Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
"चेस कसे करावे हे कोणत्या
"चेस कसे करावे हे कोणत्या कर्णधाराने स्ट्रॅटेजी आखून धोनीला शिकवले नाही तर धोनीने जगाला शिकवलेय."
Factual errors: धोनी च्या आधी लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधे नावजलेले फिनिशर्स होते. अगदी सुरूवातीच्या काळात व्हिव्ह रिचर्ड्स, जावेद मियांदाद वगैरे उदाहरणं सोडून देऊ. नंतरच्या काळातले लान्स क्लुजनर वगैरे सुद्धा बाजूला ठेऊ. पण पहिल्यांदा ज्याने कन्सिस्टंटली वन-डे गेम्स क्लोज करायला सुरूवात केली, सिंगल्स - डबल्स काढून मॅच शेवटपर्यंत नेण्याची आणि शेवटी methodically मॅचेस जिंकायची template यशस्वीरित्या राबवली तो ऑस्ट्रेलियाचा मायकल बेव्हन हा मॉडर्न क्रिकेटमधला पहिला फिनिशर म्हणून नावाजलेला प्लेयर होता.
धोनी च्या सुरूवातीच्या काळात जेव्हा तो पॉवर हीटर म्हणून उदयाला येत होता, तेव्हा ग्रेग चॅपेल ने त्याला ही फिनीशर ची जवाबदारी दिली. तो लागेल तेव्हा मोठे शॉट्स खेळू शकतो त्यामुळे तो ही जवाबदारी चांगल्या रितीने पार पाडू शकेल अशी त्यामागची भुमिका होती. धोनी ने त्याच्या सुवर्ण काळात अनेक मॅचेस जिंकून फिनीशरचा रोल अत्यंत यशस्वीरित्या राबवला.
माझ्या पोस्टसोबत त्या आधीची
माझ्या पोस्टसोबत त्या आधीची समोरच्याची पोस्टही कोट करा. ज्यात द्रविडचे कौतुक करताना त्याच्या कप्तानीत चेस करताना सलग जिंकलो याचा उल्लेख होता. त्याबाबत म्हटलेले >> पण धोनीला मधे तू आणलेलेस नि नंतरची गांगुलीचे कोट्स त्यामूळे प्रश्न तुलाच विचारणार ना ? स्वरुप ने जे लिहिले ते तुला माहित नव्हते असे तर नक्की नाही पण धोनीला अधिक श्रेय द्यायच्या आधी का ? कसे हे सांगायची जबाबदारी पण तुझीच ना मग ? धोनी थेट फिनिषर म्हणून आकाशातून पडला नाही. तूला वाचनाचे वावडे असल्यामूळे युवराजचे टेस्ट ऑफ माय लाईफ वाच पण सांगता येत नाही ... जाऊ दे ....
फे फ, धोनीचा समकालीन हसी पण राहिला रे. चॅपेल ने तो नि बेव्हन ह्यांना गाईड केले होते नि रीफाईन केले होते.
फेरफटका,
फेरफटका,
बर्र, धोनीला "धोनी द फिनिशर" हे द्रविड आणि चॅपेलने बनवले.
तसे चॅपेलने आपल्या टीममधील सिनिअर खेळाडूंची स्वतःची जागा गृहीत धरण्यावरही वचक ठेवला होता. पुढे धोनीने हेच धोरण राबवले. ज्याचा फायदा आपल्याला २०११ वर्ल्डकपला झाला. त्या एकंदरीत काळात झाला.
धोनी थेट फिनिषर म्हणून
धोनी थेट फिनिषर म्हणून आकाशातून पडला नाही.
>>>>
तसे सचिनही फलंदाज म्हणून आकाशातून पडला नव्हता. आधी म्हणे तो वेगवान गोलंदाज बनायला चालला होता. मग कोणीतरी तिथून परत पाठवले. आता सचिनच्या शंभर शतकांचे कौतुक करताना त्या आधी त्याला गोलंदाजाच्या जागी फलंदाज बनवणार्याचे कौतुक करणे गरजेचे आहे का?
