क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

बोकलत यांचे बोलणे वाढवून मी म्हणेन की हरणे किंवा जिंकणे हे देवाने आधीच ठरवले असते. आपण फक्त खेळावे नि पैसे कमवावे नि सुखी रहावे. हे मान्य नसल्यास पुढचे वाचा.
अँडरसनने कोहली नि पुजारा यांना जशी गोलंदाजी केली तशी करणारे भारताकडे कुणि आहेत का? असल्यास त्यांच्या गोलंदाजी वर खेळण्याचा सराव करावा सर्वांनी. आणि रहाणे विसरला की आपण कसोटी सामना खेळतो आहे. त्याला कुणितरी समजावून सांगा कसोटी नि टी २० मधे कसा फरक असतो.

मधल्या तिघांनी मिळून निदान १०० तरी धावा करायला पाहिजे होत्य! पण नाही.
असो.
बोकलत यांचे बोलणे वाढवून मी म्हणेन की हरणे किंवा जिंकणे हे देवाने आधीच ठरवले असते. आपण फक्त खेळावे नि पैसे कमवावे नि सुखी रहावे.

आज भारतीय शेपूट वळवळलेलं पाहून फार बरं वाटलं. इंग्लंडची एखाद-दुसरी विकेट पडली असती तर चेरी ऑन टॉप झालं असतं. जडेजाला सहावा बॅट्समन म्हणून ऑफिशियली खेळवावं पंतच्या पुढे असं वाटतंय. पंतला थोडी विश्रांती पण मिळेल आणि जडेजा कदाचित मोठी इनिंगपण डेव्हलप करू शकेल.

आज भारतीय शेपूट वळवळलेलं पाहून फार बरं वाटलं. इंग्लंडची एखाद-दुसरी विकेट पडली असती तर चेरी ऑन टॉप झालं असतं. >> +१ शेपूत वळवळणे हा सुखद धक्का होता खरा. जाडेजा नि राहुल ने अतिशय जबाबदारीने खेळ केलाअ हे ही नमूद करण्यासारखे आहे. पंत ला त्याच्या डाऊन अंडर इनिंगच्या रीरन्स परत दाखवायला हवेत. "तू गिलख्रिस्ट नाहीस नि तो सातव्या क्रमांकावर येत असल्यामूळे त्याला ते अ‍ॅफोर्डेबल होते , आपल्याकडे ती चैन नाही" हे सांगायची वेळ आहे Sad

जडेजाला सहावा बॅट्समन म्हणून ऑफिशियली खेळवावं पंतच्या पुढे असं वाटतंय. पंतला थोडी विश्रांती पण मिळेल आणि जडेजा कदाचित मोठी इनिंगपण डेव्हलप करू शकेल. >> पंत जे काही विचित्र प्रकार मधेच करतोय ते बघून तरी नक्कीच. असेच झटकेदार खेळणार असे ल्तर शेपटाबरोबर खेळला तर विरुद्ध पार्टीला पण धक्के बसतील हा फायदा आहेच.

रहाणे पुजाराच्या फ्लॉप शो ने आणि कोहलीसुद्धा बरेच काळापासून मोठी वा शतकी खेळी करत नसल्याने मिडल ऑर्डर तकलादू झाली आहे. अन्यथा पंतच्या खेळींचे किंबहुना भुमिकेचे विश्लेषण वेगळे असते Happy

सेना कंट्री म्हणून एकच ग्रूप बनवला तरी ऑस्ट्रेलिया आणि ईंग्लण्ड या देशात आवश्यक फलंदाजी तंत्रात बराच फरक आहे. तो फरक कव्हर करायला कदाचित ॲप्रोच बदलला असावा. हे वर्क नाही झाले तर नंतर वेगळे करेल.
मोठी सिरीज आहे, हि पहिलीच टेस्ट आहे. जसा स्थिरावेल तसे त्याने स्वत:च उत्तरे शोधलेली चांगले. दुसरे कोणी सल्ले द्यायची वेळ आली कि त्याचा नॅचरल खेळ पुन्हा गडबडणार. ते होऊ नये..

