क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

कोहली गेला.. आता मजा आहे सामन्यात
भारत चांगला खेळला तर डिक्लेअर कधी करणार हा प्रश्न आहेच. किंबहुना न करता जास्तीत जास्त खेळतील..
पण तशी स्थिती न येता १५० चे टारगेट देत ऑल आऊटच झालो आपण.. तर न्यूझीलंडला ते न झेपून ते सुद्धा ऑल आऊट होणे... हि शक्यताही आहेच एक आपल्या विजयाची.

*आपण प्रतिकार कसा करतो हे पाहण्यासारखं आहे ना.* - तें आहेच. दोन्ही संघांची गोलंदाजीही पाहाण्यासारखीच. मीं फक्त सामना निकाली होण्याबाबत साशंक आहे इतकंच.

लंचला आपण लीड वजा करता ९८-५
कोहली पुजारा गेले तेव्हा हेच ४०-४ होते
रहाणे दुर्दैवी ऑट झाला, पण त्याला आधीही असे बाद होताना पाहिले आहे बहुधा..
पंत कसाही खेळू दे, पण धावा येणे गरजेचे होते त्या येत आहेत.
ऐतिहासिक सामना एका ऐतिहासिक फिनिशसाठी तयार होत आहे असे फीलींग येतेय Happy

मीं फक्त सामना निकाली होण्याबाबत साशंक आहे इतकंच. >> अजूनही ? Happy

आपण अति बचावात्मक खेळलो असे सारखे वाटले. विशेषतः किविज कडे पाच अचूक बॉलर्स आहेत नि पेशन्स + कंट्रोल हा त्यांचा सर्वात मोठा स्ट्रेंग्थ पॉईंट्स आहे हे लक्षात घेऊन आपण त्या ट्रॅप मधे अलगद स्वतःहून जाऊन अडकलो.

रच्याकाने, स्पिन बॉलिंग ला आयसीसी च्या द्रूष्टीने फारशी किम्मत नाही हे स्पष्ट झाले. आयडीयल पिच च्या कल्पना ह्या फक्त कल्पनाच आहेत हे उघड झाले. इंग्लंड मधले वेदर किती बेभरवशाचे असते हे माहीत असूनही तिथेच सामना ठेवण्याचा प्लॅन का ते माहीत नाही. हा सामना दोहा किंवा दुबई इथे असता तर खर्‍या अर्थाने आयडीयल पिच जिथे स्पिनर्स पण प्ले मधे आले असते जे बघायला आवडले असते. जेंव्हा एक संघ शून्य स्पिनर नि पाच स्विंग सीम बॉलर्स खेळतो तेंव्हा माझ्या मते तरी तो व्हेन्यू अशा मह्त्वाच्या सामन्यासाठी लायक नाही.

आपण अति बचावात्मक खेळलो असे सारखे वाटले. विशेषतः किविज कडे पाच अचूक बॉलर्स आहेत नि पेशन्स + कंट्रोल हा त्यांचा सर्वात मोठा स्ट्रेंग्थ पॉईंट्स आहे हे लक्षात घेऊन आपण त्या ट्रॅप मधे अलगद स्वतःहून जाऊन अडकलो. >> +१ त्यातून शेपटाला काढता न येणे हे किती वर्षं बघत बसायचं भारतीयांनी हा प्रश्नच आहे. आपलं शेपूट किती लगेच संपतंच.

रच्याकने,

Test batting average versus 'high' release points (2.15m+) from quicks since 2018:

Kohli 36.66 (6 wickets)
Rahane 29.66 (6 wickets)
Rohit 25.00 (3 wickets)
Pujara 19.90 (10 wickets)

Jamieson's average release point: 2.22m

*जेंव्हा एक संघ शून्य स्पिनर नि पाच स्विंग सीम बॉलर्स खेळतो तेंव्हा माझ्या मते तरी तो व्हेन्यू अशा मह्त्वाच्या सामन्यासाठी लायक नाही.* - पण व्हेन्यू असाच आहे हें आपल्यालाही माहित असून आपण दोन स्पिनर का खेळवले ? त्याबद्दल तर आपणच जबाबदार ठरतो ना ?( अर्थात, जर शेवटच्या सत्रात ते प्रभावी ठरतील असा विचार असेल व तो चुकीचा ठरला तरच )

पण व्हेन्यू असाच आहे हें आपल्यालाही माहित असून आपण दोन स्पिनर का खेळवले ? त्याबद्दल तर आपणच जबाबदार ठरतो ना ? >> अर्थातच . सामना सुरू व्हायच्या अगोदरच मी तसे म्हटले होते. "पहिला दिवस वॉश आउट होतोय हे बघून संघ बदलायला काहीच हरकत नाही."

