क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

जर हे खरे मानले तर ते घर का भेदी लंका ढाये टाईप्स झाले. गंमत म्हणजे यात लंकाच समोर होती Happy
पण मला तर त्या बातमीत जराही तथ्य वाटत नाही.
म्हणजे त्या चर्चेत द्रविडने असे काहीही ज्ञानवाटप केले नसणार जे चालू मॅचमध्ये भारताच्या विरोधात जाईल.
झालेय काय की सध्या कुठल्याही युवा खेळाडूने काहीही केले की द्रविडशी लिंक जोडून बातमी दिलीच पाहिजे असे एक फॅड आलेय.
त्याच जोशमध्ये हि बातमी दिली गेली आहे. पण यातून चुकीचा अर्थ निघतोय.

*पण मला तर त्या बातमीत जराही तथ्य वाटत नाही.* +!. पुरावा आहे का, मॅचवर परिणाम होईल असा सल्ला द्रविडने त्यावेळी दिल्याचा ? आपल्या खेळाडूनाही परदेशी दिग्गज खेळाडूनी खेळाविषयी सल्ला दिल्याची उदाहरणं आहेतच कीं. उगीच सनसनाटी कांहीं तरी निर्माण करायचं !

ऋन्मेऽऽष ने दिलेल्या बातमीवरून मला एकदम चक दे इंडिया ची सुरूवात आठवली. कबीर खान ने प्रतिस्पर्धी टीम च्या कप्तानाला शेक हँड केले म्हणून तो लगेच देशद्रोही Lol

"हरकत नाही. जी व्यक्ती एव्हढ्या कमी वेळात प्रतिस्पर्धी सांघाचा खेळ उंचावू शकते ती स्वतःच्या संघाचा किती उंचावत असेल ?" - तुझा मुद्दा बरोबर आहे. पण मिडिया स्पेक्युलेशन वरून अंदाज बांधणं अवघड आहे. (कि तो श्रीलंकेला मार्गदर्शन करत होता - 'द्रविडने शनाकाला नेमके काय सांगितले हे कळू शकले नाही. पण एकूणच द्रविड रणनिती आणि गोष्टी कशा हाताळायच्या याबद्दल सांगत होता असे दिसते.'). काही मिनिटांच्या चर्चेतून अगदी मॅच टर्निंग परफॉर्मन्स काढणं म्हणजे द्रविड ची कोचिंग स्किल्स आणि लंकेची लर्निंग स्किल्स फारच द्रोण-अर्जुन लेव्हलची असावीत. Happy

"आकर्षक व आक्रमक असूनही सूर्यकुमार खूपच भरवशाचा फलंदाज वाटतो." - सहमत. फक्त मला 'असूनही' म्हणजे काय हे नक्की कळलं नाही. कदाचित लिमिटेड ओव्हर्स मधे यशस्वी होण्याचे attributes असूनही तो टेस्ट मधे यशस्वी होऊ शकेल अशी आशा वाटते अशा अर्थानं म्हणायचं असावं. त्या अर्थानं देखील योग्य आहे.

पण मिडिया स्पेक्युलेशन वरून अंदाज बांधणं अवघड आहे. ( >> त्याने अगदी साधे काहीतरी पण संगितले असू शकते रे - तुझ्या डाव्या बुटाची नाडी सुटली आहे असे Wink जोक्स अपार्ट, मला त्याच्या बद्दल अजिबात शंका नाही त्यामूळे तो लंकेला एक गोश्ट सांगेल तर भारतीय संघाला १०० सांगत असणार ह्यात शंकाच नाही त्यामूळे मूळ मुदलालाच काडिचीही किम्मत नाही एक क्लिक बेट पोस्ट वगळता.

स्काय आवडत असूनही मला स्वतःला ही चुकीची मूव्ह वाटतेय. विहारि, राहाणे, राहुल असताना अजून एक अ‍ॅड करण्यामागचे कारण समजले नाही. खर तर आवेश खान, सुंदर ह्यांना रीप्लेस करणार असे बघता एखादा अजून बॉलर विशेषतः भुवीसारखा जो इंग्लंड साठी अधिक सूटेबल ठरेल परत थोडिफार बॅटींग करू शकतो ( त्याच्या फिटनेस वर प्रश्न आहे हे माहित आहे पण तो आय्पील नंतर आता हि सिरीज खेळतोच आहे) अधिक योग्य ठरला असता. किंबहुना स्काय ला लिमिटेड सिरीज ची तयारी म्हणून नेत असू तर तो जाणारा तिसरा खेळाडू हवा होता.

