माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? 
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. 
हॉटेलसारखे क्रिस्पी हवे असतील
हॉटेलसारखे क्रिस्पी हवे असतील तर डबल फ्राय करावे लागतात.
पनीर स्वच्छ कपड्यात ठेवून दाबून घ्या नीट. पाणी निघून जाईल. मग तळायला घ्या. पहिला शॅलो फ्राय अन मग डीप फ्राय असे डबल फ्राय केले तरी चालेल.
बापरे. म्हणूनच हॉटेलात जास्त
बापरे. म्हणूनच हॉटेलात जास्त किमतीला विकतात बहुतेक.
पण नक्की बघणार प्रयत्न करून. पण त्याआधी पूर्ण ओटा रिकामा करून घेणार.
कांदा भजी कुरकुरीत
कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी काय घालावे माझ्या मऊ पडतात लगेच
कांदे उभे कापून त्यावर मीठ
कांदे उभे कापून त्यावर मीठ-तिखट, जिरे, हिंग, हळद, कोथिंबीर घालून चांगले मिसळावे. कांद्याला पाणी सुटल्यावर त्यावर बेसन आणि तांदूळाचे पीठ घालून चांगले मिसळून १५-२० मि. ठेवावे. आवश्यकतेनुसार पुन्हा पीठ मिसळावे. त्यात जराही पाणी घालू नये. मग मध्यम आचेवर तळावे.
sonalisl ने लिहिलं आहे तसं
sonalisl ने लिहिलं आहे तसं तांदूळ पीठ, मोहन हे तर घालावेच पण मध्यम आचेवर छान वर खाली हलवत भजी तळावीत म्हणजे आतपर्यंत नीट तळली जातात आणि कुरकुरीत होतात.
मी श्रिखंड केले पण त्याला
मी श्रिखंड केले पण त्याला दुसर्या दिवसापासुन पाणी सुटायला लागले. माकाचु?
कांदा भजी / कुठलाही भजी
कांदा भजी / कुठलाही भजी प्रकार करतांना तांदूळ पीठ वापरलं की भजी कडक होतात. अन खातांना ड्राय लागतात.
सो, तांपी ऐवजी, शिजवलेली तूर डाळ थोडी घातली की भजी जास्त खमंग होतात, तेलही कमी पितात, सोडा वापरायचीही गरज पडत नाही. करून पाहा.
मी श्रिखंड केले पण त्याला
मी श्रिखंड केले पण त्याला दुसर्या दिवसापासुन पाणी सुटायला लागले. माकाचु? >>>

- चक्का नीट घट्ट नव्हता
- गरमीमुळे फसफसण्यावर गेलं; हवा तसा थंडपणा मेंटेन नाही झाला
- पाकाचं केलेलं असल्यास, पाक गोळीबंद नव्हता
- ज्यानी कुणी ते घोटलं (पक्षी: नवरा) त्यानी नीट घोटलं नाही. आता तरी ठपका ठेवायला जागा मिळाली का नई?
- आमच्यात अस्संच करतात हाही एक उपाय आहे
धन्यवाद sonali मनीमोहर ,
धन्यवाद sonali मनीमोहर , योकु. तुम्ही सगळ्यानी सांगितल्या प्रमाणे करुन बघते आता.
मी रात्रीतुन वाचली होती
मी रात्रीतुन वाचली होती क्वेरी ते तांपी लिहायलाच आले होते. तुरीच्या डाळीची टिप मिळाली. मी आता एअर फ्रायरच घेणार आहे भजी वडे करायला. श्रीखंडाची काय आय्डिया येत नाही. एकदा वास घेउन बघा. ताजा चक्का असायला पाहिजे.
चक्का घरीच केला होता. दही
चक्का घरीच केला होता. दही बांधुन जास्त वेळ बाहेर राहिले होते पण मला वाटले थंडी आहे तर काही होणार नाही. घोटले मीच होते
सोडा न वापरता राजमा अगदी
सोडा न वापरता राजमा अगदी मऊसूत शिजवण्याच्या टिप्स द्या.
मी काश्मिरी राजमा वापरते. रात्रभर भिजवून एक शिट्टी झाल्यावर १५-२० मिनीटे बारीक गॅसवर शिजवते. मग फोडणी देऊन एक शिट्टी करून अर्धा तास तरी बारीक गॅसवर ठेवते. पण दाणा बिस्कीटासारखा मोडतो. गाळ शिजत नाही
राजमा भिजवलेले पाणी शिजायला वापरणे, शिजवताना मीठ घालणे, तेल/तूप घालणे याविषयी मत-मतांतरं आहेत. मी सगळ्या पद्धती वापरून पाहिल्या. इफेक्ट सेम.
