्यांच्या कादंबरीत नेमके काय आहे याचा अॅब्स्ट्रॅक्ट वाचला आहे. बेंद्रेंच्या पुस्तकातले निवडक वाचलेले आहे. या विषयी अनेक पुस्तके यापूर्वी वाचलेली आहेत.
जे कुबेरांवर अन्याय झाला असे म्हणत आहेत त्यांनी तरी कुबेरांचे पुस्तक / वादग्रस्त मजकूर वाचला आहे का ? वाचले असते तर इतके सांगावे लागलेच नसते.
अगा जे घडलेचि नाही ते ते द्यावे ठोकूनि
यास अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणता येत नाही.
त्यानंतरचे वागणे तर अजिबातच समर्थनीय नाही.
पत्र केराच्या टोपलीत टाकणे हा
पत्र केराच्या टोपलीत टाकणे हा लोकशाही मान्य नसल्याचा पुरावा आहे आणि शाई फेकणे हा ही. दोन लोकशाही न मानणार्यांनी आपसात काय केले हे मायबोलीवरच्या राजकीय धाग्यांप्रमाणे दुर्लक्ष करण्याचीच गोष्ट आहे. >>> इथेच तर फरक आहे. एक उदाहरण "वागणे चुकीचे पण अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत येणारे" आहे, तर दुसरे नाही. दोन्ही एकाच लेव्हलला आणून शाईचे कृत्य जस्टिफाय होत नाही.
न शाईचे कृत्य जस्टिफाय होत
न शाईचे कृत्य जस्टिफाय होत नाही. >> चालू द्या. हेच तुणतुणे वाजवायचे आहे हे लक्षात आलेले आहे. धन्यवाद.
इतर विषयांवर इथली कटुता येऊ देऊ नये.
वागणे चुकीचे पण
वागणे चुकीचे पण अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत येणारे >>> विक्रमादित्याने त्याचा हट्ट सोडला नाही. त्याने भादंवि, राज्यघटनेची कलमे फाट्यावर मारून प्रेतात बसलेल्या वेताळाची शाळा घेणे सुरूच ठेवले.
शांत माणूस : तुमचा मुद्दा
शांत माणूस : तुमचा मुद्दा समजला. कुबेरांनी उपलब्ध मान्य इतिहासाची साधने न वापरता जुन्या आता खंडीत केलेली साधने वापरून चुकीच्या माहितीवर मानहानीकारक लिखाण केले. तसेच संपादक भुमिकेत असल्याने स्वत:च्या वर्तमानपत्रात विरोधी मते मांडू दिली नाहीत.
मुख्य म्हणजे त्यांचे लिखाण हे अभिव्यक्तीसातंत्र्याच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे आहे. पण त्या उल्लंघनाच्या गुन्ह्याच्या दंडाबद्दल तुम्ही काही भाष्य केलेले नाही.
भादंविच्या काय तरतुदी आहेत? या उल्लंघनाबद्दल कशी दाद मागता येते? ती कोणाला मागता येते (लोकस स्टँडाय?)? जर न्यायालयात तशी दाद मागता येत असेल तर निकाल लागेपर्यंत पुस्तकाच्या विक्रीवर स्थगिती येते का? आणि या पुस्तकाबाबत अशी काही कारवाई करण्यासाठी न्यायालय वा शासनाकडे अर्ज दाखल केला आहे याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का?
तुमचा मुद्दा समजला. कुबेरांनी
तुमचा मुद्दा समजला. कुबेरांनी उपलब्ध मान्य इतिहासाची साधने न वापरता जुन्या आता खंडीत केलेली साधने वापरून चुकीच्या माहितीवर मानहानीकारक लिखाण केले. तसेच संपादक भुमिकेत असल्याने स्वत:च्या वर्तमानपत्रात विरोधी मते मांडू दिली नाहीत. >>> धन्यवाद.
मुख्य म्हणजे त्यांचे लिखाण हे अभिव्यक्तीसातंत्र्याच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे आहे. पण त्या उल्लंघनाच्या गुन्ह्याच्या दंडाबद्दल तुम्ही काही भाष्य केलेले नाही. >>> हा प्रश्नच समजलेला नाही. माझे प्रतिसाद पुन्हा वाचा. कायदेविषयल वेगळा धागाही वाचा. तसेच त्या गुन्ह्याच्या दंडाबद्दल मी भाष्य करणे का गरजेचे आहे ?
