युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

रंग चांगला डार्क राहतो, आणि गरम पालकांच्या वाफेच्या प्रेशर ने मिक्सर चे झाकण उडून भिंती स्प्रे पेंट होण्याची शक्यता शून्य होते Happy
(आता परवाच मी घाई असल्याने गरम टोमॅटो चे स्प्रे पेंट केले.सुदैवाने अगदी कमी प्रमाणात असल्याने ते 1-2 थेंब भिंतीवरचे लगेच ओल्या फडक्याने पुसले.)
पालकाचा वास कांद्याने थोडा सौम्य होतो.ताजे गरम हिवाळ्यात पावसाळ्यात प्यायला छान लागते.

ताजा पुदिना कसा टिकवावा?
मी पाने निवडून थोडा वेळ पसरून ठेवते. मग tupperware च्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते. पण 2 4 दिवसात ती काळी पडतात आणि खराब होतात.

एक स्वच्छ फडकं ओलं करून पिळून घ्यायचं. पुदिन्याची पानं त्या फडक्यावर पसरवायची आणि फडक्याचा हलक्या हाताने रोल करायचा. हा रोल झिपलॉक पिशवीत किंवा डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवायचा. पण पिशवी किंवा डबा पूर्ण हवाबंद करायचा नाही. एका यूट्यूब व्हिडिओमधे बघितलं होतं हे. मी आता अशीच ठेवते. चांगली टिकतात पानं.

tupperware च्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते. >>>> ते डबे याबाबतीत मलाही नाही आवडत.पेपरमधे गुंडाळून स्टील किंवा श्रीखंडाच्या डब्यात ठेवले तरी आठवडाभर चांगले रहाते.

ही टीप चांगली आहे पुदिना पानांना
एरवी पानांमध्ये पर्सन सेन्सर असल्याप्रमाणे भाजीवल्याकडून घरी आणली की लगेच कोमेजायला चालू होतात.

धन्यवाद वावे आणि देवकी.
हो गया अनु.. किती पण ताजी जुडी आणली तरी दहा मिनिटांनी मान टाकून पडते.

tupperware च्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते.>>>>>> माझी टिकतात पंधरा दिवस पुदिन्याची पानं, टप्परवेअरच्या डोळ्यावाल्या डब्यात (फ्रिजमेट सेट).

ब्लांच केलेला पालक फ्रिझर मध्ये ३-४ महिने ठेवलाय. यापेक्षा जास्त पण राहू शकेल. आम्हाला गरज नाही पडली.
मागे एकदा महिनाभर दर आठवड्याला शेतातून भरपूर कोवळा पालक यायचा. ड्रायव्हर काका, मैत्रिण, शेजारच्या काकू, कामवाली या सगळ्यांना देवूनही माझ्याकडे खूप उरायचा. लगेच सगळा ब्लांच करून ठेवायचे. एका दिवसा पुरता ( पालकाची भाजी किंवा पराठे व्हायचे दर शनिवारी त्यावेळी आमच्या घरी) काढून बाकीचा फ्रीझर मध्ये दोन वेगवेगळ्या डब्ब्यात ( छोटे पोर्शन्स) ठेवायचे. महिनाभरात फ्रिजर मध्ये आठ छोटे डब्बे झाले होते पालकाचे.
पुढचे तीन महिने विकत आणावा लागेल नाही पालक.

गेल्या लोक डाऊन मध्ये नवऱ्याने पुदिन्यावर खूप प्रयोग केले होते. एका कॉफी च्या रिकाम्या बाटलीत पाण्यात मूळे बुडतील अशा प्रकारे पुदिना ठेवून त्यावर एक झीप लॉक पिशवी वरून घालून फ्रीज मध्ये ठेवला होता. १०-१२ दिवस छान राहिला. मधून अधून पाणी बदललं. पण जी पानं पाण्यात बुडत होती ती काळी पडायची किंवा गाळून जायची.
मीठ आणि लिंबू घालून पुदिना वाटून त्याचे क्यूब फ्रीज करून पण झाले. यांचा मात्र रंग बदलला होता. नुसती पानं बर्फाच्या त्रे मध्ये ठेवून त्यावर थोडे पाणी घालून पुदिन्यावाले आईसक्युब केले होते. यात रंग बऱ्यापैकी टिकला होता. लिंबू सरबत केलं की त्यात आम्ही पुदिनावाला बर्फ घालायचो.