पण मुद्दा तो नाही. ह्या अशा व्हेन्यूमूळे असा स्पिनर ना सो कॉल्ड टेस्ट चँपियनशिप मधे पेसर्स पेक्षा अधिक किम्मत आहे हा संदेश जातो आहे. चौथ्या पाचव्या दिवसांमधे स्पिनर प्ले मधे येणार जोवर जवळजवळ सामन्याचे पारडे एका बाजूने झुकलेले असणार हे आदर्श कसे हे मला कळत नाही.

अभिनंदन न्यूझीलंड. केन त्या चौकडीमधला बेस्ट आहे हे सध्या तरी स्पष्ट झालं आहे. ग्रेट ॲप्लिकेशन.

निकाल लागणार नाहीं हा माझा अंदाच चुकला. मान्य. न्यूझीलंड आपल्यापेक्षा अथिक शिस्तबद्ध खेळून जिंकले. आपला खेळही वातावरण आपल्यासाठी खूपच प्रतिकूल असूनही चांगलाच झाला, हेही नाकारतां येणार नाहीं. तेज गोलंदाजी व ती मुख्यतः बचावातमक खेळायचं कसब, एवढंच या फायनलचं वैशिष्ट!
न्यूझीलंडचं अभिनंदन!

काल दिवसाखेर हे स्पष्ट होतं की भारताला मॅच वाचवण्यासाठी खूप चांगलं (out of skin) खेळावं लागणार होतं. त्यातून सकाळी तिन्ही प्रमुख फलंदाज इतक्या झटपट बाद झाल्यावर मॅच न्युझिलंडकडेच झुकली होती. ५३ ओव्हर्स मधे १३९ चं लक्ष्य फारसं आव्हानात्मक नव्हतं. भारतीय संघानं शरणागती न पत्करता लढत चालू ठेवली हे बघून बरं वाटलं. ते दोन कॅचेस घेतले असते (निकालात काही फरक पडला नसता तरिही) बरं वाटलं असतं. जरी भारतीय संघ विजिगिषू वृत्तीनं खेळत असला तरी काही उणीवा सुधारण्याची संधी नक्कीच आहे.

टेल-एण्डर्स ची बॅटींग - जॉन राईट ने ह्या पैलूवर बरंच काम केलं होतं. वेळ प्रसंगी आशिष नेहरा सुद्धा नेटानं उभा राहिलाय.

बुमराह ची फिल्डींग - ऑस्ट्रेलियात त्याने बाऊंड्रीवर सोडलेला लबुशेन चा आणि आजचा विल्यमसन चा कॅच जरी मॅच च्या निकालाच्या दृष्टीनं गौण असले, तरिही इतकी गचाळ फिल्डींग हल्लीच्या क्रिकेटमधे अक्षम्य आहे.

ओपनर (किमान भारताबाहेर तरी): रोहित शर्मा कडे टेस्ट चं टेंपरामेंट नाहीये. तो थोडा वेळ बॅटींग केल्यावर अक्षरशः कंटाळतो. मान खाली घालून मोठ्या इनिंग्ज उभ्या करण्यासाठी / आव्हानात्मक परिस्थितीत टिकून रहाण्यासाठी लागणारा पेशन्स त्याच्याकडे नाहीये. गिल अजून नवखा आहे, पण टी-२० चा प्रभाव त्याच्या बॅटींगमधे सुद्धा जाणवतो - लाईन च्या बाहेर जाऊन खेळणां टी-२०मधे जरी रिवॉर्डिंग असलं तरी टेस्ट क्रिकेटमधे बॉल च्या लाईनमधे येऊन, सरळ बॅटने स्विंग होणार्या बॉल ला सामोरं जाणं हे टेस्ट ओपनरसाठी गरजेचं आहे.

टेल-एण्डर्स ची बॅटींग - आपली वाढवणे नि समोरच्यांची कमी करणे ह्या दोन्ही बाबींवर प्रचंड मेहनत घ्यायची गरज आहे हे परत जाणवले. सराव सामने का जरुरी असतात हे परत स्पष्ट झाले. बाहेर जाऊन पहिला सामना हरणे हि परंपरा आपण कायम राखली, किमान इंग्लंड विरुद्ध ह्याचा फायदा होईल अशी आशा बाळगूया.

