क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

बाकी तुमचे मला पटावे किंवा माझे तुम्हाला पटावे यासाठी काही चर्चा करू नये. आपले मत मांडावे. आपल्या आवडत्या खेळाडूंबद्दल कोणी चुकीचे मत मांडत असेल, वा आपल्याला पटत नसेल तर ते खोडावे. कारण तो खेळाडू समोरच्याचा नावडता असल्यास त्याचे मत बायस्ड असू शकते. आपलेही मत बायस्ड असू शकते. हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे ते मत बदलायच्या फंदात पडू नये.

जर ६९ सामन्यात १८ शतके असतील तर प्रत्येक चौथ्या सामन्यात शतक, कन्सिस्टन्सीच आहे की ही. जर शर्माने पहिल्या १८ सामन्यात १८ शतके केली असती आणि उरलेल्या ५१ सामन्यात जर एकही शतक केले नसते तर म्हणू शकलो असतो की सध्या फॉर्म मध्ये नाही. रोहित शर्मा हा आपल्याच image चा बळी झालाय. लोकांनां त्याच्या कडून फार अपेक्षा असतात. सलग ८ वर्षे ५० पेक्षा जास्त सरासरी आहे तर अजून काय पाहिजे.

50 चा जमाना गेला. 50 ने काही होत नाही. जुन्या काळात ते ठीक होतं. आता प्रत्येक सामन्यात कमीतकमी 100 च्या वर धावा पाहिजेत.

>>द्रविड ए टीम किंवा मेन टीम अच्या आधी प्लेअय्र्स तयार करण्याच्या रोल मधेच असावा असे वाटते. त्यांचे गुणदोष तो ते मेन टीम मधे येण्याआधीच हाताळू शकतो. टेक्निकली नि मेंटली एकदम तयार प्लेयर्स मिळतील.

100% अनुमोदन!!
तो under-19 लाच हवा!

बाय द वे हा संघ बांधायचे क्रेडीट त्याने कोहली आणि शास्त्रीबुवांना दिलय!

फक्त आयपीएलमध्ये पण पाहिजेल यार तो कुठल्यातरी नवोदित संघाबरोबर Happy

फक्त आयपीएलमध्ये पण पाहिजेल यार तो कुठल्यातरी नवोदित संघाबरोबर >> काँफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो ना रे मग तो ? म्हणून तर राजस्थान मधून नि दिल्ली मधून बाहेर पडला ना ?

साधा माणूस तुमच्या लिस्ट मधे शमी नि उमेश असे दोन कधीही कंट्रोल जातो असे बॉलर्स आहेत त्याताल्या एका जागी नि मग ती अर्थात उमेश ची येते, इशांत हवा जो एक बाजू अडवून धरू शकतो जेणेकरून दुसर्‍या बाजूने विकेट टेकिंग स्पेल टाकायला इतर मोकळे. सिराज संघात असण्याबाबत अनुमोदन. राहणे तिसर्‍या क्रमांकावर खेळणे कठीण आहे. तो पाचवा असणार असेल तर मग परत राह्लुल तिसर्‍या क्रमा़आवर जाईल नि तो पहिल्या तीन आकड्यांमधे इंग्लंड मधे खेळला तर .. जाऊ दे.

बाकी तुमचे मला पटावे किंवा माझे तुम्हाला पटावे यासाठी काही चर्चा करू नये. आपले मत मांडावे. >> नुसते भाराभार असंबद्ध मते मांडत सुटून प्रत्येक बाफाचा काऊंट वाढावा अशी तुझ्यासारखी माझी खरच इच्छा नाही रे. तो प्रकार तुलाच लभलाभ. हॅव फन. आता इथे ही डुप्लिकेट आयडी यायला लागले आहेत तुझे तेंव्हा हा बाफ ही तू हायजॅक करणार असे दिसते तेव्हढे थांबवू शकत असलास तर बघ बाबा.

>>काँफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो ना रे

ते माहितेय पण काहितरी वेआउट हवा..... It was pleasure watching him in dugout and spending time with new generation
U-19 वगैरेचे तेव्हढे सामने होत नाहीत किंवा तितके फॉलो केले जात नाही वर्ल्डकप वगैरे सोडल्यास!

