क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

पुजाराचा क्रमांक 3 असला तरीही इंग्लंडमध्ये त्याला सलामीला असल्यासारखच खेळावं लागणार आहे, असं मला वाटतं. मग थोडासा धाडसी प्रयोग करून त्यालाच सलामीला खेळवून राहुलला क्रमांक 3 वर पाठवलं तर ...

माझ्या मते अशी हवी टीम
1 रोहित
2 पुजारा
3 रहाणे
4 विराट
5 राहुल
6 पंत
7 जडेजा
8 अश्विन
9 सिराज
10 उमेश
11 शमी
पाच गोलंदाज खेळवायचे असतील तर जडेजा ला खेळवावेच लागेल, नाहीतर खूप लांब tail होईल, 2018 मध्ये हरण्यात ते एक महत्त्वाचे कारण होते, बुमराह सध्या फॉर्म मध्ये वाटत नाही आणि मला असे वाटते आहे की इंग्लंड मध्ये उमेश चांगली गोलंदाजी करेल इशांत पेक्षा, राहुल ला खेळवायचे असेल तर 5 व्या क्रमांकावर च खेळवावे अथवा नाही

सचिनच्या काळात बॅट्समन बॉलरला हणायचे पण पुजारा ऑस्ट्रेलियन दौऱ्यात स्वतःला हाणून घेत होता. त्यात भरीस भर म्हणजे लोक्स तो पुजाराचा मार खातानाचा व्हिडिओ आणि बॅकग्राऊंडला तेरी मिट्टी मे मिल जावा गाणं वाजत असलेला व्हिडिओ स्टेटसला ठेवत होते ते आठवलं की अजूनही हसायला येतं. अजून तास दोन तास खेळला असता तर ऑसिज बॉलर्सनी त्याला ऑस्ट्रेलियन मिट्टीतच मिळवला असता.

रोहित, राहुल, पुजारा, कोहली, रहाणे, पंत, अश्विन, सिराज, इशांत, शमी, बुमरा (काल बीसीसीआयनी शेअर केलेला हिरव्यागार पिचचा फोटो पाहून ४ सीमर्स अन एक स्पिनर) >> तेच हिरवेगार पिच बघून मी तीनच बॉलर्स खेळवीन - सिराज, इशांत, शमी. रिकाम्या जागेवर विहारीला आणीन. हिरवे पिच म्हणजे आपल्या बॅटींगचे वांदे असणार, त्यात एक बॅट्समन कमी खेळवून अजून ताप का घ्या ? अशा पिचवर तीन पेसर्स पुरेसे होतील. आपण नेहमी पहिली टेस्ट हरून बॅकफूटवर सुरू करतो ते बहुतेक वेळा बॅटींगच्या कमकुवतपणामूळे. नंतर बहुतेक वेळा ते सुधरत जातात हाही मुद्दा आहे.
पुजाराचा क्रमांक 3 असला तरीही इंग्लंडमध्ये त्याला सलामीला असल्यासारखच खेळावं लागणार आहे, असं मला वाटतं. मग थोडासा धाडसी प्रयोग करून त्यालाच सलामीला खेळवून राहुलला क्रमांक 3 वर पाठवलं तर ...>> पुजाराची तयारी हवी ना त्यासाठी ? आधीच लोक त्याच्या जागेच्या पाठी लागले आहेत तेंव्हा तो त्याला न आवडणार्‍या नंबरवर खेळून आगीतून फुफाट्यात जाणे का पसंत करेल ? तो गरज म्हणून सलामीला आला नि फेल गेला हे कारण कोणी लक्षात ठेवील असे वाटत नाही.

देसाईंच्या १४ जणांमधे १० मुंबई / महाराष्ट्राचे होते.>> अस कधिही झाल नव्हत. किंवा मला आठवत नाही. विश्वनाथ निवडसमितीत असताना कर्णाटकात अचानक रत्नांची खाण सापडली होती हे मात्र आठवतय.
अमोल मुजुमदार, अमित पागनीस, मिलिंद गुंजाळ यांच्या सारखे अंतर्गत सामन्यात खोर्‍याने धावा काढणारे पण महत्वाच्या सामन्यात फेलाटणारे अनेक खेळाडू होउन गेलेत. अमोलची आणि राहूल द्रवीडची तूलना स्वतः अमोलनेही केली नसती.
हेमंत कानिटकरला संधी कमी मिळाली अस मला तरी वाटतय. त्याच्याबद्दलची आठ्वण म्हणजे त्याने विंडीज विरुद्ध पहिल्याच कसोटीत अर्धशतक ठोकल होत (६५ का काहितरी) ११ चौकार, त्यातले ९ लेट कटने थर्ड मॅनला. लॉईडला विचारल्यावर तो म्हणाला मला वाटल तो बीट होतोय. Happy

