युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

मला पण कन्फ्युज झालेलं पुण्यात एक किबे वाडा आहे तो आठवला. कुक त कुक ( घ्या अजून एक शॉर्‍ट फॉर्म)

प्रभात थिएटर चं काही वर्षांपूर्वी बदललेलं नाव आहे ना किबे लक्ष्मी चित्रपटगृह?
मला पिबे वाचल्यावर पिझ्झा बेसच आला डोळ्यासमोर
आवडती वस्तू असल्याने मी मनाने अलरेडी तिथे जाऊन भाज्या परतून चीज किसत होते Happy

शहाणी अनु ती.

मोबाईलवरून लिहिताना (ऑटो करेक्ट टाळून ) कंटाळा आला.मग shortfom बरा वाटला.

मला पण लहान पणी आईने बनवलेला पिझा आठवला. यीस्ट आणण्या पासून तयारी करून दोन बारके पिझे बनलेले. तेव्हा फ्लावर कॅप्सिकम भाज्या पण नाविन्य पूर्ण होत्या. चवही नवीन. खोलगट तव्यात पिझा ठेवुन वरून साधे झाक न्ण मध्यम आच. पाच सात मिनिटे. चीज पन घरात त्या निमित्ताने पहिल्यांदाच आलेलं जबरी नवी चव होती.

आज फ्रायडे नाइट पिझा नाइट फ्रेंड्स रियुनिअन.

करून पाहिला. सर्व भाज्या शिजवून घेतल्या . मग पिझा बेसला खाल्च्या बाजूने बटर लावूनम, वर भाज्यांचा थर, त्यावर चीझ..!
मस्त बनला होता.
मागच्या पानावर म्हट्ल्याप्र्माणे घरभर दरवळ नुसता..!

जरा जाडसर आणि किंचित कडक झालेला फोकाशिया टाईप चा bread आहे. त्याचं काय करता येईल? Hya वेळेला जास्त वेळ ठेवला गेल्याने थोडा कडक झाला आहे. पिझ्झा होणार नाही. स्ट्राटा एक ऑपशन आहे. अजून काही karata येईल का?

तुकडे करून पुन्हा बेक करून कुरकुरीत करायचे. हे तुकडे सॅलड, सूप मघे घालता येतील. तरीही नाही संपले तर त्याचा चुरा करून (bread crumb) वापरायचे.

ब्रेड क्रंब किंवा कॄतॉ न बनवून वापरता येइल. किंवा रुंदीतून अर्धा कापून म्हणजे पातळ होईल बटर लावून भाजुन घ्या वर सँडविचेस करता येतील एक दोन.

शाही तुकडा हा एक हाय कॅलरी बेत होउ शकेल. रेसीपी मिळेल.

किंवा ब्रेडचा दहीवडा ही आपली मध्यम वर्गीय रेसीपी.

ब्रेड गार पाण्यात बुडवुन ठेवा. मग काढून अल्युमिनम फॉईल मध्ये गुंडाळून ३०० डिग्रीला एक दहा मिनिटे बेक करा. ओव्हन प्रिहीट करू नका.
क्रस्ट हवा असेल तर फॉईल मधुन काढून परत थोडा वेळ ठेवा.
हे दोन दिवस घरात राहिलेल्या आणि दगड झालेल्या... जो हातोड्यानेच तोडावा लागेल... फ्रेंच बगेटला केलेलं आणि छान झालेला.
फोकाशिआचा इतका दगड नाही होणार. सो पाणी आणि तापमान थोडं ट्युन करुन प्रयोग करा.

आपल्याकडे देशात हक्का नूडल्स साठी ज्या नूडल्स मिळतात/वापरतात त्या इथे अमेरिकेत कुठल्या नावाने / कुठल्या ब्रँडच्या मिळतात? किंवा ती चव येण्यासाठी कुठल्या नूडल्स घ्याव्यात?

कॉस्ट्को मध्ये ए-शा >> बहुतेक सध्या १८ तारखे पर्यंत सूट दिसते आहे. घेऊन येतो. चिंग्ज वर कही रिव्ह्यु म्हणतात की एक्सपायर्ड पाकिटे येतात त्यामुळे इंग्रो मध्ये मिळाल्या तर पाहू.