तुम्ही शाईफेकीबाबत माझे मत विचारले नाही याबद्दल आभार. तुम्ही बर्यापैकी बारकाईने वाचले आहे असे दिसते.
शां.मा.,मी कुबेरांचा
शां.मा.,
मी कुबेरांचा वादग्रस्त भाग वाचला आहे. त्यांच्या कादंबरीत नेमके काय आहे याचा अॅब्स्ट्रॅक्ट वाचला आहे
हा फरक आहे. तुम्ही सोडून इथे दुसऱ्या कुणीच हे वाचलेलं नसावं. वाचलेलंच नसताना चुकीचं आहे किंवा बरोबर आहे असं कसं म्हणणार? मी तर जो एकमेव रिव्ह्यू वाचला त्यातूनही काही कळण्याचा संबंध नव्हता!
कुबेरांनी जे लिहीले, त्यानंतर
कुबेरांनी जे लिहीले, त्यानंतर त्यावरच्या प्रतिक्रियांची दखल घेतली किंवा नाही घेतली - ही सगळी त्यांची मर्जी आहे. शाई वगैरे १००% अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आहे. कितीही सौम्य असली तरी.
त्याचा निषेध करायला पुस्तकाचे समर्थन करण्याची किंवा ते वाचलेले असण्याची गरज नाही. कारण त्यात काहीही लिहीले असले तरी ही प्रतिक्रिया बरोबर होत नाही.
कुबेर असोत, मुनव्वर राणा असो, खरे असोत, एम एफ हुसैन, किंवा माबोवर देवदेवतांबद्दल लिहीणारे आयडी. प्रत्येक बाबतीत आपले मत विचारस्वातंत्र्यालाच. मग ती मते न पटोत, खोटी माहिती लिहीली आहे असे वाटो, किंवा अगदी सिद्ध होवो, किंवा बदनामीच्या कटाचा भाग वगैरे असो. त्याबद्दल दुर्लक्ष किंवा प्रतिवाद हेच फक्त दोन उपाय आहेत.
याला एकदा "पण" लावला, जस्टिफिकेशन्स शोधली की ती निसरडी वाट आहे.
Submitted by फारएण्ड on 12 December, 2021 - 14:44
फा +१
कुबेरांनी काहीही केले तरी त्यावर बोलण्याची गरज नाही. फक्त शाई फेकली शाई फेकली असा कांगावा करायचा हा डाव आहे. क्रिकेटच्या धाग्यावर लिहीले म्हणून हाब हा आयडी उडाला. शाई फेकणे आणि आयडी ब्लॉक करणे ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नाही का ?
अशी प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य गोंजारायची परवानगी दिली तर उद्या दंगली पेटतील. त्या कुणी आवरायच्या ?
भावना भडकवणारे, दंगली घडवायला फूस देणारे लिखाण करणे हा गुन्हा आहे. बदनामी करणे हा दिवाणी गुन्हा आहे. इतके माहिती नाही का ? कि उगीच वेड पांघरून पेडगावला जायचे ?
लिखाण केले म्हणून गेल्या सात वर्षात किती तरी पत्रकार नोकर्या घालवून बसलेत. यावर कुबेरांचे पिट्टे (शाईफेकविरोधक) मूग गिळून गप्प आहेत. हे न समजायला लोक काय बोळ्याने द्दूध पितात का ? कुबेर ब्राह्मण आहेत त्यामुळे संभाजी महाराजांची बदनामी झाली तरी चालते. ब्राह्मणांनी काहीही इतिहास लिहावा, त्यात आपल्या जातीचे लोक शोधून त्यांना महत्व द्यावे आणि या लबाड्या उघडकीला आल्या कि अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून भुई धोपटावी.
कुबेरांचा गुन्हा जास्त गंभीर आहे. कारण ते सुशिक्षित आहेत. संपादक आहेत. आपल्या लिखाणाचे काय परिणाम होतात ते त्यांना माहिती आहे. फक्त शाईफेक झाली हेच निषेधार्ह आहे. शेण घालायला हवे होते.
शांत माणूस, ओके, तुम्हाला वेळ
शांत माणूस, ओके, तुम्हाला वेळ होईल तेव्हा लिहा.