आज गावसकरांनी रहाणे अ‍ॅसेट समजावे थ्रेट नाही अस म्हणलय (टाइम्स ). रोख कुठे आहे ते स्पष्ट आहे. हे खरोखरच दुर्दैवी आहे.

माझ्या मते अशी हवी टीम
1 रोहित
2 राहुल
3 पुजारा
4 विराट
5 रहाणे
6 पंत
7 जडेजा
8 शार्दूल
9 सिराज
10 बूमरा
11 शमी

शार्दूल ईज इंटरेस्टींग अ‍ॅडिशन विक्रम.

लॉईडला विचारल्यावर तो म्हणाला मला वाटल तो बीट होतोय. >> Happy लॉईड गावस्करच्या लेट कट बद्दल पण असेच म्हणाला असेल वैतागून Wink कानिटकर चा फोर आठवत नाही का ? काय भन्नाट मॅच होती राव ती. मियांदादच्या सिक्सरची आठवण पूर्णपणे मिटवून टाकली होती - ही मॅच, जाडेजा-प्रसादची मॅच नि राजेश चौहान ने पाकिस्तान मधे शेवटच्या ओव्हर मधे फोर किंवा सिक्स मारून जिंकून दिले होते ह्या तीन मॅचेस नी.

रोख कुठे आहे ते स्पष्ट आहे. हे खरोखरच दुर्दैवी आहे. >> +१

बीसीसीआय ने काश्मीर लीग विरुद्ध मसल्स फ्लेक्स केले आहेत हे मस्तच केले. पैशाचा माज दाखवल्याबद्दल आज पहिल्यांदा बरे वाटले. Happy

कानिटकर चा फोर आठवत नाही का ? काय भन्नाट मॅच होती राव ती. >> हो . ते कस विसरेन. Happy पण ते धाकटे कानिटकर - ऋषिकेश

धाकट्या कानिटकरांची मॅच झाल्यावर अनेक वर्षांनी मी आणि एक बहीण भारत-पाकिस्तान कुठली तरी मॅच बघत होतो. परिस्थिती जरा नाजूक होती (नंतर सुधारली). तेव्हा कोणीतरी दुसरंच म्हणालं, की आपण असे एकदम जोशात खेळून हरवलं पाहिजे, तशी मॅचच होत नाही. तेव्हा अगदी एकाच वेळी मी आणि बहीण एकदम उद्गारलो - "आहे! हृषीकेश कानिटकरची मॅच!" आणि जाम भारी वाटलं होतं. (मला आणि बहिणीला कल्पना नव्हती की दोघांपैकी दुसर्‍या व्यक्तीने ती मॅच पाहिली होती.)

ती भारीच होती मॅच. नुसते चवताळून खेळलो होतो आपण. सचिन साकलेन विरुद्ध कसला आक्रमक झाला होता - त्याला अजिबात सेटल होउ द्यायचे नाही अशा थाटातच खेळला होता. त्याने टोन सेट केला नि मग दादा- रॉबिन सिंग नी असा खेचला होता कि फक्त एक विकेत गमावून तिनशे चेस करू असे वाटत होते. मग् नेहमीची पडझड झाली पण कानीटकर ने डोके थंड ठेवून शॉट मारला.

रॉबिन सिंगला पुढे पाठवणे हा एक मास्टरस्ट्रोक होता. दादासोबतची त्याच्गी भागीदारी हा त्या विजयाचा आत्मा होता. पण लोकं आजही कानिटकरचा तो एक चौकार लक्षात ठेवतात. धोनीपूर्व काळ होता तो. तेव्हा पुढचे एकदा गेले की सामने फिनिश होताना बघायची सवय नव्हती आपल्याला.