कबीर खान ने प्रतिस्पर्धी टीम च्या कप्तानाला शेक हँड केले म्हणून तो लगेच देशद्रोही Lol
>>>>>>>

म्हणजे आता स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणनार वर्ल्डकप द्रविडच्या कोचिंगखाली Proud
सुपरओवरला मॅच जाणार, मिताली राज मैदानात उतरून एक चौकार मारणार आणि कॉमेंटरीला रवी शास्त्री बोलणार, और शायद ईसी को एक्पिरीअन्स कहते है.. चीअर्स !!!

असामी, सूर्यकुमारला रहाणे चं कव्हर म्हणून निवडलंय. रहाणे हॅमस्ट्रिंग च्या दुखापतीमुळे प्रॅक्टीस मॅच खेळला नव्हता.

हे तर अजूनच ऑड आहे . दुखापतीमुळे दौर्‍याबाहेर गेलेले तिघेच आहेत - गिल, आवेश खान नि सुंदर. राहुल म्हणून पाचव्या क्रमांकावर खेळला आधीच्या सामन्यामधे - राहाणेचे कव्हर म्हणून. राहाणे मोस्ट्ली फिट होइळ असेही म्हटलय अरुण ने म्हणजे इंजरी सिरीयस नसावी कि चारही सामने खेळू शकणार नाही.

द्रविडने शनाकाला नेमके काय सांगितले हे कळू शकले नाही. पण एकूणच द्रविड रणनिती आणि गोष्टी कशा हाताळायच्या याबद्दल सांगत होता असे दिसते.
>>कायपण छापतात.. फेकायची काय लिमिट...

द्रविडला विनाकारण डोक्यावर चढवलाय. काय नाही येत त्याला. त्याला ताबडतोब सगळ्या पदांवरून काढायला पाहिजे नाहीतर सगळ्यांना तो त्याच्यापेक्षा टुकूटुकू खेळायला शिकवेल.

आज ११ च खेळाडू उपलब्ध होते. सैनी ला एकही ओव्हर दिली नाही ह्यावरून तो केवळ कोरम भरण्यासाठी खेळला कि काय असा प्रश्न पडला. १९ व्या ओव्हरमधे भुवनेश च्या हातातून निसटलेल्या फुलटॉस ला गेलेली सिक्स निर्णायक ठरली. नाहीतर हा स्कोअर सुद्धा डिफेंड केला असता असं वाटून गेलं. उद्या संजू सॅमसन त्याच्या करियरमधली सगळ्यात महत्वाची मॅच खेळणार आहे.

उद्या संजू सॅमसन त्याच्या करियरमधली सगळ्यात महत्वाची मॅच खेळणार आहे. > > दुर्दैवाने हे खरे ठरले रे.

धवनची कॅप्ट्न्सी फारशी ईम्प्रेसीव्ह नाही. सकारिया पहिल्या ओव्हर्स पासून ऑफ वाटत असतानाही नि पिच स्लो बॉलर्स साठी टेलर मेड आहे हे दिसत असतानाही नितिश राणा ला न वापरणे झेपले नाही.

भारत A - 55-6 !!
फिरकीने आपली मस्तच फिरकी घेतली !!

तरुण भारतीय फलंदाज फिरकीच्या खेळपट्टीवर फारच उघडे पडतात, सुर्यकुमार यादव आणि काही प्रमाणात श्रेयस अय्यर हेच फिरकी चांगली खेळतात. बाकीचे फारच चाचपडतात

"दुर्दैवाने हे खरे ठरले रे." - the best he can do now is hope to make a career for Rajasthan Royals in IPL. आऊट होण्याचं दु:ख आहेच. पण इतका ऑर्डिनरी पद्धतीनं? त्याने स्वतःच्या टॅलेंट ला न्याय च दिला नाही.

"तरुण भारतीय फलंदाज फिरकीच्या खेळपट्टीवर फारच उघडे पडतात" - तरूण च कशाला, अगदी रहाणे, कोहली, शर्मा सुद्धा चाचपडतात. हे तर खूप मोठं दु:ख आहे. ज्या भारतात एके काळी शेन वॉर्न ला रणजीपटू अमित पागनीस ने धूतला होता, तिथे आज-काल लेग-स्पिनर (रिस्ट-स्पिनर - 'साला नाव बदलले म्हणून काम सुधारते का" इत. पेस्तन काका Happy ) समोर आला हे कळलं की च बॅट्समन predetermined शॉट्स खेळायला लागतात. शेन वॉर्न आज असता तर १,०००-१,५००० विकेट्स तर सहज काढून गेला असता. आपल्या कुंबळे ने सुद्धा १,००० चा पल्ला गाठला असता.

