Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ते गेमच्या स्पिरीटमध्ये नाही
ते गेमच्या स्पिरीटमध्ये नाही रडगाणे गाण्यात काय अर्थ आहे>> दुसर्याचा रडकेपणा कुणी दाखवून दिला तर तो रडगाणे होत नाही. रडकेपणा तो रडकेपणाच. पण ते हरण्याच कारण अस कुणी म्हणतच नाही आहे. ती फक्त न्युझिलंडच्या खेळायच्या पधतीवरची एक प्रतिक्रिया आहे.
कोहली ची आजची मुलाखत वाचली तर त्याने धावा न काढण्यावर भर दिला आहे. >> पहिल्या इनिंगला विल्यमन्स सुद्धा जवळपास पुजाराच्या रेटने खेळला. आपल्याला मॅच ड्रॉ करण्यासाठी ते आवश्यक होते. ऑस्ट्रेलियात विराट नसताना आपण जिंकलो याचे एक कारण पुजाराची स्लो बॅटिंग होती.
अपल्या टीम मॅनेजमेंटनी नाही म्हणल तरी न्युझिलंडला फार लाइटली घेतल अस मला वाटत. हीच मॅच जर ऑस्ट्रेलिया विरूद्ध असती तर आपण अजून जास्ती तयारी नक्कीच केली असती. असो.
जर रहाणे कॅप्टन असता तर
जर रहाणे कॅप्टन असता तर जिंकलो असतो. जोपर्यंत कोहली आहे तोपर्यंत कुठलीही फायनल भारत जिंकू शकत नाही. कोहली जर ऑस्ट्रेलियात बाकीच्या टेस्ट खेळला असता तर तिथे पण हरलो असतो.
*मग उगाच ते गेमच्या
*मग उगाच ते गेमच्या स्पिरीटमध्ये नाही रडगाणे गाण्यात काय अर्थ आहे?* - खिलाडू वृत्तीने खेळावं , हा लिखित नियम नसला तरी तो कोणत्याही खेळात सर्व नियमांचा पायाच आहे, हें गृहीत धरूनच मीं तरी खेळ खेळलो व खेळ पहातो. त्या वृत्तीनेच खेळावं कीं नाहीं, हा अर्थात प्रत्येकाचा निर्णय. पण कुणी तसं खेळला नाहीं तर त्याची नोंद घेणं हें 'रडगाणं' होत असेल, तर मात्र खेळाच्या बाबतीत आपले मतभेद फारच मूलभूत स्वरूपाचे असावेत !
दुसर्याचा रडकेपणा कुणी
दुसर्याचा रडकेपणा कुणी दाखवून दिला तर तो रडगाणे होत नाही.
>>>>>>>>
आक्षेप रडकेपणा दाखवण्यावर नाही तर त्यांनी जे केलेय त्याला रडकेपणाचा शिक्का मारणे या आरोपावर आहे
लेग साईड बॉलिंगला नकारात्मक डावपेच म्हणतात कारण यात हेतू स्पष्ट असतो - आम्हालाही विकेट नको आणि आम्ही तुम्हालाही रन्स मारू देणार नाही. सामना अनिर्णित राखायच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात म्हणून नकारात्मक डावपेच म्हटले जातात.
पण नकारात्मक डावपेच म्हणने वेगळे आणि रडीचा डाव म्हणने वेगळे. हे दोन वेगळे आरोप आहेत.
पातळी सोडून स्लेजिंग करणे, अंपायरवर दबाव टाकायला लाऊड अपील करणे, सामना अनिर्णित राखायला खोट्या एंज्युरी दाखवून वेळकाढूपणा करणे वगैरे हे रडीचे डाव झाले. पण नियमात राहून डावपेच वापरत असेल कोणी त्याला रडका, रडीचा डाव खेळणारा म्हणून हिणवण्यात अर्थ नाही. कमॉन अॅक्सेप्ट करूया, त्यांनी आपल्याला सर्वात मोठी मात डावपेचात दिली आहे.