न्यूझीलंडचा फोकसच वेगळा आहे पण. पुजारा ज्या पद्धतीने खेळून कमिन्स आणि हेझलवुडला नडला होता, त्याच पद्धतीने तो इथे खेळल्यावर जेमिसन आणि कंपनीच्या उलट पथ्यावरच पडलं. ते काही अनसेटल वगैरे झाले नाहीत. उलट परफेक्टली प्लॅन एक्झीक्युट केले.

ह्या अशा व्हेन्यूमूळे असा स्पिनर ना सो कॉल्ड टेस्ट चँपियनशिप मधे पेसर्स पेक्षा अधिक किम्मत आहे हा संदेश जातो आहे. चौथ्या पाचव्या दिवसांमधे स्पिनर प्ले मधे येणार जोवर जवळजवळ सामन्याचे पारडे एका बाजूने झुकलेले असणार हे आदर्श कसे हे मला कळत नाही. >>> साऊथहॅम्प्टनमध्ये मोईन अलीने ९ विकेट्स काढून आपल्याला इंग्लंडने २०१८मध्ये हरवलं होतं. तिथली माती इंग्लंडमधल्या इतर मैदानांपेक्षा लवकर सुटावते असं ऐकून आहे. आता पाऊसच आला तिथे आमाला पावर नाय म्हणतील ते. आज सकाळपर्यंत २२१.३ ओव्हर्सचाच खेळ झाला होता, त्यामुळे फुटमार्क्स, पिच वेअरींग वगैरे मुळातच झालेलं नाही.

आज आपण शेवटी अनाकलनीय डावपेचाने फलंदाजी केली. पंत सुरुवातीपासून पुढे येऊन मारत होता. आधी वाटले की दोन चार फटके बॉलरना अनसेटल करतोय. पण नंतर लक्षात आले त्याला तसेच खेळायचे आहे, किंबहुना भारताचा प्लानच तसा आहे. तेव्हा तो प्लान बरा वाटला. लंचनंतरही आले तेव्हा जडेजा आणि पंत दोघे आश्वासक पद्धतीने स्कोअरबोर्ड चालवू लागले. पण जडेजा गेला. तरी पंत व्यवस्थित खेळत होता. शॉर्ट बॉलला कंट्रोलमध्ये पुल करत होता. तसेच साऊथीची एक टेंम्प्टींग लाईनवर टाकलेली ओवर देखील बॅट न टाकता सोडून दिली. अजून आठदहा ओवर आणि आपला सामना सेफ होणार म्हणत मी चहा टाकला. ईतक्यात अचानक पंतने पुढे सरसावत मारले आणि कॅच देऊन बसला. कुठून आला तो शॉट देव जाणे. पर्सनली फार निअरश केले.
मग मी लगेच आता शेवटच्या तीन विकेट किती ओवर खेळल्या तर गेम सेफ होईल याचा हिशोब करू लागलो. पण कसले काय. पंत गेल्यावर गेमप्लान बदलत जास्तीत जास्त ओवर्स खेळायला बघायचे तर नाही. जो येतोय तो बॅट फिरवतोय आणि ऑट होतोय. रन्स जाऊ द्या, अजून दहाच वाढले असते तरी चालले असते. पण ओवर्स तरी दहाबारा कमी करायच्या होत्या. ड्रॉ करायलाही रन्स जरू होत्याच. पण ते रन्स मारायला पंत जडेजा होते तोपर्यंत ते मारणे त्यांचे काम होते. पण ते बाद झाले तर आश्विन ईशांत शमी बुमराह यांनी त्यांच्या परीने जमेल तितके बॉल खेळून काढायचे काम करायचे होते. ते त्यांच्या कुवतीनुसार होते. पण नाही. जणू काही पुरेश्या धावा झाल्या आहेत न्यूझीलंडला बाद करायला अश्या आविर्भावात का बॅट फिरवत होते समजले नाही. दोन टीममधील सर्वात मोठा फरक हाच होता. त्यांचा गेमप्लान, एक्झेक्युशन पर्रफेक्ट होते आणि आपला गंडलेला.

