क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

थोडंसं रेकॉर्डवर आहोत म्हणून - तेंडुलकरने 'धोनी वरती आला असता, तर त्याने अजून धावा केल्या असत्या' असं काही म्हटल्याचंच मुळात कुठे दिसलं नाही. गौतम गंभीरने गेल्या वर्षी अश्या अर्थाचं विधान जूनमध्ये केलं होतं, हे खरं. असामी, तुला बाय एनी चान्स ते आठवत असावं का?

https://www.hindustantimes.com/cricket/gautam-gambhir-believes-ms-dhoni-...

बाकी (अगदी सचिनने असं काही म्हटलं असेल तरी थोड्या कमी इंटेन्सिटीने का होईना) ह्या बाबतीत मी हाबशी सहमत आहे. रिटायर झाल्यावर लोकांच्या डोळ्यांवर गुलाबी चष्मे सहज चढतात. "म्हाराजांच्या टायमाला ..." असं सहज होतं. बिशनसिंग बेदी स्वतःला दुनियेतला आजवरचा ऑल टाईम ग्रेटेस्ट स्पिनरही समजतो. (आता भाऊ माझ्यावर व्यंगचित्रही काढतील, तरी चालेल. Lol तो ग्रेट आहेच. Happy जरा गंमत. ) विशेषतः गंभीर ऑफ द फिल्ड कधी काय बोलेल आणि त्यात किती विचार करेल, ह्याचा आता भरवसा नाही. तो पुरता राजकारणी झाला आहे. गंभीरला २०१९ वर्ल्ड कपमध्ये रवी आश्विन नं. ४ ला खेळायलाही हवा होता.

हे एकदीवसीय क्रिकेटच्या संदर्भाने असले तरी गंभीर, तेंडुलकरसारखा 'ऊपखंडातल्या संघांविरूद्ध' आणि 'पाटा विकेट्सवर' असे स्पेसिफिकली म्हणायचे विसरला नाही बरं का Proud

“MS Dhoni batting at No. 3 on flat wickets with the quality of bowling attack now in world cricket... look at Sri Lanka, Bangladesh, and West Indies in the current situation, with the quality there is in international cricket, MS Dhoni would have broken most of the records.”

असामी, तुला बाय एनी चान्स ते आठवत असावं का? > नाही भा, मी जे मला आठवतेय असे म्हटलय ते तेंडूलकर्चे विधान होते. त्याच मुलाखती मधे त्याने धोनी ला कप्तान करण्याबाबत कसे सुचवले होते हे विस्ताराने (पहिल्यांदा नाही) वगैरे सांगितले होते. म्हणूनच मी वरती कुठे तरी ते कधी म्हटले होते त्याबद्दल उल्लेख केला होता. प्रामआणिकपणे मला हे मी कुठे वाचले होते हे आठवत्नाही. शक्यतोवर क्रिकेट च्या कुठल्या तरी साईटस हे वाचलेले असाण्याची शक्यता आहे कारण तेइथेच मी डेलि व्हिसीट्स करतो.

राहुलचे ऊदाहरण फक्त एकदीवसीय टीमच्या अनुषंगाने दिले होते. (तसे नमूद करण्याचे मी विसरलो हे मान्य) >> बर्गा तू आजवर इतक्या वर्षाम्मधे एकदाही चुकीचा किंवा अतिरिक्त शब्द (वाक्य किंवा पोस्ट नाही) मी वाचलेले नाही. (हे कौतुक तुक). तेंव्हा मी नमूद करायचो विसरलो वगैरे मल्लीनाथी न करता चुकीचे उदाहरण दिले हे मान्य कर. It's OK to be wrong once in a while. तुला तेंडूलकरच्या विधानाबद्दल आक्षेप असेल नि त्याला क्रिकेटबद्दल फारसे कळत नाही असे तुला वाटत असेल तर त्याबद्दल अजूनबोल्ण्यासण्यासारखे माझ्यकडे नाही. माझ्या पेक्षा त्याला अधिक कळते असे मला वाटते त्यामूळे मी त्याचे विधान तुझ्या आकडेवारीपेक्षा अधिक मनावर घेईन. मी सेहवाग , अन्वर सारख्या प्लेयर ला जे कुठल्याही ओपनिंग बॅटस्मन्च्या डेफीनेशन मधे बसत नाही त्याला यशस्वी ओपनिंग करताना पाहिले आहे. हेडन , कटीच सारख्या प्लेयर्स ना जिगर, सेल्फ डिसिप्लिन च्या जोरावर खोर्‍याने धावा काढताना पाहिले आहे. त्यामूळे फक्त आकडेवारी दाखवून प्रत्येक गोष्ट १००% सिद्ध करता येण्यावर मी फारसा भर देणार नाही.

भारतात तरी सगळे माजी क्रिकेटपटू त्यांच्या सोबत खेळलेल्या खेळांडुंबद्दल चांगलेच बोलतात, पटत नसेल तर बोलत नाही पण सहसा टीका करत नाही. >> साधा माणूस, हे विधान मान्य आहे फक्त तेंडूलकरचे वाक्य हे फक्त चांअग्ले बोलण्यापलीकडे होते असे मला वाटते. म्हणजे धोनी चांगला कप्तान होता, बेस्ट कीपर होता वगैरे सिद्ध झालेल्या गोष्टीं पलीकडे जाऊन बोलण्याची गरज तेंडूलकरला नव्हती. तेंडूलकरचे जे काही बोलणे मी ऐकले आहे त्यावरून तो क्रिकेट बद्दल मनापासून बोलतो असे वाटते फक्त त्यामूळे हे तोंडदेखले विधान असावे असे वाटलेले.

