वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ते हास्यजत्रा बघून अजूनही हसू येते.>> मला ही. त्यांचे कंटेंट नवे आणि बरे आहेत.
कपिल शर्मा सारखे पाहुणे सतत येत राहिले तर त्या मार्गावर जाऊ शकते.
समिर चौगुले आणि विशाखा खूप आवडतात..

काल गुड डॉक्टर सिझन पहिला संपवला, शेवटी ग्लासमॅन आणि शॉनचं बॉंडींग खूप छान आहे. मेलेंडेज आणि त्याच्या टीमचं पण चांगले जमलेले बॉंडींग फार आवडले. खुप भाग आहेत पण, थोड्या ब्रेकनंतर दुसरा सिझन बघेन. खुप दिवसांनी छान काहीतरी सापडलंय ही सिरीज म्हणजे.

शान्तीत क्रान्ती मी ऑनलाईन बघितली. पण तिथे ती हिंदी मधे होती. मजा नाही आली. मराठी मधे कुठे बघता येईल?

शान्तीत क्रान्ती बरी आहे. पण त्यातल्या नेहा चे मराठी उच्चार खटकताहेत. अगदी ती गुजराती दाखवली असली तरी.

गुड डॉक्टर मी पण बघतेय..खूप मस्त आहे, मेडिकल बॅ. नसल्याने काही चुका नाही पकडू शकत फक्त Wink
अधुन मधुन रडायला येतय. शॉन च्या भावाचे सीन आले की फार कठीण होउन जाते अश्रू लपवणे.

हो
मी पण खूप रडते त्या भावाच्या सीन्स ना
डॉक्टर ग्लासमॅन मुलीला भेटतात हल्युसिनेशन मध्ये तेव्हा पण धोधो रडले होते.

The baker and the beauty बघतेय Prime वर.
पण ही Israeli series आहे. Prime वर English नाही सापडली.

पण ही Israeli series आहे. Prime वर English नाही सापडली.>>> Netflix वर आहे इंग्रजीमधे

Hmmmm . आमच्याकडे netflix नाही.
पण ठीक आहे, सध्या subtitles ने चालून जातयं.

नेटफ्लीक्स वर the untamed कोणी पाहिली आहे का ? मी सध्या hooked आहे. चायनिझ ५० भागांची आहे. कोणी पाहत असेल तर डिसकस करायला आवडेल.

मी नेटफ्लिक्सवरची क्लीकबेट पाहिली. ८ च भाग आहेत. चांगला सस्पेन्स राखलाय. हळुहळु उत्तरं मिळायला लागल्यावर जरा अस्वस्थ व्हायला झालं (इंटरनेटवर काय होऊ शकते ते माहिती असुन).

क्लीकबेट पाहिली. चांगला सस्पेन्स आहे. पण एक बेसिक चुक वाटली . कोण अस करत आजच्या जमान्यात? कथानकात मस्त ट्विस्ट आहेत.
नेटफ्लिक्सवरच knives out सिनेमा पाहिला. चांगला सस्पेन्स आहे याच्यात पण .

कोटा फॅक्टरी ही वेबसिरीज बघितली . JEE परीक्षेसाठी तयारी करवून करणारे इन्स्टिट्यूटस , तिथले वातावरण, मुलांची result ची उलघाल छान मांडली आहे . पुण्यात इंटिग्रेटेड कॉलेजची सुरुवात कशी झाली , ते कसे फोफावले हे आता लक्षात येते . विशेषतः या वर्षी मुलीची बारावी झाल्याने हे सगळे जवळून अनुभवले आहे.

नेटफ्लीक्सवरचा कुणी Aftermath पाहिला का?
क्राईम हिस्ट्री असलेल्या हॉन्टेड हाऊसमध्ये रहायला जाणे वगैरे नेहमीची कथा आहे.
<स्पॉयलर>
शेवटी त्या घरातल्या ज्या भुताचे (?) दर्शन होते ते प्रकरण भूत्/अमानवीय शक्ती म्हणून दाखवलेय की जिवंत गुन्हेगार व्यक्ती?
शेवटी कपल त्याला ठार मारतात म्हणजे जिवंत व्यक्ती होती असं म्हणावं तर घरात लावलेल्या कॅमेर्‍यां च्या फुटेजमध्ये ती दिसायला हवी होती.
तेव्हा तर त्या फुटेजमध्ये ती कॅप्चर होत नाही असं दाखवलेय म्हणजे ते भूत होतं असं म्हणायचं का?