आता सेहवाग हा विस्फोटक ओपनर होता हे कौतुक करताना त्याने कसे कसोटी क्रिकेट बदलले असे म्हणताना त्याचेच कौतुक करणार ना. की त्याला ओपनिंगला ज्याने पाठवले त्याचे कौतुक दरवेळी करणे गरजेचे.
"फे फ, धोनीचा समकालीन हसी पण
"फे फ, धोनीचा समकालीन हसी पण राहिला रे." - येस्स! त्याचा उल्लेख राहिला. माझा मुद्दा इतकाच होता की धोनी गेल्या काही वर्षांतला जबरदस्त फिनीशर असला तरी तो एकदाम पायोनियर वगैरे नव्हता (रेफः त्याने जगाला फिनीशर म्हणजे काय ते शिकवलं).
"बर्र, धोनीला "धोनी द फिनिशर"
"बर्र, धोनीला "धोनी द फिनिशर" हे द्रविड आणि चॅपेलने बनवले." - वादासाठी का होईना, ऋन्मेष ने एक मुद्दा मान्य केलाय. 'स्टॉप द प्रेस!' मी तर उरलेला दिवस सुट्टी घेऊन अर्ली दिवाळी / ख्रिसमस / ईद वगैरे साजरं करिन म्हणतो.

त्याला ओपनिंगला ज्याने पाठवले
त्याला ओपनिंगला ज्याने पाठवले त्याचे कौतुक दरवेळी करणे गरजेचे. >> पण त्याला हाड करूनच सेहवाग ग्रेट होता असे म्हणणार का ? मुद्दा साधा आहे, तू नविन मुद्दा मांडत असलास तर तो का मांडतो आहेस नि त्याला पूरक पुरावा देणे ही तुझी जबाबदारी.
आधी म्हणे तो वेगवान गोलंदाज बनायला चालला होता. मग कोणीतरी तिथून परत पाठवले. >>सचिन अजूनही त्या व्यक्तीला अॅक्नॉलेज करतो हे. तू मात्र .... कोणाला हे मी लिहिणार नाही. तू पुस्तक वाचू शकतोस (कुठले तेही तुला माहित आहे
)
माझा मुद्दा इतकाच होता की धोनी गेल्या काही वर्षांतला जबरदस्त फिनीशर असला तरी तो एकदाम पायोनियर वगैरे नव्हता >> मला मान्य आहे रे. आपल्याला आपल्या देशाचा म्हणून धोनीचे बोटभर अधिक कौतुक एव्हढेच.
पण त्याला हाड करूनच सेहवाग
पण त्याला हाड करूनच सेहवाग ग्रेट होता असे म्हणणार का ? >>> असे मी हाड कुठे म्हटलेय ?
सचिन अजूनही त्या व्यक्तीला अॅक्नॉलेज करतो हे. तू मात्र .... >>>> त्या व्यक्तीलाही मी हाड कुठे म्हटलेय ?
सचिन, सेहवाग, धोनी यांनी मिळवलेल्या यशात टप्याटप्यावर कित्येक लोकांचे कमीजास्त श्रेय असेल. ईट्स पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ एवरी सक्सेस स्टोरी.
तरी तो एकदाम पायोनियर वगैरे
तरी तो एकदाम पायोनियर वगैरे नव्हता (रेफः त्याने जगाला फिनीशर म्हणजे काय ते शिकवलं).
>>
तसे जगाला शिकवले म्हणायची एक पद्धत असते. म्हणजे त्या आधीच्या काळात असे कोणी नव्हतेच असे नाही. तो खेळाडू त्या काळातील वा सार्वकालीन श्रेष्ठ खेळाडू होता हे सांगताना आपण तसे म्हणतो. बाकी त्या आधी तसा पराक्रम कमी अधिक प्रमाणात कोणी ना कोणी केले असणे स्वाभाविकच आहे.
