क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

जर टेस्ट मॅचच खेळवत आहेत तर त्या सिरीजमध्येच धरावी आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पॉईंटही त्यानुसारच काऊंट करावे असे मला वाटते.
जर केवळ पैश्याची नुकसानभरपाई करायला हे असेल तर कसोटीऐवजी लिमिटेडने ते लगेच झाले असते.

*वर्ल्ड चॅम्पियनशिप पॉईंटही त्यानुसारच काऊंट करावे असे मला वाटते.* - हाच हेतू समोर ठेवून ती मॅच खेळवली जाईल, असं त्यावेळी वाचल्याचं निश्चितपणे आठवतंय.

नव्या कर्णधाराचा नव्या कोचचा नव्या सपोर्ट स्टाफचा भारतीय संघ जाहीर झालाय.
खूप सारे अपेक्षित बदल झालेत :
शर्मा कर्णधार, राहुल उपकर्णधार,
गायकवाड, चहल, दीपक चहार, हर्शल पटेल, सिराज, वेंकटेश आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन
बुमरा, शमीला विश्रांती देताना भूवीवर दाखवलेला विश्वास / दिलेला मौका
पांड्याला दिलेला (मच डिजर्विंग) नारळ

पण माझ्यासाठी शार्दुलला वगळणं ही अनपेक्षित गोष्ट होती.

तसंच सध्या चालू असलेल्या मुश्ताक अली डोमेस्टिक टी-२० मालिकेतल्या परफॉर्मन्सवर काही खेळाडूंचं सिलेक्शन होताना बघायला आवडलं असतं. टॉप ३ रन स्कोअरर्स पैकी कुणी : तन्मय अगर्वाल, दीपक हूडा किंवा रहाणे (द्रविड कोच असताना याला संधी मिळेल असं वाटलं होतं), किंवा टॉप ३ विकेट टेकर्सपैकी कुणी : सीवी मिलिंद, सीवी स्टीफन किंवा रिषी धवन
पण यापैकी कुणालाही संधी मिळाली नाही Sad

असो,
नव्या संघाला शुभेच्छा...

२०१९ ओडीआय का, २०२१ डब्ल्यूटीसी का, २०२१ टी२० का, सब का बदला लेंगा रोहित शर्मा...!!!

कोणीही कोच असला तरीही रहाणे ला t20 संघात जागा मिळणे सध्यातरी अशक्य वाटतेय. रहाणेला ipl टीमपण सगळ्या matches खेळवत नाहीत.

t20 संघात जागा मिळणे सध्यातरी अशक्य वाटतेय रहाणेला ipl टीमपण सगळ्या matches खेळवत नाहीत
>>
सध्यातरी हे सध्याच्या परफॉर्मन्सवर हवं ना, पास्ट परफॉर्मन्सवर नाही.
सध्या (चालू असलेल्या) मुश्ताक अली टूर्नामेंट मधे रहाणेनी ५ पैकी ४ सामन्यांमधे ५०+ स्कोअर केलाय.

रहाणेनी हा फॉर्म अ‍ॅज अ‍ॅन ओपनर दाखवला आहे, आणि टीम मधे ऑलरेडी ओपनर्स आहेत, म्हणून रहाणेला जागा नाही हे कारण पटण्यासारखं आहे.

पण परफॉर्मन्स बघताना आपण हॉर्सेस फॉर कोर्सेस बघत नाही आहोत हे आपण ५ ओपनर्स घेऊन सिद्ध केलंय.
रोहित, राहुल, गायकवाड, वेंकटेश अन ईशान यापैकी दोघं ओपन करतील, एक जण नं. ३ खेळेल. (४-५ वर श्रेयस किंवा स्काय ला पकडलं) तर उरलेला नं ६ वर खेळेल.
म्हणजे मुळात आपण कुणातरी ओपनरला खाली खेळवायला ओके आहोत, पण त्या जागी चांगला खेळलेल्याला स्पेशालिस्ट स्पॉटवर कन्सिडर करत नाही आहोत.