मी अर्थातच शाईफेकीच्या विरोधात आहे. भ्याड लोकं ही अशी हिंसा करतात. ज्यांना सत्याची चाड आहे ती लोकं शांततेच्या मार्गाने जातात. कारण सत्य तुम्हाला निर्भय व्हायला मदत करते.
यापूर्वी कुबेरांना त्यांच्या विचारांमुळे त्यांच्याच शाळेच्या माजी विद्यार्थी संमेलनात सहभागी होऊ दिलं नाही असे वाचनात आले होते. तेव्हा मला त्या शाळेच्या माजी विद्यार्थी मंडळाची फार कीव करावीशी वाटली. इतक्या कोत्या मनोवृत्तीचे नागरिक तयार करणारी शाळा मनातून उतरलीच पार!
कुबेर तसेही बऱ्याचदा चुकीचे
कुबेर तसेही बऱ्याचदा चुकीचे संदर्भ वापरतात. मागे एका व्याख्यानात आणि कदाचित त्यांच्या पुस्तकातही 'मर्सिडीज बद्दल ते कुठल्या तरी उद्योजकाची मुलगी होती तिचं नाव दिलं', किंवा 'डिझेल इंजिन वाला डिझेल हा पूर्वी सायकल बनवायचा, त्याच्या नावाने डिझेल सायकल आहे' असले व्हाट्सअप्प विद्यापीठातले तारे तोडले होते. (डिझेल सायकल हे सायकलचं नव्हे, प्रक्रियेचं नाव आहे). आता हा समस्त यंत्र अभियंते, मेकॅनिक वगैरे आम्हा लोकांचा अपमान आहे. पण म्हणून काय त्यांच्या तोंडावर शाई (किंवा गाडीचं ग्रीस) फासायचं का? उगीच काय काहीतरी? फालतू लेखक म्हणून दुर्लक्ष करा किंवा त्यांच्यापेक्षा चांगली उत्तम दर्जाची पुस्तकं लिहा.
सनातन प्रभात / बजरंग दल /
सनातन प्रभात / बजरंग दल / भाजप अशांचा आदर्श घ्या. काळे काय फासतात?
अनाजी पंतुकड्यांच्या खापरपणतूने लिहिलेली बखर हा पुरावा नाही. त्यात संभाजी महाराजांची बदनामी हा हेतू आहे. हे ऐतिहासिक आणि तर्कशुद्ध पुराव्यानिशी एकदा सिद्ध झालेले आहे.
असे भंगार पुरावै उर्मटपणे वापरणे आणि त्यावरचा प्रतिवाद झटकणे, चर्चेला नकार देणे. मॅक्स महाराष्ट्र या वागळेंच्या चॅनलने डिबेटमधे त्यांचा पक्ष मांडायला बोलावले तेव्हा तिथे जायचे टाळणे
हे जर दुर्लक्ष करण्यासारखे असेल तर शाईफेकीकडे पण दुर्लक्ष करावे. अडाणी लोक समजून सोडून द्या.
शाईफेकीकडे दुर्लक्ष करता येत नसेल तर ज्या कारणामुळे ती झाली त्याकडे दुर्लक्ष करा असा शहाजोगपणाचा सल्ला आवरा.
कुबेरांना त्यांच्या
कुबेरांना त्यांच्या विचारांमुळे त्यांच्याच शाळेच्या माजी विद्यार्थी संमेलनात सहभागी होऊ दिलं नाही असे वाचनात आले होते. >> कुठे वाचलं जिज्ञासा? कारण ते पार खोटं आहे.
२०१९ डिसेंबर मध्ये कुबेर स्नेहसंमेलनात आलेले. मी प्रत्यक्ष पाहिलंय. त्यावेळी बंदी घाला ची बोंब उठलेली हे खरं आहे, पण तसं काही प्रत्यक्षात उतरलं न्हवत. मराठी मध्यम वर्गीय कोत्या मनोवृत्तीचे आहेत यात काही वादच नाही. बाकी यामुळे अख्खी शाळाच मनातून उतरली हे पण फनी आहे. 
कुबेरांना त्यांच्या
.