फिनिशर (फलंदाज), यष्टीरक्षक आणि कर्णधार अश्या तिन्ही आघाड्यांवर जो माणूस ऑल टाईम ग्रेटच्या लिस्टमध्ये मोडला जातो त्याची खेळाडू म्हणून कोणाशी तुलना मी तरी करू शकत नाही. या पंक्तीत कोणीच नाहीये
@स्वरूप :
@स्वरूप :
हे माझे म्हणणे नेमके मांडाणारा हा व्हिडीओ मिळाला >>>
याचे बाकी व्हिडिओजही मस्त आहेत.
खासकरून रिलायन्स कप च्या जुगाडाचा...
*हे माझे म्हणणे नेमके
*हे माझे म्हणणे नेमके मांडाणारा हा व्हिडीओ मिळाला* -
स्वरुपजी, व्हिडिओ पाहूनही एक शंका राहिलीच. द्रविडला नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची संधी दिली गेली. अशा खेळाडूंना शिकवतांना नेमका कशावर भर द्यायचा हें अभ्यासपूर्वक ठरवून त्याने आदर्शवत अंमलात आणलं , हें त्या व्हिडिओवरून सिद्ध होतं. पण त्यावरून 'he is better bet with younger lot ' हा निष्कर्ष कसा निघतो ? त्याला जर राष्ट्रीय संघाचं प्रशिक्षण करायची जबाबदारी दिली असती, तर त्या खेळाडूंच्या बाबतीतही नेमका कशावर भर द्यायचा याचीही त्याने अभ्यासपूर्वक वेगळी योजना आखून यशस्वीपणे अंमलात आणलीच असती, ही दाट शक्यता आहेच ना !
ही दाट शक्यता आहेच ना ...
ही दाट शक्यता आहेच ना ...
>>
भाऊ,
अंडर १९ / ए टीम्सना द्रविडनी कोचिंग दिल्यानी त्याची फळं नॅशनल टीम ला मिळाली. बेंच स्ट्रेंथ तयार झाली.
यापूर्वी कधी हे झालं नव्हतं.
द्रविडनी नॅशनल टीमला कोच केलं तर ती टीम फर्मास तयार होईल (रादर त्यानीच ए लेव्हलला ती बरीच चांगली करूनच पाठवली आहे)
द्रविडनी बनवलेल्या बेंच ला नॅशनल टीम मधे परत द्रविडनीच कोच करायची तितकी गरज मला वाटत नाही (ही टीम शास्त्रीबुवांच्या कोचिंगमधेही फार वाईट खेळत नव्हती.)
नॅशनल टीमला द्रविड कोच होण्याचा तत्कालिन फायदा होईल, पण मग बेंच स्ट्रेंथ कोण बनवणार? त्यासाठी दुसरा कुणी पर्याय दिसत नाही.
लक्ष्मणनी सपशेल नकार कळवल्याचं वाच्लं.
जॅकी (व सवरूपजी), हें 100%
जॅकी (व स्वरूपजी), हें 100% मान्य ! धन्यवाद.
पण मग बेंच स्ट्रेंथ कोण
पण मग बेंच स्ट्रेंथ कोण बनवणार?
द्रविड ला प्रमोशन नको का? जशी खेळाडुंमध्ये बेंच स्ट्रेंथ महत्वाची आहे तशीच कोचेच मध्ये ही महत्वाची आहे. कदाचित द्रविड पेक्षाही चांगला कोच अंडर19 संघाला मिळेल.
>>कदाचित द्रविड पेक्षाही
>>कदाचित द्रविड पेक्षाही चांगला कोच अंडर19 संघाला मिळेल.
मिळाला तर चांगलेच आहे आणि आता जर द्रवीडने मुख्य प्रशिक्षकपद स्विकारले असेल तर त्याचाही यात काही निश्चित विचार असेलच म्हणा!
>>खासकरून रिलायन्स कप च्या जुगाडाचा...
