युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

15 डबे मागवले आमर्सचे
त्याने दवाखान्यात पोच केले

10 वाटले , 1 फोडून खाल्ला , चांगला होता , 4 घरी नेले>>>> भारीच की!

घरी 3 चमचे मास्कारपोने चीज उरलंय
तिरामीसु सोडून त्याचा काय वापर करता येईल?काही गोड नसलेली बिस्कीट वगैरे बनतील का?सल्ले द्या.

धन्यवाद
पास्ता कल्पना चांगली वाटते आहे.

पपई छान पिवळी झाली म्हणून कापली तर आतून कच्ची करकरीत आणि पांचट निघाली. तर अश्या पपईचे काय करता येईल?

हो, पण लगेच वापरा. खुप दिवस ठेवू नका. वापरताना वरची चकती कापून टाका.>>>>> हो. आणी सकाळी दुधी करणार असाल तर संध्याकाळी तो किसुन त्याच्या किसात तीळ, ओवा, हिर्वी मिर्ची +लसुण+ आले पेस्ट, कोथिंबीर + एकेक चमचा प्रत्येकी बेसन व कणिक घालुन गोळा करा. त्याची वळकटी कुकर मध्ये १५ मिनीटे उकडुन घ्या . मग बाहेर काढुन गोल चकत्या कापुन तव्यावर फोडणीत शॅलो फ्राय करा. संध्याकाळचा नाश्ता रेडी. मुठिये.

पपईचा पिकलेला भाग खा.
कच्च्या भागाची (जुलियंस बनवुन) हिरवी मिरची लावुन चटणी बनवा. सफेद ढोकळे (ईदडा) बनवुन त्यासोबत किंवा फाफड्याबरोबर खा.

नाचणीचा रवा बनवणार्‍यांनी त्याला आधी आपल्या सध्या रव्यासारखा भाजुन बघितला कां? मे बी तो चिकटपणा येणार नाही. नी नंतर पाणी टाकताना पण अंदाज राहीलच

घरात 1 किलो आख्खे वाल आहेत. काय करता येईल. वालाची उसळ, वाल घालून मसालेभात वगैरे कोणालाच आवडत नाही.
अजून काय बनवता येईल?

इकडे पाठवून द्या Wink
फणसाच्या भाजीत वाल चांगले लागतात. पडवळाच्या भाजीत डाळिंब्या ( मोड आणून सोललेले वाल) छान लागतात.

इकडे पाठवून द्या .....+१.
वालाची आमटी,उसळ अतिशय आवडते आहेत.त्यानंतर वालभात वगैरे

लगेच वापरा. खुप दिवस ठेवू नका. वापरताना वरची चकती कापून टाका. > हो उद्या लगेच उरलेला वापरणार आहे.
रश्मी , मुठिये रेसिपी मस्त !

‘एकमेका साहाय्य करू आणि पोटोबाला तृप्त करू !’ असा हा धागा आहे.
सर्व प्रतिसाद वाचूनच तृप्तीचा ढेकर आला.

सर्वांचे कौतुक !

एक पपई....चिरली तर धड पूर्ण पिकलेली नाही धड पूर्ण कच्ची नाही. अशा पपईचं काय करता येईल?
<<
नॉन व्हेज खात असाल, तर पपई किसून वाळवा, अन त्या किसाची भुकटी करून ठेवा. मटन मॅरिनेट करताना चिमूटभर घाला. मटन फारच मऊ शिजेल. अन लवकर ही.

कच्ची पपई मीट टेण्डरायझर म्हणून फार छान असते. अस्लं मस्त शिज्तं ना मटण! की वा।!!

आत्तापर्यंत आंबेडाळीवर फोडणी गार करून घालत असे पण तूनळीवर काही ठिकाणी गरम फोडणी घातलेली पाहिली. नक्की काय बरोबर आहे? की दोन्ही चालेल?

आंबाडाळ वर गरम फोडणी घातली तर ती जास्त खमंग लागते
त्यातल्या कढीपत्ता, जिरं, भरली मिरचीचा फ्लेवर त्यात मुरतो असं माझं निरीक्षण आहे

गरम फोडणी तेव्हा घालतात जेव्हा डाळ लगेच खायची असेल तर.
ठेवून खायची असेल दुसर्‍या दिवशी वगैरे तर गार फोडणी घाला.

आम्ही गरम फोडणी घालतो. दुसऱ्या दिवशी डाळ उरली फोडणी घातलेली, तर अजूनच छान लागते, असं मला वाटतं .

कच्ची पपई मीट टेण्डरायझर म्हणून फार छान असते. अस्लं मस्त शिज्तं ना मटण!>>> लक्षात ठेवेन. धन्यवाद.

Hebbars किचन वर बन डोसा नावाची रेसिपी पाहिली . त्यात raw rice वापरला आहे . Raw rice म्हणजे नक्की कोणता तांदूळ ? ओले खोबरे आणि पोहे वाटून तांदूळ च्या पिठात घालून वाटायला सांगितले आहे . फरमेन्ट करताना वास नाही ना येणार ? कृपया जाणकारांनी मदत करा .

Raw राईस हा शब्द प्रयोग मी पहिल्यांदा आणि फक्त तमिळनाडू आणि केरळमध्ये ऐकला.
तिकडे बहुतकरून बॉईल्ड राईस (parboiled) वापरतात. म्हणजे तांदुळ साळीत असतानाच तो उकळून वाळवून साळी काढून बनवलेला असतो.
आपण जो नेहमीचा तांदूळ वापरतो, त्याला ते रॉ राईस म्हणतात. पॉलिश्ड, हातसडी, ब्राऊन सगळ्यांना रॉ राईस.

सध्या माझ्याकडे जे जाड पोहे आहेत ते मला अजिबात आवडलेले नाहीत. कांदेपोह्यांसाठी पाण्याने भिजवून निथळले तरी जाड्च, ड्राय राहतायत. मला
ओलसर सॉफ्ट झालेले हवे असतात. त्यामुळे एरवी चांगले होणारे कांदेपोहे आता अजिबात चांगले होत नाहीयेत.
अजून कशाप्रकारे संपवता येतील हे पोहे?

Pages