सध्या (चालू असलेल्या) मुश्ताक अली टूर्नामेंट मधे रहाणेनी ५ पैकी ४ सामन्यांमधे ५०+ स्कोअर केलाय.
>>>>>>>
ते सामने तू बघितले नसशील असे गृहीत धरतो. रहाणे या फॉर्मेटमध्ये स्कोअर टाकतो तरी तो बिनकामाचा असतो असे बरेचदा होते. त्याला हवे तेव्हा अ‍ॅक्सलरेट करता येत नाही. त्यामुळे निव्वळ ५०+ स्कोअर आहे यावर न भुलने उत्तम.

ते सामने तू बघितले नसशील असे गृहीत धरतो. रहाणे या फॉर्मेटमध्ये स्कोअर टाकतो तरी तो बिनकामाचा असतो असे बरेचदा होते.
>> सामने बघितले नाहित, पण फॉलो केले आहेत. या पाच सामन्यांमधला त्याचा परफॉर्मन्स हा खरंच वेगळा आहे (पण तो परफॉर्मन्स अ‍ॅज अ‍ॅन ओपनर असल्यानी काऊंट न होणं मला मान्य आहे).

रहाणे हा केवळ एक उदाहरण आहे. या सिरीजमधे इतरही प्लेअर्स चांगले खेळले आहेत (गायकवाडच्या महाराष्ट्राला लीड करतानाच्या काही इनिंग्ज खास होत्या, तन्मय आगर्वाल हैदराबादसाठी की प्लेअर ठरलाय. स्टीफन आणि धवननी साधारण ८ च्या अ‍ॅव्हरेजनी ५ सामन्यात १४ विकेट्स काढल्या आहेत) पण त्या कुणाचाही या परफॉर्मन्सच्या जोरावर टीममधे समावेश झाला नाहीये.
गायकवाड, वेंकटेश, हर्शल, आवेश हे आयपीएल मुळे आलेत

आयपीएल अन टी २० वर्ल्डकप दुबईमधे झाले, पण वर्ल्डकपसाठी आयपीएलचा परफॉर्मन्स कन्सिडर नाही झाला.
आताची सिरीज भारतात आहे, मुश्ताक अली स्पर्धाही भारतातच आहे, पण इथेही रेलेव्हन्ट परफॉर्मन्स नाही कन्सिडर झाला.

केवळ मागची चूक सुधारल्यासारखं करायचं म्हणून आयपीएल परफॉर्मर्सना घेतलंय असं वाटतं.

निवड समितीनी थोडं लॉजिकली डोकं लाऊन टीम सिलेक्ट करावी अशी माफक अपेक्शा आहे.

रहाणेच्या बाबतीत आणखीन एक अडचणीचा मुद्दा म्हणजे त्याच वय. पुढच्या वर्षी होणाऱ्या t20 विश्वचषकात कोहली आणि शर्मा चे स्थान समजा गृहीत धरले तर आणखीन तिशीच्या पुढचे किती फलंदाज खेळवणार? सुर्यकुमार ही तिशीच्या पुढचा आहे तर kl राहुल ही पुढच्या वर्षी 30 पार करेल.

सैद मुश्ताक अली च्या मॅचेस फॉलो केल्या आणि जमतील तितके हायलाईट्सपण पाहिले. रहाणे मुंबईकडून चांगला खेळला. ऋतुराज ही महाराष्ट्राकडून चांगला खेळला (दोघंही ओपनर्स आणि कॅप्टन्स म्हणून उदाहरणात घेतले आहेत). रहाणे ट्राईड अँड टेस्टेड आहे - तो काय करू शकतो आणि काय नाही हे सिलेक्टर्सना माहित आहे. नवोदित खेळाडूंना संधी मिळणं, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अनुभव मिळणं, त्यांच्या क्षमता तपासणं ह्या दृष्टीनं त्यांना संधी मिळणं वाजवी आहे.