बघितला आत्ता..... मस्तच आहे!
हे काहीच माहित नव्हते
१९८७चा वर्ल्डकप.... नव्हे रिलायन्स कप खास आठवणीतला आहे..... त्यादरम्यानच क्रिकेट थोडेथोडे कळायला सुरुवात झालेली
"आपल्याला आपल्या देशाचा
"आपल्याला आपल्या देशाचा म्हणून धोनीचे बोटभर अधिक कौतुक एव्हढेच." - ते आहेच रे.
स्वरूप, व्हिडीओ मस्त आहे. ह्या विषयावर मागे एक आर्टिकल पण वाचलं होतं. सापडलं तर पोस्ट करतो.
स्वरूप, व्हिडीओ मस्त आहे.
स्वरूप, व्हिडीओ मस्त आहे. ह्या विषयावर मागे एक आर्टिकल पण वाचलं होतं. सापडलं तर पोस्ट करतो. >> +! , रेडीफ वर होते बहुतेक.
द्रविड ला नॅशनल कोचिंग चे जवळजवळ डबल पैसे मिळणार आहेत सध्यापेक्षा त्यामूळे शॉर्ट टर्म फायनान्शियल मोटिव्ह असणे शक्य आहे. (ह्यात मला काही चुकीचे वाटत नाही)
तसे चॅपेलने आपल्या टीममधील
तसे चॅपेलने आपल्या टीममधील सिनिअर खेळाडूंची स्वतःची जागा गृहीत धरण्यावरही वचक ठेवला होता. >> खेळाडूत फूट पाडून आपली जागा घट्ट करण्याचा तो प्रयत्न होता. सचिन वर वचक ठेवायच्या नादात स्वतःच्याच पृष्ठ्भागावर लाथ ओढवून घेतली.
चॅपेलच्या नादाला लागून द्रविडसारखा सज्जन माणूसही बिघडला होता असे माझे मत आहे. असो.
वेगवेगळ्या काळखंडातील खेळाडूंची तूलना करणे चुकिचेच. माझ्या मते मर्यादीत षटकात नियमांबाबत इतके आमूलाग्र बदल झाले आहेत की त्या त्या वेळेचा खेळ केवळ नावालाच एक नाव क्रिकेट म्हणायला पाहिजे.
नाहीतर ६० ओव्हरस चे कुठलेही नियम नसणारे क्रिकेट व आता फलंदाजांना पूर्ण अनुकूल नियम असणारे क्रिकेट हे एकच असू शकत नाही आणि त्यातल्या खेळाडूंचे एकत्र मूल्यमापनही करता येणार नाही.
क्षेत्ररक्षणाचे कोणतेही निर्बंध नसणारे ६० ओव्हर्सचे क्रिकेट , कसोटीचे एक छोटे मर्यादीत वर्जन होते. ज्यात फिनिशर असा कोणी उठुन दिसू शकत नव्हता.
मर्यादीत षटकात फिनिशर हा एक भाग झाला. पण काहिकाही खेळाडूंच्या खेळामुळे संघाला फिनिशरची जरूरच लागायची नाही त्याचे काय. रिचर्डस, सचिन वगैरे.
धोनीच्या २०११ च्या अंतीम सामन्यातील खेळीला मी मुख्य फलंदाजाची खेळी म्हणेन, फिनिशर नाही. धोनीला मॅन ऑफ द मॅच म्हणूनच दिले गेले. याच सामन्यात धोनीसारखीच गौतमची खेळीही महत्वाची होती.
तसेही धोनी ज्या क्रमांकावर बॅटींग करायचा तेथे त्याला आधिच्या फलंदाजांनी केलेल्या फलंदाजीमुळे मॅच फिनिश करायचा चान्स तसाही जास्तच असायचा. आणि आपल्याला थ्रिलिंग शेवट झालेल्या मॅचेस जास्त आठवतात. जेंव्हा क्षेत्ररक्षणाच्या नियमात आमुलाग्र बदल झाले त्यावेळेस या थ्रिलिंग मॅचेस वाढायला लागल्या.
