Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बरीचशी बघितली.
बरीचशी बघितली.
धवन कर्णधार म्हणून कीं काय फार संयमी फलंदाजी करतांना पहाणं मजेशीर वाटलं. शाॅला सतत ऑफ स्टंप व बाहेर मारा होत असतांना तसं क्षेत्ररक्षण भेदत त्याने मारलेले स्टरेट, कव्हर व स्क्वेअर ड्राईव्हज खूपच आकर्षक व आश्वासक वाटले. आपली फलंदाजी खूपच सरस पण आपली गोलंदाजी तितकीशी प्रभावी वाटली नाहीं.
धवन कर्णधार म्हणून कीं काय
धवन कर्णधार म्हणून कीं काय फार संयमी फलंदाजी करतांना पहाणं मजेशीर वाटलं. >> धवनची इनिंग भलतीच मॅच्युअर इनिंग होती. तो तसाही फॉर्म मधे आहे काहीमहिने नि ऑन डिमांड अॅक्स्लरेट करतोय. मेजर टूर्नामेंट मधे नेहमी खेळतोच. मला सण्घात परत आलेला बघायला आवडेल.
शॉ ची ईनिंग नि त्याचा सध्याचा बघून फॉर्म बघून वर्ल्ड कप मधे ओपन करायला लावावे असे वाटते. त्याच्या सगळ्या पिट फॉल शिवाय सुद्धा , तो जेंव्हा खेळेल तेंव्हा मॅच एक हाती काढेल. रोहितच्या जागी नक्की वर्णी लावू शकतात.
किशन चे पॉवर हिटींग बघता त्याला ही किमान चौदा मधे घ्यावे असे वाटते. पंत नि तो दोघे डावखुरे पॉवर हिटर - मजा येईल.
पृथ्वी शॉ कडे तर मी
पृथ्वी शॉ कडे तर मी आयपीएलच्या सुरुवातीपासूनच वर्ल्डकप संघात येण्याची आस लाऊन बघतोय. टॉप ऑर्डरला तीनात दोन जर शर्मा आणि कोहली असतील तर शॉ सारख्या पहिल्या बॉलपासून मारणार्याची फार गरज आहे. २०-२० मध्ये पॉवरप्ले वसूल झालाच पाहिजे जे ईंटरनॅशनलला आपण अभावानेच करतो.
बाकी हारजीत एकीकडे पण फार मनोरंजन करतो तो. कसले बॉल फोडणारे खवडे मारतो एकेक. ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर स्वतःला सिद्ध करायलाच खेळतोय जणू. त्याच्यातली ही आग वापरायला हवी
शॉ ची बॅटींग बघायला मजा आली
शॉ ची बॅटींग बघायला मजा आली काल. क्रिस्प शॉट्स होते. एक स्क्वेअर कट तर अगदी सचिन च्या जातकुळीतला वाटला. आऊट झाला ते शॉट मात्र अगदीच सामान्य होता. फ्लाईटमधे नाही, पण चेंज ऑफ पेस मधे फसला बहुदा. किशन काय करतोय ते सुरूवातीला कळत नव्हतं, पण तो सुद्धा मस्त खेळून गेला. धवन एकदम प्रो आणि जवाबदार इनिंग खेळला.
बॉलिंग पाहिली नाही पण कुलदीप ला विकेट्स पडलेल्या पाहून आनंद झाला आणि भुवी च्या बॉलिंग चं अॅनलिसिस पाहून वाईट वाटलं.
पृथ्वी, इशान, धवन आणि सूर्या
पृथ्वी, इशान, धवन आणि सूर्या चौघेही वर्ल्डकपच्या टीम मधे यायचच या इर्षेने खेळले. श्रीलंकेच काही खर नाही. भूवीच्या शेवटच्या षटकातच १७-१८ धावा निघाल्या. पण एकंदरीतच बॅटींगच्या तूलनेने बॉलिंग साइड निस्तेज वाटली.