*तरूण च कशाला, अगदी रहाणे, कोहली, शर्मा सुद्धा चाचपडतात. हे तर खूप मोठं दु:ख* - खरंय. आपलीं पारंपारिक शक्तीस्थळच आपलीं मर्मस्थळं होणं बघवत नाहीं! Sad

ज्या भारतात एके काळी शेन वॉर्न ला रणजीपटू अमित पागनीस ने धूतला होता,
>>
अगदी अगदी...

ऑसी वि. मुंबई : १९९८
तेंडल्या ची पहिली फर्स्टक्लास २०० बहुतेक...
नीलेश कुलकर्णीनी दुसर्‍या इनिंग्ज मधे ५ काढले होते ऑसीज चे

ज्या भारतात एके काळी शेन वॉर्न ला रणजीपटू अमित पागनीस ने धूतला होता,>>> मग त्याला भारतीय संघात का नाही घेतलं?

>> मग त्याला भारतीय संघात का नाही घेतलं?

असे बरेच होते त्याकाळी मुंबईचे, महाराष्ट्राचे ज्यांना फारशी संधी मिळाली नाही.... अमित पागनीस, अमोल मुझुमदार, जतिन परांजपे, सुरेंद्र भावे वगैरे वगैरे!
बहुतेक तोपर्यंत बंगलोरवाल्यांची सद्दी चालू झाली होती.

त्यामानाने जाफर बराच नशीबवान म्हणायचा Happy

रमाकांत देसाई निवड समिती अध्यक्ष असताना कुठल्याश्या टूर च्या आधी संघ प्रपोज करताना देसाईंच्या १४ जणांमधे १० मुंबई / महाराष्ट्राचे होते.
ते पाहून बाकी सिलेक्टर्सचं डोकं फिरलं आणि कितीही डिजर्विंग असला तरी मुंबई / महाराष्ट्राच्याला बसवायचा हे सुरू झालं.

म्हणून त्या वेळच्या काही टूर्सना तेंडल्या हा एकमेव मुंबईचा खेळाडू होता

@स्वरूप,
जाफर बर्‍यापैकी नंतर आला.

त्या मुंबई टीममधले नशीबवान लोक :
अबी कुरुविल्ला, नीलेश कुलकर्णी, जतिन परांजपे
महाराष्ट्राकडचे :
कानिटकर, इक्बाल सिद्दकी

नशिबवान अशासाठी की यांना किमान इंडिया कॅप मिळाली...

मुझूमदार म्हणजे ms धोनी पिक्चर मध्ये नाव आलं होतं तोच ना? त्याच्यासोबत पॉलिटिक्स झालं असं वाचलं.

*देसाईंच्या १४ जणांमधे १० मुंबई / महाराष्ट्राचे होते.* - पण त्यावेळी मुंबैच्या खेळाडूंचा दबदबाही तसाच होता, हेही नाकारतां येणार नाहीं. मुंबै कायम रणजी चॅम्पियन असायची. बाकी, निवडसमितीचा अध्यक्ष जिथला असेल, त्या विभागाला झुकतं माप मिळणं नवीन नव्हतंच. लाला अमरनाथ त्यावेळी अधयक्ष नसते तर बेदी ऐवजी मुंबईचा शिवलकरच संघात असता व बेदी इतकीच प्रतिभा व कौशल्य असूनही एकही कसोटी खेळायला न मिळणयाचं दुर्भाग्य त्याच्या वाट्याला नसतं आलं !!

लाला अमरनाथ त्यावेळी अधयक्ष नसते तर बेदी ऐवजी मुंबईचा शिवलकरच संघात असता व बेदी इतकीच प्रतिभा व कौशल्य असूनही एकही कसोटी खेळायला न मिळणयाचं दुर्भाग्य त्याच्या वाट्याला नसतं आलं !!

>>
लाला अमरनाथ :: जी आर विश्वनाथ
बेदी :: राहुल द्रविड
शिवलकर :: अमोल मुजुम्दार

मुजुम्दार आवडत असून न त्याचे मॉन्युमेंटल स्टॅट्स बघूनही द्रविड ला मुजुम्दार वर प्रीफरेंटिशियल ट्रीटमेंट मिळाल्याचे मला तरी दु:ख वाटत नाही. द्रविड मुजुम्दार पेक्षा कधीही अधिक तंत्रशुद्ध फलंदाज होता त्यामूळे तिसर्‍या क्रमाकांसाठी अधिक योग्य होता असे माझे मत आहे. मुजुम्दार ला नंतर किंवा गांगुली त्याच्या पहिल्या इंग्लंड दौर्‍यानंतर फेल (किंवा कमी यशस्वी) झाल्यावर त्याच्या जागी संधी का मिळाली नाही (विशेषतः तेंडूलकरच्या कॅप्टन्सीच्या दुसर्‍या इनिंग मधे ) हे कळलेच नाही. एकदा दाता कॅप्टन झाल्यावर नि कलकत्ता इनिंग नंतर मधले चौघे (३-६) अन्टचेबल झाले ह्यात काहीच आश्चर्य नाही.