अरे 'राहुल' आणि 'टेस्ट क्रिकेट' हे दोन शब्द एका वाक्यात मी दोन अडीच वर्षांपासून वापरलेले नाहीयेत. राहुल टेस्ट मध्ये ओपनर यावा की मिडल ऑर्डरमध्ये असा कुठलाही वाद/दुमत कोणीही कधीही केल्याचे ऐकिवात नाही. शिवाय तो जात्याच ओपनिंग बॅट्समन आहे आणि कायमच ओपनिंगला येतो मग धोनीच्या कसोटीतल्या पोझिशनबद्दल राहुलचे कसोटीतले ऊदाहरण मी का आणि कशाला देईन.

आता राहुलच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पोझिशनबाबत मात्र ओपनिंग की मिडल ऑर्डर असा बराच वाद होत असतो. तो चांगली ओपनिंग सुद्धा देऊ शकतो हे त्याने वर्ल्डकप मध्ये दाखवून दिले आहे. पण सध्या तो मिडल ऑर्डर मध्ये खेळत आहे. शर्मा वा धवन पैकी एक नसल्यास तो प्रीफर्ड ओपनर आहे.. टी२० आणि आयपीएल मध्ये सुद्धा तो सातत्याने ओपनिंग करतो आणि ओपनिंग त्याची फेवरिट पोझिशन आहे हे सुद्धा तो सातत्याने स्वतः म्हणतो. (आता ह्यात राहुल टेस्ट बॅट्समन म्हणून काही तरी संदर्भ आला का?) तर 'तो ओपनिंग पोझिशनला आल्यास जास्त ईफेक्टिवली रन्स बनवेल हे पटणे सोपे आहे' असे मी म्हणालो.
टेस्टमध्ये धोनीने असे कुठलेही दिवे वरच्या पोझिशनवर (एक-दोन अपवाद असू शकतील) लावलेले नाहीत.
ह्यात राहुलचे आणि धोनीची थेट तुलना करण्याचा ऊद्देश नसून समर्पक पोझिशन ठरवण्याबाबत ऊदाहरण द्यायचे होते ईतकेच. तू विश्वास ठेव की नकोस. Happy

तुला तेंडूलकरच्या विधानाबद्दल आक्षेप असेल नि त्याला क्रिकेटबद्दल फारसे कळत नाही असे तुला वाटत असेल तर त्याबद्दल अजूनबोल्ण्यासण्यासारखे माझ्यकडे नाही. >> मला तेंडुलकरच्या क्रिकेटज्ञानाबद्दल शंका आहे असे मी कुठे लिहिले? त्याचे स्टेटमेंट पीआर डृष्टीकोनातून आलेले आहे हे स्प्ष्ट आहे असेच मी लिहिले आहे. धोनीच्या टेस्ट रेकॉर्डविषयी बोलण्यासारखे काहीच नाही. मग कोणी त्याच्या टेस्ट बॅटिंग अपयशाबद्दल प्रश्न विचारला तर (जो विचारणे सहाजिक आहे कारण त्याच्या आधीचे सगळे कॅप्टन्स कुंबळे सोडून बॅटिंग लीजेंड्स होते) त्याने केलेल्या बॅटिंगबद्दल वाईट बोलून लाखो धोनी फॅन्सचा रोष ओढवून घेत 'पीआर नाईटमेअर' करून घेण्यापेक्षा न केलेल्या बॅटिंगबद्दल चांगले बोलून वेळ मारून नेणे ही स्ट्रॅटेजी तुझ्या लक्षात येत नसेल तर मी तुझ्याएवढा नाईव तेंडुलकर भक्त नाही असे म्हणेन. Happy

अमिताभ बच्चनला विचारले की जॉन अब्राहम एक अ‍ॅक्टर म्हणून कसा आहे तर बच्चन तो 'खराब आहे' असे थोडीच म्हणणार आहे. त्याने चांगले सिनेमे निवडले असते तर त्याची टेलेंटेड अ‍ॅक्टिंग आपल्याला दिसली असती असेच डिप्लोमॅटिक विधान तो करेल. अब्राहमचे लागोपाठ दहा सिनेमे फ्लॉप झाले आणि ईतर कोणीही त्याला 'गूड अ‍ॅक्टर' म्हणून आपल्या सिनेमात घेत नाही ही आकडेवारी बाजुला ठेऊन तुला 'बच्चन ऊवाच' म्हणून त्याच्या मताला देववाणी सारखे महत्व द्यायचे असेल तर.. so be it. What can I say?

तेंडुलकरपेक्षा मी धोनीच्या मताला जास्त किंमत देईन की आपला बॅटिंगचा वकुब ओळखून त्याने टेस्टमध्ये कधीही वरची पोझिशन फारशी ट्राय केली नाही. 'आपण वरच्या पोझिशनवर खेळलो तर खोर्‍याने रन्स बनवू' हे त्याला कळत नव्हते आणि तेंडुलकरला कळाले असे तुला म्हणायचे आहे का?
असे असेल तर ९०-१०० टेस्ट खेळून, कॅप्टन होऊन सुद्धा धोनीला टेस्ट क्रिकेट्मधली साधी बॅटिंग ऑर्डर कळत नाही असे तू ईंप्लाय करतो आहेस...हे तुझ्या ध्यानात आले का? Proud

सचिन जेव्हा ऑन कॅमेरा असतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कृत्रिम हावभाव वाटतात. खास करून तो जेव्हा बोलतो तेव्हा ओढूनताणून तो त्याचा चेहरा एक विशिष्ट साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं बोलणं नैसर्गिक वाटत नाही. सुरवातीला लहान असताना त्याची मुलाखत घेतली होती तेव्हा तो असा न्हवता.

