खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काय एकेक मेन्यू सर्वांचेच !! Happy
सा.खि. सा.खि. रे सा.खि. सा.खि.
Screenshot_20210521-125158_Gallery.jpg
पनीर +भाज्या पुलाव
Screenshot_20210521-125145_Gallery.jpg
आंब्याचा शिरा
Screenshot_20210521-125132_Gallery.jpg

सगळंच मस्त दिसतय..
बाय द वे..कोणत्या आंब्यांचा शिरा आहे ? कॅास्टोतल्यांचा चांगला लागेल का?

अरे e ते शिरा भात साखि... एवढे क्लोज अप फोटो टाकू नका... मी लॅपटॉपवरून बघत असल्याने तोंडात पडल्यासारखे वाटतेय Proud

Lol

Proud
माझ्या फोनचा camera चांगला आहे , त्यात फूड ऑप्शन निवडून लोकांना जळवता येते , त्यांना तोंपासु करून laptop ओले करता येतात.

ईसी बात पे ओळखा मग हे डोनटस आहेत की मेदूवडे
बरोब्बर्र ओळखणारयाला एक प्लेट सांबार फ्री फ्री फ्री

1621622287245.jpg

श्या.. व्हॉट्सप स्टेटस बघितलेल्यांनी उत्तर फोडू नका टाकायचे विसरलो Proud
हे घ्या रंगलेले डोनट.. उचला एकेक
खालचा माझा बूक झालाय Happy

1621626189962.jpg
.
1621626224967.jpg

सांबार फ्री म्हटल्याने डोनटच असेल असं वाटलं होतं बरं. दिशाभूल करायचा प्रयत्न लक्षात आला. Wink
अतिशय सुरेख डोनट्स!!

ते तर तेव्हाही ओळखलंच होतं..प्रश्नच चुकीचा विचारला होता.. चटणी हवी का सांबार? असं विचारायला हवं होतं.. पण डोनट्स भारीच झालेत

अस्मिता काय एक दे बढकर एक फोटो आहेत...शिरा तर सरळ उचलून खावासा वाटतो य..slrupp..
म्हाळसा आणि Runmesh... मस्त दिसत आहेत donut.. रेसिपी स्वतंत्र धागा काढून लिहा की

DD86DE50-92DF-47DB-8386-308058594477.jpeg

चाल - मेंदीच्या पानावर (खरंच मनात म्हणून पहा)

केळीच्या पानावर  इडली सांबार सजले गं
हाताच्या कोपरां ओघळ येऊन सुकले गं

सध्या इतकंच सुचतंय.. म्हणून आता खाऊन घेते Happy

खूप दिवसांनी आले आज खाऊगल्लीत
खूप छान वाटतंय. अस्सा निवांत वेळ आणि खाऊगल्लीची सफर ! ऐश आहे Wink

@ प्राजक्ता - नाचणी, खजूर आणि ड्राय फ्रुट्स चे लाडू >>> खूप मस्त दिसताहेत. हलवायाच्या दुकानात असतात तसे झालेत. मिळाले तर कित्ती छान ना ?

म्हाळसा - चुर्मा लाडूचा झब्बू कसला भारी आहे. जे फॉर झालं अगदी Lol
मृ - या इडल्या खाल्ल्या बरं का त्या गल्लीत. थॆंक्यु. आता शिळ्या झाल्या असतील Wink

माझे मन - छान आहे सामिष आहार. साधाच.

म्हाळसा देवी - चिकनचं प्रेझेंटेशन कसलं भारीय. अगदी प्रोफेशनल्स करतात तसं. एकच नंबर. Happy

व्हीबी ताई - मसाला आप्पे नाही खाल्ले कधी. बघायला पाहीजे करून.

एस एन एन - लसूण लच्छा पराठा / पनीर हरीयाली टिक्का - मस्तं नाश्टा आहे. आमच्याकडे ललपराठा असतो नेहमी. पण टिक्का त्याच्याबरोबर छान लागेल ना ?

म्हाळसा खरंचच युट्यूबर निघाल्या की. मला अजिबात ठाऊक नव्हतं. कसले अंदाज पर्फेक्ट असतात माझे ! मलाच फुल्ल मार्क्स Wink
चॅनेल बघते निवांत.

प्राजक्ता - स्टफ्ड पालक पराठा चा झब्बू भारी आहे. तोंपासु. लोणचं पाहूनच जीभ ओली झाली

लावण्या - इमेज डिलीट झालीय बहुतेक ..
बाकीच्या डिशेस पण बघून प्रतिसाद पण देतेय.

केळीच्या पानावर मेदूवडा फुलतो गं
जाळीदार इडलीत सांबारही मुरतो गं।

वरून तुझ्या हातचे बटाटेवडे पिवळे गं
अजून ही जिव्हा त्यांचा चवीने खवळे गं।।

किल्ली तै - बागेतला पेरू चांगला मोठा आहे.
व्हीबी ताई - आंब्याचा झब्बू. मज्जा आहे बागेतले आंबे !
एस एन एन - पुरण पोळी आमटी. तोंपासु पुन्हा एकदा.
प्राजक्ता - आताच पिठलं बनवलंय. दह्यातलं कसं असतं चवीला ?

दिप्ती - कांद्याची कचोरी .. भलतीच यम्मी दिसतेय. आता कडकडून भूक लागली.

म्हाळसा आणि प्राजक्ता - भारीये दोघी सुगरणी आहात

अस्मिता - आमरसपुरी भाजी. जेवायला नाही बोलवलं ना ? कट्टी ! Sad

लावण्या -आईस्क्रीम लाजवाब. अप्रतिम दिसतेय. स्क्रीनमधून डालो करावंसं वाटतंय.

Submitted by मानव पृथ्वीकर >> Lol

म्हाळसा खरंचच युट्यूबर निघाल्या की. मला अजिबात ठाऊक नव्हतं. >> मलाही ठाऊक नव्हतं

मलाही ठाऊक नव्हतं >>> तिथे लिंकच्या खाली कुणीतरी भारी आहे चॅनल तुमचा असे म्हटलेय. मी वर नंतर निवांत बघते असं म्हणालेय. सॉरी वेगळं काही वाटलं असेअ तर Happy

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे
अंड्याचा ऑल टाईम फेव्हरेट प्रकार .. डबल एग हाफफ्राय
जो स्वत:च्या हातचाच आवडतो Happy
बाहेर बिलकुल खात नाही..

1621816027260_0.jpg

Pages