आता पाऊसच आला तिथे आमाला पावर नाय म्हणतील ते. >> बरोबर नि त्यासाठीच तीन सामन्यांची सिरीज हवी हे मला जास्त पटते. ते तसे करणे अशक्य नव्हते. दोन वर्षांपासून टाईम ब्लॉक् करता आला असता जसा वर्ल्ड कप साठी केला जातो. शेवटच्या सहा महिन्यांमधे कोण फायनल मधे येऊस शकेल ह्याचे संभाव्य चित्र स्पष्ट होत गेले की त्या यादीत नसलेले मोकळे करता आले असते. मूळात बीसीसीआय ने मनावर घेतले असते तर ही फायनल चंद्रावर पण नेऊन खेळवली असती Wink तसेही ह्या क्षणी विंडीज नि आफ्रिका वगळता बाकी सगळे संघ तंगड्या वर करून बसलेले आहेत तेंव्हा स्केड्युलिंग हि अतिशय लंगडी सबब वाटते. एक सामना ही लॉटरी आहे. त्यात खूप जर तर चा भाग येतो.

किविज बोरिंग पण अतिशय मेथॉडीकल क्रिकेट खेळतात ह्यात नवीन काहीच नाही. त्यामूळेच समोरची टींम अधिक इनिषियेटिव्ह घेऊन खेळू लागली कि मग त्यांची पंचाईत होते. इथे आपण तसे काहिही न करता त्यांच्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला नि तो अंगाशी आला. सराव सामने किंवा वेदर बघणे (हे पहिल्यांदाच झालेले नाहीये) अशा फुटकळ गोष्टींवर आपला फारसा विश्वास नाही हे आधीच माहित आहे. टेस्ट चँपियन शिप साठी आपण खर्‍या अर्थाने डीसर्वींग होतो ( एक किवि सिरीज वगळता बाकी आपण खर्‍या अर्थाने चुरशीने खेळलो आहोत) अशी संधी परत येईल असे मला तरी वाटत नाही ह्याचे दु:ख आहे.

*रच्याकाने, स्पिन बॉलिंग ला आयसीसी च्या द्रूष्टीने फारशी किम्मत नाही हे स्पष्ट झाले. * - 'स्पिन बॉलिंग'शिवाय इतर प्रकारच्या बाॅलींगला किंमतच द्यायची नाहीं, हा तर आपलाही अगदीं आतां आतापर्यंतचा दृष्टीकोन होताच ना ! Wink

अभिनंदन न्यूझिलंड. सर्वच बाबतीत एकदम प्रोफेशनल अ‍ॅप्रोच. तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्यापेक्षा चांगले एक्झिक्यूट केले. आपल्याला नेहमीच ते नडतात. आपणही तुल्यबल खेळलो असे म्हणणे हा विल्यम्सन्सचा मोठेपणा. ग्लॅमरस टीम नसल्यामुळे त्यांचे फारसे कौतुक होत नाही कधी. आता लोक दखल घेतील.

शास्त्रीबुवा काय करत होते?. मॅचच्या परिस्थिती प्रमाने पंतला खेळायला लावायचे की नाही. मॅच ड्रॉपर्यंतच्या परिस्थिती येउन कारण नसताना हरलो. अजून ३०-४० मिनिटे येवढाच प्रश्न होता. पण पंत हाच आपला भरवश्याचा फलंदाज ठरणार असेल तर आपल्या बॅटिंग बद्दल काय बोलायच. मी काल म्हणल्याप्रमाणे चहापानापर्यंत २०० धावा लागल्या असत्या तर मॅच सेफ होत होती. बूमराचा शून्य उपयोग झाला. तो आता खूप प्रेडिक्टेबल झालाय. अजिंक्य एकटाच दोन्ही इनिंगला कॉन्फिडन्ट दिसत होता. पण दोन्ही इनिंगला अचानक आउट झाला. दोन्ही वेळेस सगळे मुख्य फलंदाज खेळपट्टीवर टिकून मग आउट झाले. इथेच कोचचे महत्व असते.

काल थोडावेळ न्यूझिलंड रडीचा डाव खेळले असे मला वाटले. वॅगनर सतत लेग साइडला ६ फिल्डर लाउन खूप बाहेर निगेटीव बॉलिंग करत होता. जवळपास सहा षटकं. आउट घेण्यापेक्षा धावा द्यायच्या नाहीत असे धोरण होते असे मला तरी वाटले. जडेजाची विकेट मटक्याने मिळाली ही बाब अलाहिदा.

