आता कशाला शिजायची बात- प्रीति- स्पायसी अवाकाडो सूप

Submitted by प्रीति on 6 September, 2014 - 22:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धे अवाकाडो
२ चमचा लिंबाचा रस
५-६ पुदिन्याची पाने
४-५ आल्याचे तुकडे
१ लहान मिरची
पाऊण कप व्हेजीटेबल ब्रॉथ
मीठ

क्रमवार पाककृती: 

आधी मिरची, पुदिना, आले, लिंबु मिक्सरमधे बारीक करुन घ्यावे.

आता त्यात अवाकाडो आणि व्हेजी ब्रॉथ, मीठ घालुन फिरवावे. पातळ हवे असल्यास अजुन ब्रॉथ घालावा.

सूप तायार आहे.

वाढणी/प्रमाण: 
एक माणुस
अधिक टिपा: 

लगेच प्यायले तरी छान लागते, अथवा गार करुन प्यावे. वरतुन क्रुटॉन्स टाकुनही छान लागते. आपल्या चवीनुसार सगळे जिन्नस कमी जास्त करता येतात.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवाकाडोची टेस्ट माहीत नसल्याने कल्पना करता येत नाहीये कसं लागेल ते Happy
फोटो मस्त दिसतोय Happy