>>बुमराह सध्या फॉर्म मध्ये वाटत नाही

साधा माणूस, तुमचे बोलणे फारच मनावर घेतलेले दिसतेय बुमराहने Wink

Happy विक्रम चे ऐकून टीम निवडलेली दिसते आहे. Happy

शेवटी अँडरसन - ब्रॉडला बॉलिंग न दिलेली पाहून बरे वाटले. आजचे मरण उद्यावर Happy

आज भारतीय बॉलर्स नी कमाल केली. अश्विन आणि इशांत ह्या दोन्ही अनुभवी बॉलर्स ना बाहेर ठेवणं हा फारच बोल्ड निर्णय होता पण आज तरी त्यांची कमतरता जाणवली नाही.
सिबलीच्या कॅच च्या वेळी पंत ने कोहली ला आग्रह करून रिव्ह्यू घ्यायला लावणं आणि तो रिव्ह्यू बरोबर आल्यावर कोहली ने पंतच्या पाठीवर थाप देणं, ह्या दोन्ही गोष्टी बघताना फार छान वाटलं.

मजा आली मॅच पहायला. कसोटी अजिंक्यपदाच्या सामन्यात संघ निवडीची केलेली चूक सुधारली हे बर झाल. ४ जलद गोलंदाज पाहिजे होतेच. सर की अश्विन हाच प्रश्न होता. सरांच्या क्षेत्ररक्षणामुळे मी त्यांना घेतल होत. बाकी इंग्लंडमधे दोघेही सारखेच. व्यवस्थापनाने पण तोच विचार केला असावा. शिवाय वेळ पडल्यास एक बाजू दाबून इतरांना विश्रांती देण्यासाठी उपयोग. Happy
शार्द्दूल नेहमी महत्वाचे बळी टिपतो.
आता या हवामानात आपली टीम ४०० करेल हा दुर्दम्य आशावाद असतोच आपल्याला. Happy

*पुजाराचा क्रमांक 3 असला तरीही इंग्लंडमध्ये त्याला सलामीला असल्यासारखच खेळावं लागणार आहे, असं मला वाटतं* - माझे हे शब्द खोटे ठरवल्याबद्दल रोहित व राहूल याना मनापासून धन्यवाद !!

पुन्हा एकदा शर्मा थर्टीजमध्ये गेला. सलग तीन वेळा चॅलेंजिंग परिस्थितीत खेळला आणि ईतकी मेहनत केल्यावर मोठी खेळी कॅश करता आली नाही. पण ॲक्चुअली या कंडीशनमध्ये तुम्ही सेट झालाय तर आता गेम सिंपल झालाय तुमच्यासाठी असे काही नसावे. बॉल सातत्याने हलतोय त्याला त्याच निग्रहाने तोंड द्यायचेच आहे.
बॉल जिथे सतत स्विंग होतोय जिथे ईंग्लंड स्वत: १८३ ला गुंडाळली गेलीय तिथे ९७ ची सलामी कमाल.
पहिल्या डावात जर हा ९७ चा लीड आपल्याला मिळाला तर सामन्यात फार पुढे जाऊ.
बाकी आज पुन्हा आमच्या फेसबूक व्हॉटसपग्रूपवर शर्मा टिकाकारांच्या पोस्ट वाचायला मजा येणार Happy

अरेरे! शर्मा पुन्हा एकदा सेशन संपता संपता आऊट झाला. का असं करतो हा माणूस? असामी, तू मागे म्हटल्याप्रमाणे ‘Frustrating to watch’ असं आजही झालं. आपली बॅटींग चांगली व्हावी आणि तीन आकडी लीड मिळावा ही अपेक्षा.

पुजारा आणि कोहली अँडरसनला गेले! शर्माजींनी दार उघडं ठेवलं अन् काय! गेम एकदम रोमांचक झाला.

खेळाडू जेव्हा बॅटिंग करायला येतो तेव्हा नियतीने तो किती बॉल खेळणार हे आधीच निश्चित केलेलं असतं . त्यामुळे तो कसाही खेळू दे बॉलचा कोटा संपल्यावर तो आऊट होणार. त्यामुळे जास्त टेन्शन न घेता ४ ६ मारत बॅटिंग करावी. समांतर मध्ये स्वजो चा सासरा बोलतो तसं खेळावं. अति वेग चांगला नाही तसंच अति संथपणा पण चांगला नाही. जास्त सांभाळून खेळू नये आणि जास्त आक्रमकही होऊ नये.