याशिवाय किती वेळा संधी मिळाली आणि त्यात किती वेळा फिनिश करून जिंकलो हेही बघणे मनोरंजक ठरेल. कारण आपण दुसरी बॅटींग करताना हारलेली प्रत्येक मॅच हे फिनिशर म्हणवून घेणार्या खेळाडूचे अपयश होते हे विसरायला नको.
त्यामुळे तूलना करायचीच असेल तर फिनिशरपेक्षा कुणी मॅन ऑफ द मॅच अॅवॉरड्स, प्लेयर ऑफ द सिरीज जास्त पटकावली आहेत हे बघा.
हा निकश कालातीत आहे.
>>चॅपेलच्या नादाला लागून
>>चॅपेलच्या नादाला लागून द्रविडसारखा सज्जन माणूसही बिघडला होता असे माझे मत आहे.
बाकीच्या इतक्या सेन्सिबल पोस्टमध्ये हे एक वाक्य रुचकर बिर्याणी खाताना दाताखाली खडा आल्यासारखे वाटले.... पण असो!
द्रवीड दादासारखा स्वभावाने बंडखोर माणूस नव्हता त्यामुळे आजूबाजूला जेही काही चालू होते त्यातून कुठेही अजुन वादग्रस्त न होता त्यातल्या त्यात भारतासाठी चांगले करण्याचा प्रयत्न केला..... त्यातून काही जण द्रवीडने चॅपेलसमोर शरणागती पत्करली असा अर्थ काढतात..... काहीजण तर अजुनही पुढे जाऊन चॅपेलच्या खांद्यावर बंदूक ठेऊन द्रवीडने दादाचा काटा काढल्याचाही आरोप करताना बघितले आहे!
बाकीच्या इतक्या सेन्सिबल
बाकीच्या इतक्या सेन्सिबल पोस्टमध्ये हे एक वाक्य रुचकर बिर्याणी खाताना दाताखाली खडा आल्यासारखे वाटले.... >> भापो.
पण ते सुरुवातीचच वाक्य आहे. फेकून द्या आणि बाकिची बिर्याणी एन्जॉय करा.
कुणी मॅन ऑफ द मॅच अॅवॉरड्स,
कुणी मॅन ऑफ द मॅच अॅवॉरड्स, प्लेयर ऑफ द सिरीज जास्त पटकावली आहेत हे बघा. Happy हा निकश कालातीत आहे.
>>>>>
असेही नाही म्हणता येणार. कारण पुढे फलंदाजी करणार्यांना जसे शतके बनवायला जास्त संधी असते तसेच सामनावीर पटकवायलाही जास्त संधी असते. लिमिटेडमध्ये तर बरेचदा बॅटींग पिचेसच असतात जिथे टॉप तीनचार फलंदाजांपैकी एखाद्याने शतक मारले आणि तो सामना जिंकलो की सामनावीर त्याचेच. बरेचदा पहिली गोलंदाजी करताना सामना बॉलरने सेट केलेला असतो. ३०० च्या पिचवर २६०-२७० ला रोखले असते. पण वनडे फॉर्मेटमध्ये कसोटीशी तुलना करता गोलंदाजात सहसा कोणी एक स्टँड आऊट परफॉर्मन्स नसतो तर प्रत्येकी १०-१० ओवर टाकणार्या बॉलिंग युनिटचे हे काम असते. याचमुळे कसोटीत गोलंदाजांना जितके सामनावीर मिळतात तितके एकदिवसीयमध्ये मिळत नाहीत. असो, तर होते काय, त्यामुळे नंतर हे गोलंदाजांनी सोपे केलेले टारगेट आरामात चेस करताना जो टॉप ऑर्डर फलंदाज शतक मारतो तो सामनावीर पटकावतो. झिम्बाब्वे बांग्ला केनिया अश्या दुबळ्या संघांविरुद्ध तर हे हमखास बघायला मिळते. मागच्या फलंदाजांना जास्त संधी तेव्हाच मिळतात जेव्हा फलंदाजीत आव्हान जास्त असते. मलई खाणे त्यांच्या वाट्याला कमीच येते.