आणि हो, मुळात न्यूझीलंडला जिंकायचे चान्सेस असताना ते सामना अनिर्णित राखायच्या हेतूने नकारात्मक गोलंदाजी करण्याचाही प्रश्नच नव्हता. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या अतिअतिआक्रमक डावपेचांना पलटवार म्हणून त्यांनी विकेट मिळवणे हा हेतू डोळ्यासमोर ठेऊनच थोड्यावेळासाठी हे डावपेच अवलंबवले आणि आपल्याला अक्कल न आल्याने यशस्वीसुद्धा झाले.
खिलाडू वृत्तीने खेळावं , हा
खिलाडू वृत्तीने खेळावं , हा लिखित नियम नसला तरी तो कोणत्याही खेळात सर्व नियमांचा पायाच आहे, हें गृहीत धरूनच मीं तरी खेळ खेळलो व खेळ पहातो.
>>>>>
खिलाडूवृत्तीला मी सुद्धा मानतो, पण त्यांनी जे केले त्यात खिलाडूवृत्ती नव्हती हे मान्य नाहीये
किंबहुना पराभव झाल्यावर तो स्विकारता न येणे यात मला खिलाडूवृत्तीचा अभाव वाटतो.
भारतीय संघाने, कोहली आणि शास्त्रीने आता हा पराभव सुद्धा स्विकारायला हवा. तसेच आपल्या काय चुका झाल्या हे कबूलही करायला हव्यात.
आमचे डावपेच योग्यच होते, पण ते चांगले खेळले म्हणून जिंकले ईतके बोलणे पुरेसे नाही. हट्टीपणे चुका मान्यच केल्यात नाहीत तर सुधारणार कसे...
*किंबहुना पराभव झाल्यावर तो
*किंबहुना पराभव झाल्यावर तो स्विकारता न येणे यात मला खिलाडूवृत्तीचा अभाव वाटतो.* - हा आरोपच खरं तर तसा आहे. इथे हरण्या-जिंकण्याशी निगेटीव्ह गोलंदाजीचा संबंध जोडण्यात आलेला नाहीं ना न्यूझीलंडचं जिंकणं त्यामुळे कमी लेखण्यात आलं आहे. जिंकले त्यांचं सगळंच आदर्श व हरले ते सर्वार्थाने कुचकामी, असं म्हणणं म्हणजेच खिलाडूवृत्ती का ? ऑसीज गुणवत्तेवरच जिंकत असत, तरीही त्यावेळी त्यांच्या उद्दामपणावर टीका व्हायचीच ना ! का तोही आपला खिलाडू वृत्तीचा अभावच होता ? आपला- परका, जिंकला- हरला यापलीकडे जाऊन योग्य- अयोग्य वाटतं तें म्हणणं हीच तर माझ्या मतें खरी खिलाडूवृत्ती !
जिंकले त्यांचं सगळंच आदर्श व
जिंकले त्यांचं सगळंच आदर्श व हरले ते सर्वार्थाने कुचकामी, असं म्हणणं म्हणजेच खिलाडूवृत्ती का ?
>>>
असे मी कुठे म्हटले आहे का?
पण हरल्यावर समोरच्यांनी जे नियमात राहून डावपेच वापरलेत त्याला रडीचा डाव वा रडकेपणा म्हणने हे पराभव स्विकारता न येण्याचीच लक्षणे आहेत.
ऑसीज गुणवत्तेवरच जिंकत असत, तरीही त्यावेळी त्यांच्या उद्दामपणावर टीका व्हायचीच ना !
>>>>
हे तुम्हाला माझ्या पोस्टमध्येही सापडेल.
हे बघा >>>> पातळी सोडून स्लेजिंग करणे, अंपायरवर दबाव टाकायला लाऊड अपील करणे, सामना अनिर्णित राखायला खोट्या एंज्युरी दाखवून वेळकाढूपणा करणे वगैरे हे रडीचे डाव झाले. >>>> यात ऑस्ट्रेलियन अहंकारातून आलेल्या स्लेजिंगलाही मी आरोपीच्या पिंजर्यात ठेवले आहेच
पण या उद्दामपणाला आणि कालच्या न्यूझीलंडच्या डावपेचांना एकाच पारड्यात टाकून रडीचा डाव बोलणे हे काही पटत नाही.