कोटा फॅक्टरी जुनी आहे बरीच
आता तर दुसरा सिजन येऊ घातलाय
मला तो जितू भय्या खूप आवडला
पंचायत सिरीज आणि अजून एक दोन मुव्हीज मध्येही आहे
एकदम नॅचरल वाटतो

बाकी पोराची कामे पण झकास
लव्ह स्टोरी पण अगदी हळुवारपणे फुलवत नेलीय

तो खूप क्युट आहे
पंचायत मध्ये मेन पात्राच्या बरोबर ऑफिस मध्ये असतो तो ना?
कोटा फॅक्टरी अजून बघायला चालू नाही केली.पण अस्पायरंटस आवडली होती.

>>पण एक बेसिक चुक वाटली . कोण अस करत आजच्या जमान्यात? << +१
सुरुवातीचे एपिसोड्स एंगेजिंग आहेत. पण जसजसं रहस्य उकलत जातं तसतशी मालिका कैच्याकै व्हायला लागते. जणुकाहि, आता ट्विस्ट द्यायचा बरं का, असं मानुन ट्विस्ट आणलेले आहेत... Wink

स्पेशल ऑप्स बघितली. फारच छान आहे. मस्त! Happy
के के मेनन चा हिंमत सिन्ग मस्त. आणी फारुख ही खूपच छान. कुणी बघितली असल्यास मला काही क्वेरीज आहेत.... त्या विचारु का?
सोन्या नक्की मरते ना ? कारण ती शेवटी नामावलीत फोन वर बोलताना दाखविली आहे.
ऑल्सो, जूही चे काय होते...? पोहोचते ना ती?
फारुख ला जूही आवडत असते का?
ती रुहानी पण मस्त दाखवली आहे! व्हेरी टफ अँड डिटरमाईन्ड! नवरा वगैरे असाच नावापुरता......!! Happy

वर्षा, ती खरी व्यक्ती असते. शेवटी उगीच अर्धवट सोडलंय.वारा किंवा भूत किंवा अजुनही कोणी असेल हे पिल्लु सोडलंय. बाकी कॅमेराचा प्रसंग आठवत नाही. कधी होता?

क्लिकबेट मला आवडली होती. काही प्रसंग जरा जास्त वाटले पण ऑनलाईन काहीही होऊ शकतं.

नेटफ्लिक्सवरच सध्या ‘यु’ पहात आहे. आतापर्यंत तरी आवडली आहे. ७ भाग झाले.

Aftermath स्पॉयलर

सुनिधी, ते कपल घरात कॅमेरे लावून घेतात. एका रात्री ती व्यक्ती दिसल्यावर तिची जी धावाधाव व गॅलरीतून उडी मारणे होते ते सर्व कॅमेर्‍यांमध्ये रेकॉर्ड होते पण त्यात ती व्यक्ती कुठेच नसते.

क्लीकबेट बघतेय. ५ भाग बघून झाले. कथानक फार ताणत आहेत उगाच असं वाटतंय पण चालू केलीय तर आता पूर्ण बघेनच.

शांतीत क्रांती बघितली , आवडली. ललित प्रभाकर छान आहे आणि ती शिखा तलसानिया पण.
सोनी लिववरच Potluck नावाची हिन्दी सिरीज आहे. बघतेय.हायफाय घरातील family drama . थोडी over the top आहे, पण बघणेल वाटली. सायरस साहुकार ची commedy नेहमीच subtle वाटते , आवडते. एकेकाळी किट्टू गिडवाणी जाम आवडायची .

Good Doctor चे 3 season मस्त आहेत, चौथाही लवकर यायला हवा Netflix वर ..
5 वा सीझन27 सप्टेंबर पासून सुरू होतोय ना, आपल्याकडे कुठे दिसेल any आयडिया ?

Pages