ला तेंडुलकरच्या क्रिकेटज्ञानाबद्दल शंका आहे असे मी कुठे लिहिले? त्याचे स्टेटमेंट पीआर डृष्टीकोनातून आलेले आहे हे स्प्ष्ट आहे असेच मी लिहिले आहे. >> आधी राहूळ झाले. गेल्या आठवड्यात हे वरचे "काँफ्लीक्ट ऑफ इंटरेस्ट" होते, आज "पी आर' झाले आहे. तू आधी मुद्दा ठरवून आत्ता ठिगळे जोडतो आहेस हे प्रत्येक पोस्ट नंतर उघड होत आहे रे. एक पे रेहना रे !!!

त्याने चांगले सिनेमे निवडले असते तर त्याची टेलेंटेड अ‍ॅक्टिंग आपल्याला दिसली असती असेच डिप्लोमॅटिक विधान तो करेल. >> मान्य आहे. पण मूळात एखाद्यावर टीका करायची नसेल तर कौतुक करताना आऊट ऑफ द वे जाऊन असे लांगुलचालन करायची गरज तेंडूलकर ला पडेल असे तुला का वाटले ते मला अजूनही कळले नाही. त्याचे सपर्पक उत्तर तू दिलेले नाहीस. उगाच पी आर स्टंट वगैरे उत्तर देउ नकोस, तुलाही हे माहित आहे की तेंडूलकरला धोनीपेक्षा अधिक भक्त आहेत.

बर एक सांग तू छातीठिकपणे इथे बोंबलतो आहेस की धोनी ने वरच्या क्रमांकावर येऊन अधिक रन्स केलेच नसतेस. धोनी आहे तसाच खेळला असता तरी दोन आकडे वर येता तर अधिक रन्स तसेही सहजच झाले असते असे तुला का वाटत नाही ? ६-७ वर खेळणे ४-५ खेळणारे ह्यांच्या सरासरी तूला मी दाखवायची गरज नसावी ना रे ? धोनी क्रिकेट स्मार्ट होता , सेल्फ डिसीप्लीन्ड होता ह्याबाबत तुला वाद घालायचा नसेल असे मी धरतो (असेल तर सिरीयसली लेट्स स्टॉप राईट हीयर फॉर वन्स अँड ऑल) . उसळत्या चेंडूंचा त्रास त्याला कधी झाल्यचे जाणवले नाहीये. तो चांगला हूक मारू शकत असे नि बॉल अंगावर घेण्याबाबतही कधी मागे झाल्याचे आठवत नाही. स्वतःच्या मर्यादा ओळखून त्याने आपलि बॅटींग अ‍ॅडजस्ट केली आहे. परिस्थितीनुसार नेहमी आपल्या इनिंग्स बिल्ड केल्या आहेत त्यामूळे ऑब्वियस चूका किम्वा अन फोर्स्ड एरर्स टाळणे हा त्याचा स्थायीभाव होता. अर्थात ट्रॅप मधे अडकवण्यासाठी बॉलर्स ना अधिक कष्ट घ्यायला लगणार हे उघड आहे. स्विंग बॉलिंग मधे कमकुवत होता (असे मला वाटते) असे धरायचे तर न्युझिलंड मधले आकडे बघीतले तर ठामपणे म्हणता येत नाही. (इंग्लंड मधले खराब आहेत . पण अँडरसन नि ब्रॉड धुमाकूळ घालत असतानाचे आकडे बघायचे तर सचिन नि द्रविड पण धोनीच्याच रांगेत येतात). स्पिन चा कधी त्याला सातत्याने त्रास झाल्याचे आठवत नाही. टेक्निकली (क्लासिक टेक्निक) तो पर्फेक्ट नव्हता हे उघड आहे पण शार्प आय साईट नि हँड आय को ऑर्डीनेशन अफलातून होते हे तर उघड दिसते (हेलीकॉप्टर शॉट मारून बघ कळेल कधी तरी) . ह्या सगळ्या घटकांना एकत्र धरले तर वरच्या क्रमांकावर येऊन त्याने अधिक धावा केल्या नसत्याच हे ठामपणे मी तरी म्हणणार नाही. फॉर सेक ऑफ आर्ग्युमेंट भारताबाहेर नसत्या तरी भारतात (किंवा सब काँटीनेंट पिचेस वर तरी) त्याने अधिक धावा केल्याच असत्या ना ? (बाय द वे, तेंडूलकरने कुठेही त्याने अधिक धावा केल्या असत्या हे म्हटलेले नाही - तू सब काँटीनेंट पिचेस मधे आणले होतेस. तेच संगक्कारा , गिलख्रिस्ट ह्यांच्या उल्लेखाबाबत )

सचिन सुरुवातीला वनडेमध्ये मागे यायचा तसाच पुर्ण कारकिर्द आला असता तर त्याचे आकडे कसे असते Happy

आपल्याला पुढे येऊन खेळणारे बरेच मिळाले आहेत.
म्हणजे सचिन दादा द्रविड पासून आता धवन कोहली शर्मा पर्यंत आपली टॉप ऑर्डर नेहमी शतकवीरच राहिले आहेत.
पण मागे येऊन खेळणार्‍यांची आपल्याकडे धोनीपूर्व काळात बोंबच होती.
मी कपिलचा काळ पाहिला नाही पण माझ्या बालपणी जे पाहिले आहे त्यात तळाच्या वासरात एखादा रॉबिनसिंग वा नंतर कैफ आपल्याला ग्रेट वाटायचे. अर्थात त्यातही मागच्या शेपटाला सोबत घेऊन खेळेल असेही कोणी नव्हते.