राहूल ची विकेट नसती पडली तर बरं वाटलं असतं. असो. अजून १५७ रन्स व्हायला हरकत नाहीये. भारताला सिरीजची विजयी सुरूवात करण्याची सुवर्णसंधी आहे.

नुसते सिरीजची नाही वर्ल्ड चॅम्पियनशिपची सुद्धा विजयी सुरुवात होईल.

रोहीत शर्माने अपेक्षेप्रमाणे आजही दिवस खेळून काढला.
मिडल ऑर्डरला नवीन बॉल, पहिला स्पेल, शेवटचे सत्र यापासून दूर ठेवण्यात तो सातत्याने यशस्वी होत आहे. पण उद्या त्याचे स्वत:चे अर्धशतक बघायला आवडेल.
राहुल आज छान पॉजिटीव्ह खेळत होता. तो सुद्धा आज आणि उद्या तासभर राहिला असता तर काम सोपे झाले असते.
पुजारा, रहाणे, कोहली यांनी आता जबाबदारी घेऊन पंत जडेजा यांच्यापर्यंत फार शिल्लक राहणार नाही हे बघावे.
पण १००-११० च्या आत ४ बाद अशी स्थिती झाली तर मात्र उद्या एक धमाल सामना बघायला मिळेल.

पहिले सेशन फुकट गेले
पाऊस अजूनही पडतोच आहे.
जर मॅच सुरू झाली तर भारताने पंतला पुढे पाठवावे. रहाणे आणि कोहलीच्याही आधी.

आता कृत्रिम पाऊस पाडणे सहज शक्य आहे. काही दिवसांपूर्वी दुबईत ड्रोनच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. मला दाट संशय आहे की इंग्लंडने पण असंच काहीतरी केलं असणार. ज्याप्रमाणे हॉकीत टर्फ मैदान असते त्याप्रमाणे क्रिकेट मध्ये पण तसंच मैदान करण्यात यावे जेणेकरून सामना थांबणार नाही आणि खेळाडूंना पावसात खेळायला पण मजा येईल. 21 वे शतक आता थोड्या वर्षात संपेल आपण एव्हडे प्रगत झालोय आणि अजूनही पाऊस खेळखंडोबा करतो हे काय पटत नाही.

लॉर्ड्स टेस्टमधे ईंग्लंडची टॉस जिंकून पहिली बॅटिंग...
अपेक्षेप्रमाणे इंज्युअर्ड शार्दुल ऐवजी ईशांत शर्मा ११ मधे...

कोहलीच्या म्हणण्यानुसार प्री मॅच १२ मधे अश्विन होता, पण पिच पाहून ईशांत इन...

avg opening partnership duration for India in overseas test
2018 - 7.2 overs
2019 - 6.1 overs
2020 - 3.3 overs

2021 Since Rohit Sharma started opening - 19.1 overs

..

the opening stand 68* between Rohit & Rahul is the highest for a team at Lord's inserted into bat since 114 (strauss and cook) against south africa in 2008

--

India opening partnership surviving 20+ overs in test outside Asia
Jan 2011 - Dec 2020 : No instances
Since Jan 2021: Five Times in nine innings

सौजन्य :हिटमॅन Happy

बघा आमचा रोहित शर्मा कसला खेळतोय नाहीतर तुमचा कोहली पहिल्याच बॉलला आऊट होतोय. सचिन रिटायर्ड झाल्यावर 50% लोकांनी क्रिकेट पाहायचं बंद केलं तसं रोहित रिटायर्ड झाल्यावर उरलेले 40 ते 45% लोक क्रिकेट पाहायचं बंद करतील.

*2021 Since Rohit Sharma started opening - 19.1 overs* -
आपलं कितीहि प्रामाणिक मत तसं असलं, तरीही ' रोहित शर्माला टेस्टमधे स्थानच नाहीं' , ' ऑस्ट्रेलियात टेस्ट ओपनर म्हणून तो दोन अंकी संख्याही गांठू शकणार नाहीं ' , अशी टोकाचीं व हेटाळणीपूर्वक विधानं कोणत्याच खेळाडूबद्दल करूं नयेत, एवढं तरी आपण रोहितच्या कामगिरीवरून शिकावं.