कुबेर ब्राह्मण आहेत त्यामुळे
कुबेर ब्राह्मण आहेत त्यामुळे संभाजी महाराजांची बदनामी झाली तरी चालते. ब्राह्मणांनी काहीही इतिहास लिहावा, त्यात आपल्या जातीचे लोक शोधून त्यांना महत्व द्यावे आणि या लबाड्या उघडकीला आल्या कि अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून भुई धोपटावी.>>>>>> पवारांनी, राऊतांनी शाई फेकीचा निषेध केला, मग ते ब्राह्मण आहेत का? निषेध करण्याची पद्धत् चुकली असे या लोकांचे मत आहे, याच्याशी सहमत आहात का?
कुबेरांचे चुकलेच. मुळात एखाद्या थोर ऐतिहासिक व्यक्तीमत्वा विषयी लिहीतांना नीट अभ्यास करायला हवा होता. मान्य आहे की संभाजी महाराजां ची बदनामी केली गेली ती निश्चीत निंदनीय आहे. ज्या पिता पुत्राने आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवले, प्रतीकार करायला शिकवले त्यांच्या विषायी काही पण मनाला येईल तसे लिहीणे चुकीचेच आहे. पण त्या करता तुम्ही अख्ख्या ब्राह्मण समाजाला वारंवार का जबाबदार धरताय ते तुम्ही आणी ते ब्रिगेडीच जाणे,
अमितव, माझा सोर्स व्हॉट्सॲप -
अमितव, माझा सोर्स व्हॉट्सॲप - काही मित्रमंडळी आणि नातेवाईक त्या शाळेचे आहेत आणि त्यांना कुबेरांना बोलवू नये असेच वाटत होते. तेव्हा शाळेने कुबेर विरोधी मंडळींसाठी behave yourself असा stand घेतला नाही असे वाटल्याने शाळा मनातून उतरली! तसे घडले नसेल तर शाळा has redeemed itself!
कुबेरांना त्यांच्या
कुबेरांना त्यांच्या विचारांमुळे त्यांच्याच शाळेच्या माजी विद्यार्थी संमेलनात सहभागी होऊ दिलं नाही>>
शाळेने त्यांचा अभिव्यक्ती(संस्था)स्वातंत्र्याचा अधिकार वापरला असावा.
रच्याकने ते हेच कुबेर आहेत का जे इथले तिथले उचलुन ढापुन स्वतःच्या नावावर (किंवा नाव न लिहिता) खपवतात.
रच्याकने ते हेच कुबेर आहेत का
रच्याकने ते हेच कुबेर आहेत का जे इथले तिथले उचलुन ढापुन स्वतःच्या नावावर (किंवा नाव न लिहिता) खपवतात >> तेच तर!
हे बघा. यांना शाईफेकीचा निषेध
हे बघा. यांना शाईफेकीचा निषेध करायचा आहे.

(No subject)
आंध्रातल्या बलात्काराच्या
आंध्रातल्या बलात्काराच्या केसमध्ये, पोलिसांनी गुन्हेगारांना रातोरात मारुन टाकलेले. म्हणजे पोलिसांनीच परस्पर कायदा हातात घेउन, न्याय दिलेला. जी की नक्कीच दंडेलशाही होती आणि त्या गोष्टीचे समर्थनही चूकच होते. अनेक सूज्ञ आय डिंनी त्या बाबीचा निषेध केलेला होता.
तेव्हा माझे व अनेकांचे मत असेच होते की - झाले, केले गेले ते बरोबर आहे , गुन्हाच इतका गर्हणिय आहे की - पोलिसांनी न्याय हातात घेउन, गुन्हेगारांना शिक्षा दिली ते योग्यच केले.
पण या बहुमताविरुद्धही, त्या कृत्याचे खंडन करणारे काही आय डि होते माबोवरती. का तर दंडेलशाही इन इटसेल्फ इज अ क्राइम.. त्यांनी घातलेला वाद, त्यांची त्यामागील भूमिका व कळकळ कौतुकास्पद होते.
----------------------------
ते आय डी आता गप्प का आहेत? त्या आय डिज चे काहीच म्हणणे नाही? मत नाही? का प्रत्येक जण आपापल्या जाती-समाजापुरता सूज्ञ होतो? 'शाई फेकणे' हा निषेधाचा मार्ग दंडेलशाहीतच येतो की. चुझ युअर बॅटल्स असे काहीसे शहाणपण यामागे असले तरी एका वाक्यातही भूमिका मांडत नाहीत?