आता इथे ही डुप्लिकेट आयडी यायला लागले आहेत तुझे
>>>>
मागे मी आयपीएल फिक्सिंगची शंका व्यक्त केली तर आपण माझ्याकडे पुराव्याशिवाय कसे काय बोलतोस म्हणून काहीतरी एक इंग्लिश शब्द वापरलेलात..
आता कुठलेही आयडी खुशाल माझ्या गळ्यात बांधत आहात काय बोलावे Happy
असो, त्यांना इग्नोर मारणे जमले तर मारा अन्यथा खुशाल माझे समजा. मी अश्या आरोपांची पर्वा करत नाही.

पण मुद्दा ढळू देणार नाही मी, शर्माचे आकडेच बोलके आहेत. आणि मी तेच दिले आहेत. भाराभार असंबंद्ध मते वगैरे काही नाही.
उद्या वा विकेंडला मी पुरसतीने शर्माचे आणखी रोचक आकडे आणतो. तुर्तास रजा घेतो Happy

"द्रविड ए टीम किंवा मेन टीम अच्या आधी प्लेअय्र्स तयार करण्याच्या रोल मधेच असावा असे वाटते. त्यांचे गुणदोष तो ते मेन टीम मधे येण्याआधीच हाताळू शकतो. टेक्निकली नि मेंटली एकदम तयार प्लेयर्स मिळतील." - अरे मी तो नॅशनल टीम चा कोच व्हावा इथपर्यंत विचार च केला नाही. एक विशफुल थिंकिंग असं होतं की असे जे संस्कारक्षम खेळाडू आहेत किंवा कच्ची मडकी आहेत (असं त्यांच्याकडे बघून वाटतं) अशा खेळाडूंसाठी द्रविड एक उत्तम कोच आहे. तू म्हणतोस तसं तो अंडर-१९ किंवा ए टीम च्या कोच च्या भुमिकेतून ती जवाबदारी जास्त चांगल्या प्रकारे निभावू शकेल.

अरे मी तो नॅशनल टीम चा कोच व्हावा इथपर्यंत विचार च केला नाही. एक विशफुल थिंकिंग असं होतं>> माझे विशफुल थिंकिंग होते ते खर तर पण जरा अधिक व्यापक विचार केला तर त्याच्यापेक्षा अधिक चांगला पर्याय तो आधीच्या पाइपलाईनमधे असावा असे वाटले.

It was pleasure watching him in dugout and spending time with new generation >> अरे गेली काही वर्षे अ टीम सातत्याने बाहेर दौरे करतेय नि टीयर सी मधल्या प्लेयर्स वर नजर ठेवली जाते आहे ( फक्त द्रवीडच नाही तर सिलेक्टर्स नि नसीए चा स्टाफ) असे वाचलेले. त्यामूळे आपल्याला दिसत नसेल पण तुझी इच्छा पडद्या आड पुरी होते आहे असे दिसतेय. मनाला पटणार नाही पण दिल्लीच्या कोचमधे पाँटींग चे कोच म्हणून (आधी मुंबई मधे कोच म्हणून) त्याच दर्जाचे काम होते असे वाचले.

मी अश्या आरोपांची पर्वा करत नाही. >> तू कोणाचीच पर्वा करत नाहीस हे सगळ्यांनाच माहित आहे, वेगळे सांगायची गरज नाही रे. तू शर्माची संपूर्ण जन्म कुंडली लिहिलिस तरी मला काही फरक पडत नाही. बी माय गेस्ट. मला काय म्हणायचे होते त्या शब्दामधे ते आधीच स्पष्ट केले आहे. समोरच्याचा मुद्दा समजून न घेता उगाचच पोस्ट्स डायरिया मार्फत आपलेच घोडे पुढे दामटायचे हे तुझे धोरण नवीन नाही.

बुमराला टेस्ट ग्रेड बनवण्यात पाँटिंगचा महत्त्वाचा सहभाग होता, असं वाचलं. >> इंटरेस्टींग ! लिन्क आठवतेय का रे ? अधिक वाचायाला आवडेल .