दादाने धोनीला पुढे पाठवताच त्याने आपल्यातील मोठे तडाखेबाज शतक मारायची क्षमता दाखवली होतीच.. पण दादालाही माहीत होते की टीम कॉम्बिनेशनसाठी त्याची खरी गरज कुठे आहे. आणि पुढे धोनीही स्वतःकडे कप्तानी आल्यावर पुढे येत सेंचुरया बनवत बसला असता किंवा स्वतःला गिलख्रिस्टच्या भुमिकेत बसवायला गेला असता तर तळाचा दुष्काळ तसाच राहिला असता आणि कित्येक विजय कागदावरच राहिले असते.

आज जर कोणाला वाटत असेल की धोनी पुढे आला असता तर त्याच्या तंत्रातील सो कॉल्ड दोष उघड पडले असते तर तसे समजण्यास काही हरकत नाही. ही धोनीनेच संघहितासाठी मोजलेली किंमत आहे Happy

धोनीच्या टेस्ट बॅटिंग बद्दल खरे बोलून बॅड पी आर आपल्या वाट्याला येऊ नये (धोनीच्या करोडो फॅन्सचा रोष) म्हणून खोटे कौतुक करायचे ह्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट म्हणत नाहीत का? रिटायर्ड झाले तरी फेम आणि पीआर सांभाळावा लागतो सोशल लाईफमध्ये सेलिब्रिटिजना, फार खरे बोलून चालत नाही.
पुन्हा, तुला तेंडुलकरनेच हे विधान केले आहे का?, केले असेल तर किती कॅजुअली केले आहे, साध्या गप्पांत केले आहे की अ‍ॅनालिस्ट म्हणून केले आहे, कोणासमोर केले आहे असा काहीही आगापिछा माहित नसतांना 'फक्त तेंडुलकर ऊवाच' म्हणून तू जेवढ्या हिरिरीने ते डिफेंड करतो आहेस त्यावरून पुन्हा म्हणेन मी तुझ्याएवढा झापडबंद तेंडुलकर भक्त नाही. Happy

पण मूळात एखाद्यावर टीका करायची नसेल तर कौतुक करताना आऊट ऑफ द वे जाऊन असे लांगुलचालन करायची गरज तेंडूलकर ला पडेल असे तुला का वाटले ते मला अजूनही कळले नाही. >> रिटायर्ड झाल्यानंतर रिलेवंट राहण्यासाठी कराव्या लागतात रे अशा गोष्टी किंवा आधी म्हणालो तसे अडचणीत आणणार्‍या प्रश्नांना ऊत्तर देतांना वेळ मारून नेण्यासाठी असे बेसलेस, अघळपघळ बोलावे लागते जेणेकरून लोकांना बरे वाटेल.

तुलाही हे माहित आहे की तेंडूलकरला धोनीपेक्षा अधिक भक्त आहेत. >> Lol कमी अधिकचा प्रश्न नाहीच.. त्याचे पन्नास करोड असले आणि धोनीचे दहा तरी कोणीही शहाणा माणूस दहा करोड फॅन्सचा रोष ओढवुन घेत नाही. मागे हर्षा भोगलेला Rare off day for MSD behind the stumps? एवढ्या एका वाक्यासाठी पूर्ण आयपील आणि दोनेक टूर्स कसे बॉयकॉट केले गेले होते माहिती नाही का तुला?

बाकी शेवटचा पॅरा मी पूर्णपणे ऑप्शनला टाकतो आहे कारण..जर-तर, स्वप्नरंजन टाईप्स अर्ग्यूमेंट क्रिकेटच्या अ‍ॅनालिसिसमध्ये कामाला येत नाहीत हे मी खूप आधीच शिकलो आहे Happy

बाकी शेवटचा पॅरा मी पूर्णपणे ऑप्शनला टाकतो आहे कारण..जर-तर, स्वप्नरंजन टाईप्स अर्ग्यूमेंट क्रिकेटच्या अ‍ॅनालिसिसमध्ये कामाला येत नाहीत हे मी खूप आधीच शिकलो आहे > > थोडक्यात काय तर खोडता येत नाही पण मान्य करवत नाही. आले लक्षात रे.

रिटायर्ड झाल्यानंतर रिलेवंट राहण्यासाठी कराव्या लागतात रे >> किती हास्यास्पद विधाने करशील ह्या आर्ग्युमेंट मधे ? रिलेवंट राहण्यासाठी अशा गोष्टी कमीत कमी तेंडूलकर ला नाही काराव्या लागत रे अजूनही ! आजही तो तेव्हधाच ब्रेंड नेम आहे. आजही तो पॅव्हिलियन मधे आलेला दिसला कि लोक तेंडुलकर तेंडुलकर ओरडतात. मुंबई अजूनही तेंडूलकरची टीम म्हणून लआय्पीपील मधे फॉलो करतात. एकदा त्या आकड्याच्या दुनियेतून बाहेर पडून खर्‍याखुर्‍या जीवंत लोकांशी बोलून बघ.