मुळात न्यूझीलंडला जिंकायचे
मुळात न्यूझीलंडला जिंकायचे चान्सेस असताना ते सामना अनिर्णित राखायच्या हेतूने नकारात्मक गोलंदाजी करण्याचाही प्रश्नच नव्हता. >> आपल्याला धावा न करू देणे हा रडीचा डाव होता हे जर कळू शकत नसेल तर पुढे बोलणे बंद. जेंव्हा सातव्या आठव्या स्टंपवर ओळीने ४० बॉल बोलिंग टाकली जाते त्याला विकेट घ्यायची स्ट्रॅटेजी म्हणण हे अती होतय.
पातळी सोडून स्लेजिंग करणे, अंपायरवर दबाव टाकायला लाऊड अपील करणे, सामना अनिर्णित राखायला खोट्या एंज्युरी दाखवून वेळकाढूपणा करणे वगैरे हे रडीचे डाव झाले. >> का बर. जो पर्यंत दंड होत नाही तोपर्यंत तेही लेजिटिमेट धरा की.
ड्रॉ करण्यासाठी टुकूटुकू
ड्रॉ करण्यासाठी टुकूटुकू खेळणं जर निगेटिव्ह नसेल, तर ड्रॉकडे जाण्यासाठी धावा रोखण्यासाठी केलेली गोलंदाजी निगेटिव्ह म्हणणं चूक आहे. फलंदाजी सामना वाचवायला केली तर काय ग्रेट डिफेन्स, आणि गोलंदाजी केली तर किती वाईट गोलंदाजी?!
पण हरल्यावर समोरच्यांनी जे
पण हरल्यावर समोरच्यांनी जे नियमात राहून डावपेच वापरलेत त्याला रडीचा डाव वा रडकेपणा म्हणने हे पराभव स्विकारता न येण्याचीच लक्षणे आहेत. >> पराभव स्विकारून न्यूझिलंडच कौतुक केल्यावर जाता जाता केलेली नोंद आहे ती. फालतू वाद घालायला मला आवडत नाही म्हणून हा विषय माझ्यासाठी संपला.
गोलंदाजी केली तर किती वाईट
गोलंदाजी केली तर किती वाईट गोलंदाजी?!>> माझा आक्षेप सातव्या आठव्या स्टंपवर बोलिंग करण्याबद्दल आहे.
माझा आक्षेप सातव्या आठव्या
माझा आक्षेप सातव्या आठव्या स्टंपवर बोलिंग करण्याबद्दल आहे. >> हा परसेप्शन बायस असावा. कारण मी बघताना मला प्रत्येक ओव्हरला १-२ बॉल्स तरी अंगावर दिसलेले आहेत. आता जाऊन कॉमेंटरी वाचली, तर त्याला दुजोराच मिळतो. जवळपास प्रत्येक ओव्हरला एक तरी बॉल रिबकेजकडे डिरेक्टेड आहे, एक बॉल मिडल आणि लेग वर आहे. जडेजा आणि पंतला खांद्यावर, हेल्मेटवर बॉल लागून बाईज मिळालेल्या आहेत. सातवा-आठवा स्टंप कंसिस्टंटली कुठेही दिसत नाही.
सोशल मिडियावर बरेच जण आता
सोशल मिडियावर बरेच जण आता शास्त्रीबुवांना बदलून द्रविडला आणा असा सूर लावायला लागलेत.... त्यात श्रीलंकेत आपला संघ जिंकला तर या मागणीला अजूनच जोर चढेल.

द्रविडचा मोठा फॅन असूनसुद्धा मला स्वतला त्याने भारतीय संघाचे कोच बनावे असे अज्जिबात वाटत नाही.... त्याची स्टाईल युवा किंवा अ संघासाठीच जास्त उपयुक्त आहे.
