माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००० होऊन गेले तरी अजुन सर्व इथेच कसे म्हणून संभ्रमात पडलेला धागा बोले मायबोली करांना - माझं काय चुकलं !!

ओ हॅलो, एक बिन्डोक प्रश्न,

वरिष्ठांना विचारता येत नाही. Happy मदत करा.

महिन्याभरात बरीच प्रगती केलीय. कुठल्याही साध्या पालेभाज्या, उसळी, कोशिंबीरी, पोहे. साखी हे प्रकार बर्‍यापैकी जमायला लागलेत. माझ्यावर विसंबून जेवणाची तयारी (मेनू) होतीय म्हणजे अ‍ॅप्रूवल आहे. पब्लिक मुकाट्याने खातय. काही टाकून द्यायला लागल नाही.

पण तीन चार वेळा करूनही भाकरी काही नीट थापता येत नाही. उचलताना एकदा तरी मोडते. पोळपाटाला चिकटते, पुन्हा गोळा करावा लागतो. हात इतके गच्च चिकट होतात की चमच्याने खरवडून काढावे लागते. फुगत नाही. काहीतरी टेक्निक सांगा. इज्जत पणाला आहे. Happy

विक्रम, पीठ खूप वेळ मळावे लागते. थापताना खाली कोरडे पीठ घ्या भरपूर. वरूनही पीठ लावत लावत थापा भाकरी. म्हणजे चिकटणार नाही.

ओके. धन्यवाद मंजूताई व प्राची,
खूप वेळ म्हणजे किती वेळ. योग्य मळून झालय हे कस ओळखायच. किती जाड थापली पाहिजे.
आणि अजून एक भाकरी किती मिनिटे तव्यावर भाजायची.
एखादी व्यवस्थित रेसिपी आहे का ?.

विक्रमसिंग, मी सुद्धा तुमच्यासारखीच भाकरी करायला शिकतेय. Happy
बाकी अजुन काही मदत लागली तर इथल्या सुगरणी करतीलच.
1. भाकरी वातट होऊ नये म्हणुन मी पीठ कोमट पाण्याने मळते.
2. पीठ मळताना परतीला चिकटलेलं पीठ आपोआप मिळुन येईपर्यत चांगल मळुन घेते.(कलथ्याने काढायची गरज पडत नाही..)
3. सुरवातीला माझी भाकरी साईडने चिरटुन तव्यावर जाण्याआधीच तुटायची. नंतर आई भाकरी थापताना कशी थापते ते निरीक्षण करुन मी भाकरी साईडने थापायला लागले तेव्हा कुठे भाकरी न चिरटण्याच प्रमाण कमी होऊन तव्यावर अखंड भाकरी टाकता यायला लागलीये.
4. भाकरी थापताना तांदळाची पिठी वापरते. त्यामुळे भाकरी पोलपाटाला चिकटायच प्रमाण कमी झालंय.

1. पीठ खूप जुनं नको.
2. कोमट पाण्यात मळा
3. तव्याला आच पहिल्यांदा भाकरी टाकताना खूप जास्त नको.
4. भाकरी टाकून लगेच पाणी फिरवा(पूर्ण सरफेस पाण्याने कोट करा).पाणी 5 ml पेक्षा जास्त नको.सरफेस नुसता कोट व्हायला जावा, सरफेस च्या विहिरीत पाणी दिसायला नको
4. पाणी फिरवून झाल्यावर हिट मोठी करून 15 आकडे नॉर्मल स्पीड ने म्हणा आणि भाकरी शांतपणे (खालून न खरावडता) उलटा.
5. आता 30 आकडे मोजा.आणि भाकरी उलथण्याने थोडी उचलून नीट समान भाजलीय का बघा.त्यावर ओले कच्चे पॅच दिसले नाही पाहिजे.
6. आता गॅस वर करत असल्यास शेजारचा गॅस लावून भाकरीची खाली असलेली(म्हणजे पहिल्यांदा पाणी फिरलेली) बाजू गॅस वर खालच्या बाजूला येईल अशी थेट गॅस वर भाजा.भाकरी थोडी तरी फुगेल.
7. खाली काढून लावायचे असल्यास तूप लावा किंवा थोडावेळ बाहेर ठेवून बंद डब्यात टाका.
बिगीनर असल्यास खात्रीशीर ताज्या पीठाने छोटी(3 इंच डायमिटर) भाकरी करा.पीठ पण जुने माणूस पण नवा असेल तर you are working with too many questionmarks at the same time.