त्यामुळे धोनीने कित्येक फिनिशरचा रोल निभावत जिंकवून दिलेले सामने त्याच्या सामनावीरात नसतील.
यात आणखी एक मुद्दा म्हणजे धोनी कीपर होता. एखादा युवराज आपल्या अष्टपैलू कामगिरीने सामनावीर पटकावतो तसे कीपर बाबत घडत नाही. म्हणजे दुर्दैवाने म्हणा किंवा लिमिटेशनमुळे म्हणा चांगल्या किपिंगचे मूल्यमापन करून ते सामनावीर पुरस्कार देताना विचारात घेणे असे होत नाही, होऊ शकत नाही. अर्थात हेच कप्तानीलाही लागू. त्याच्या कीपींग आणि कप्तानीने जो विजयात वाटा उचलला असतो तो देखील नुसते सामनावीर मोजायचा निकष लावल्यास त्यात कधी काऊंट होणार नाही.
असो,
पण तरीही त्याचे सामनावीर बरेच असावेत. किंबहुना मालिकावीरही बरेपैकी असावेत असे मला वाटते. हि आकडेवारी शोधायला आवडेल. या विकेंडला चेक करतो.
काही खेळाडूंच्या खेळामुळे संघाला फिनिशरची जरूरच लागायची नाही त्याचे काय. रिचर्डस, सचिन वगैरे. >>>> मुळात फिनिशर धोनीची लाईन मोठी करायला टॉप ऑर्डर फलंदाज सचिनची लाईन छोटी दाखवायची काही एक गरज वाटत नाही मला. सचिन ग्रेट होताच. टॉप ऑर्डर ग्रेट असल्यास फिनिशरची गरज तुलनेत कमी लागणे स्वाभाविकच आहे. पण लागतच नाही हे शक्य नाही कारण शतके वा मॅचविनिंग खेळी दर सामन्याला येत नाही.
क्रिकेट हा जितका तंत्राचा खेळ आहे तेवढाच वा किंबहुना त्यापेक्षाही जास्त टेंपरामेंटचा खेळ आहे. आणि ते सर्वाधिक टेस्ट होते ते प्रेशर सिच्युएशनमध्ये. तुम्ही कितीही क्लासिकल फलंदाज असला, पुस्तकातले सारे शॉट तुमच्या भात्यात असले, दहाही दिशांना तुम्ही सहज खेळत असला तरी जेव्हा सामना शेवटाला जातो, चेस करताना प्रेशर सिच्युएशन येते, तेव्हा तेच शॉट खेळताना तुमचे हातपाय तुम्हाला साथ देत नाहीत. आणि हे भल्याभल्या फलंदाजांबाबत होते. त्या प्रेशरशी डील करताना ज्याच्या खेळावर शून्य फरक पडतो तो खरा फिनिशर. जगातल्या सर्व टॉप ऑर्डर दिग्गज फलंदाजांचा आदर करून हे नमूद करतो की तुम्ही आपल्या तडाखेबाज खेळाने १५० चेंडूत २०० धावा ठोकून एखादा ३०० चा चेसही ४०-४५ ओवरमध्ये सामना क्लोज होऊ न देताच संपवत असाल. हा तुमचा ग्रेटनेस मान्य आहेच. पण तेच जर तुम्हाला थेट दहा ओवर ७०-८० असताना मैदानात उतरवले तर त्या सिचुएशनला तुम्ही कसे खेळता हे तुमचे अंडर प्रेशर परफॉर्म करायचे कॅरेक्टर डिफाईन करते. तिथे वेगळाच खेळ होतो. तिथे वेगळेच स्किल लागते. ते तुमच्यात असूही शकते आणि नसूही शकते. फक्त तुम्ही टॉपा ऑर्डरला खेळत असल्याने ते कधी टेस्ट झाले नाही.