सामो, योग्य मुद्दा आहे.
सामो, योग्य मुद्दा आहे.
खरेंच्या कार्यक्रमाबद्दल वचावचा बोलणाऱ्या कोणीही महाराष्ट्रातच झालेल्या एका गर्भवती तरुणीच्या शिरच्छेदाबद्दल काही चिंता किंवा खेद व्यक्त केला नाही. त्या भयानक घटनेचा ब्राह्मण समाजाशी संबंध नव्हता इतकंच.
या वादाची इथे कशी सुरूवात
या वादाची इथे कशी सुरूवात झाली ते या पानावर जाउन पाहा. इथे कायच्या काय आरोप केले जात आहेत. ते बरेचसे माझ्या पोस्ट्सना लागू आहेत हे गृहीत धरून - इथे मी तरी कुबेरांचे समर्थन केलेले नाही.
पब्लिक जुन्या पोस्ट्स न पाहता पुन्हा पुन्हा तेच लिहीत आहे म्हणून अजून एकदा:
- शाई चा निषेध करायला कुबेरांचे पुस्तक वाचलेले असण्याची गरज नाही. मुळात कुबेरांनी जे लिहीले त्याचे समर्थन मी तरी केलेलेच नाही. उलट त्यांनी चुकीचे काहीतरी लिहीले आहे हेच गृहीत धरले आहे - लोकांच्या मुलाखती, इथल्या पोस्ट्स वाचून.
- त्यांनी सनदशीर मार्गांची दखल घेतली नाही म्हणून एखाद्या संघटनेने शाई फेकणे ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आहे का हा प्रश्न होता. ती "आहे" असे माझे मत मी लिहीले आहे. इथे माझे मत लिहीणे म्हणजे भादंवि फाट्यावर मारून तुणतुणे वाजवणे इतके भयंकर काहीतरी आहे याची कल्पना नव्हती.
माझे जे मत मी लिहीले आहे त्याचा कोणी प्रतिवाद केला तर जरूर विचार करेन. बाकी वैयक्तिक आरोपांत मला इण्टरेस्ट नाही. मी अशा गोष्टींचा जात, पक्ष व धर्म न बघता कायमच विरोध केलेला आहे. अशा प्रत्येक घटनांच्या वेळी कोणाना कोणाला तरी असा विरोध आपल्या जातीविरूद्ध, धर्माविरूद्ध आहे असे वाटणारच. कधी तुम्ही ब्राह्मणांची बाजू घेत आहात असे वाटेल, कधी तुम्ही फुरोगामी आहात म्हणून टीका होईल. आपला स्टान्स क्लिअर आहे हे आपल्याला माहीत असले, तर ते प्रत्येक वेळेस समजावत बसायची गरज नाही.
बाकी सध्या शाईवर चर्चा सुरू आहे म्हणून शाईबद्दल लिहीले आहे. उद्या दुसरा विषय निघाला तर त्यावर लिहीन.
बी जी कोळसेपाटलांच्या
बी जी कोळसेपाटलांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा प्रतिवाद ज्या मार्गाने करावा असे फतवे निघत आहेत त्याच मार्गाने संभाज ब्रिगेडच्या तळातल्या कार्यकर्त्यांनी प्रतिवाद करायला पाहीजे होता का ? ज्यांना कुबेरावर शाई फेकली म्हणून भलतेच दु:ख झाले त्यातल्या एकाने तरी कोळसेपाटलांची ही बातमी पाहून दु:ख व्यक्त केले का ?
थोडक्यात जीव घेणे हा सभ्य मार्ग आहे पण शाई फेकणे हे भयंकर दहशतवादी कृत्य दिसतेय.
वर एकाने कुबेरांच्याच चुका दाखवल्यावर समजा ते चुकले असतील इथपर्यंत गाडी आली.
पण त्या आधीचा प्रतिसाद असा होता कि शाईफेकीचा निषेध करायला पुस्तक वाचलेले असण्याची गरज नाही. म्हणजे त्यांनी जर पुस्तकात ब्राह्मण सोडून इतरांची लायकीच नाही असा निष्कर्ष काढलेला असेल त्यासाठी पुरावे पण द्यायची गरज नसेल तर याचा अर्थ काय ?