*तरूण च कशाला, अगदी रहाणे, कोहली, शर्मा सुद्धा चाचपडतात. हे तर खूप मोठं दु:ख* - खरंय. आपलीं पारंपारिक शक्तीस्थळच आपलीं मर्मस्थळं होणं बघवत नाहीं! >> कोहली लेग स्पिनर समोर बरेचदा बाद होतो हे मान्य पण ते लिमिटेड ओव्हर्स मधे अधिक होते टेस्ट मधे स्पिन नक्कीच नीट खेळतो - चाचपडतो हा शब्द बरोबर वाटत नाही. बाकीचे दोघे नक्कीच नियमितपणे सर्वत्र चाचपडतात. मनिष पांडे स्पिन चांगला खेळतो - धवन चांगला खेळतो. शॉ कसा खेळतो हे तोवर टिकतच नसल्यामूळे हे माहित नाही Happy

लंका सिरीज ने क्लीयर झालेल्या काही गोष्टी
१. धवन, किशन, यादव, शॉ ह्यांची परीस्थिती जैसे थे राहिली. त्यांनी असे काहीच केले नाही कि त्यांना मुख्य टीम मधे तात्काळ घ्यायला जागा करावी पण त्याच बरोबर १५-१७ मधे घेऊ नये असे ही काहीच केले नाही.
२. सॅमसन, हार्दिक ह्यांनी असे काहीच केले नाही कि त्यांना १५-१७टीम मधेही घ्यायला जागा करावी.
३. पांडे, भुवी ह्यांनी असे काहीच केले नाही कि त्यांची सध्याच्या रँकिंग मधे बदल व्हावा.
४. चहर बंधू, चहल, कुल्दीप, वरूण ह्यांनी नक्कीच वेगवेगळ्या फॉर्मॅटच्या १५-१७टीम मधे तरी घ्यायला जागा करावी असा खेळ केलाय.
५. सकरिया, पड्डिकल, गायकवाड वेट अँड वॉच लिस्ट मधे राहिले.

मुजुम्दार आवडत असून न त्याचे मॉन्युमेंटल स्टॅट्स बघूनही द्रविड ला मुजुम्दार वर प्रीफरेंटिशियल ट्रीटमेंट मिळाल्याचे मला तरी दु:ख वाटत नाही. द्रविड मुजुम्दार पेक्षा कधीही अधिक तंत्रशुद्ध फलंदाज होता त्यामूळे तिसर्‍या क्रमाकांसाठी अधिक योग्य होता असे माझे मत आहे.
>>
नि:संशय...
पण द्रविडला मुजुमदारच्या आधी संधी मिळणं आणि त्यानी ती पूर्णपणे वसूल करणं हा काय तो दोघांच्या लक मधला फरक होता.

जर उलटं घडलं असतं, तर कदाचित आपण आज मुजुमदारच्या जागी द्रविड अन द्रविडच्या जागी मुजुमदारची नावं घेऊन हेच म्हणत असतो.

नाही रे, द्रविड जास्त तंत्रशुद्ध फलंदाज होता मुजुमदारपेक्षा हाही एक मह्त्वाचा फरक आहे. बाकी सगळ्या बाबतींमधे डावे उजवे करणे अशक्य वाटते हे बरोबर आहे.

इंग्लंडच्या टेस्टसिरीज आधी मयंक इंज्युअर्ड.
राहुलला आम्ही ओपनर म्हणून कन्सिडर करत नाही आणि त्याला व्हाईट बॉल क्रिकेट प्रमाणे मधल्या फळीतच संधी देऊ म्हणणार्‍या टीम मॅनेजमेंटला आता त्यालाच ओपनर म्हणून उभा करायला लागणार.

उद्याच्या पहिल्या टेस्ट साठी तुमची प्लेइंग ११ काय?

माझी टीम :
रोहित, राहुल, पुजारा, कोहली, रहाणे, पंत, अश्विन, सिराज, इशांत, शमी, बुमरा (काल बीसीसीआयनी शेअर केलेला हिरव्यागार पिचचा फोटो पाहून ४ सीमर्स अन एक स्पिनर)

Pages