युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

बिन उपासाची साबूदाणा खिचडी करा, त्यात कांदा आणि मटार वगैरे घाला आणि शेंगदाणे चटणी घाला दाणेकुटाऐवजी आणि संपवा.

आमच्याकडे विकत आणली आहे सोलापुरी. मी अजिबात खात नाही, नवरा आवडीने घेतो पण त्याला तोंडीलावणे कमी हवं असतं. नाही संपली तर मी सा खि करेन आणि संपवेन.

बाकी इतर सर्वांनी छान उपाय सांगितले आहेतच.

बेगल टोस्ट करुन त्यावर क्रिम चिज आणि लसणाची चटणि पसरुन फार भारी लागत.
मेथिचा घोळाणा/पचडि मधे.
मेथिच्या कोरड्या भाजित घालुन सन्पेल.
गरम भाकरिचा पापुद्रा काढावा त्यावर चटणि पसरावी,थोड तेल टाकाव आणी मिटक्या मारत खाव.
पापडाच्या चटणित तर अशक्य भारी लागेल.

मुळात शेंगदाणे चटणी उरतेच कशी, म्हणते मी.
हे म्हणजे 'पावभाजी उरली' किंवा 'मॅगी उरले' यासारखे आहे Happy
वरण भात शेंगदाणे चटणी मस्त लागते.

मॅगीवरून आठवले

एकदा कुठेतरी एक नवीन नूडल्स पॅक घेतला होता, त्यात मसाल्याबरोबर एका पुडीत शेंगदाण्याचा एक चमचा कूट होता, तो मस्त लागला होता

आमटीत किंवा कोणत्याही भाजीत ढकलणे

नाहीतर अजून थोडी अळू आणून त्याच्या फदफद्यात जुनी आणि नवी दोन्ही दांडकी ढकलणे

>>> देठाची सालं काढून कुकरमध्ये उकडून दही, मिरची मीठ घालून देठी करायची
+१

पुरण जास्त गोड झाले आहे. गोडवा कमी करण्यासाठी काय करावे?

फ्रीजरमध्ये पुरण किती दिवस चांगले रहाते?

पुरण फ्रीजर मध्ये ठेवून नंतर पोळ्या करणे बरे की पुरणपोळ्या करून फ्रीजर मध्ये ठेवणे बरे?पुरणपोळ्या फ्रीजमध्ये कशा store करायच्या?

खूपच प्रश्न पडले आहेत! धन्यवाद!

डाळ शिजवून,वाटून मिसळता येईल किंवा बेसन कच्चटपणा जाईल इतपत भाजून. आठेक दिवस पुरण ठेवलं आहे. मुलीला पार्सलपाठवते ती चारपाच पुरवून खाते.

खूपच प्रश्न पडले आहेत!
<<
पूर्ण-पोळी हा डाळीचे प्रोटीन, इन्स्टन्ट एनर्जी गूळ, गव्हाचे कार्ब्स, अन तुपातले फॅट्स असे मिळवून बनवलेला खास प्रवासाला नेण्यासाठीचा आयटम आहे.

फार जास्त ऊन्हाळा नसेल तर तयार पोळी हवेशीर डब्यात ८ दिवस आरामात टिकते.

पुरण पोळी फ्रोजन करुन कितीही दिवस टिकू शकते. खरब होण्याची स्टेज येण्या आधी संपली तर हा जास्त रिअलिस्टिक प्रश्न आहे Proud
उत्साह असेल तर पुपो करुन फ्रीज बेस्ट. एकदाच काय तो त्रास मग फक्त माज! Happy
फ्रीज मध्ये ८ -१० दिवसावर टिकणार नाही कदाचित. पण फ्रोजन केली की आयत्यावेळी मावे मधुन गरम केली की हव्वी तेव्हा पुपो. पहिल्यावेळी आम्रविकेला आलेलो तेव्हा आईने दिलेल्या पुपो पुरवुन पुरवुन दोन महिने ढकलल्या होत्या.

फ्रीझर मधे पुपो कितीही टिकतील. एका डब्यात २ पुपोच्या मधे मधे बटर पेपर घालून ठेव. छान राहतील. पण फ्रीझ - थॉ - आणि पुन्हा रीफ्रीझ असे करू नये. थॉ केल्या तर लगेच संपवाव्या.

धन्यवाद सगळ्यांना!

सध्याचे lockdownमुळे हाताशी असलेला वेळ पुपो करून सत्कारणी लावणार! 5 किमी परिघात रहाणाऱ्या 2 मित्र कुटुंबांना डबे पण पोहोचवता येतील.

ढोकळा समजून खा

केचप नैतर चटणी घालून खा,

नैतर त्याचे तुकडे करून फोडणीत फ्राय करा , इडली फ्राय सारखे

पुरणपोळीचा साबांच्या मैत्रिणीचा किस्सा -
एका वर्षी त्यांनी त्यांच्या अमेरिकेत असलेल्या मुलीला स्वहस्ते करून ३०-४० पुपो पाठवल्या, देवदयेने त्या अगदीच नीटपणे अमेरिकेत पोचल्या. लेक पुरवून पुरवून खात होती.
९-१० महिन्यात व्हिसा मिळाला तर या काकू तिकडे गेल्या. लेकीने मोठ्या उत्साहाने पुपो वाढली पानात. तिचा पुपो करायचा उत्साह आणि उरक बघून काकू खूष! ''माझ्यासारख्याच जमल्यायत तुला" म्हणून पुढचा घास घेईपर्यंत "तू गेल्या वर्षी पाठवलेल्या आहेत या" हे ऐकून अक्षरशः त्यांचा घास हातात तसाच राहिला!!

Pages