धोनीच्या टेस्ट बॅटिंग बद्दल खरे बोलून बॅड पी आर आपल्या वाट्याला येऊ नये (धोनीच्या करोडो फॅन्सचा रोष) म्हणून खोटे कौतुक करायचे ह्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट म्हणत नाहीत का? >>
a situation in which the concerns or aims of two different parties are incompatible.
a situation in which a person is in a position to derive personal benefit from actions or decisions made in their official capacity.
A conflict of interest arises when what is in a person’s best interest is not in the best interest of another person or organization to which that individual owes loyalty.

अरे जे घडलेच नाही त्यात खोडायचे ते काय ? धोनीनेच बीलो अ‍ॅवरेज स्टॅट्स बनवून तेंडुलकरचे म्हणणे खोडून काढले आहे. Proud (हेच जर मांजरेकर म्हणाला असता तर तू एवढे मनावर घेतले नसतेस हे मला कळते Wink ) तुझ्यामते धोनी लीजेंड टेस्ट बॅट्समन होऊ शकला असता असे तुला वाटते तर ठीक आहे, ऊद्या तुला कार्तिकलाही लीजेंडरी टेस्ट बॅट्समन म्हणावेसे वाटेल. कोणाला काहीही वाटू शकते काय काय खोडणार.

किती हास्यास्पद विधाने करशील ह्या आर्ग्युमेंट मधे ? रिलेवंट राहण्यासाठी अशा गोष्टी कमीत कमी तेंडूलकर ला नाही काराव्या लागत रे अजूनही ! आजही तो तेव्हधाच ब्रेंड नेम आहे. आजही तो पॅव्हिलियन मधे आलेला दिसला कि लोक तेंडुलकर तेंडुलकर ओरडतात. मुंबई अजूनही तेंडूलकरची टीम म्हणून लआय्पीपील मधे फॉलो करतात. एकदा त्या आकड्याच्या दुनियेतून बाहेर पडून खर्‍याखुर्‍या जीवंत लोकांशी बोलून बघ. >> पुन्हा मिसप्लेस्ड भक्तीभावाचे प्रदर्शन. क्रिकेटच्या कंटेक्स्टमध्ये ह्या गोष्टी ईरिलेवंट आहेत. आता बिझनेस ईंट्रेस्ट्स आणि रेप्युटेशनल रिस्क जपणे हेच तेंडुलकरच्या जीवनाचे ईतिकर्तव्य आहे. जोवर तो गावस्कर, मांजरेकर, चोप्रा, भोगले सारखा अ‍ॅनालिस्ट आणि समालोचकांच्या मुख्य धारेत येत नाही तोवर त्याच्या मताला फक्त टीआरपी वॅल्यू आहे..क्रिकेटिंग वॅल्यू शून्य.

A conflict of interest arises when what is in a person’s best interest is not in the best interest of another person or organization to which that individual owes loyalty. >> करेक्ट. हेच तर म्हणत होतो मी. धोनीच्या टेस्ट करिअर वर टीका करणे (कॉल अ स्पेड अ स्पेड) तेंडुलकरच्या बेस्ट ईंट्रेस्टमध्ये नाही.

तुझ्यामते धोनी लीजेंड टेस्ट बॅट्समन होऊ शकला असता असे तुला वाटते तर ठीक आहे, >> एक मिनिट पॉज घे इथे. सर्व प्रथम, माझे सगळे पोस्ट्स पहिल्यापासून वाच नि मी कुठे हे असे विधान केले आहे हे हायलाईट करून दाखव. मी "तेंडुलकर ने धोनी अजून वरच्या क्रमांकावर येता तर अधिक रन्स काढता असे म्हटले आहे" हे विधान केले नि ते मला पटले असे नमूद केले. ते मला योग्य का आटते ह्याची कारणे मी वर दिली. ह्यातून "धोनी लीजेंड टेस्ट बॅट्समन होऊ शकला असता हे मी सुचवलेय,, संगक्कारा - गिलक्रिस्ट वगैरेच्या आसपास गेला असता" ह्या सगळ्या तुझ्या कल्पना भरार्‍या आहेत. नुसत्या धावा काढल्या कि लीजेंड टेस्ट बॅट्समन होतात असे मला वाटते, असे तुला का वाटते देव जाणे.

क्रिकेटच्या कंटेक्स्टमध्ये ह्या गोष्टी ईरिलेवंट आहेत. >>> हे तू ठरवलस ? सचिन मुंबई इंडियन्स चा मेंटर आहे. बीसीसीआय च्या Cricket Advisory Committee मधे होता ( दोन वर्षांपूर्वी conflict of interest - there was official conflict of interest recognized by Court appointed ombudsman and not something like one you are trying to conjure) भारतीय क्रिकेट च्या कोचच्या नेमणूकीमधे अजूनही कोणाचे मत घेतले जाते हे बघ. कुंबळे फियास्को नंतर शास्त्री साठी मध्यस्थ म्हणून कोणाला आणले गेलेले ते बघ. आता ह्या गोष्टी क्रिकेट शी संबंधीत नाही व्यवस्थापनाशी आहेत , मैदानी खेळाशी नाहीत वगैरे असा शब्दछ्ळ करायचा का ते बघ ? Wink त्या वरच्या conflict of interest मूळेच तो ऑफिशीयल कॅपॅसिटि मधे सध्या नाही.