तू शर्माची संपूर्ण जन्म कुंडली लिहिलिस तरी मला काही फरक पडत नाही.>> त्याची कल्पना आहे. जर नावडतीचे मीठ अळण असा प्रकार असेल तर शर्माने दर दुसर्‍या सामन्याला शतक मारले तरी तुम्ही शतक न मारलेलाच सामना दाखवाल. मी लिहितोय ते ईथे ईतरही अनेक तटस्थ वाचक वाचत असतात, त्यांच्यासाठी Happy

बॉलिंग युनिटमध्ये होलसेल चेंजेस >> एकदम चार बदलले रे ! म्हणून आज बॅटींग क्लिक व्हायची गरज होती पण सगळ्यआंनीच निराशा केली. पन्नास ओव्हर्स पण पूर्ण खेळले नाहीत. कार्डिनल क्राईम. राणा, पांडसो, हार्दिक तिघांनी संधी वाया घालवली. स्काय ला मोठी इनि<ग खेळून तिसरा क्रमांक कोणाचा ह्याबद्दल प्रश्न मिटवता आला असता. शॉ, सॅमसन नेहमीची स्क्रिप्ट प्ले केली. पॅक्ड भारतीय टीम मधे घुसण्यासाठी रन्स सारखे खणखणीत कुठलेच नाणे नाही. आज इशान ला न खेळवण्याचे लॉजिक कळले नाही. दोन मॅच मधे एकदा खनाही, एकदा नाही ह्यवरून काय निष्कर्ष काढणार ? सॅमसन ला आणायचे तर राणा च्या जागी येऊ शकला असता. तसेही राणा ची वरणी लागणे कठीण आहे.

जयविक्रमची बॉलिंग बघायला मजा आली. क्रीज, पेस नि फ्लाईट काय सुरेख वपरत होता. सॅमसन नि पांडे दोघेही स्पिन उत्तम खेळतात नि दोघांनाही पेस नि फ्लाईट मधे फसवले.

पांड्या फॉरवर्ड नि डिफेन्सीव्ह पुश करतो तेंव्हा खरच पुश करतो असे वाटते. जनरली इतर जण हलकेच टाईम करतात. पांड्या चे हात ढकलल्यासारखे जातात. एकदम हार्ड हँड.

जर नावडतीचे मीठ अळण असा प्रकार असेल >> तू पोस्ट्स न वाचता तुझा पोस्ट्स डायरिया सुरू करतोस हे परत परत लिहायची काय गरज आहे रे ? हे सर्वांनाच माहित आहे. तुला सटल लिहिलेले कळत नाही हे माहित असल्यामूळे - क्रिकेट बाफांवरच्या माझ्या पोस्ट्स वाचल्या असत्या तर ''शर्मा मला आवडतो का नाही' ते ही कळले असते.

असामी, +१

आज बॅटिंग क्लिक व्हायला हवी होती. पांडे ने तर करियर रिवाईज करायची संधी घालवली. सूर्यकुमार, शॉ, पांडे, पंड्या कुणीतरी मोठी इनिंग खेळायला हवी होती. संजूकडून त्याच्या टॅलेंटला न्याय देणारा परफॉर्मन्स बघण्याची आशा मी केव्हाच सोडलीय. शॉ च्या मेंदूत फवारा मारा रे कुणीतरी. सोन्यासारखं करियर होऊ शकेल त्याचं. हार्दिक आणि बुमराह - दोघंही इंज्युरीतून परत आल्यापासून पहिल्यासारखा फॉर्म मिळवू शकले नाहीयेत.
बॉलिंगमधे चहर आणि सकारिया मस्त खेळले. बॉलिंगमधला सैनी म्हणजे बॅटींगमधला पांडे झालाय.

@ असामी, शर्मा कन्सिस्टन्स नाही असे एक वाक्य फेकायचे आणि ते खोडणारे स्टॅट्स आणले की मग माझ्या पोस्टच डायरीया भडीमार डुआयडी वगैरे वेगळेच बोलत बसायचे, मलाही या चर्चेत बिल्कुल रस आहे. पण साईड बाय साईड मी स्टॅटससुद्धा आणेनच. ते देखील विश्लेषणासह. कारण नुसते आकडे तर फसवे असतात. पण आज नाही उद्या परवा. आता जरा ऑफिसचे काम करावे लागतेय Sad

बॉलिंगमधे चहर आणि सकारिया मस्त खेळले. बॉलिंगमधला सैनी म्हणजे बॅटींगमधला पांडे झालाय. >> चहर र्‍हीदम मधे आला कि एकदम वेगळाच बॉलर बनतो. सकारीया एकदम रिव्हीलेशन आहे गेल्या काही महिन्यांमधले. एकदम मॅच्युअर वाटतो. सैनीबद्दल एकदम परफेक्ट बोललास. पांडे बद्दल तर राहून राहून वाईट वाटते. खर तर कमी दाखवावी असे बॅटींग मधे काहीही नाही पण .....

धवन ची कॅप्टन्सी बोगस होती आज. पांड्याला जास्तच वेळ वापरले. बॉल वळतोय बघून तरी स्पिनर्स + राणा सुरू ठेवायला हवे होते अधिक वेळ.