बी टीम पाठवली म्हणून आधी श्रीलंकेची मंडळी बोंबाबोंब करत होती. आता गप्प.
*ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर
*ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर स्वतःला सिद्ध करायलाच खेळतोय जणू. त्याच्यातली ही आग वापरायला हवी* +1
*पण कुलदीप ला विकेट्स पडलेल्या पाहून आनंद झाला* - काल तो खूप relaxed & confident वाटत होता. त्याच्या फिरकीचं वेगळेपण मला खूप आवडतं. फ्लाइट, लेंगथ व चायनामनचा अधिक हुशारीने उपयोग करेल तेव्हा तो भलताच प्रभावी ठरेल, अशी माझी धारणा आहे.
>>बॉलिंग साइड निस्तेज वाटली.<
>>बॉलिंग साइड निस्तेज वाटली.
पाटा पीच होते!!
अर्थात UAE मधल्या पीचेसवर आपले बॅट्समन चालतीलच!
खर म्हणजे भारताच्या दोन्ही टीम्स वर्ल्डकप लेव्हलच्या आहेत
जर कोहली कॅप्टन असता तर सगळे
जर कोहली कॅप्टन असता तर सगळे दडपणाखाली खेळताना दिसले असते.
2री ओडीआय -अनपेक्षितपणे
2री ओडीआय -अनपेक्षितपणे झालेला रोमहर्षक सामना !!
चहरने धमालच केली आज. क्रूणाल
चहरने धमालच केली आज. क्रूणाल ने हातातली संधी घालवली. स्काय जिंकून देईल शेवट्पर्यंत खेळून असे वाटलेले.
"अनपेक्षितपणे झालेला रोमहर्षक
"अनपेक्षितपणे झालेला रोमहर्षक सामना !!" - टोटली अॅग्रीड!! चहर - भुवी लाजवाब खेळले. शांतपणे आणि अत्यंत हुशारीनं खेळले. सूर्यकुमार - पांडे पार्टनरशिप मस्त चालली होती. पण पांडे ची दुर्दैवी विकेट आणि नंतरची पडझड ह्या पार्श्वभूमीवर चहर - भुवी ने दिलेली लढत अक्षरशः डोळ्यांच पारणं फिटवणारी होती.
Shaw needs to learn to capitalize on his good form. भारतीय उपखंडातल्या फलंदाजांना गूगली ओळखता आला नाही की बघताना यातना होतात.
कोहलीच्या दोन सेंच्युर्या
कोहलीच्या दोन सेंच्युर्या झाल्या असत्या आरामात... संधी गेली...
श्रीलंकेच्या प्रशिक्षकाला
श्रीलंकेच्या प्रशिक्षकाला पाहून कोहलीची आठवण येत होती.
सामने बघत नाहीये.
सामने बघत नाहीये.
पण स्कोअरलाईन बघून श्रीनाथ कुंबळेची मॅच आठवली. ती लाईव्ह पाहिलेली. बेस्ट चाईल्डहूड क्रिकेट मेमरीजचा एक भाग
*भारतीय उपखंडातल्या
*भारतीय उपखंडातल्या फलंदाजांना गूगली ओळखता आला नाही की बघताना यातना होतात.* +1 ! शाॅ तो फटका आधीच ठरवून खेळल्यासारखा वाटला. शाॅ आऊट झालयाचं श्रेयही गोलंदाजाला न देतां स्वतःलाच घ्यायला कां बघतो कळत नाही ! ( पण त्याने वजन कमी करून फिटनेसवर भर दिला आहे असं मात्र जाणवलं ).
*श्रीलंकेच्या प्रशिक्षकाला पाहून कोहलीची आठवण येत होती.* -
पण त्याने वजन कमी करून
पण त्याने वजन कमी करून फिटनेसवर भर दिला आहे असं मात्र जाणवलं >> अजूनही चांगला खात्या पित्या घरचा वाटतो भाऊ.
मनीष पांडे रनआउट होईपर्यंत
मनीष पांडे रनआउट होईपर्यंत बघितली मी मॅच!
