युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

पपई खिसून थालीपीठ, आंबोळी मध्ये घालता येईल
कोफ्ता-करी मधला कोफ्ता होईल, बाकी भाज्यांच्या बरोबर
हरभरा,मूग,मसूर डाळ भिजत घालून, जाडसर वाटून,नंतर पपई किस,ही मीरची,लसूण वगैरे घालून उन्हात वाळवून सांडगे करून ठेवता येतील

४-५ अवोकाडो एकदमच पिकलेत. मॅश करुन, लिंबू, मीठ, मिरी, मिरची घालून स्प्रेड बनवले तर ते फ्रिजमध्ये आठवडाभर टिकेल का ?

वर्षा, मीठ घालू नका. मीठाने रंग बदलतो. काढलेल्या गरावर पाणी/ विनेगर थर असे केले तर दोन दिवस रहाते फ्रीजमधे. काही अवाकाडोत ठेपले करुन संपवता येतील. मी लिंबाचा रस/ विनेगर घालून १-२ अवाकाडो गर एका पाकिटात असे फ्रीझरला टाकते. ३ महिने व्यवस्थित रहाते.

लिंबू घातलं तरी दोन एकच दिवस टिकेल.. काळं पडेल व खायची इच्छा होणार नाही.. पराठ्यात वापरा आणि स्प्रेड पण बनवा

पिकलेले न फोडता तसेच फ्रीज मध्ये रहतील दोन चार दिवस आरामात. रोज एक स्कूप करुन खा, थोडी ग्वाक करुन खा.
हौस असेल तर पराठे करा. अशक्य भारी लागतात. एकदम मऊसुत!

पराठे नॉर्मल कणिक घालूनच करायचे का? इंटरेस्टिंग वाटतायत.

अवाकाडो अति पिकले की खरंच वैताग येतो. मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ठीक राहतात. सॅलड कोशिंबीर ग्वाक काहीही केलं तरी त्याच दिवशी संपवावे दुसऱ्या दिवशी काळे पडतात.

हो हो.. कणिक घालून बनवायचे.. जीरा पावडर, मीठ, तेल घालून मळायचं.. घडीचा पराठा बनवायचा..साधा देखिल छानच लागतो

पराठे/ठेपले - अवाकाडोच्या गरात मावेल तितकी कणिक आणि आवडीनुसार हळद , तिखट, मीठ, धणे जीर्‍याची पावडर सढळ हाताने. नेहमी कणीक भिजवतो तितपत घट्ट भिजवायची. गरज वाटल्यास तेलाचा हात लावायचा. पोळपाटाला तेलाचा हात लावून किंवा पिठावर लाटून दोन्ही बाजूने भाजायचे.

मला वाट्ते एका गणेशो त्सवाच्या स्प र्धांमध्ये अवोकाडो चे अनेक पदार्थ आहेत. बघून घ्या. तेव्हा लोला ह्यंनी हे पराठे बनवायची कृती टाकली होती.

अव्होकॅडोचं कोशिंबीर, ग्वाकमोले केले तर काळं पडू नये म्हणून अव्होकॅडोची बी पण त्यात घालून ठेवायची.

अवकॅडो स्मुदी पण छान लागते. अँपल आणि अवकॅडो मिक्सरवर फिरवुन घ्यायचे आणि थोडं हनी घालुन हेल्दी आणि चविष्ट स्मुदी ब्रेकफास्टला खाऊ शकता. आवडत असेल तर किंचित सिनॅमन पावडर घातली की अजुन छान लागते.

वरच्या मिश्रणात दूध घालुन फिरवलं की अव्हकॅडो मिल्कशेक तयार. हा पण टेस्टी लागतो.

सुकामेवा बरेचजण भिजवून खातात. नाहीतर उष्ण पडतो म्हणे.
अक्रोड पण खूप उष्ण असतात.
माझी एक मैत्रीण अंजीर सुद्धा भिजवून खाते. 'कुठे, कशी वाळवतात काय माहिती. किती माशा, घाण पडत असेल त्यावर' असे तिचे म्हणणे आहे.

'कुठे, कशी वाळवतात काय माहिती. किती माशा, घाण पडत असेल त्यावर' असे तिचे म्हणणे आहे.>>>> हे आमच्याकडे खजूर, बेदाणे, मनुका खाताना पण असतं. मी बदाम, अक्रोड, काजू कधी खायचे असले तर तसेच खाते. खजूर कधी कधी धुवून खाते. बेदाणे मनुका मला आवडत नाहीत.

सर्वांना धन्यवाद.
प्राची हो, त्या लेखात सुकामेवा उष्ण पडतो त्यामुळे भिजवून खावा असे लिहिलेलं.

जाई, वॉलनट्स भिजविलेले चालतात. नट्स भिजविण्याचे कारण म्हणजे ते पचायला हलके होतात आणि लवकर शरिरात अ‍ॅबसॉर्ब होतात.
सेम आपल्या उसळींसारख.

ओल्ड लोकांना आजार पणा नंतर त्याना एनर्जी मिळावी म्हणून कोणते पदार्थ देता येतील जर त्याना भात आणी चपाती खाण्या ची इच्छा नसेल तर??

Pages