रहाणे च्या बाबतीत त्याने लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधे २०१५ चा वर्ल्डकप हा करियर पीक होता आणि आता ती बस निघून गेली आहे असं वाटतं. त्याने आता टेस्ट क्रिकेटमधली जागा भक्कम करावी जी गेले काही दिवस चर्चेत आहे. टॅलेंट ची कमतरता नसताना, टेंपरामेंटअभावी संधी दवडली असं वाटावा असा खेळाडू म्हणजे संजू सॅमसन. लंकेच्या दौर्यात त्याला अधिक मॅच्युरिटीने खेळायला हवं होतं असं वाटतं. त्याला कदाचित अजून संधी मिळतीलही, पण आता मार्जिन ऑफ एरर कमी असेल असं वाटतं.

नवोदितांना सपोर्ट करण्याच्या दृष्टीनं शॉ ने जरी एक अपवादात्मक इनिंग वगळता सैद मुश्ताकमधे काही केलं नसलं तरी त्याला ए टूरवर पाठवणं हे सिलेक्टर्स चं योग्य पाऊल वाटतं.

या पाच सामन्यांमधला त्याचा परफॉर्मन्स हा खरंच वेगळा आहे >>> ओके असेलही कदाचित. धवनबाबत हे झालेय तर रहाणेही अ‍ॅप्रोच बदलू शकतोच.

रहाणे ला आता टी 20 मध्ये घेणे अजिबात योग्य नाही >>> आपण त्याच्यावर ईथे चार पाच पोस्ट चर्चेच्या खर्च केल्या हेच खूप झाले असे मला वाटते Happy

त्याचे टेस्ट मधलेही स्थान धोक्यात आहे >>> हो, कुर्‍हाड पडू शकते. त्याचे नशीब चांगले आहे की कसोटीत युवांचे ईतके कॉम्पिटीशन नाहीये जसे लिमिटेडमध्ये आहे.

नवोदित खेळाडूंना संधी मिळणं, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अनुभव मिळणं, त्यांच्या क्षमता तपासणं ह्या दृष्टीनं त्यांना संधी मिळणं वाजवी आहे. >> +१. विशेषतः तन्मय अग्रवाल खरच इंप्रेसीव्ह वाटला.

रोहित, राहुल, गायकवाड, वेंकटेश अन ईशान यापैकी दोघं ओपन करतील, एक जण नं. ३ खेळेल. (४-५ वर श्रेयस किंवा स्काय ला पकडलं) तर उरलेला नं ६ वर खेळेल. >> ह्या सगळ्या मधे रोहित ओपनिंग वगळता खाली आला तर निरुपयोगी आहे हे लक्षात घे. त्या अनुषंगाने बाकीचे ठरतील. राहुला वन डे मधे ४-५ वर खेळणार हे नक्की असल्यामूळे टी २० मधेही त्याला तिथेच खेळवून १-२ वर इशान्/वेंकटेष ट्राय करायला हवेत. ते दोघे अधिज्क आक्रमक खेळतात त्यामूळे बाकीच्यांना ब्रीदर मिळेल. लेफ्टी राईटी काँबो पण होईल. गायकवाड नि शॉ ह्यामूळे बॅकप मधे जाणार. भुवीला घेणे मला तरी पटलेले नाही. तो फॉर्म मधेही नाही नि फीट ही वाटत नाही. चहर ला ड्रॉप करणे पण खूप हार्श वाटले.

एक अशी खबर येतेय,
विराट कोहली पहिल्या कसोटीला नसणार आहे. पण त्या जागी रहाणे नाही तर रोहीत कर्णधार होणार आहे. रहाणे उपकर्णधार कायम राहणार आहे.
खबर खरी खोटी लवकरच कळेल. पण असे करू शकतो का? उपकर्णधाराला डावलून भलत्याच प्लेअरला एका मॅचसाठी कर्णधार करणे..
कि असे खरेच झाल्यास आता रोहीतला तिन्ही फॉर्मेट कर्णधार बनवायची चाचपणी समजायची का?