कि ते गिरीश कुबेर नावाचे ब्राह्मण आहेत म्हणजे तेच बरोबर असणार पण शईफेक उगीचच झाली आहे. हीच रडारड चालू आहे.
कुबेरांनी माफी मागितली असती तर प्रश्न मिटला असता असे का नाही वाटले कुणाला ?
बाबासाहेब पुरंदरेंना एका कार्यक्रमात त्यांच्या वादग्रस्त लिखाणाचे पुरावे मागितले. त्यांना देता आले नाहीत. त्यांना तिथेच आधुनिक पुरावे दाखवण्यात आले. हे का घेतले नाहीत असे विचारले. तेव्हां त्यांनी हात जोडून माफी मागितली. त्यावर कार्यकर्त्यांनी लिहून मागितल्यावर बाबासाहेब पुरंदरे यांनी ती लिहून दिली. त्यांना माफ केले गेले.
पण बाबासाहेब पुरंदरेंना माफी मागायला लागली ही झुंडशाही म्हणून रडारड सुरू झाली. कोण होते रडणारे ? कुठल्या नात्याने रडत होते ?
मग खेडेकरांनी बाबासाहेबांच्या भाषेत पुस्तक लिहीले त्या विरोधात पाच बहुजन चमचे हाताशी धरून एफ आय आर का नोंदवली ? त्यातला कावा पण असा कि ते आमच्या जातीचे नाहीत. पण त्यातल्या एकाला ब्राह्मणांविरोधात लिहीतो म्हणून धमकावले होते, दुसरे होते त्यांना पद दिले होते, तिसरे होते त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दा़खल झाली होती. ती मागे घ्यायच्या बदल्यात तक्रार द्यायला लावली होती. हे कोण सांगणार ?
फारेण्ड यांनी शाई फेक हाच
फारेण्ड यांनी शाई फेक हाच मुद्दा लावून धरला. कुबेर चुकले याचे त्यांना काहीही वाटत नाही. त्यांनी दिवाणी न्यायालयात उभा राहू शकणारा गुन्हा केलाय त्याला ते सरळच अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणत आहेत. खेडेकरांना तुरूंगात जावे लागले होते हे माहिती असेलच. बेसच डळमळीत असताना फक्त शाई फेकली शाई फेकली चालू आहे.
शाई नाही, तोंडाला काळे फासले आहे. ते पण कुबेर फारच आघाव वागले, उर्मटपणा केल्यावर. त्या त्या समूहाला संताप होईल असे ते वागले. सत्तेतले नेते आपल्या खिशात आहेत, कोण काय करतो ही गुर्मी होती. ते सांस्कृतिक दहशतवादी आहेत. त्यांच्या दहशतवादाला अहिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणणार तर खेडेकरांना पण अमुक एक लोकांचा प्रतिवाद कलबुर्गी, पानसरे, दाभोळकरांच्या मार्गानेच करावा असे लिहू द्यायला हरकत आहे का ?
किती जण त्यांचे स्वातंत्र्य मान्य करणार ?
कायच्या काय म्हणे अभिव्यक्तीस्वातंत्र्य.
संभाजी महाराज बदफैली होते, लायक नव्हते, खूनी होते हे लिहीताना योग्य ते संदर्भ न बाळगता लिहीणे हा उद्दामपणा आहे की. यामुळेच सावरकरांबद्दल अशाच घाणेरड्या भाषेत पुस्तक लिहीले गेले असावे. तुमचे स्वातंत्र्य तर आमचे पण मान्य करा. हा माजुर्डेपणा नाही का ?
सामो, तुम्ही एण्काउंटरचे
सामो, तुम्ही एण्काउंटरचे समर्थन केले. ते दोषी होते कि नाही हे माहिती नसताना. इथे कुबेरांचा गुन्हा उघड झाला आहे. मग कुबेरांना पण तीच ट्रीटमेंट दिली तर तुम्ही समर्थन कराल का ?
शाईफेक म्हणजे बलात्कार आहे का ? कि जीव घेतलाय ?
तुम्हाला शाईफेक हा गंभीर गुन्हा वाटत असेल. पण माजी न्यायमूर्तीला बोलू नका नाही तर जीव घेऊ ही धमकी देणे योग्य वाटते का ? तुम्ही का मौनात ? कि व्यक्ती पाहून मत द्यायचे आहे ? कोळसेपाटलांना धमकी दिली तर देऊ दे की असे आहे का ?