शर्मा तुडवतोय आता
मजा येतेय त्याची बॅटींग बघायला
वूडचा ९३ स्पीडचा बॉल आता काय कडक पुल मारला.. या माणसाकडे नेहमीच एक सेकंद एक्स्ट्रा टाईम असतो..
तो एकदा परदेशात खेळून स्थिरावला की येत्या काळात तो बॉसिंग करायला लागणार हे उघड आहे.

पुजारा स्लिपमध्येच खेळतोय. आधीचा ईनस्विंगर सावधपणे खेळून समोर दोन धावा आल्यावर शंभर टक्के खात्री होती पुढच्या बॉलची. आणि तसाच बॉल आला आणि त्याने नुसती बॅट लावली बाहेरच्या बॉलला आणि गेला..
:का त्याला कंटीन्यू खेळवत आहेत. ब्रेक द्यायला हवा. त्याचेच भले आहे त्यात.

the opening stand 68* between Rohit & Rahul is the highest for a team at Lord's inserted into bat since 114 (strauss and cook) against south africa in 2008
>>>>

हा रेकॉर्डही तुटला आज..
शर्मा गेला. पुजारा गेला. राहुलचे अर्धशतक झाले

आता कोहली ॲंडरसन टश्शन !

रोहित चांगलाच खेळतोय नि तसेच खेळत राहावे असे माझ्यामधल्या त्याच्या चाहत्याला नेहमीच वाटते. फॉर दॅट मॅटर राहूललही चांगलेच ओपन करतोय अपेक्षेपेक्षा हेही लक्षणीय आहे. पण त्याचबरोबर रोहित ओव्हरसीज ओपनर म्हणून कसा आहे किंवा ठरेल ह्याबद्दल माझे मत मी फक्त दोन सिरीज वरून ठरवणार नाही एव्हढे मात्र नक्की. त्याने त्याच्या शैलीमधे त्याच्या बॅटींग च्या स्वभावाविरुद्ध वयाच्या तिसाव्या वर्षानंतर बदल केलाय हे उघडच दिसतेय. त्याबद्दल त्याचे कौतुक करायला हवे. आता पेशन्स ठेवून हेच किती वेळ करत राहील हे बघणे कुतूहलाचे ठरेल. अशीछ पाचेक वर्षे काढली तरी एका ओपनींग स्लॉट चा प्रश्ना निकालात निघेल.

पुजारा चा फॉर्म गेलाय, पुढच्या सामन्यात कदाचित अग्रवाल ला खेळावतील >> किंवा विहारीला. खर तर ह्या सामन्यात कोहली नि राहणे पण दणकून खेळले तर पुजाराला हात लावू नये असेही वाटते. एक फॉर्म मधे नसलेला नक्कीच कॅरी करू शकतो.

मुरली जसा संगमरवरावर पण नव्वद अंशांमधे बॉल वळवू शकेल असे वाटते तसा अँडरसन वाळवंटामधे पण बॉल स्विंग करू शकेल असे वाटते. हो कि रीटायर आता बाबा ! किती पिळ्णार Sad

*हया सामन्यात कोहली नि राहणे पण दणकून खेळले तर पुजाराला हात लावू नये असेही वाटते. * मलाही पुजाराला आत्ताच वगळूं नये असं वाटतं. तो ( बहुतेक ) एकटाच स्पेशालिस्ट टेस्ट फलंदाज म्हणून जपलेला खेळाडू आहे. तो हें सिद्धही करेल अशी आशा बाळगणे व त्याला आणखी संधी देणंच योग्य.
इंग्लंडमध्ये 200-2 हा आपला स्कोअर कौतुकास्पद.

कोहली अजून खेळतोय म्हणजे बॅटिंग पीच दिसते. >> ह्याच न्यायाने रोहित ने शंभरावर चेंडू सेटल होण्यासाठी घेतले , सगळे मनापासून होत असताना नि मग बॅटींग पीचवर नाहक विकेट फेकली असे म्हणायचे का ? Wink

पण त्याचबरोबर रोहित ओव्हरसीज ओपनर म्हणून कसा आहे किंवा ठरेल ह्याबद्दल माझे मत मी फक्त दोन सिरीज वरून ठरवणार नाही एव्हढे मात्र नक्की.
>>>>>

बिलकुल ठरवू नये. काही लोकांना त्याला फ्लॉप ठरवायची फार घाई लागलेली. तसेही बिलकुल करू नये Happy

पण सेहवाग नंतर जे आपण सलामीची संगीत खुर्चीच खेळत आलो आहोत ईतके वर्षे त्यातली एक खुर्ची रोहीत नक्की अडवून धरणार याची मला पुरेपूर खात्री होती.
शर्मा पुन्हा आपल्याला कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलला पोहोचवणार.