नंतर मी सावकाश काही उदाहरणेही देतो
@ चॅपेल
@ चॅपेल
खेळाडूत फूट पाडून आपली जागा घट्ट करण्याचा तो प्रयत्न होता.
>>>>>>
खेळाडूंची चापलूसी करूनही हे शक्य होते. असो, सगळेच खरे काही बाहेर येणार नाही. त्यामुळे सर्व चर्चा अंदाजांवर आणि वैयक्तिक मतांवार्च राहील.
चॅपेलच्या नादाला लागून द्रविडसारखा सज्जन माणूसही बिघडला होता असे माझे मत आहे.
>>>>
बिघडला कश्याला म्हणत आहात हे कळले नाही.
पण द्रविडने सचिनला १९४ ला थांबवले तेव्हा चॅपेल होता का?
द्रविड स्वतःच एक खतरनाक माणूस आहे
असे अगणित परिस्थितीजन्य
असे अगणित परिस्थितीजन्य महत्वाचे घटक खेळाडूंची तुलना करतांना लक्षात घ्यावे लागतात ( जें अशक्यप्राय आहे), म्हणूनच अशी तुलना करणं टाळावं असं मला वाटतं. खेळाडूंच्या खेळातलं आपल्याला काय भावतं , काय खटकतं तें सांगून मोकळं व्हावं, हें उत्तम !
कुणी मॅन ऑफ द मॅच अॅवॉरड्स,
कुणी मॅन ऑफ द मॅच अॅवॉरड्स, प्लेयर ऑफ द सिरीज जास्त पटकावली आहेत हे बघा. Happy हा निकश कालातीत आहे.
>>>>
अर्थात या आकड्यातही किती फोलपणा असतो हे मुद्दे वर मांडले आहेत. पण आता थोडे आकडेही बघून आलो. वर म्हटल्याप्रमाणे टॉप ऑर्डर फलंदाजांचाच जगभरात बोलबाला आहे आणि गोलंदाज तर म्हटल्याप्रमाणे जणू अस्तित्वातच नाहीयेत.
प्लेअर - सामने - सामनावीर - टक्केवारी
कोहली - २५६ - ३६ - १४.१
सचिन - ४६३ - ६२ - १३.४
दादा - ३११ - ३१ - १०.०
रोहीत शर्मा - २२७ - २१ - ९.३
गंमत म्हणजे ओपनिंगला येणार्या सिद्धूचेही आकडे भारी आहेत
सिद्धू - १३६ - १३ - ९.६
धोनीचा क्रमांक येता येता
धोनी - ३५० - २१ - ६.०
पण त्याच क्रमांकाचा आणि त्याच फिनिशर रोलचा बेवन
बेवन २३२ - १२ - ५.२
वर द्रविडचा विषय होता म्हणून...
द्रविड - ३४४ -१४ - ४.१
धोनीच्या पुढे येत असूनही धोनी याच्या दिडपट आहे.
मालिकावीर पाहिले तर आणखी ईंटरेस्टींग आकडे मिळाले,
प्लेअर - मालिका - मालिकावीर - टक्केवारी
कोहली - ६० - ९ - १५.०
सचिन - १०८ - १५ - १३.९
दादा - ७५ - ७ - ९.३
रोहीत शर्मा - ६० - ५ - ८.३
गंमत म्हणजे ओपनिंगला येणार्या सिद्धूचेही आकडे भारी आहेत
सिद्धू - ४२ - ४ - ९.५
धोनीचा क्रमांक येता येता
धोनी - ८० - ७ - ८.८
पण त्याच क्रमांकाचा आणि त्याच फिनिशर रोलचा बेवन
बेवन ४२ - १ - २.४
धोनीने बेवनला दोन्हीत मागे टाकलेय. मालिकावीर तर कित्येक दिग्गज टॉप ऑर्डरला लाजवणारे आहेत
वर द्रविडचा विषय होता म्हणून...