मी पुदिन्याची पानं आणि एखादी मिरची, चिमूटभर मीठ घालून सरळ मिक्सर मधून वाटून डीप फ्रिजात ठेवते. पाणीपुरी किंवा चाट करताना चटणी पटकन होते. नाहीतर आदल्या रात्री डीप फ्रिजातून बाहेर काढून चक्क स्वयंपाकघरात खिडकीपाशी ठेवून ते वाटणं साध्या टेंपरेचरला आणून पुदिना कोथिंबीर पराठे. पराठ्यात बरंच वाटण संपतं.

जे काही सांगणार ते सगळ्यांना माहितच असेल म्हणा.
१. पालक पनीर (रेग्युलर मेथड)
२. पालक बटाटा ( पालक पनीर सारखं)
३. पालक पेस्ट करुन पुलाव जस्ट लाईक हैद्राबादी बिर्यानी.
४. चिकन पालक (पालक घट्ट पेस्ट करुन त्यात चिकन पण सुके पातळ नाही)
५. नुसत पालक पेस्ट करुन सुक्या लाल मिरचीची फोडणी द्यायची. भात, चपाती बरोबर.
६. पालक कोफ्ते; पालक पेस्टमधे ताजं पनीर कुस्करुन ( शिजवलेला बटाटापण चालेल) मधे तळलेले काजुचे तुकडे पण टाकता येतील.
७. पालक पराठा; पालक पेस्ट सरळ गव्हाच्या पीठात एकत्र मळुन (एक तिखट हिरवी मिरची वाटुन किंवा बारीक चिरुन टाकलीत तर मस्तच)
८. पालक पुर्‍या. (यात बनवतानाच लाल मिरची पावडर, ओवा, हळद वगैरे टाकलत तर टिकतील आणी नुसत्या खाल्ल्या तरी चालतील)

चिकन पालकची रेसीपी डिटेलात सांगा की. चवीला अगदीच सपक नाही ना लागत. पालक आणि चिकन एकत्र एकावेळी शिजवायचे की वेगवेगळे शिजवून घ्यायचे.

कोणतीही पालेभाजी अधिक प्रमाणात आणली गेली असेल तर ती खुडून निवडून स्वच्छ धुवावी आणि पातळ पंच्यासारख्या कोरड्या कपड्यावर पसरवून ठेवावी. अधिकचे पाणी शोषले गेले आणि भाजी कोरडी झाली की प्रोसेसरवर अथवा कशीही चिरून घ्यावी. मग त्याचे चार पाच किंवा हवे तेव्हढे भाग/ वाटे करून चांगल्या कंटेनर्समध्ये घालून ते फ्रीझरमध्ये ठेवून द्यावे. नंतर पुढे भाजी करताना कढईमध्ये हवी ती फोडणी कांदा वगैरे परतून झाल्यावर फ्रीझरमधला डबा सरळ कढईत उपडा म्हणजे रिकामा करावा. आंच अगदी कमी ठेवून झाकण ठेवावे. एक दोन मिनिटात भाजीचे फ्रीझरमध्ये जे घट्ट गोळे झालेले असतात त्यातले बर्फ वितळून ते गोळे कढईत कोसळतील. मग त्याचे हवे ते करा. आधी thaw करूनही घेता येईल , पण लागलीच वापरायला पाहिजे.
बर्फातली वस्तू घराच्या तापमानाला आणल्याशिवाय वापरू नये हे खरे, पण अधूनमधून चालू शकेल कदाचित.

पालकांची पाने मोठी व व्यवस्थित असतील तर त्याच्या अळूवड्या होऊ शकतात >> अळुवड्या कशा होतील बरे? झाल्याचं वड्या तर पालकवड्या होतील.
पालक सूप करताना छोटा टोमॅटो पण घालावा म्हणतात, जीवनसत्त्व कॉम्बिनेशन साठी. मी घालते, बरा लागतो.

Proud

म्हणजे त्या मेथडने होतील

माझ्याकडे धृतराष्ट्र tapperware आहे. >>> Lol

झाल्याचं वड्या तर पालकवड्या होतील. >>> Lol

पालक सूप करताना छोटा टोमॅटो पण घालावा म्हणतात, जीवनसत्त्व कॉम्बिनेशन साठी. मी घालते, बरा लागतो. >>> हो टेस्टी लागतं हे कॉम्बो, लसूण पण घालते मी.

माझ्या कडे जवळपास पाऊण किलो कॉर्नफ्लोअर आहे.
त्यापासून काय पदार्थ करता येतील म्हणजे कसं संपवता येईल.

Pages