माकाचु?
कडकडीत गरम पाण्यात भिजवून बघा
कडकडीत गरम पाण्यात भिजवून बघा व ४ तासांनी पाणी बदलून पुन्हा कडकडीत पाण्यात भिजवा
एक शिट्टी ऐवजी जास्त देऊन बघा , वेगळ्या जातीचे / वेगळ्या दुकानातले आणून पहा
पुढची वाक्ये हातात दिव्यांची माळ घेऊन वाचा
एकेकाचा हातगुण असतो बहुतेक !!!मी काहीही केले तरी काळे वाटाणे अजिबात म्हणजे अजिबात शिजत नाहीत अगदी १० १२ तास भिजवून १५ शिट्या देऊन सुद्धा !!
आणि सासूबाईंनी काहीही आणि कसेही केले/ केले नाही तरी त्यांनी काळे वाटाणे शिजवल्यावर अगदी छान मऊसूत शिजतात
राजमा मीही कालच केला होता
राजमा मीही कालच केला होता कुकर ला लाऊन 7-8 शिट्या काढल्या तरी कडकच..
मलाही तो मऊ शिजण्यासाठी उपाय हवाय.
Dmartची कडधान्य आणि डाळी नीट
Dmartची कडधान्य आणि डाळी नीट शिजत नाहीत. ग्रोसरी शॉप बदलून पहा
इकडच्या सुटरमार्केटमध्ये दोन
इकडच्या सुटरमार्केटमध्ये दोन प्रकारचे राजमे मिळतात..
एक मी नेहमी आणते फिक्या रंगाचा..सात शिट्ट्यात परफेक्ट शिजतो..
दुसरा डार्क रंगाचा, एकदाच ट्राय केला जास्त शिट्ट्या करूनही अजिबात शिजला नव्हता..
अंजली इज म्हणिंग रैट...
अंजली इज म्हणिंग रैट... रच्याकने, तुम्ही हाय अल्टिट्यूड ला आहात का? हार्ड वॉटर चा तर प्रोब्लेम नाही? जस्ट शक्यता...
कमी आचेवर १५-२० मिनिटे >>> इथे आच कमी म्हणजे एकदमच कमी होतेय का? नैतर सरळ दणादण ५-७ शिट्ट्या मोठ्या आचेवर अन मग लो फ्लेम वर अजून १० मिनिटं असं प्रयोगाखातर करून पाहा...
असा एक कण कमी शिजलेला राजमा
असा एक कण कमी शिजलेला राजमा चांगला नसतो म्हणे तब्येतीला..toxic असतो
योकू इज म्हणिंग द राइट! टॅप
योकू इज म्हणिंग द राइट! टॅप वॉटर वापरता का भिजवा/शिजवायला? ते हार्ड असल्यामुळे डाळी/कडधान्यं शिजता शिजत नाहीत. फिल्टर्ड/स्प्रिंग वॉटरमध्ये शिजवून बघा.
मंडळी, मला वाटते खरे कारण LPG
मंडळी, मला वाटते खरे कारण LPG असावे.
गॅस सिलिंडर बदलून बघा त्याने काही फरक पडतो का ते.
रिलायन्स च्या गॅस वर राजमा लवकर शिजतो अशी वदंता आहे म्हणे.
आता तर देवदास सारखं व्हायचं
आता तर देवदास सारखं व्हायचं राजम्या पायी, सबने बोला पहले राजमा बदलो, फिर पाणी बदलो, फिर गॅस बदलो और फिर टेकडीवरचं घरही बदलो.
छोटा लाल राजमा गडद रंगांचा तोच मूळ कश्मिरी असतो म्हणे. मला राजम्यात गडबड वाटते आहे. कॅनचा मिळतो का आपल्याकडे ? खूप शिळा किंवा जून असेल तरी असं होऊ शकतं म्हणे, असं इंटरनेट सांगत आहे.
पाणी/समुद्र सपाटी पासून उंची
पाणी/समुद्र सपाटी पासून उंची यामुळे असे होत असेल तर इतर पदार्थ त्या इतर दिवस शिजवत असताना लक्षात आले नसते का असे वाटून गेले. पण राजमा शिजवायचा काहीच अनुभव नसल्याने असेल राजम्यासाठी हे जास्त प्रमाणात लागु असे वाटून गप राहिलो. पण आता लोक गॅस पर्यंत पोचले तर वाटले पाजळून टाकावा आपला पण विचार.