द्रविड - ८३ - ० - ०
द्रविडला एकदिवसीयमध्ये एकही मालिकावीर नाही.
हेन्स प्रूवड म्हणूया का आता?
द्रविडला एकदिवसीयमध्ये एकही
द्रविडला एकदिवसीयमध्ये एकही मालिकावीर नाही. >> द्रविडला एक दिवसीय सामन्यांमधे तुलना करण्यासाठी आणणे इथेच सगळे पेंड खाते. मला वाटले की द्रविड च्या एक दिवसीय सामन्यांबद्दल विषय नसून तो कप्तान असताना झालेल्या सक्सेसफुल चेस च्या विषयातून धोनीचा फिनिशर असा विषय निघाला होता. उद्या ह्याच न्यायाने नोएल डेव्हिड द्रविडपेक्षाही उच्च बॉलर होता असेही प्रॉव्ह करता येऊ शकेल
असे अगणित परिस्थितीजन्य महत्वाचे घटक खेळाडूंची तुलना करतांना लक्षात घ्यावे लागतात ( जें अशक्यप्राय आहे), म्हणूनच अशी तुलना करणं टाळावं असं मला वाटतं. >> + १
बाकिची बिर्याणी एन्जॉय करा. > >विक्रम हे आवडले नि तसेच केले. सामनावीर वाला मुद्दा फारसा पटला नाही पण एकूण पोस्ट आवडले.
असामी, प्लीज नॉट अगेन..
असामी, प्लीज नॉट अगेन.. तुम्ही माझ्या पोस्टच्या आधी कोट केलेले वाक्य पाहिले का?
तुम्ही माझी दुसऱ्याशी दुसऱ्या विषयावर चालू असलेल्या चर्चेत मध्येच आपली चर्चा घुसवत आहात. असो शुभरात्री
तुम्ही माझी दुसऱ्याशी दुसऱ्या
तुम्ही माझी दुसऱ्याशी दुसऱ्या विषयावर चालू असलेल्या चर्चेत मध्येच आपली चर्चा घुसवत आहात. >> मी तुझ्या बोल्ड केलेल्या वाक्यावर टिप्पणी केली आहे. तू मोठे पोस्ट लिहून शेवटी बोल्ड तर्जुमा दिला आहेस. कुठेही हे उपहासाने किंवा विनोदाने केले आहे असे म्हटलेले नाही. पब्लिक बाफ असल्यामूळे मला त्यावर उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे.
तुमचा उत्तर द्यायचा अधिकार
तुमचा उत्तर द्यायचा अधिकार मारत नाहीये. ईतर दोघांची पुर्ण चर्चा न वाचता मध्येच काही भाग वाचून चुकीचा संदर्भ लाऊन बोलत आहात त्याबद्दल बोलत आहे.
आता सामनावीराच्या पोस्टला द्रविडच्या कर्णधारपदाचा संदर्भ जोडाल तर कसे चालेल
ECB came up with the much
ECB came up with the much-waited answer as they declared that the final match of the series will be played from July 1 to 5. This will be followed by the already scheduled T20 and ODI series.
आता सामनावीराच्या पोस्टला
आता सामनावीराच्या पोस्टला द्रविडच्या कर्णधारपदाचा संदर्भ जोडाल तर कसे चालेल >> तसाच जसा द्रविडच्या कर्णधारपदावरून तू धोनीच्या फिनिशरचा लावला होता तसाच
ECB came up with the much-waited answer as they declared that the final match of the series will be played from July 1 to 5. >> हो फक्त नवीन सिरीज धरणार की पाचवी मॅच हे कळले नाही. कसेही असो आपण पहिली ंएच डेवाला ह्या न्यायाने निकाल आपल्याला आधीच माहित आहे. त्यापेक्षा अजून वन डे सामने द्यायचे लीसस्टर्शायर ला
Pages