ऋन्मेऽऽष , मी माझ्या पहिल्या तीन पोस्ट्स मधे काय ते स्पष्ट केले होते. तुला ते कळत नसेल तर तुझ्या बुद्धीचा दोष. ह्याउप्पर तू जे लिहिशील ते माझ्यासाठी निर्रथक आहे. बाकी वेळ तुझा आहे, कसा वापरायचा हे तू ठरव.

६९ डावात १८ शतके मारणारा शर्मा ईनकन्सिस्टन्सीमुळे डोक्याला ताप आहे हे पटले नाहीये ईतकेच Happy

पांडेबद्दल खरंच वाईट वाटतं. पांडे, जडेजा, कोहली अंडर 19 वर्ल्डकपला टीममेट्स होते. पांडेच्या टेक्निकमधे पटकन दिसेल असा कुठलाही दोष नाही आणि तरिही तो स्वतःचं स्थान बळकट करू शकला नाही हे दुर्दैवी आहे.

पांडेची ईन्सकन्सिस्टन्सी कन्सिस्टंट आहे.
ईन्कन्सिस्टन्सीने डोक्याला ताप देणारा खेळाडू म्हटले की पहिला आठवतो अजिंक्य रहाणे. कारण त्याच्या कित्येक मोक्याच्या वेळच्या खेळींमुळे तो संघातही असणे गरजेचे आहे.

आजची टी-ट्वेंटी मस्त झाली. आपला स्कोअर थोडा कमी वाटत होता, पण बॉलिंग जबरदस्त झाली. धवन, संजू आणि सूर्यकुमार ची बॅटींग बघायला मजा आली. वरुण चक्रवर्ती ला ह्या प्रकारात परिणामकारकरित्या वापरता येईल.

शॉ आणि सूर्यकुमार इंग्लंडमधे टेस्ट टीममधे सहभागी होणार. पृथ्वी साठी ही सुवर्णसंधी आहे.

* शाॅ आणि सूर्यकुमार इंग्लंडमधे टेस्ट टीममधे सहभागी होणार*. - आकर्षक व आक्रमक असूनही सूर्यकुमार खूपच भरवशाचा फलंदाज वाटतो. चांगलीच भर पडेल 'मिडल ऑर्डर ' फलंदाजीत त्याच्यामुळे. शुभेच्छा.

बातमी बघा आणि सांगा यांना कौतुक करायचे आहे कि टिका?

द्रविडच्या शब्दांनी श्रीलंकेचे नशिब बदलले; सामना सुरू असताना प्रतिस्पर्धी कर्णधाराला केले मार्गदर्शन

पाऊस गेल्यानंतर मैदान सुखवण्याचे काम सुरू होते. तेव्हा भारताचे कोच राहुल द्रविड आणि श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका यांनी थोडावेळ एकत्र घालवला. द्रविडने शनाकाला नेमके काय सांगितले हे कळू शकले नाही. पण एकूणच द्रविड रणनिती आणि गोष्टी कशा हाताळायच्या याबद्दल सांगत होता असे दिसते.
सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर मात्र श्रीलंकेने भारताला बॅकफूटवर नेले. फिरकीपटूंच्या जोरावर लंकेने भारताला २२५ धावांवर रोखले. त्यानंतर फलंदाजी करताना विजयाचे लक्ष्य ३९ षटकात ७ विकेटच्या बदल्यात पार केले.

हरकत नाही. जी व्यक्ती एव्हढ्या कमी वेळात प्रतिस्पर्धी सांघाचा खेळ उंचावू शकते ती स्वतःच्या संघाचा किती उंचावत असेल ? मला आक्षेप असता जर द्रवीड भारताच्या संघबांधणीमधे सामील नसता नि अन ऑफीशियल कॅपॅसिटी मधे प्रतिस्पर्धी संघाला मार्गदर्शन करत असता तरच. अर्थात हा फक्त तात्विक आक्षेप असेल.

आकर्षक व आक्रमक असूनही सूर्यकुमार खूपच भरवशाचा फलंदाज वाटतो.
>> +१ फक्त नेमका मागचा डोमेस्टीक सीजन ठिकठाक होता त्याचा तेंव्हा त्याला संघात उचलले ह्याची मजा वाटते. त्या आधी तो खोरे घेऊन उतरत होते तेंव्हा त्याचे नावही चर्चेमधे नव्हते Happy

Pages