आमचा कुबेर तुमचा कोळसेपाटील असे आहे का ?
कसेही करा. शाईफेकीचा आडोसा
कसेही करा. शाईफेकीचा आडोसा घेऊन कुबेरांचे समर्थन होऊच शकत नाही.
संभाजी ब्रिगेडला कितीही बदनाम करा, त्यांनी जीव नाही घेतला अजून कुणाचा. जीव असेल तर चुका दुरूस्त करता येतात. ते आधी संपर्क साधतात. चर्चा करतात. पत्रं पाठवतात. त्याला दाद दिली नाही कि पुन्हा येऊन भेटतात. तरीही जर उद्दामपणे अनुल्लेख करणे हे धोरण चालू राहिले तर मग कुठला पर्याय राहतो ?
बाबासाहेब पुरंदरे, पांडुरंग बलकवडे आणि निनाद बेडेकर यांना नेहरू मेमोरियल इथल्या भारतीय इतिहास परिषदेत भाग घेण्याचे आवाहन केले होते. निमंत्रण दिले होते. ते आले नाहीत. सुरक्षा पाहीजे म्हणाले. झेड प्लस सुरक्षा दिली. तरी आले नाहीत. म्हणजे हे चर्चेतून पळ काढतात. का ?
त्या मुलीवर चार श्रीमंत
सामो,
त्या मुलीवर चार श्रीमंत मुलांनी बलात्कार करून ठार मारले होते व पोलिसांना पैसे चारले होते व पोलिसांनी दुसर्याच चार गरीब तरुणांना पकडून एनकाउंटर करून प्रकरण मिटवून टाकले ही शक्यता विचारात आली नाही का ? हे फारच अविश्वसनीय आहे असे वाटेल त्यांनी नंदा बी एम डब्ल्यू केस, वगैरे केसेस वाचाव्यात. समजा त्या चार गरीब तरुणांमध्ये तुमचाच एक जवळचा नातेवाईक असता तरीही याच हिरिरेने समर्थन केले असते का?
>खरेंच्या कार्यक्रमाबद्दल वचावचा बोलणाऱ्या कोणीही महाराष्ट्रातच झालेल्या एका गर्भवती तरुणीच्या शिरच्छेदाबद्दल काही चिंता किंवा खेद व्यक्त केला नाही. त्या भयानक घटनेचा ब्राह्मण समाजाशी संबंध नव्हता इतकंच.
टवणे सर वचावचा बोलताहेत ?
या दोन घटनांचा काहीही संबंध नाही. त्या घटनेचा ब्राह्मण्/अब्राह्मण असण्याचाही संबंध नाही. अ या घटनेचा निषेध करण्या पूर्वी अजिबात संबंध नसलेल्या ब घटनेचा निषेध करणे जरूर आहे अशांसाठी वेगळाच बीबी उघडला आहे.
फा - छान पोस्ट्स.
फा - छान पोस्ट्स.
कुठल्याही गैरप्रकाराचा निषेध व्हायलाच हवा आणि तो घटनात्मक मार्गानेच व्हायला हवा. देशाच्या घटनेला आणि कायद्याला न जुमानणं हा सुद्धा गुन्हाच आहे. कुबेरांचं चुकलं असेल तर त्याचाही निषेध व्हावा आणि कायदेशीररित्या व्हावा. तसंच कायदा धाब्यावर बसवून शाईफेक करणार्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी. पण आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर त्याच्या निषेधार्थ कायदा हातात घेणं हे कुठेच समर्थनीय असू शकत नाही.
हे अजून सुरूच आहे का?
हे अजून सुरूच आहे का?
लोकहो,
प्लीजच.
भाजपा/संघोटे जे आहेत, त्यांनी डोळ्यांवर झापडं पक्की ओढून घेतली आहेत.
इथे संयत, सभ्य 'चर्चा' वगैरे करून काडीचाही उपयोग नाही. संघाचा "थिंक टँक" जो प्रकार आहे, त्यांना त्यांच्या व्हिजन नुसार देश घडवायचा आहे, अन त्यासाठी पाशवी बहुमत जमविण्यासाठी जे काय करायचे ते ते ते करीत आहेत.