अरे जे घडलेच नाही त्यात खोडायचे ते काय ? >> मान्य की धोनी वर खेळला नसला मुळे त्याबाबत तू काही बोलू शकत नाहीस पण त्या बेसीस साथी मला योग्य वाटलेले मुद्दे मी मांडले आहेत त्यावर उत्तर देता आले असते तुला. त्यातले पॉईटंस चुकीचे आहे हे मांडू शकला असतास की. आत्तापर्यंतच्या आकडेवारीने नि घटनांनी ते खोडू शकला असतास की.

करेक्ट. हेच तर म्हणत होतो मी. हेच तर म्हणत होतो मी. धोनीच्या टेस्ट करिअर वर टीका करणे (कॉल अ स्पेड अ स्पेड) तेंडुलकरच्या बेस्ट ईंट्रेस्टमध्ये नाही. >> तुला खरच conflict of interest समजत नाही ह्यापलीकडे काय बोलणार.

तेंडुलकर ने धोनी अजून वरच्या क्रमांकावर येता तर अधिक रन्स काढता असे म्हटले आहे" हे विधान केले नि ते मला पटले >>> 'अधिक रन्स ' ?नाही रे महाराजा....'खोर्‍याने धावा' असे तू म्हणालास. Proud खोर्‍याने धावा करणारे लीजेंडरी बॅट्समन (द्रविड, कुक, सचिन, पाँटिंग, कॅलिस) असे एक साधे लॉजिक लावले बघ मी. आता तू 'खोर्‍याने नाही पण अधिक धावा केल्या असत्या' असे म्हणत असशील तर मी तुला तेवढे तरी कन्विन्स केले असे समजतो. Proud
हे बघ साधे लॉजिक आहे... तुमचे मोस्ट टेक्निकली साऊंड बॅट्समन टॉप/मिडल ऑर्डरवर खेळतात... कुक, जी स्मिथ, आमला, कोहली, संगाकारा, स्मिथ, द्रविड, लक्ष्मण, पाँटिंग. एखादा सेहवाग असतो जो टेक्निकली साऊंड नसला तरी टॉप ऑर्डर खेळून रन्स बनवून दाखवतो एखादा लक्ष्मण असतो जो मिडल/लोअर ऑर्डर मध्ये किंवा कुठल्याही पोझिशनवर खेळून रन्स बनवतो. सो..टॉप ऑर्डरवर खेळण्यासाठी एक तर तुम्ही रन्स बनवलेले असले पाहिजेत किंवा टेक्निक तरी साऊंड पाहिजे की जेणेकरून अजून रन्स बनवलेले नसले तरी पुढे तुम्ही रन्स बनवू शकता ह्याची खात्री पटावी (एक मस्त ऊदाहरण लाबुशेन)
धोनीने टेस्ट मध्ये पाटा विकेट्सवरच्या दोन चार ईनिंग्स सोडून ना कधी रन्स बनवले ना कधी चेंडू/तास खेळून काढण्यासाठीची साऊंड टेक्निक दाखवली. लोअर ऑर्डर मध्ये जिथे गिलख्रिस्ट सारख्यांनी रन्स बनवले तिथे धोनी टॅलेंट असून अंडरअचिवर आहे असे तुझे म्हणणे असेल तर एकवेळ ते समजू शकते पण तो अपर ऑर्डरच्या कॅलिबरचा बॅट्समन होता हे तू म्हणणे किंवा तेंडुलकर म्हंट्ला म्हणून झापडबंद नजरेने त्याची री ओढणे माझ्यासाठी कल्पनेपलिकडे अ‍ॅबसर्ड आहे. अश्विन/जडेजा धोनीएवढ्या टेस्ट खेळले तर ते सुद्धा धोनीच्या बॅटिंग च्या रेकॉर्डच्या आसपास जाऊ शकतील, एवढे बीलो अ‍ॅवरेज बॅटिंग स्कील होते धोनीचे टेस्ट मध्ये. स्कील्/पोटेंशिअल पहिल्या १०-२० टेस्ट खेळेपर्यंत बघतात रे... ९०-१०० टेस्ट खेळलेल्याचा परफॉर्मन्स बघतात, जो धोनीचा बीलो अ‍ॅवरेज आहे.

भारतीय क्रिकेट च्या कोचच्या नेमणूकीमधे अजूनही कोणाचे मत घेतले जाते हे बघ. कुंबळे फियास्को नंतर शास्त्री साठी मध्यस्थ म्हणून कोणाला आणले गेलेले ते बघ. आता ह्या गोष्टी क्रिकेट शी संबंधीत नाही व्यवस्थापनाशी आहेत , मैदानी खेळाशी नाहीत वगैरे असा शब्दछ्ळ करायचा का ते बघ ? Wink त्या वरच्या conflict of interest मूळेच तो ऑफिशीयल कॅपॅसिटि मधे सध्या नाही. >> ईरिलेवंट. मी ह्या ऑफिशिअल कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट बद्दल बोलत नव्हतो. तू काहीतरी ओढून ताणून आणत आहेस.