@ anjali_cool कोकणातकाळे
@ anjali_cool कोकणात काळे वाटाणे शिजवताना नारळाच्या करवंटीचा तुकडा घालून शिजवतात. तुम्ही का.वा. आणि राजमा दोन्हीवर हा प्रयोग करून बघा.
भरतीच्या वेळी राजमा पटकन
भरतीच्या वेळी राजमा पटकन शिजतो. ओहोटीच्या वेळी शिजत नाही.
काश्मिरी राजमा म्हणजे डार्क
काश्मिरी राजमा म्हणजे डार्क आणि छोटा असतो तो वापरते. डी मार्टचा आणला होता. किमान अर्धा किलो घ्यावा लागतो. आता उरलेल्याचे काय करू? पाव किलोचे पॅकेट मिळाले असते तर वेगवेगळ्या दुकानातून आणता आला असता. तरी दुसरीकडून आणून पाहते. फिल्टर्ड वॉटर वापरत होते. आता साधे नळाचे पाणी कडकडीत करून वापरून पाहते. ७-८ शिट्ट्याही करेन बापडी. पण गॅस नाही हो बदलता येणार....बाहेरून ऑर्डर केलेला परवडेल त्यापेक्षा अधून मधून...
असलाच राजमा मेला मावशीकडे (मीच) केला होता तेव्हा बरा शिजला. जम्मूच्या मुलींनी तिला दिला होता. त्यांनी मला देण्याचा काही चान्स नाही
ता. क. कोकणी असल्याने आमच्याकडे काळा वाटाणा शिजतो. जीन सिक्वेन्स बदलून काश्मिरी नाही होता येणार....बाकी टिपा येऊ द्यात.
मंडळी तुम्ही लायटर कडे अजिबात
मंडळी तुम्ही लायटर कडे अजिबात लक्ष दिले नाही.. बरोबर नाही हे. पुढच्या वेळेस गॅस काडेपेटी ने पेटवून बघा. तसेच राजमा पाण्यात भिजवला की रात्री भांड्याच्या बाजुला राजमा शिजेना
राजमा शिजेना, पाहिले भांडे मी बदलून, सोडा ही बघितला घालून , मन खंत करी काही केल्या शिजेना असे गाणे लाऊन ठेवा.
वरची गंमत सोडून द्या राजमा जुना असल्याने कदाचित शिजत नसेल नीट असे वाटते आहे.
स्लोवर १ तास शिजवून बघ. मी
स्लोवर १ तास शिजवून बघ. मी छोले राजमा स्लोवर पाऊण तास शिजवते शिट्ट्या न काढता..
बेसिकली शिजवणे आणि शिजणे
बेसिकली शिजवणे आणि शिजणे ह्यांच्या आधी भिजवणे प्रक्रिया महत्वाची आहे. थोडं अधिक वेळ भिजत घालून पाहिले तर फरक पडेल. नाही पडला तर मात्र त्याचं राज शेवटी राजच्या आईला विचारावे लागेल. राज-माँ की जय हो.
एक राज निदर्शनास आलंय ते असे की २०००पेक्षा जास्त प्रतिसाद होऊन सुद्धा नवीन धागा न सुरु केल्याचा णिषेध म्हणून राजमा असे वागत असणार.
माझाही राजमा कधी मऊ शिजतो कधी
माझाही राजमा कधी मऊ शिजतो कधी नॉर्मल खाणेबल शिजतो.सगळे सोपस्कार नीट करून पण.भिजवणे, बऱ्याच शिट्ट्या इत्यादी.
घरचे गरीब आहेत.ते राजमा अगदी मऊसूत शिजला नसला तरी ग्रेव्ही ची चव छान आहे म्हणून खातात.
यावर अनेक भावनिक आंदोलनं मनात झाल्यावर मी राजमा पाहुणे आल्यावर न करण्याचे ठरवले आहे
इथे ज्यांचा राजमा प्रत्येकवेळी मऊसूत शिजतो त्या सगळ्या सुगरण आणि सुगरणोबाना माझा सादर प्रणाम.
कडधान्य जुने असल्यास मऊ शिजत
कडधान्य जुने असल्यास मऊ शिजत नाही.
का वा शिजवताना कूकरच्या शिटीने सुक्सुक केल्यावर 20-२५ मिनिटे गॅस मंद करून शिजवा.छान मऊ होतात.
Pages