पुजारा ४
कोहली शून्य
रहाणे ५

९७-० ते ११२-४

या लोकांनी शर्मा राहुलच्या मेहनतीवर पाणी फेरले.

पुजाराला आराम द्यायची वेळ आली आहे.
रहाणे एकदा धावबाद होता होता वाचला, पण पुन्हा झालाच. कसोटीत हातातले बॉल धावणे, सरळ सरळ आत्मविश्वासाचा अभाव.

चुम्माने चौथ्याच बॉलला पुढे येत अँडरसनला बॅट फिरवली. हवा तसा शॉट बसला नाही, पण तीन धावा आल्या.
शास्त्री ते बाल्कनीत बघून हसत होता. म्हणजे हा गेमप्लान आहे. ईंटरेस्टींग

आणि त्यानंतरच्या बॉलला राहुलची स्लिपमध्ये कॅच सुटली...
त्यानंतर ब्रॉडच्या पहिल्याच बॉलला पंतचा चौकार.. पण हा चांगला शॉट.. क्रीजच्या पुढे उभे राहत, स्विंग कवर करत, जमिनीलगत फटका..
मग सिंगल.. मग राहुलचा चौकार.. मग पुन्हा सिंगल
चुम्मा आला आणि सामना हॅपनिंग झालाय.
पण त्याने न्यूझीलंडसारखे खेळू नये. त्याकडे क्षमता आहे टिकून मारण्याची.

शास्त्री ते बाल्कनीत बघून हसत होता. म्हणजे हा गेमप्लान आहे. ईंटरेस्टींग >> पंत त्याच्या नेहमीच्या पद्धतीने खेळतो तेंव्हा काय डीफेंड करायचे नि काय फटकावयाचे हे नीट करतो हे त्याने गेल्या इंग्लंड, डाऊन अंडर दौर्‍यांनंतर दाखवून दिले आहे तेंव्हा असा आचरट पणा नाही केला तर बरे होईल. वेदर पाहता सनी सेशन्स मिळण्याचे चान्सेस कमी आहेत त्यामूळे पहिला डाव अतिशय मह्त्वाचा ठरेल.

शर्माजींनी दार उघडं ठेवलं अन् काय! गेम एकदम रोमांचक झाला. > >अँडरसनचे ते दोन बॉल्स खतरनाक होते. कसा काय करतो हा माणूस देव जाणे. २००४-५ मधे त्याला पहिल्यांदा लिमिटेड ओव्हर्स मधे पाहिलेले तेंव्हापासून तो हे बॉल्स हवे तेंव्हा हुकूमी टाकतोय.

अरेरे! शर्मा पुन्हा एकदा सेशन संपता संपता आऊट झाला. का असं करतो हा माणूस? >> ऋन्मेऽऽष ला विचार. Happy

असामी, पंतबद्दल मी सुद्धा नंतर तेच लिहिले आहे. त्याला स्वत:ला छान मॅच्युरीटी येत आहे. त्याच्याकडून उगाच सतत काऊंटर अटेकची अपेक्षा ठेऊ नये. त्यावर सोडून द्यावे.

@ शर्मा, नेहमीच क्रिकेटप्रेमी त्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात. तो खेळत असतो तेव्हा सारे सुरळीत असते. पण तो जेव्हा बाद होतो तेव्हाच समजते की कंडीशन्स तितक्या सोप्या नसतात.

५० च तरी लीड मिळवून द्या लोक हो.
पण हरकत नाही. लीड मिळाल जरी नाही आणि फरक २०-२५ चा राहिला तरी मॅच हातातून गेली नाही. चौथ्या इनिंगला आपल्याकडे आखाडा असतो तशी परिस्थिती तिथे नसते. त्यामुळे नीट खेळल तर ३०० पण चेस आपली टीम करू शकते.
मॅच एक्दम बॅलन्स्ड आहे आत्ता.

सामना सुरू झाला. पंतने अ‍ॅंडरसनला पुढे येत एक चौकार मारला आणि पाऊस सुरू झाला.
या अँडरसनची बॉलिंग बंद करायला हवी. बॉलिंगला आला की पाऊस पडतो.

Pages