तुला खरच conflict of interest समजत नाही ह्यापलीकडे काय बोलणार. >> हेच मी तुला म्हणतोय Proud

पराग अरे दोन मोठी माणसे बोलत असतांना शेंबड्या पोरांनी मध्ये मध्ये बोलू नये.
तू आधी चड्डी घालून ये पाहू, अशी शोभा बरी नाही. Proud

बर्गा शेवटी शब्दछळावरच उतरलास तू. " तो अपर ऑर्डरच्या कॅलिबरचा बॅट्समन होता " हे नवे असंप्शन. आधी तुझ्या मनाने लिजंडस चा निकष लावून लिहिलेस - खोर्‍याने म्हणजे लिजंड्स हा उपधागा. आता अपर ऑर्डरच्या कॅलिबरचा बॅट्समन हे नवे पिलू. ह्या न्यायाने नाईट बॅटस्मन म्हणून येणारे उद्या अपर ऑर्डरच्या कॅलिबरचे बॅट्समन आहेत असे 'मी' म्हणालोय असे माझ्या डोक्यावर चिकटवलेस तरी नवल नाही. 'वर खेळला असता तर अधिक्/खोर्‍याने धावा काढल्या असत्या' ह्यात अजून काय वेगळे अर्थ काढणार आहेस अजून ? "धोनी टॅलेंट असून अंडरअचिवर आहे " हे ही तुझेच वाक्य. टॅलेंट पेक्षाही क्रिकेटीग सेन्स आहे असे मी म्हटले असते. (वर दिलेली पोस्ट ' धोनी क्रिकेट स्मार्ट होता.... " एकदा परत वाच)

एवढे बीलो अ‍ॅवरेज बॅटिंग स्कील होते धोनीचे टेस्ट मध्ये. स्कील्/पोटेंशिअल पहिल्या १०-२० टेस्ट खेळेपर्यंत बघतात रे... ९०-१०० टेस्ट खेळलेल्याचा परफॉर्मन्स बघतात, जो धोनीचा बीलो अ‍ॅवरेज आहे. >> जनरल ३९ चा अ‍ॅव्हरेज आहे त्याचा. पहिल्या पाचांमधे मोजक्या पाच इनिंग्स खेळल्या त्यात तो ५३ पर्यंत वर सरकला (अर्थात इथे तू असे म्हण कि सॅम्पल स्पेस तुटपुंजी आहे.) आता सहाव्या क्रमांकापर्यंत बघितले तर २२ सामन्यांमधे ५५ आकडा येतो. पॉईटं हा की सोयीस्कर रित्या हवे तसे आकडे बघता येतात हे धरले तरी जेंव्हा जेंव्हा वर खेळला तेंव्हा त्याचे रन्स वाढलेले दिसले आहेत.

ईरिलेवंट. मी ह्या ऑफिशिअल कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट बद्दल बोलत नव्हतो. तू काहीतरी ओढून ताणून आणत आहेस. >> तुला खरच अर्थ कळत नाही कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट ह्याची पुरेपूर खात्री पटली. तो पूर्ण मुद्दा तेंडूलकर अजून क्रिकेट मधे ईरिलेवंट झाला नाहिये हे दाखवत होता नि त्यात अनुषंगाने कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट आले म्हणून तुला ते काय असते हे दाखवायला दिले होते. कमीत कमी तू तरी तेव्हढेच एक वाक्य बघ्त ज्या सोयीस्कर पणे त्या मुद्द्याला बगल दिली आहेस ते बघता तुला त्याचे उत्तर मिळत नाही हे परत दिसतेय.

*पराग अरे दोन मोठी माणसे बोलत असतांना शेंबड्या पोरांनी मध्ये मध्ये बोलू नये.* - उलट, मला तर वरची मोठयांची चर्चा वाचून ' लहानपण देगा देवा.... ' असंच वाटथंय !! Wink

शब्दच्छल कसा? 'धोनी टॉप्/मिडल ऑर्डर वर फलंदाजीला आला असता तर खोर्‍याने रन्स बनवले असते' हे हायपोथेसिस पडताळून पाहण्यासाठी त्याच्याकडे तिथे खेळण्यासाठीचे टेक्निक होते का किंवा त्याने लोअर ऑर्डर मध्ये खोर्‍याने रन्स बनवले होते का जेणेकरून त्याचे वरती प्रमोशन करणे शक्य होते हे बघणे जरूरी नाही का? आणि त्याच अनुषंगाने ईतर टॉप्/मिडलऑर्डर बॅट्समन सारखे कॅलिबर धोनीच्या खेळात होते का हे तुलनात्मक दृष्टीकोनातून बघणे शब्दच्छ्ल कसा होतो?

क्रिकेटिंग सेन्स कॅन नॉट रिप्लेस स्कील माय फ्रेंड. लिमिटेड ओवर्स मधल्या क्रंच मोमेंट्समध्ये क्रिकेटिंग सेन्स कामाला येऊ शकतो. टेस्ट मध्ये फक्त आणि फक्त बॅटिंग स्कील कामाला येते. पुजारा कडे असा कोण्ताही क्रिकेटिंग सेन्स नाही पण तो एक सक्सेसफुल अपर ऑर्डर टेस्ट बॅट्समन आहे.