राहुल अभिनंदन!
*काही लोकांना त्याला फ्लॉप ठरवायची फार घाई लागलेली. तसेही बिलकुल करू नये * - +1

रोहितने पाचेक वर्षे टेस्टमध्ये काढली तर असामी तुला टिळक पुलावर शाल आणि श्रीफळ माझ्याकडून. Wink

रोहित जबरदस्त खेळला आज. एरव्ही तो ज्या पद्धतीनं स्वतःच्या टॅलेंटला (टेंपरामेंट ची जोड न दिल्यामुळे) न्याय देत नाही, त्या पार्श्वभुमीवर आज तो भलताच फोकस ने खेळला. शतक हुकल्याची हळहळ आहेच. पण चांगल्या बॉलवर आऊट झाला.

पुजारा स्वतःच्याच जीवावर उठल्यासारखा खेळतोय. गिल / शॉ जेव्हा परततील - आणि ते लवकर परतावे - तेव्हा राहूल च्या रूपानं रेडिमेड रिप्लेसमेंट तयार आहे. राहूल!!! काय तूफान खेळला आज. पहिले २० रन्स १००+ बॉल्समधे काढले, पण कुठेही आऊट ऑफ कंन्ट्रोल नाही वाटला. नंतर इनिंग मस्त पेस केली.

कोहली फॉर्म मधे आला ही जमेची बाब. अगदी शेवटी आऊट झाला आणि सुरात चाललेया गाण्याची तार तुटल्यासारखं वाटलं. आता उद्या रहाणे, राहूल, जडेजा, पंत ने स्कोअर ४०० च्या पलिकडे पोहोचवावा अशी सदिच्छा!

कोहलीची फलंदाजी आज फार बघता आली नाही. पण जी पाहिली त्यात तो एक्स्ट्रा क्लास कोहली वाटला नाही. उलट राहुलचे एकेक ड्राईव्ह बघून तो समोर आणखी फिका वाटत होता. धावाही मी पाहिले तेव्हा स्पिनरसमोरच जमवत होता. बाद होताना त्याला पाहिले तेव्हाही चांगल्या बॉलवर बाद न होता लूज शॉट खेळूनच बाद झालेला वाटला.
बहुधा आपले शतक झाले नाही बरेच काळ हे त्याच्या डोक्यात घोळत आहे. सचिनचा शंभर शतकांचा रेकॉर्ड त्याला खुणावतोय आणि त्यात असे वर्ष दिड वर्षाचा काळ शतकाशिवाय जाणे हे कुठेतरी डोक्यात असेलच..
अर्थात एक येताच बूच उघडल्यासारखे धबधबा चालू होईल शतकांचा याचीही खात्री आहे .

रोहितने पाचेक वर्षे टेस्टमध्ये काढली तर असामी तुला टिळक पुलावर शाल आणि श्रीफळ माझ्याकडून >> त्यापेक्षा ऋन्मेऽऽष ची खण-नारळाने ओटी भर. त्या निमित्ताने त्याला स्त्री पुरुष समानतेवर एक बाफ पण झाडता येईल Wink

कोहलीची फलंदाजी आज फार बघता आली नाही. >> हे वाक्य लिहिल्यानंतर पुढची पाच वाक्ये तूच लिहू शकतोस एव्हढ्या खात्रीने ( शेवटचा शब्द चूकीचा वापरला आहे ह्याची मला कल्पना आहे. पण कुठल्या लेखकाचा संदर्भ आहे हे कळणारे लोक इथे असल्यामूळे लिहू शकतो Wink )

अर्थात एक येताच बूच उघडल्यासारखे धबधबा चालू होईल शतकांचा याचीही खात्री आहे . >> आमेन टु दॅट !!!

Pages