खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ऋन्मेष, बरोबरच बोललात. भाज्या चांगल्या केल्या की कोणतीही भाजी खाल्ली जाते हा माझा अनुभव. आणखी एक (मजेदार)तत्व म्हणजे ‘भाजीत काहीही नाही घालायचं पण भाजी चांगली करायची’. काहीही म्हणजे कांदा लसूण टोमॅटो वगैरे वगैरे. अनेकदा फ्लॉवर, पानकोबी वगैरे भाज्यांमध्ये काहीच घालायची गरज नसते. त्यांची आपली स्वतःचीच चव इतकी छान असते की फक्त हळद, तिखट, हिंग घालून ह्या भाज्या उत्तम होतात. थोडा बटाटा, मटार दाणे, वरून घातलेली कोथिंबीर किंवा हिरवी ताजी मेथी, ह्यांनी आणखीच चव वाढते.

तोंडली आणली आहेत

काय होईल ?

बहुतेक बिर्याणी>>>> बिर्याणीच का? मसालेभात करा सायो यांच्या रेसेपीने, मटार एवजी तोंडली घाला. किंवा तोंडल्याची परतुन काप भाजी करतांना फोडणीत खडा हिंग कुटुन घाला. तिखट मीठ, किंचीत साखर व कोथिंबीर घाला. भाजी मस्त होते.

बिर्याणी ला तिचेच सहकारी बरे.

बाकी हा बाफ छळवादी आहे. चविष्ट खाद्यपदार्थ, उत्तम सादरीकरण आणी खानेके शौकिन. जबरी बाफ आहे.

तोंडली आणली आहेत

काय होईल ?>>>>>>

चटणी बनवा..भात/चपाती/डोश्याबरोबर छान लागते
सैपी आहे..तेलात जीरे,हिरवी मिरची, लसुण आणि बारीक चिरलेली तोंड मस्त सोनेरी परतून घ्यायची..मग जरा मीठ, चिंच जरा टाकून मिक्सरमध्ये फिरवायचं..फाईन ग्राईंड नाही करायचं..मस्त लागते.

तेंडल्याची भाजी बनवा. तोंडली चिरून, चार भाग (उभे) करून त्यात मीठ मसाला आणि चनाडाळ घालून पण चांगली होईल. वरून कांदा टोमॅटो वगैरे तुम्हाला चवीप्रमाणे.

कापून परतून भाजी केली

अशी भाजी करून झाली की त्यातच तयार भात घालून परतणे

तेंडली फ्राय राईस , उद्या होईल

ब्लॅककॅट +१
छान सुगरण आहात की.
मसाला भात पण. त्यात मटार पण टाका.
सोयाबिर्याणी + तोंडली हे पण कॉम्बिनेशन.

हळदीची भाजी
नवीन शेजारयांपैकी एक यूपीचे आहेत. त्यांनी दिलेली. अफलातून चव होती. घरात वाटणीवरून भांडणे झाली आमच्या.. Happy

1613752432632.jpg
.
1613752470207.jpg

हळदीचे लोणचे मी सुद्धा खाल्ले आहे. छान लागते. त्याची जशी चव लागते साधारण तोच फ्लेवर, अर्थात कारण हळदीचीच भाजी, पण सोबत फ्लॉवर वाटाणे वगैरे काही मिक्स भाज्या सुद्धा होत्या. ईतरवेळी मी मिक्स भाजीतून फ्लॉवर अलगद बाजूला ठेवतो. ईथे तो देखील चक्क आवडीने खाल्ला. आणि हे माझ्या बायकोनेही ऑब्जर्व करत बोलून दाखवले Happy

बिर्याणी आणि भाताचे सारेच प्रकार तोपासू..
तो ईडलीचाही फोटो खूप छान आला आहे..

@ मानवमामा
ओले हळकुंडच की आंबे हळद? >>> एवढे ज्ञान नाही मला Happy

रविवारचा गृहपाठ : खास व्हॅलेंटाईन डे निमित्त मंडळींसाठी बनवलेली बीट कोकोनट बर्फी. (यु ट्युब वरची रेसिपी. माझ्या अ‍ॅडिशन्स- वेगवेगळ्या रेसिप्यांची सरमिसळ करून Happy ) - एकदम टॉप क्लास.
IMG-20210214-WA0046[1].jpg

एक महिना गावी गेले होते तर बाळंतविडा म्हणून भरपूर अंडा कोशिंबीर अन दिवशी खायला मिळाली.
हे काही फोटो.

IMG_20210222_154709.jpg

IMG_20210222_154630.jpg


IMG_20210222_154605.jpg

Pages