शास्त्रीबुवा असून नसून सारखेच आहेत हे मात्र खरे
त्यांनी त्यापेक्षा कॉमेंट्री बॉक्समध्ये परतावे
इंग्लंड ची मालिका पुजारा,
इंग्लंड ची मालिका पुजारा, रहाणे साठी महत्वाची आहे, ते विशेष यशस्वी झाले नाही तर कदाचित त्यांची शेवटची मालिका ठरू शकते. रोहित साठी पण opener म्हणून महत्वाची मालिका आहे खूप
"इंग्लंड ची मालिका पुजारा,
"इंग्लंड ची मालिका पुजारा, रहाणे साठी महत्वाची आहे, ते विशेष यशस्वी झाले नाही तर कदाचित त्यांची शेवटची मालिका ठरू शकते. रोहित साठी पण opener म्हणून महत्वाची मालिका आहे खूप" - पुजारा, रहाणे जरी अयशस्वी ठरले (ते यशस्वी च ठरावे अशा भरघोस सदिच्छा!!) तरी ऑस्ट्रेलियातल्या देदिप्यमान यशानंतर, एका सिरीज मुळे त्यांचं स्थान धोक्यात येईल असं वाटत नाही. तसंही असे काही विशेष निवडसमितीचं दार ठोठावणारे खेळाडू डोमेस्टीक सर्किटमधे दिसत नाहीयेत. शॉ परतला तर फार आवडेल. शर्मा just doesn't belong in test cricket. प्रश्न टॅलेंट चा नसून टेंपरामेंट चा आहे. कोहलीकडून एका मोठ्या सिरीज ची अपेक्षा आहे.
"शास्त्रीबुवा असून नसून सारखेच आहेत हे मात्र खरे" -
being in the right place at right time चं क्लासिक उदाहरण आहे तो.
इंग्लंड ची मालिका पुजारा,
इंग्लंड ची मालिका पुजारा, रहाणे साठी महत्वाची आहे, ते विशेष यशस्वी झाले नाही तर कदाचित त्यांची शेवटची मालिका ठरू शकते. रोहित साठी पण opener म्हणून महत्वाची मालिका आहे खूप >> +१. राहणेपेक्षाही पुजारा कडे बोटे अधिक दाखवली जात आहेत दुर्दैवाने. फे.फ. म्हणतो तसे डोमेस्टीक सर्किटमधे कोणीही नसताना बोटे दाखव्लेली खटकतात. आशा करूया कि राहुल किंवा विहारीला तिसर्या क्रमांकावर बळी देण्याची हि तयारी नसावी.
being in the right place at right time चं क्लासिक उदाहरण आहे तो. >> किवीजकडून २-० मार क खाल्यानंतर झालेल्या डाऊन अंडर दौर्यानंतर असे म्हणणे मला धाडसाचे वाटते. तो जे काही करतोय ते लागू होतेय हे नाकारता येणार नाही. फायनली त्याचे चांगले रेकॉर्ड मोठ्या कालावधीसाठी आहे हा भाग दुर्लक्षित करता येणार नाही. त्याने स्वतःही मी कोच पेक्षा टीम मॅनेजर आहे ह्यावरच भर दिलाय. नि बॅटींग नि बॉलिंग कोचच्या मुलाखतींमधून सुद्धा टेक्निकल अॅस्पेक्टअॅतेच बघतात असे वाटते. शास्त्रीबुवा मेंटल अॅस्पेक्ट कींवा टीम बिल्डींगकडे लक्ष देत असतील तर त्याला सध्या मी तरी पूर्ण मार्क्स देईन. ह्या टीममधे जेव्हढा विजिगुषू बाणा जाणवतो तेव्हढा आधी एव्हढा सातत्याने जाणवलेला आठवत नाही.
द्रविडचा मोठा फॅन असूनसुद्धा मला स्वतला त्याने भारतीय संघाचे कोच बनावे असे अज्जिबात वाटत नाही.... त्याची स्टाईल युवा किंवा अ संघासाठीच जास्त उपयुक्त आहे. >> +१
पराभव स्विकारून न्यूझिलंडच
पराभव स्विकारून न्यूझिलंडच कौतुक केल्यावर जाता जाता केलेली नोंद आहे ती. >>> मला फक्त तो रडीचा डाव, रडके वगैरे शब्द खटकला. जो कोणीही स्पोर्टसमन स्पिरीट मानतो त्याला हा शब्द एखाद्या शिवीसमान जिव्हारी लागू शकतो. तुम्ही नकारात्मक गोलंदाजी म्हटले असते तर त्या शब्दाला माझा आक्षेप नसता. आणि मी तुमच्याशी वाद घालत नसून फक्त न्यूझीलंडची वकिली करतोय. कारण त्यांचे स्पिरीट मला गेला वर्ल्डकप वा विल्यमसनपासूनच नाही तर फ्लेमिंग काळापासून आवडत आलेय.