जेमिसन आपल्याला आणि इतर सर्वांना खूप त्रास देणार आहे अनेक वर्षे अस वाटतय. येवढ्या लहान वयात खूप चांगला गेम सेन्स आहे. आणि कधिही विकेट घेइल असे वाटत होते.

आता तरी पहिल्या टेस्टच्या आधी काही गेम्स खेळायला मिळायला पाहिजेत. नाहीतर बीसीसीआय च्या ताकतीचा काय उपयोग. तसे झाले नाही तर मात्र पहिली टेस्ट देवाला. Happy

अशी संधी परत येईल असे मला तरी वाटत नाही ह्याचे दु:ख आहे. >> येइल नक्की येइल. आपली खेळाडू घडवण्याची प्रोसेस चांगली आहे. आपण फायनलला पोचलो आणि जिंकण्याचे दावेदार होतो हे काही फ्लुक नाही.

*वॅगनर सतत लेग साइडला ६ फिल्डर लाउन खूप बाहेर निगेटीव बॉलिंग करत होता. * +1. अगदीं ' बाॅडी लाईन' बोलींगची आठवण यावी अशीच !

वॅगनर सतत लेग साइडला ६ फिल्डर लाउन खूप बाहेर निगेटीव बॉलिंग करत होता
>>>>>>
६ की ५ बघायला हवे नक्की, कारण बॉडीलाईन अवॉईड करायला टेस्टमध्येही नियम आहे लेगसाईड फिल्ड रिस्ट्रीक्शनचा. तसेच स्क्वेअर लेगच्या मागेही २ च फिल्डर ठेऊ शकतो असाही काहीतरी नियम आहे आणि बॉलर देखील विकेटच्या त्या बाजूने बॉलिंग करत असेल तर तो सुद्धा लेगसाईड फिल्डरमध्ये मोजला जातो बहुधा.. नक्की नियम काय हे चेक करावे लागेल पुस्तकात.

*6की ५ बघायला हवे नक्की, कारण बॉडीलाईन अवॉईड करायला टेस्टमध्येही नियम आहे लेगसाईड फिल्ड रिस्ट्रीक्शनचा* - तो नियमबाह्य गोलंदाजी करत होता असं मुळीच नाहीं. पण डावरया फलंदाजांना सतत ' राऊंड द विकेट' जावून फलंदाजांच्या अंगावर बोलींग करणं ही ' निगेटीव्ह ' बोलींग होती हें नक्की !
भारतीय गोलंदाज शेवटपर्यंत विकेट मिळवण्यासाठीच गोलंदाजी करत होते. ऑफ स्टंप बाहेर आऊट स्विंग गोलंदाजी करण्यासारख्या निगेटीव्ह टॅकटीज त्यानी सामना वांचवायला वापरल्या नाहीत. कोहली व कं.ला हें कौतुकास्पदच !

पॉपिंग क्रीजच्या मागे लेग साइडला दोन पेक्षा जास्त फिल्डर लावता येत नाहीत येवढा एकच नियम क्षेत्ररक्षणाबाबत आहे. त्यांचा एक फिल्डर डीप फाइन लेगला आणि तीन एकामागे एक स्क्वेयर लेगच्या दिशेने (त्यातले दोन पोपिंग क्रीज च्या रेषेच्या पुढे) , एक मिड विकेट आणि एक लाँग ऑन ला. हे नियमात बसणारे होते. पण रडके होते. लेग स्टंपच्या बाहेरच्या बाजूस टाकलेल्या बॉल वर अशी फिल्डिंग लावली तर स्कोअरिंग करणे कठिण असते, म्हणूनच मर्यादीत षटकांच्या सामन्यात लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाइड असेल असा नियम आहे.

पण डावरया फलंदाजांना सतत ' राऊंड द विकेट' जावून फलंदाजांच्या अंगावर बोलींग करणं ही ' निगेटीव्ह ' बोलींग होती हें नक्की !.. >> भाउ फक्त डावर्‍या नाही तर उजव्या फलंदाजासुद्धा त्याने ओवर द विकेट येउन तशीच वाइड आउट साइड द लेग स्टंप बोलिंग केली. दुर्दैवाने कुठल्याही तज्ञाने याची धावत्या वर्णनात नोंद घेतली नाही. उलट जडेजा आउट झाल्यावर (तो माझ्यामते मटका होता) "वॉट अ टॅक्टिक, जडेजा वॉज नाइसली सेट अप" अशी कॉमेंट केली.