हो, एक्स्पायर्ड पाकिटे आली तर तक्रार करायची मग नवी पाकिटे देतात. जुनी परत द्यावी लागत नाहीत. नूडल म्हणजे गहू/मैदा व मीठ असलेली शेवईच. ती एक्सपायर होत नाही, फक्त मसाला काय केमिकल्स मिसळत असतील त्यामुळे एक्सपायर होतो असा माझा बाळबोध हिशेब. तो नाय वापरायचा. (किती तो चिक्कूपणा माझा... आणि लिहायचा कशाला इथे पण अन्न फेकवेना.)

आम्ही पण चिंग्स वापरतो. हाका नुडल्स एकदम इन्डियन चायनीज रेस्टॉमधे मिळतात तसे होतात.

धनि, आमच्या इंग्रोमध्ये एकेकाळी मेल्याहून मेलेली पाकिटं मिळायची, तुमच्या इथे काय तर्‍हा आहे ते बघून घे म्हणजे नक्की किती जुना माल खाल्ला असता पोट दुखत नाही ( किंवा दुखतं) समजेल Proud

सिंडी Lol
आमच्या इथे इंग्रोमधे चिंग्जची पाकिटं दिसलेलीच नाहीयेत Sad आता या मुद्द्यावरून तलसाच सोडावं की काय असा विचार करते आहे Proud

अ‍ॅमझोनवर ६००ग्रॅम चं एक पाकीट जवळपास पावणेनऊ डॉलर्सना आहे. लूट मचा रख्खी है! त्यापेक्षा हक्का नूडल्स न खाल्लेल्या परवडतील.

अर्रे काय धमाल हसलेय... मज्जा चालु आहे इकडे एकदम!

पिबे, किबे, खालून बटर, खरपूस, मेल्याहून मेलेली पाकिटे, पोटदुखी हहपुवा झाली.

सिंपली एशिया नावाचा ब्रँड मिळतो वॉलमार्ट्/क्रोगर मध्ये. त्यांच्या नुडल्स ट्राय केल्यात का ? >>> नाही केल्या. पण होपफुली या मिळतील इथे. शोधते या वीकांताला.

@Jui.k: 180°C for 10 minutes for a crispy base; otherwise 150°C is also fine.

ही पोस्ट उगीच करमणूक म्हणून - एकादशी स्पेशल.
घरातली सगळीच उपास करणार असतील तेव्हा जास्त उपयोगी.

सकाळी साबुदाणा खिचडी करायची तेव्हाच एखादी वाटी उरेल या हिशेबाने करायची. दुपारला जेवायला वरी तांदूळ-दाण्याची आमटी करतानाही दोन्ही मिळून अर्धी-पाऊण वाटी उरलं तरी चालेल अशा बेतानेच करायची. बटाटा भाजीसुद्धा जरा चढीच झाली तरी चालेल. संध्याकाळला सगळं मिळून २ वाट्यांच्या वर जरासं राहिलं असलं की नीट रूम टेंपरेचरला आणून (फ्रिजात ठेवलं असाल दुपारी जेवल्यावर.. एकादशीचा उपास 'लागला' असं होऊ नये म्हणून अंमळ झोपही काढली असाल ना मधे.... ) त्यात उपास भाजणी घालायची बसेल तेवढी. ही सोपी असतेच घरी करायला. आता दाणेकूट अजिबात न घालता बारीक चिरलेली कोथिंबीर (तुम्ही उपासाला खात असाल तर), दही जरासंच, कारण दाण्याच्या आमटीचा ओलावा असेलच, आणि बाकी जिरेपूड-मीठ, गरज असेल तर हिरवी मिरची किंवा तिखट घालून थालिपीठाचं भिजवून ठेवायचं. मस्त खरपूस खमंग थालिपीठ होतं आणि उरलेलं संपवणे, नवीन काही पदार्थ करावा लागणे आणि तो पुन्हा उरला तर काय ही चिंता हे सगळं बायपास होतं! Wink

भाजणी - अख्खा राजगिरा एक वाटी शिगोशीग भरून, वरी तांदूळ एक वाटी शिगोशीग भरून, साबुदाणा पाऊण वाटी. (ओगले आजींच्या रुचिरात सग्ळे घटक सपाट वाटीच्या समप्रमाणात आहेत, आमच्याकडे पथ्याच्या मंडळींना साबुदाणा जास्त नको असतो.) आधी वरी तांदूळ भाजायचे, मग साबुदाणा आणि जराजरासे करत राजगिर्‍याच्या लाह्या भराभर फोडायच्या. सगळं गार झालं की मिक्सरातून फिरवून डब्यात भरून ठेवायचं. कोरडी भाजणी २-३ महिने टिकते.

एकादशी दुप्पट खाशी ही म्हण सार्थ करायची Proud

Pages