पॉईटं हा की सोयीस्कर रित्या हवे तसे आकडे बघता येतात हे धरले तरी जेंव्हा जेंव्हा वर खेळला तेंव्हा त्याचे रन्स वाढलेले दिसले आहेत.>>
त्याच्या अ‍ॅवरेज संदर्भातले तुझे स्प्ष्टीकरण एक म्हत्वाची फॅक्ट इग्नोर करतात की ...हे सगळे रन्स ऊपखंडातल्या पाटा विकेट्सवर वीकर बोलिंग लाईनअपविरूद्ध आलेले आहेत आणि ईतर कंडिशन्स मध्ये तो पूर्ण फेल झाला आहे. त्याचा अवे अ‍ॅवरेज ३२ आहे आणि ह्या अवे मधे ऊपखंडातल्या पाकिस्तान, बांग्ला, श्रीलंका मधल्या मॅचेस सोडल्या तर २५-२६ चा अ‍ॅवरेज असेन. कुठला खोर्‍याने रन्स बनवू शकण्याचे पोटेंशिअल असलेल्या बॅट्समन हे स्टॅट्स जस्टीफाय करू शकते असे तुला वाटते?

कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट चा पॉईंट ड्रॉप करू यात, मी अनेकदा तो एक्स्प्लेन करण्याचा प्रयत्न केला पण त्यावरून तू एकदम वेगळ्या टँजेंटवर जात आहेस.

उलट, मला तर वरची मोठयांची चर्चा वाचून ' लहानपण देगा देवा.... ' असंच वाटथंय !! >> मलाही तुमची पांचट व्यंगचित्रे बघून तुमच्या बौद्धिक वयाविषयी संशय वाटतो पण मी तो नेहमी बोलून दाखवतोच असे नाही Wink

आता बिझनेस ईंट्रेस्ट्स आणि रेप्युटेशनल रिस्क जपणे हेच तेंडुलकरच्या जीवनाचे ईतिकर्तव्य आहे, अश्विन/जडेजा धोनीएवढ्या टेस्ट खेळले तर ते सुद्धा धोनीच्या बॅटिंग च्या रेकॉर्डच्या आसपास जाऊ शकतील, पुजारा कडे असा कोण्ताही क्रिकेटिंग सेन्स नाही >> हे सगळे असे वाचल्यावर मला फक्त पु.ल. चा अणुयुद्ध वाला फेमस कोट आठवत राहतो .

बर्गा माफ कर, मला पुढे ह्या चर्चे मधे सुतरामभर ही इंटरेस्ट नाही.

मला पुढे ह्या चर्चे मधे सुतरामभर ही इंटरेस्ट नाही. >> ठीक आहे नो वरीज. वी कॅन अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री यट अगेन.

फिल्मी, टेस्ट मध्ये पीचवर टिच्चुन ऊभे रहात रन्स बनवण्यासाठी लागणारे सगळे टेक्निकल स्कील्स पुजारा कडे असतांना, त्याने भारतात आणि भारता बाहेर खोर्‍याने रन्स बनवलेले असतांना ज्या क्रिकेटिंग सेन्सच्या कमतरते अभावी बॅट्समन म्हणून वनडे-टी२०, आयपील मध्ये पुजारा कोणाच्या खिजगणतीतही नसतो आणि जो क्रिकेटिंग सेन्स धोनीकडे चिक्कार आहे आणि त्याच्या जोरावर धोनी टेस्ट क्रिकेटमध्ये पुजारासारखा यशस्वी होऊ शकला असता असे असामी म्हणतो मी त्या क्रिकेटिंग सेन्स बद्दल बोलत होतो.

तुम्हाला काही वेगळे वाटते का?

जोरावर धोनी टेस्ट क्रिकेटमध्ये पुजारासारखा यशस्वी होऊ शकला असता असे असामी म्हणतो मी त्या क्रिकेटिंग सेन्स बद्दल बोलत होतो. >> कृपया नोंद घे की, मी धोनी कोणासारखा यशस्वी होऊ शकला असता असे कुठेही कोट केलेले नाही - अश्विन, जाडेजा, पुजारा, संगक्कारा, गिल्ख्रिस्ट किंवा इतर कोणीही नाही. बाकी पुढे चालू दे.

ओके. कदाचित तू ऊत्तर देणार नाहीस पण तुझ्या लेखी 'खोर्‍याने' रन्स बनवले असते ह्याला काही मापदंड नाही का?
त्याने ९० टेस्ट मध्ये ४८०० रन्स बनवले, त्याने जर साधारण तेवढ्याच टेस्ट मध्ये

५५००+ रन्स बनवले असते तर त्याला आपण गिलख्रिस्ट एवढे म्हणालो असतो
६०००+ रन्स बनवले असते तर त्याला आपण अरविंद डिसिल्वा एवढे म्हणालो असतो
७०००+ रन्स बनवले असते तर त्याला आपण युसुफ योहाना एवढे म्हणालो असतो
७५००+ रन्स बनवले असते तर त्याला आपण विराट कोहली एवढे म्हणालो असतो

असे...

शब्द छळ का म्हणालो ह्याचा अर्थ वरच्या पोस्ट मधे आहे बर्गा. खोर्‍याने हे विशेषण आहे 'आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त' एव्हढ्या साध्या सोप्या अर्थाने वापरलेले मी. तेंडूलकर खोर्‍याने म्हणालेला कि नाही हे माहित नाही कारण मी इंग्लिश मुलाखत वाचली होती. (नंतर अधिक लिहिलेलेही त्याच अर्थाने - अधिक किंवा खोर्‍याने कुठेही comparatives and superlative अशा अर्थाने नव्हते ) खेळाडूंच्या उल्लेखांबद्दल मला तुलना करायची असती तर तसे मी माझ्या पोस्ट मधे लिहिले असते. तुला तुलना करायची असल्यास तू जरूर करू शकतोस फक्त तसे स्पष्ट लिही, 'असामी म्हणतो' असे का ?

Pages