*दुर्दैवाने कुठल्याही तज्ञाने याची धावत्या वर्णनात नोंद घेतली नाही* - मला वाटतं , तज्ञानी काय बोलावं व काय नाहीं याची यादी खूप मोठी असावी. That's why they must be playing safe while commenting ! शेवटीं, त्यांनाही स्वतःची विकेट संभाळायची असतेच ! Wink
*भाउ फक्त डावर्‍या नाही तर उजव्या फलंदाजासुद्धा त्याने ओवर द विकेट येउन तशीच वाइड आउट साइड द लेग स्टंप बोलिंग केली. * - डावर्‍या फलंदाजांच्या बाबतीत तशी गोलंदाजी शारिरीक इजेसाठी अधिक खतरनाक ठरूं शकते म्हणून मुद्दाम त्याचा उल्लेख केला. शिवाय, डावर्‍या फलंदाजांना तशी गोलंदाजी करताना तो मधेच 'रिटरन क्रिज 'ही ओलांडत असे व पुढच्या पायावर लक्ष केंद्रित असल्याने अंपायरच्या तें लक्षात येत नसे, हें मात्र समालोचक व तज्ञ यांनीही दाखवलं होतं.

दुर्दैवाने कुठल्याही तज्ञाने याची धावत्या वर्णनात नोंद घेतली नाही. उलट जडेजा आउट झाल्यावर (तो माझ्यामते मटका होता) "वॉट अ टॅक्टिक, जडेजा वॉज नाइसली सेट अप" अशी कॉमेंट केली. >> जडेजा एरवी अशा शॉर्ट पिच बॉलिंग ला नीत हुक नि पुल करतो. काल किती वेळा स्क्वेअर लेग वरून दाखवलेल्या कॅमेरामधे एका सरळ रेषेत ३ किंवा चार फिल्डर दिसत होते वॅगनर च्य अबोलीम्ग ला. पहिले चार बॉल्स शरीरावर होते नि जाडेजा नुसताच डिफेंड करत होता किंवा सोडून देत होता (एक कॅच मिस झाला त्याचा त्यात निकोल्स कडून). पाचवा चेंडू ऑफ वर होता पण त्याच लेंग्थ वर नि जडेजा ने नक्की काय केले त्यावर ते मला अजूनही कळले नाही. ना धड गाईड होता न धड लीव्ह होता . ह्या अर्थाने सेटप होता हे पटत नाह पण ती फिल्डींग लावून त्याला हुक पुल मारयला न देणे ह्या अर्थाने नक्कीच सेटप होता.
रच्याकाने वॅगनर वगैरे भारतमधे येऊन शॉर्‍ट पिच बॉलिंग करतील तेंव्हा बघायला मजा येईल. तिथे खरा कस लागेल जेंव्हा बॉल कमरेच्या खाली राहील नि स्विंग पण नसेल. साऊदी बोल्ट भारतात तुरळक अपवाद वगळता कमी ईफेक्टिव्ह ठरतात हे लक्षात घ्या. जॅमिसन बद्दल तो अजूण काही वर्षे खेळेतो मी मत राखून ठेवीन. मॅच्युअरिटी आहे नि हाईट चा फायदा घेण्याची अक्कल आहे हे नक्की पण एकदा त्याला सतत खेळू लागले कि सवय होईल नि मग तो किती बदल करू शकतो ह्यावर कळेल कि तो कुठे जाईल ते. सध्या पोषक अशा वातावरणामधे खेळून बराच इन्फ्लेटेड स्टॅट्स आहे. मॉर्ने मॉर्केल चे काय झाले ते आठवा.

'स्पिन बॉलिंग'शिवाय इतर प्रकारच्या बाॅलींगला किंमतच द्यायची नाहीं, हा तर आपलाही अगदीं आतां आतापर्यंतचा दृष्टीकोन होताच ना ! >> पिकते तिथे विकत नाही हेच खरे का भाऊ ? गेली वीस वर्षे आपण पेस वर पण बरीच मेहनत घेतो आहोत ना ? मार्की सामन्यामधे फक्त पेसर नी डॉमीनेट केले जावे असा सेटप असणे मला झेपत नाही.