जेंव्हा सातव्या आठव्या स्टंपवर ओळीने ४० बॉल बोलिंग टाकली जाते त्याला विकेट घ्यायची स्ट्रॅटेजी म्हणण हे अती होतय.
>>>
सातव्या आठव्या स्टंप बाबत खाली भास्कराचार्य यांनी लिहिले आहे.
आणि स्ट्रॅटेजी म्हणाल तर येस्स. एक सिंपल बेसिक रूल असतो, एक कप्तान म्हणून तुम्ही ते करा जे समोरच्याला बिलकुल नकोय. त्यावेळी भारतीय संघ जे करत होते ते कंटिन्यू करत राहू नये एवढेच त्यांनी बघितले. आपला रिदम ब्रेक केला. पण डोक्यात विकेट घेत सामना जिंकायचे होतेच. म्हणजे असावेच. कारण कोहली-पुजारा -रहाणे यांना तंबूत पाठवल्यानंतर जिंकण्याव्यतिरीक्त ते कसला विचार करत असतील असे मला वाटत नाही. स्विंग मिळायचा कमी झाला तसे त्यांनी आपल्या स्ट्रॅटेजी बदलल्या ईतकेच.
वर्ल्डकपला बघितले ना त्यांनी आपले काय केले. आधी सेफ गेम करत पुरेश्या धावा केल्या आणि त्यानंतर आपली स्ट्रेंथ तसेच भारताचा वीकनेस बघत सुरुवातीलाच आपली स्विंग गोलंदाजी घेऊन तुटून पडले. तोच आपल्या बलाढ्य फलंदाजीविरुद्ध जिंकायचा सर्वोत्तम पर्याय आहे हे त्यांना ठाऊक होते. ती सेमीफानयनल देखील त्यांनी आपल्याला स्किल लेव्हलपेक्षा डावपेचातच जास्त मात दिली होती.
सोशल मिडियावर बरेच जण आता
सोशल मिडियावर बरेच जण आता शास्त्रीबुवांना बदलून द्रविडला आणा असा सूर लावायला लागलेत.... त्यात श्रीलंकेत आपला संघ जिंकला तर या मागणीला अजूनच जोर चढेल.
>>>>>
द्रविड कुंबळे टाईप्स सिनिअर खेळाडूंना बिलकुल नको, तसे आता होणारही नाही. खेळाडूच याला तयार होणार नाहीत.
बाकी श्रीलंकेत तर आपला संघ एकूण एक सामना जिंकून येईल असे वाटतेय. कारण लंका आता पुन्हा ऐंशी नव्वदीच्या सुरुवातीसारखा साधारण संघ झालाय तर आपला दुय्यम म्हणवला जाणारा एकदम कचकचीत संघ आहे. सगळे तुटून पडणारेत बिचार्या लंकेच्या खेळाडूंवर.
रवी शास्त्री आणि विराट
रवी शास्त्री आणि विराट कोहलीचे नेहमीचे वाक्य We take Pitch and conditions out of equation. याला काही अर्थ नाही, pitch, condition ला लक्षात न घेता संघ जाहीर करणे यात शहाणपण नाही.
ज्या प्रकारे कोहलीच्या प्रेस
ज्या प्रकारे कोहलीच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर पुजारावर टीका होत आहे ते अनाकलनीय आहे.
मुळात हे बोलणं हे न्यूझिलंड नक्की कुठे आपल्या पुढे गेले (विल्यमसन, टेलरची स्टेडी बॅटिंग, बोलर्सना दमवून निष्प्रभ करा आणि मग धावा गोळा करा, जे आपल्याकडे पुजारा सोडून कुणी करत नाही.) हेच न समजल्यासारखं आहे.
ऑस्ट्रेलियातही पुजाराच्या याच खेळामुळे आपण गेम मधे राहिलो होतो.