Rofl सुई किंवा टोकदार वस्तूने भोक पडतं, पण चाकूने भोक नाही पडत,तर भसकन फाटतं, म्हणून भोसकणे मी काहीहि सांगते आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>> Lol फारच हसले वाचून

चिकटवणे चिटकवणे Lol

गावरान चव, युट्युब चॅनल वर व्हिडिओ आहे तो पहा विक्रम पारंपारिक पद्धतीने भाकरीचा.
पण पीठ उकडुन लाटुन भाकरी अगदी चांगली जमते. सोपी पण आहे करायला. व्हिडिओ मिळतो का बघते.

सॉरी अज्ञानी. मी तुमची पोस्ट बघितलीच नाही चुकुन . आता पोस्ट डिलीट करता येत नाही पण नविन धाग्यावर पण लिहिली.

धागा बंद झाला आहे.

दुधिची कोफ्ता करी केली होती. ग्रेव्हीच्या मानाने कोफ्ते जास्त झाले. ग्रेव्ही संपली आणि फक्त कोफ्ते शिल्लक राहिलेत. ( ग्रेव्ही मधे भिजलेले) काय करता येइल?

परत ग्रेव्ही करा! कंटाळा आला असेल तर रेडिमेड प्युरी वापरून शॉर्टकट मध्ये करा.
किंवा चेंज म्हणून कढी करून त्यात कोफ्ते घालून कढी पकोडे स्टाईल बनवुन बघा.
(हे मी केलेलं नाही, आमच्याकडे कोफ्ते ग्रेव्हीत पडायच्या आत भजी म्हणून येता जाता खाऊन संपतात.)

दोन ब्रेडच्या स्लाईस मध्ये केचप, कांदा, चीज स्लाईस असं टाकून जरा चपटवलेला कोफ्ता घालून सँडविच करता येईल.

चपातीवर तिखट हिरवी चटणी लावा, कोफ्ते तव्यावर भाजा आणि उभा चिरलेल्या कांद्यासकट चपातीवर ठेऊन काठी रोल टाईप्स रोल बनवा

ग्रेव्ही मधे भिजलेले म्हणजे मऊ आणि मसालेदार झाले असतील ना. मग त्यात थोडे पनीर घालून ते पराठ्याचे सारण म्हणून वापरा. पनीर पराठे म्हणून खपवता येतील Proud
ती. क. -मी हा प्रयोग केला नाहीये. पण काही उरले असेल ते पराठ्यात ढकलले कि आमच्या घरातले मिटक्या मारत खातात. Happy

अरे वा! बर्याच ideas मिळल्या. धन्यवाद सनव, सीमंतिनी, म्हाळसा, सोनाली. उद्या येते परत काय केले ते सांगायला.

म्हाळसा, तुम्ही सुचवल्याप्रमाणे, चपाती वर हिरवी चटणी , कांदा, लेट्यूस, चीज़ आणि शिल्लक कोफ्ते घालून काठी रोल केले. मस्त झाले होते. पुन्हा एकदा थँक्स !

नाचणीचे लाडू करायला भरपूर तुपात नाचणीचं पिठ भाजलं. पिठीसाखर मिक्स केली. तरी पण मिश्रण कोरडं कोरडंच वाटतंय. ऑलरेडी बरंच तूप घातलंय. अजून किती घालायचं म्हणून थांबले. काय करावं? मला छान तुळतुळीत लाडू करायचे होते.

मी पण हे भोगलं आहे.. कितीही तूप घातलं तरी ते कोरडेच होतात.. पिठी साखरे ऐवजी गुळाचा पातळ पाक बनवून त्यात तूपात भाजलेलं पिठ घातलं असतं तर वळता आले असते.. पिठी साखर जास्त नसेल घातली तर अजूनही गुळाचा पाक घालता येईल.. लाडू नाही वळता आले तर ताटात थापून वड्या पाडा

मला मदत करा प्लीज...
ड्रायफ्रुटची चिक्की केली, पण चिक्कीचा गुळ घातला नव्हता, साधाच. चिक्की पातळच राहीली.
मग चिक्कीचा गुळ आणून पाक करुन घातला. चिक्की बर्‍यापैकी जमलीये, वड्या पडल्यात, पण त्या परत पाघळत आहेत. काय करु??
वड्या घट्ट व्हायला हव्यात. आता गरम करता येणार नाही. पाक करपेल..
मदत करा.
लगेच खाऊन संपवता येणार नाही, बरीच आहे....खोबरं लावू का वरुन??

Pages