जे नियमात बसते ते माझ्यामते रडके नाही. मग ते आश्विनने नॉनस्ट्राईकर फलंदाजाला केलेले धावबाद असो वा रन रोखायला केलेली लेगसाईड गोलंदाजी का असेना. सो कॉल्ड स्पोर्ट्समन स्पिरीटमध्ये जर हे मोजायचे असेल तर ईट्स ओके, जे दाखवतात ते स्पिरीट त्यांचे कौतुक करा, पण कोणी नियमात राहून वागत असेल त्याला ब्लेम करणे वा रडके म्हणने चुकीचे आहे. किंबहुना टेस्टच्या ईतिहासात हे काही पहिल्यांदा झाले नाही. आपणही या लाईनने स्पिनर लावले आहे जेव्हा समोरची टीम लवकर मारून डिक्लेअर करायच्या हिशोबात असेल. ईटस पार्ट ऑफ टेस्ट क्रिकेट म्हणून अ‍ॅक्सेप्ट केले पाहिजे. किंवा हे चुकीचेच वाटत असेल तर बदलायला नियमात आणखी काही बदल करा जसे बॉडीलाईन प्रकरणानंतर झाले.

पण खरी गंमत तर अशी आहे,
काल जेव्हा हे घडत होते तेव्हा सामना अश्या स्थितीत होता की आपल्याला रन्स मारण्याऐवजी त्यांना आपल्या विकेट काढायची जास्त गरज होती. पण आपणच शहाणपणा करून असे खेळत होतो जसे आपण डिक्लेअर करून त्यांना टारगेट देऊन गुंडाळणार आहोत. आपले हे अतिअतिपॉजिटीव्ह डावपेच त्यांनी ओळखले आणि आपल्याला आपल्याच जाळ्यात फसवले. रन्सच्या मागे न धावता त्या ओवर खेळून काढल्या असत्या तर त्यांनाच जिंकायचा जास्त चान्स असल्याने आणि त्यासाठी विकेट घेणे गरजेचे असल्याने त्यांनीच लगेच टॅक्टीक्ट्स बदलले असते. पण आपल्याला हा शहाणपणा दाखवताच आला नाही. खरंच काल काहीच क्लीअर डावपेच वा माईंडसेट नव्हते आपले Happy

*जे नियमात बसते ते माझ्यामते रडके नाही.* प्रत्येकाला आपलं मत असण्याचा अधिकार आहेच. पण , ज्या ' बाॅडी लाईन' गोलंदाजीमुळे क्रिकेटला काळीमा लागला, ती गोलंदाजीही त्यावेळी नियमबाह्य नव्हती, हेंही खरं.

कोहली ची आजची मुलाखत वाचली तर त्याने धावा न काढण्यावर भर दिला आहे. माझ्या मते त्यचा रोख मुख्यत्वे पुजाराकडे आहे. त्यामूळे समोरच्या फलंदाजावर विनाकार्ण ददपण येते नि बॉलर्स ना सेतप साठी वेळ मिळतो . बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे वगैरे वगैरे. पण मूळात पुजारा हे एकमेव कारण आहे का हरण्याचे ? फूल्टी टीम सिलेक्शन (जे अचूनही अचूकच होते असे साहेब म्हणतायेत), एकंदरीत सगळ्याच फलंदाजांछे कलेक्टीव फेल्युअर, जडेजाचा बॉलर पण फारसा उपयोग नसणे, टेल एंडर्स चे बॅटींग मधले शून्य काँट्रिब्युशन, किविज ची शेपूट वळवळणे - त्यांच्याविरुद्ध फारसे डावपेच नव्हते असे वाटत राहिलेले, एकंदर सामना पेस कसा करयाचा ह्यबद्दलची कमालीची सांशकता, मॅच प्रॅक्टीसचा अभाव हे सगळे घटक जबाबदार नाहीत का ? चूका काय झाल्या हे योग्य तर्‍हेने शोधले नही तर कसे सुधारणार आपण ?

ज्या ' बाॅडी लाईन' गोलंदाजीमुळे क्रिकेटला काळीमा लागला, ती गोलंदाजीही त्यावेळी नियमबाह्य नव्हती, हेंही खरं.
>>>>>
फरक आहे ना भाऊ. त्यावेळी ठोस नियम नसल्याचा फायदा ऊचलत त्यांनी हे केले आणि मग नियम बदलला.
ईथे असे होण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. हे आपण याधीही बघितलेय, हे चालतेच, आणि आजवर हे रोखायला नियम बदलायची गरज भासली नाही. मग उगाच ते गेमच्या स्पिरीटमध्ये नाही रडगाणे गाण्यात काय अर्थ आहे?

Pages