सतत ही असली विधानं करणं, पिच आणि कंडिशन्स ना महत्व न देणं हेच अंगाशी आलंय.
आणि ज्या प्रकारे बाकी देशांचे दिग्गज कोहलीच्या कॅप्टन्सीची अन रोहितच्या टेस्ट ओपनर रोलची पाठराखण करताहेत ते बघून ती त्यांची स्ट्रॅटेजी असावी असंही वाटतंय.
किमान सबकाँटिनेंट बाहेर तरी मेकशिफ्ट ओपनर्सना खेळवण्यात पॉईंट नाही हे कधी लक्षात येणार आहे देव जाणे.
पुजारावरची टीका बघता (आणि गिलचं सलामीचं अपयश बघता) इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत रोहित सोबत मयंक ओपन करेल अन गिल तिसर्या नंबरवर खेळेल.
बोलिंग युनिटला प्रत्येक सामन्यात किमान धावांचं टार्गेट द्यायची वेळ आली आहे.
आपल नेहमीचच रडगाण आहे. पहिली
आपल नेहमीचच रडगाण आहे. पहिली टेस्ट झाली की अचानक टीम मधे जागा निर्माण होतात. horses for courses हे सत्य टीम मॅनेजमेंट का विसरते ?. दोन स्पिनर ही इंग्लंड मधे लक्झरी ठरू शकते बहुतेक वेळेला.
*मयंक ओपन करेल अन गिल तिसर्
*मयंक ओपन करेल अन गिल तिसर्या नंबरवर खेळेल.* - मयंकला ती संधी देवून झालीय व मगच गिलला ओपनर म्हणून खेळवलय ना. शिवाय, गावसकर तर प्रथमपासूनच गिल हाच तंत्रशुध्द ओपनर म्हणून नांवाजेल असं आग्रहपूर्वक सांगतोय. हा बदल संभवत नाही.
पहिल्या टेस्टला गील ऐवजी
पहिल्या टेस्टला गील ऐवजी विहारीला घ्याव. पूजाराला अजून एक संधी द्यायला पाहिजे. विकेट असेल त्याप्रमाणे शार्दूल/सिराज आणि आश्विन/ सर.
पण सध्यातरी त्याला विश्रांती द्यायची जरूर आहे. (Good for him). लहान वयात सगळेच सचिन नसतात).
(मी आधी गील ऐवजी चुकुन गेल लिहील. तसच व्हाव/होइल पुढे,
भूवनेश इंग्लंडला जाऊ शकत असेल
भूवनेश इंग्लंडला जाऊ शकत असेल तर तेही बघाव.
सगळ्यांनाच आलटून पालटून
सगळ्यांनाच आलटून पालटून खेळवावे म्हणजे हरलो तर 'संघात नसलेल्या खेळाडूची कमतरता' असे कारण देता येईल नि जिंकलोच तर 'बेंच स्ट्रेंग्थ किती जबरदस्त आहे' हे दाखवता येईल
. दोन स्पिनर ही इंग्लंड मधे लक्झरी ठरू शकते बहुतेक वेळेला. >> +१ जोवर खरच समर होत नाही तोवर ३+१ वर कायम राहतील तर बरे आहे. त्या तीन मधेही भुवी (त्याला घेऊन जावे अशी इच्छा) चा अॅड करून चौघांमधले तीन फिरवून खेळवता येतील पिचचा रागरंग बघून. सहावा नंबर विचारीला देऊन त्याला पारट टाईम स्पिन बॉलिंग करायला सांगता येऊ शकते. आपण इंग्लंड्मधेच थांबून मॅच प्रॅक्टीस न करता तीन आठ्वड्याच्या ब्रेक वर परत आलोय हे अॅनॉयिंग आहे. जर एव्हढा गॅप होताच तर एकच सामना का किंवा वेदर फोरकास्ट बघून सामना पोस्ट्पोन का केला नाही हे प्रश्न उभे राहतात.
जडेजा आणि अश्विन बॅटींगमध्ये
जडेजा आणि अश्विन बॅटींगमध्ये कॉंट्रिब्यूट करतात म्हणूनही दोघांना खेळवण्याचा आग्रह असावा..... बाकी शमी, बुमराह, इशांत वगैरेंचा बॅटींगला काडीचा उपयोग नाही. .... त्यात जोडीला भुवनेश्वर आला तर शेपूट अजुन मोठे होईल..... शार्दूल ठाकूर असेल तर बॅटींगला थोडा तरी उपयोग होईल.