मलाही स्कोअरकार्ड बघितल्यावर पहील्यांदा श्रीनाथ कुंबळेने काढलेली मॅचच आठवली.... त्या मेमेरीज खरच खुप स्ट्रॉंग आहेत..... क्रिकइन्फोवर पण कुणीतरी लिहलीय अशीच कॉमेंट.
इनफॅक्ट मनीष पांडे आउट झाल्यावर मनात पण आले की हार्दिक, कृणाल भरवश्याचे नाहीत आणि कुलदीप, चहलकडून फारश्या अपेक्षा नाहीत पण गरज पडल्यास भुवी आणि चहर किमान थोडेतरी खेळू शकतात.
किमान कसला कम्माल खेळला काल चहर.
अभिनंदन टीम इंडिया!!
* किमान कसला कम्माल खेळला काल
* किमान कसला कम्माल खेळला काल चहर.* - +111 !!
*अजूनही चांगला खात्या पित्या घरचा वाटतो* - असतं एखाद्याच्या नशीबात ! पण 'खात्या'त थोडीं शतकं असलेलीं पण बरीं ना !!
असतं एखाद्याच्या नशीबात ! पण
असतं एखाद्याच्या नशीबात ! पण 'खात्या'त थोडीं शतकं असलेलीं पण बरीं ना !! >> मला असं वाटते कि शॉ ची करीयर बरीचशी रोहित च्या लाईनवर जाईल. अगडबंब टॅळेंटच्या जोरावर बरेच रेकॉर्ड्स तोडेल पण इनकसिस्टंन्सी मूळे बराच ताप देऊन जाईल. जेंव्हा खेळेले तेंव्हा ह्यासम हाच असे वाटेल नि मग अशा प्रकारे बाद होईल की कपाळावर बुक्क्या मारून घ्याव्या असे वाटेल.
शाॅ आणि हार्दिक यांचा आदर्श
शाॅ आणि हार्दिक यांचा आदर्श बहुतेक विनोद कांबळी असावा, दोघांत कांबळीचा वारसा चालवणयाची चुरस लागली आहे.
*पण इनकसिस्टंन्सी मूळे बराच
*पण इनकसिस्टंन्सी मूळे बराच ताप देऊन जाईल.* मनात एक शंका डोकावून गेली - शाॅचा ' बॅकलिफ्ट ' खूपच टोकाचा असतो , त्यामुळे तर त्याला शेवटच्या क्षणीं चेंडूच्या वेगात , फिरकीत पडलेला फरक/बदल खेळायला अडचण तर येत नसावी ? अगदींच बाळबोध व अज्ञानमूलक शंका आहे याची जाणीव असूनही विचारतो, कारण ' चेंज ऑफ पेस ' किंवा गुगली खेळतांना बॅट खाली येताना तो शेवटच्या क्षणी
ॲडजस्टमेंट न करतां आल्याने आऊट झाल्यासारखा वाटतो. ( या बॅकलिफ्टमुळेच त्याच्या फटकयांमधे 'पंच' असतो, हेंही खरं )
भाऊ, बॅकलिफ्ट त्याची
भाऊ, बॅकलिफ्ट त्याची लहानपणापासून आहे. मला नाही वाटत की त्याने फारसा फरक पडत असावा. बॉल जर बॉलरच्या हातातून खेळला तर प्रॉब्लेम जाणवू नये. ग्रॅहम गूच हा मी पाहिलेला पहिला, मोठी बॅकलिफ्ट असणारा बॅट्समन होता. त्याच्या खेळात असा काही प्रॉब्लेम असल्याचं आठवत नाही. तसं काही असतं तर प्रविण आम्रे, सचिन तेंडुलकर वगैरे लोकांनी (ज्यांचा त्याने मध्यंतरी सल्ला घेतला. सचिन ने त्याला बॅट खाली येताना चा अँगल चुकत असल्याचं सांगितलं होतं) त्याला तो बदल सुचवला असता असं वाटतं.