ह्या सगळ्या मधे रोहित ओपनिंग वगळता खाली आला तर निरुपयोगी आहे हे लक्षात घे. त्या अनुषंगाने बाकीचे ठरतील.
>>
एकदम मान्य, आणि हे ट्राईड आणि टेस्टेड आहे. पण मग बाकी ओपनर्सना खाली खेळवण्यात काय हशील?
राहुलही टी२० मधे ओपन करायला लागल्यावरच अधिक इंपॅक्ट दाखवायला लागलाय. एकूणात करंट फॉर्मवर (जमवलेल्या धावा हा निकष मुख्यतः लाऊन) ५ ओपनर्सना घेऊन नंतर मिड्ल ऑर्डरला खेळवण्यापेक्षा स्पेशलिस्ट मिड्ल ऑर्डर प्लेअर्स (त्यांच्या नावावर ओपनर्स इतक्या धावा नसल्या तरी योग्य जागी योग्य खेळी केलेले) कन्सिडर व्हायला हवे होते.

सेहवागपूर्व काळात जसं कुठल्याही मिड्ल ऑर्डर प्लेअरला आपण ओपन करायला लावायचो तसंच आता ओपनर्सना मिड्ल ऑर्डरला खेळवू नये असं मला वाटतं. (आणि सिलेक्शन कमिटीला वाटत नाही).

रोहीतला तिन्ही फॉर्मेट कर्णधार बनवायची चाचपणी समजायची का?
>>
शक्य आहे. आपल्याकडे पुढच्या मोठ्या टूर्नामेंटसाठी प्लॅन्स होतात (जसे २०१९ वर्ल्डकप पर्यंत धोनी / २०२१ टी२० वर्ल्डकप पर्यंत कोहली - शास्त्री / आता २०२३ वर्ल्डकप पर्यंत द्रविड). याच न्यायानी बीसीसीआय २०२३ पर्यंत एकच कर्णधार ठेवायचा प्लॅन करू शकते.
रोहित आत्ता ३४ वर्षांचा आहे, राहुल २९, अय्यर २६ अन पंत २४
हे आकडे बघता २०२३ पर्यंत रोहित नक्की राहू शकतो, पण त्या पुढे त्याच्या योग्य वारसदाराची निकड भासू शकते. त्यावेळी ३१ वर्षीय राहुल हा ही अजून एक शॉर्ट टर्म ऑप्शन पुरवू शकतो, पण कायम शॉर्ट टर्म गेम खेळत रहायचा की दादा / धोनी टाईप लाँग टर्म रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची हा निर्णय नक्कीच बीसीसीआयला घ्यायला लागेल.
अजून एक म्हणजे दादा किंवा धोनी दोघेही व्हाईस कॅप्टन रूटनी आलेले खेळाडू नव्हते. त्या दोघांनी लाँग टर्म टीम बिल्डिंग करताना मिळवलेल्या अचीव्हमेंट्स नक्कीच दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे माझी पसंती लाँग टर्म लीडरशिपला आहे. अन त्या दृष्टीनी मला रोहित नंतर पंत किंवा अय्यरला कॅप्टन झालेलं बघायला आवडेल. या दोघांनाही व्हाईस कॅप्टन बनवून ग्रूम करण्यापेक्षा आयपीएलसारख्या प्लॅटफॉर्म्सवर (पूर्वी साळवे चॅलेंजर टूर्नामेंट व्हायची ज्यात ईंडिया ब्लू - रेड - ग्रीन टीम्स भिडायच्या, जिथे कॅप्टन्सी अन बेंचस्ट्रेंथ ची चाचणी व्हायची. सीनिअर प्लेअर्सनी डोमेस्टिक खेळणं सोडल्यानी ही टूर्नामेंट बंद झाली. आता दुलीप ट्रॉफीला झोनल टीम्स ऐवजी या ब्लू - रेड - ग्रीन टीम्स असतात) ट्राय करून रोहित नंतर थेट कॅप्टन बनवावं अन लाँग रन द्यावा.