ती व्हिजन विकृत आहे, फॅसिस्ट आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे, इन्क्लूडिंग द "थिंक टँक" . तरीही, दुसर्या महायुद्धाच्या आधी/दरम्यान
शेवटीकुण्या गोळवलकर नामक माणसाने पाहिलेल्या कुण्या जाती/धर्माच्या सुप्रिमसी च्या विचित्र स्वप्नांत गुंतून जे सांगितले त्यापाठी लागून आपण जे काय करतो आहोत, त्याबद्दल ही सुशिक्षित लोकं विचारही करू शकत नाहीयेत.या च देशातील सगळी माणसे, त्यांना वर येऊ देणे, समान संधी देणे, आपल्या पूर्वजांनी जे काही केले त्याबद्दल समजून उमजून वागणे (यात जरा गम्मत आहे. बाबराने जे काय केले त्याबद्दल 'मुसलमानांनी' उत्तर दिले पाहिजे. पण, माझ्या पूर्वजांनी जे काय केले "ते त्यांनी केले, मग मला का जबाबदारी?" असे समजून वागणरे व स्वतःला 'सुशिक्षित' समजणारे लोक, विचार करयची इच्छाच नाहिये यांची) या व अश्या ज्या ज्या संकल्पना आहेत, त्यांना समाजवाद्/कम्युनिझम इ. लेबले लावून आपण दूर लोटताहोत.
इतिहास, ही हिस्टरी आहे. हाय स्टोरी. जस्ट अ स्टोरी. इट इज व्हॉट हॅपन्ड. "
"देन"
ते तेव्हा झालं. परशुरामाने आईचं डोकं उडवलं, किंवा औरंगजेबाने बापाला जेलीत टाकलं, ह्या 'हाय स्टोरीज' आहेत. हिस्टरी. hi-story. हे आपण आज घडल्यागत विचार करून वाचून उपयोग नाही. असा अभिनिवेशपूर्ण इतिहास जगात कुठेच शिकवत नाहीत. अन म्हणून आपली पोरं युरोप अमेरिकेत जातात.
आपण का इतिहास असा वाचतो आहोत?
हे नक्की काय सुरू आहे अन का? हे माझ्या तरी आकलनापलिकडले आहे.
मित्रहो,
मुळातच 'देव'/'इश्वर/धर्म' इ. नामक प्रकार, ही मोठ्ठी गम्मत आहे.
"W" हे अक्षर. व्हाय, व्हॉट, व्हू, व्हेन, व्हेअर? हे प्रश्न विचारणे कृपया बंद करू नका.
कोणत्याही संकल्पनेस हे प्रश्न विचारा.
उत्तर काय येते ते पहा.
सारासार विचार बुद्धी वापरा.
बुद्धीभेद हा धर्माच्या दलालांचा यूएस्पी आहे.
"धर्म" शब्दाची मूळ व्याख्या विसरू नका.
"धारयति इति धर्मः" (समाजाला धारण करतो, तो धर्म) अर्थात, समाजाचे चलनवलन चालण्यासाठीचे जे नियम "सर्वांनी" कबूल केले, ते, म्हणजे धर्म.
= आज, "भारताचे संविधान"
बघा, जमतंय का समजून घ्यायला. बरंच रँबलिंग केलंय.
कोणत्याही संकल्पनेस हे प्रश्न
कोणत्याही संकल्पनेस हे प्रश्न विचारा.
उत्तर काय येते ते पहा.
सारासार विचार बुद्धी वापरा.
बुद्धीभेद हा धर्माच्या दलालांचा यूएस्पी आहे.
<<
याबद्दल थोडे अजून.
धर्म काय ते सांगितलं.
पण धर्म = श्रद्धा असे सांगणारे दलाल फार माजलेत.
श्रद्धा = जिथे विचार करणे थांबते.
प्रश्न विचारू नकोस. जस्ट बिलिव्ह इन मी.
अरे पण व्हाय? व्हू आर यू? व्हॉट इज द रिझन टू बिलिव्ह इन यू? इ.
अमुक एक तुमच्यापेक्षा मोठ्ठ्ठी शक्ती आहे, असे सांगून तुम्ही स्वतःपेक्षा तिच्यावर "श्रद्धा" ठेवायची आहे. बरे झाले तर क्रेडीट "त्याला" वाईट झाले, तर "तुमचे कर्म"
यार, कुनाले येडी घालून राहिले?
Pages