"मला असं वाटते कि शॉ ची करीयर
"मला असं वाटते कि शॉ ची करीयर बरीचशी रोहित च्या लाईनवर जाईल. " - असं होऊ नये असं वाटतंय. पण तू म्हणतोस त्यात तथ्य आहे. कदाचित तसं घडेलही. शॉ, हार्दिक, कुलदीप, चहर, युझवेंद्र वगैरे खेळाडूंसाठी राहूल द्रविड सारखा कोच असावा असं वाटतं.
फे फ ला अनुमोदन. मला गूच ऐवजी
फे फ ला अनुमोदन. मला गूच ऐवजी लारा आठवला बॅकलिफ्ट वाचून पटकन. अॅडजस्ट्मेंट बॉलरच्या हातातून बॉल बघून नि लाईन लेंग्थ चा अंदाज घेऊन करू शकला तर अडचण येऊ नये. परत टेक्निक पेक्षाही टायमिंग नि शार्प आय साईट हे शॉ चे प्लस पॉईटंस वाटलेत. त्यामूळे सेहवाग सारखे रिफ्लेक्स स्लो होईतो दडपून धावा काढेलच. "लाईन लेंग्थ चा अंदाज" ह्याबद्दल त्याच्या डोक्याला लागलेला चेंडू बघून चूटपूट लागली आहे खरी.
शॉ, हार्दिक, कुलदीप, चहर, युझवेंद्र वगैरे खेळाडूंसाठी राहूल द्रविड सारखा कोच असावा असं वाटतं. >> माझे मत थोडे वेगळे आहे. द्रविड ए टीम किंवा मेन टीम अच्या आधी प्लेअय्र्स तयार करण्याच्या रोल मधेच असावा असे वाटते. त्यांचे गुणदोष तो ते मेन टीम मधे येण्याआधीच हाताळू शकतो. टेक्निकली नि मेंटली एकदम तयार प्लेयर्स मिळतील. मेन टीम मधे आल्यावर खर तर डावपेच नि प्रोत्साहन देणे वगळता अजून कोचची गरज लागू नये.
मला असं वाटते कि शॉ ची करीयर
मला असं वाटते कि शॉ ची करीयर बरीचशी रोहित च्या लाईनवर जाईल. अगडबंब टॅळेंटच्या जोरावर बरेच रेकॉर्ड्स तोडेल पण इनकसिस्टंन्सी मूळे बराच ताप देऊन जाईल.
>>>>>
रोहीत खरेच इनकन्सिस्टन्स आहे की आपल्या त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. जास्त म्हणजेही अव्वाच्या सव्वाच म्हणा ना
कारणे गेल्या सहासात वर्षात त्याच्याईतक्या खोर्याने धावा कोणीच केल्या नाहीत. अख्या जगात
त्याची मोठाली शतके आहेत याचा अर्थ असा नाही की तो पुढचे चार सामने सिंगल डिजिटवर बाद झाला आहे. फक्त त्याच्या क्षमतेमुळे ज्या अपेक्षा वाढतात त्याने त्याच्या ३०-४० धावांची खेळीही आपण अपयशात, पर्यायाने इनकन्सिस्टन्सी मध्ये मोजतो. पण हेच आकडे ईतर खेळाडूंबाबत हेच कन्सिस्टन्सी वाटू शकते.
जर शॉने रोहीत शर्मासारखे इनकन्सिस्टन्सली खेळत पुढच्या वर्ल्डकपला पाच शतके मारली तर मला आवडेलच


ते सुद्धा एखाद्या ईंग्लडच्या वर्ल्डकपला मारले तर क्या बात
कसोटी चॅम्पियनशिपलाही तसाच धुमाकूळ बघायला आवडेल
मॉरल - रोहीतबाबत आजही बरेच जण त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षात अडकून आहेत, आणि त्यावरूनच त्याच्याबद्दल ठाम मत बनवून आहेत. पण साधारण २०१३ पासूनचे त्याचे आकडे आणि आधीचे आकडे हे वेगवेगळे आणले तर बरेच गोष्टी क्लीअर होतील.