भावी कर्णधार पंत चालेल. तिन्ही फॉर्मेट खेळतो. यष्टीमागे उभा राहतो. तयार होईल दोन वर्षात. कप्तान होत डोक्यावरची फुकटची टांगती तलवार गेली तर जबाबदारीनेही खेळेन आणि खुलूनही खेळेन.

अय्यर बिलकुल नको. माझ्या निरीक्षणानुसार आयपीएलला त्याची नियत चांगली नाही वाटली. पंतलाच कर्णधार कायम ठेवले यावर नाखुश होता. आणि दिल्ली जिंकू नये अशी त्याची ईच्छा त्याच्या खेळातून जाणवत होती. याला कप्तानीच्या स्पर्धेतही आणू नये असे वाटते.

Rohit Sharma will be rested from the first Test match against New Zealand. Ajinkya Rahane will lead India in Virat and Rohit’s absence. Earlier, it was reported that Rohit will lead India in the first match of the Test series as Virat Kohli had requested an extended break from cricket.

However, it is being reported that even Hitman will not play in the first Test. According to the Times of India, the governing body of Indian cricket has decided to rest Rohit considering his workload in the last six months.

Meanwhile, he will lead the Men in Blue in a three-match T20I series against the Kane Williamson-led team. Rohit was recently appointed Team India’s new T20Is captain after Virat’s last match as a skipper against Namibia in the ICC T20 World Cup.

पहिल्या टेस्टमधे रहाणे कॅप्टन असणार आहे, दुसर्या टेस्टपासून कोहली परत येऊन नेतृत्व करणार आहे. शर्मा, बुमराह, शामी ह्यांना रेस्ट केलंय
न्युझिलंड सिरीजसाठी.

<<<निवड समितीनी थोडं लॉजिकली डोकं लाऊन टीम सिलेक्ट करावी अशी माफक अपेक्शा आहे.>>>
अपेक्षा ठीक आहे, पण लॉजिकपेक्षा इतरच काही बाबी निवड समितीला महत्वाच्या वाटतात असे वाटते.

रहाणेला फलंदाजीबाबत शेवटही छान करायच्या शुभेच्छा द्या. हल्ली एखादी खेळी करून संघात जागा टिकवा असेच चालू आहे.

रोहीतला तिन्ही फॉर्मेट कर्णधार बनवायची चाचपणी समजायची का? >> पुढच्या टेस्ट सिरीज अनुषंगाने बघितले तर असे नक्कीच वाटत नाही. कोहलीचा टेस्ट रेकॉर्ड कॅप्टन म्हणून जबरदस्त आहे. जोवर तो खाली येत नाही (तशी वेळ भारतावर येऊ नये अशी आशा करूया) किंवा तो कर्णधार म्हणून बाहेर निघत नाही तोवर शक्य वाटत नाही.

गिल ला मधल्या फळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असे दिसतेय जी चांगली मूव्ह वाटतेय. त्याच अनुषंगाने विहारीला आफिके च्या अ दौर्‍यावर पाठवणे पण आवडले. पंत ला ब्रेक देऊन भरत ला आणणे पण पटतेय विएशेषतः साहा बॅकप आहे म्हणून. मयांकला सलामी साठी परत संधी मिळतेय हे फेयर वाटले.

शर्मा टॉस जिंकला
भाई ये होता है कप्तान
टॉस जिंकून संघाचे मनोबल वाढवणारा

*टॉस जिंकून संघाचे मनोबल वाढवणारा* - टाॅस न जिंकतांही मनोबल वाढवतो तो खरा कर्णधार. टाॅस तर रामभरोसेच असतो.

तो जोक होता ओ भाऊ Happy
जो सामना हरल्यावर वा हरताना त्रागा न करता अपयशी खेळाडूंच्या पाठीशी ऊभा राहतो तो खरा कर्णधार..
रोहीत शर्मा अश्यांना सामना हरल्यावर जेवायला घेऊन जातो असे मागे वाचलेले.

ओके मग २००७ चा वर्ल्डकप हरल्यावर द्रविड संघ सहकाऱ्यांना घेऊन सिनेमाला गेलेला!!
just FYI Happy

Pages