टेल एंडर्सनी सामना वाचवण्यापुरती तरी बॅटींग केली पाहिजेल राव!
बाकी शमी, बुमराह, इशांत
बाकी शमी, बुमराह, इशांत वगैरेंचा बॅटींगला काडीचा उपयोग नाही. .... त्यात जोडीला भुवनेश्वर आला तर शेपूट अजुन मोठे होईल.
>> भुवीनी पूर्वी इंग्लंडमधेच बरी बॅटिंग केली आहे, पण आता इंज्युरी दूर ठेवायला थोडा सांभाळून खेळतो
शमी : पट्टे ओढा बॅटिंग, लागला तर चौका नाहितर परत
बुमराह आणि (सध्याचा) ईशांत : बॅटिंग म्हणजे काय रे भाऊ?
पूर्वीचा ईशांत किमान बॉल्स खेळून काढायचा
शार्दूल ठाकुरवर आजच सरणदीप सिंग (सिलेक्टर) चं स्टेटमेंट आलंय
हार्दिक पांड्याच्या बोलिंगचा भरवसा नाहिये, त्यामुळे शार्दुलला नेक्स्ट ऑलराऊंडर म्हणून तयार करा
(क्लब लेव्हलला ठाकुरनी ६ बॉल्समधे ६ सिक्सर्स मारल्या आहेत)
जडेजा आणि अश्विन बॅटींगमध्ये
जडेजा आणि अश्विन बॅटींगमध्ये कॉंट्रिब्यूट करतात म्हणूनही दोघांना खेळवण्याचा आग्रह असावा >> हो पण पण ते दोघे दोघांमधे एका पेसर चा स्लॉट खातात हा प्रॉब्लेम आहे. बर नुसत्या बॅटींग चा प्रॉब्लेम आहे त विहारी दोघांपेक्षा अधिक सरस बॅट्समन ठरतो. इशांतला कोणि तरी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्याची मोहाली मधली व्हीव्ही एस बरोबरची मॅच विनिंग इनिंग दाखवायला हवी. द्रविड मार्फे ला आत्तापासूनच प्रत्येक होतकरू बॅटसमनला थोडि बॉलिंग नि प्रत्येक होतकरू बॉलर्स ला थोडिफार तरी कामचला बॉलिंग करून घेण्याचा सराव द्यायला हवा. तुम्ही तेंडूलकर सारखे प्रोडीजी नसाल तर हा क्रायटेरिया मस्ट करायला हवा. आपल्याकडे ऑलराऊंडरची वानवा आहे तेंव्हा भावी कपिलचा शोध थांबवून प्रत्येक जण थोडाफार हातभार लावू शकला तर काही तरी कमतरता भरून काढता येईल.
ठाकूर तिसरा बॉलर म्हणून खेळण्यामधे माझ्या मते प्रॉब्लेम हा आहे कि शमी नि ठाकूर दोघेही विकेट टेकिंग ऑप्शन्स आहेत पण त्याच बरोबर कंट्रोल असणे हे त्या दिवशी बॅडवर कुठल्याबजूने उठलेत त्यावर असते. समजा दोघेही धावा लीक करायला लागले तर इशांत किंवा बुमरा एका बाजूने पुरे पडणार नाहीत. चार पेसर खेळणार असाल तर नक्कीच त्याचा विचार व्हावा.
3 किंवा 4 कितीही वेगवान
3 किंवा 4 कितीही वेगवान गोलंदाज गोलंदाज खेळवले तरी त्यात एक सिराज हवाच. उमेश यादव पण इंग्लंड मध्ये चांगला option आहे , स्विंग गोलंदाज म्हणून. सामने ऑगस्ट पासून आहेत त्यामुळे pitches थोड्या ड्राय असतील आणि 2 फिरकी गोलंदाज खेळवू शकतात.
कालची मॅच बघितली नाही का कोणी
कालची मॅच बघितली नाही का कोणी?
Pages