दोन कशाला चार वर्षे घेऊया रे
दोन कशाला चार वर्षे घेऊया रे -
https://stats.espncricinfo.com/ci/engine/player/34102.html?class=2;spanm...
2017-2021 : ६९ इनिंग्स मधे 3770 धावा १८ शतके. १८ शतके म्हणजे १८०० धावा धरतो म्हणजे उरलेल्या पन्नास सामन्यांमधे १८०० धावा धरल्या तर ३६ ची सरासरी त्या सामन्यांमधे येते. त्याने खोर्याने धावा केल्या कि नाही ह्याबद्दल कमेंट नव्हती - कन्सिस्टंसी बद्दल होती. इतरांशी तुलना जरुरी नाही. त्याच्या स्वत:शीच आहे. ते करत नाही हाच तर पॉईंट आहे. टॅलंट असेल नि धावा नसतील तर त्याला अवाजवी अपेक्षा म्हणायचे की इनकसिस्टंन्सी हे ज्याचे त्याला ठरवू दे ना.
असो तुझ्याशी ह्या विषयावर फारसा वाद घालण्यात स्वारस्य नाही.
६९ इनिंग्स मधे 3770 धावा १८
६९ इनिंग्स मधे 3770 धावा १८ शतके. १८ शतके म्हणजे १८०० धावा धरतो म्हणजे उरलेल्या पन्नास सामन्यांमधे १८०० धावा धरल्या तर ३६ ची सरासरी त्या सामन्यांमधे येते.
>>>>
६९ मध्ये १८ शतके हिच फार मोठी कन्सिस्टन्सी नाही का? सिरीअसली.. ६९ डावात १८ शतके.... हेटस ऑफ भाऊ !!!
उद्या ६९ मध्ये ५५ शतके मारली असती तर तुम्ही उरलेल्या १४ सामन्यांची सरासरी ३० खाली आहे दाखवून त्याला नावे ठेवली असती

हे त्या १९९२ सालच्या आफ्रिकेसारखे झाले. मेडन ओवर बाद केल्या आणि १ बॉल २२ चे टारगेट दिले
शर्माची गेले ८ वर्षांची
शर्माची गेले ८ वर्षांची एकदिवसीय सरासरी बघा
year 2013 - 52
year 2014 - 52.54
year 2015 - 50.93
year 2016 - 62.66
year 2017 - 71.83
year 2018 - 73.57
year 2019 - 57.3
year 2020 - 57
सलग आठ वर्षे ५०+

जगात असा दुसरा प्लेअर असल्यास दाखवा
कन्सिस्टन्सी शब्दाचा अर्थ
कन्सिस्टन्सी शब्दाचा अर्थ एकदा परत बघ. क्युमुलेटिव्ह आकडेवारी माझ्या मते फसवी असते. असो तुला पटावे असा माझा काडीचाही आग्रह नाही.
कन्सिस्टन्सीच बघत आहे. पण
कन्सिस्टन्सीच बघत आहे. पण त्यात असे ६९ मधील १८ शतकी खेळी सरसकट बाजूला फेकून उरलेल्यांचा एवरेज काढण्यात काही अर्थ नाही. त्या शतकी खेळींचा वेटेज तुम्ही घेतच नाही आहात यात.
उदाहरणार्थ समजा त्या १८ शतकी खेळीं न खेळता तो ८ च शतकी खेळी खेळला असता (ज्या ६९ मध्ये ८ शतके हे सुद्ध भारी आहे) आणि उरलेल्या १० मध्ये नव्वदीत बाद झाला असता तर त्या तुमच्या कॅलक्युलेशनमध्ये उरलेल्या खेळीत मोजून तो ३६ चा एवरेज ४०+ झाला असता आणि भारी ठरला असता
Pages